soybean herbicide

शेतकरी मित्रांनो नमस्कार! शेतीविषयक अचूक माहिती देणाऱ्या आमच्या कृषी डॉक्टर वेबसाईटवर आपले सहर्ष स्वागत आहे. आज आपण सोयाबीन पिकामध्ये वापरता येणाऱ्या प्रमुख soybean herbicide (तणनाशके) बद्दल सविस्तर माहिती पाहणार आहोत. पीक कोणतेही असो, जर तणांचा प्रादुर्भाव असेल तर पिकाचे 60 ते 70 टक्के नुकसान निश्चित असते. त्यामुळे सुरुवातीचे 25 ते 30 दिवस प्लॉट तणमुक्त ठेवणे अत्यंत गरजेचे असते.

🌱 उगवणीपूर्वी वापरता येणारी तणनाशके

सोयाबीन पिकातील तण नियंत्रणासाठी योग्य वेळी आणि योग्य प्रमाणात औषधांचा वापर करणे आवश्यक आहे. अधिक शास्त्रीय माहितीसाठी तुम्ही भारतीय सोयाबीन संशोधन संस्था (ICAR-IISR) च्या वेबसाईटला भेट देऊ शकता. खालील तक्त्यात पेरणीनंतर लगेच (Pre-emergence) वापरण्याच्या औषधांची यादी आहे:

तणनाशकाचे नाव समाविष्ट घटक मात्रा (एकर) वापरण्याची वेळ आणि सूचना
Dost Super (UPL)
Dhanutop Super (Dhanuka)
Stomp Xtra (BASF)
Pendimethalin 38.7% CS 700 मिली लागवडीनंतर 48 तासांच्या आत.
सूचना: फक्त कोरड्या जमिनीवर वापरावीत व नंतर लगेच पाणी द्यावे.
Dost (UPL)
Plod (BASF)
Pendisul (Sulphur Mills)
Pendimethalin 30% EC 1 लिटर लागवडीनंतर 48 तासांच्या आत.
सूचना: फक्त ओल्या जमिनीवर वापरावीत (अगोदर पाणी द्यावे).
Strongarm (Corteva) Diclosulam 84% WDG 12.4 ग्रॅम लागवडीनंतर 48 तासांच्या आत.
Authority (FMC) Sulfentrazone 28% + Clomazone 30% WP 1 किलो लागवडीनंतर 48 तासांच्या आत.

🚜 Soybean herbicide: उगवणीनंतर वापरता येणारी औषधे

तणनाशकाचे नाव समाविष्ट घटक मात्रा (एकर) वापरण्याची वेळ
Shaked (ADAMA) Propaquizafop 2.5% + Imazethapyr 3.75% w/w ME 800 मिली पेरणीनंतर 25 ते 30 दिवसांनी (पीक 2 ते 3 पानांवर असताना).
Fusiflex (Syngenta) Fluazifop-p-butyl 13.4% EC 400 मिली पेरणीनंतर 25 ते 30 दिवसांनी (पीक 2 ते 3 पानांवर असताना).
Lagaam (UPL) Imazethapyr 10% SL 400 मिली पेरणीनंतर 25 ते 30 दिवसांनी (पीक 2 ते 3 पानांवर असताना).
Iris (UPL) Sodium Acifluorfen 16.5% + Clodinafop Propargyl 8% EC 400 मिली पेरणीनंतर 25 ते 30 दिवसांनी (पीक 2 ते 3 पानांवर असताना).

फवारणी करताना कोणती काळजी घ्यावी?

  • 1.
    तणनाशकांचा वापर नेहमी शिफारशीनुसारच करावा.
  • 2.
    जास्त ढगाळ किंवा पावसाचे वातावरण असेल तर फवारणी करणे टाळावे.
  • 3.
    भर उन्हात कधीही फवारणी करू नये.
  • 4.
    तणनाशकांसोबत स्टिकर व्यतिरिक्त इतर कोणतेही कीटकनाशक किंवा औषध फवारू नये.
  • 5.
    फवारणी झाल्यानंतर हात, पाय व फवारणी यंत्रे स्वच्छ धुवून ठेवावीत.
  • 6.
    फवारणी करताना कोणत्याही प्रकारचे मद्यपान करू नये.
  • 7.
    फवारणीनंतर औषधांच्या रिकाम्या बाटल्या किंवा पॅकेटची योग्य विल्हेवाट लावावी.

हे लेख देखील नक्की वाचा:

सारांश

मित्रांनो, आशा करतो की आजच्या लेखामध्ये दिलेली soybean herbicide बद्दलची माहिती तुम्हाला नक्कीच उपयुक्त वाटली असेल.

योग्य वेळी आणि योग्य प्रमाणात तणनाशकांचा वापर केल्यास तुमचे पीक तणमुक्त राहील आणि उत्पन्नात भरीव वाढ होईल. शेतीविषयी नवनवीन माहितीसाठी आमच्याशी जोडलेले राहा. धन्यवाद!

सतत विचारले जाणारे प्रश्न (FAQs)

प्रश्न 1: सोयाबीनसाठी कोणते तणनाशक सर्वोत्तम आहे?

उत्तर: उगवणीपूर्वी Dost, Plod, Strongarm किंवा Authority यांचा वापर करू शकता. तर उगवणीनंतर Shaked, Fusiflex किंवा Lagaam यांचा वापर करणे उत्तम ठरते.

प्रश्न 2: तणनाशक किती दिवसांनी फवारावे?

उत्तर: उगवणीनंतरचे तणनाशक पेरणीनंतर 20 ते 25 दिवसांनी फवारणे सर्वात योग्य असते.

प्रश्न 3: सोयाबीन पिकातून तण कसे दूर ठेवावे?

उत्तर: यासाठी तुम्ही वेळेवर खुरपणी करणे किंवा तण उगवण्यापूर्वी व उगवल्यानंतर शिफारशीत तणनाशकांची योग्य फवारणी घेऊ शकता.

KD

लेखक

कृषी डॉक्टर – सूर्यकांत कांबळे

पत्ता: इर्ले, ता. बार्शी, जि. सोलापूर, महाराष्ट्र – 413412
संपर्क: +91 8956970102

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *