नमस्कार शेतकरी मित्रांनो, krushi doctor या वेबसाईटवर आपले आम्ही सहर्ष स्वागत करत आहोत. आज आपण या लेखांमध्ये सोयाबीन पिक लागवड माहिती (soybean Lagwad) याविषयी सविस्तर पणे पाहणार आहोत.त्यामध्ये आपण उत्पाद्कता वाढवण्याचे उपाय , सुधारित वाण, जमीन, हवामान, सोयाबीन पीकसाठी जमिनीची पूर्वमशागत कशी करावी, सोयाबीनची पेरणी कधी आणि कशी करावी, आंतरपीक पद्धती कश्या वापराव्यात, खत व्यवस्थापन, आंतरमशागत इत्यादी गोष्टींची माहिती पाहणार आहोत.
हवामान –
उष्ण हवामान या पिकास चांगले मानवते. तापमान १८ ते ३५ अंश से.ग्रे. मध्ये पिकाची वाढ चांगली होते. मुख्यत्वे सोयाबीन खरीप हंगामात घेतले जाते. या पिकास वार्षिक ६०० ते १००० मी.मी. पर्जन्यमानाची आवश्यकता असते.
सोयाबीन लागवड (soybean lagwad) साठी आवश्यक जमीन –
1. जमीन ही मध्यम स्वरूपाची असावी.
2. भुसभुशीत व पाण्याच्या निचरा होणारी असावी.
3. उत्तम सेंद्रीय पदार्थ असलेली असावी.
4. चोपण व क्षारपड जमीन वापरू नये.
5. पुर्वी सुर्यफुल घेतलेले शेत वापरू नये.
6. जमीन मे महिन्यात नांगरट केलेली उन्हाळ्यात तापू दिलेली स्वच्छ असावी.
7 जमिनीचा सामू ६.५ ते ७.५ पर्यत असलेली निवडावी.
8. एकदम हलक्या मुरमाड जमिनी या पिकास योग्य नसतात.
सोयाबीन लागवड (soybean lagwad) करताना पेरणीतील अंतर किती ठेवावे ?
पेरणी ४५ x ५ सें.मी. अंतरावर करावी. पेरणी करताना बियाणे ३-५ सें.मी. पेक्षा जास्त खोल जाणार नाही, याची काळजी घ्यावी.
पेरणी –
सोयाबीनची पेरणी (soybean lagwad) जूनच्या शेवटच्या आठवड्यापासून जुलैच्या दुसऱ्या पंधरवाड्यापर्यंत ७५ ते १०० मि. मी. पाऊस झाल्यानंतर जमिनीत पुरेशी आर्द्रता असल्याची खात्री करुनच करावी.
पेरणीसाठी वाणांची निवड –
1. सोयाबीन लागवडीसाठी (Soybean Lagwad) चांगल्या वाणांची निवड करणे अतिशय महत्त्वाचे असते.
2. शिफारस केलेल्या वाणांची पेरणी करावी. बियाणे प्रमाणित असल्याची खात्री करूनच विकत घ्यावे.
3. मराठवाडा – एमएयुएस 70, एमएयुएस 81, एमएयुएस 158, एमएयुएस 47.
4. विदर्भ – एमएयुएस 71, एमएयुएस 81, जे एस 93-05 आणि जेएस 335
5. पश्चिम महाराष्ट्र – डीएस 228 (फुले कल्याणी), एमएसीएस 58, एमएसीएस 450, जे एस 93-05 आणि जेएस- 335.
सोयाबीन लागवड (soybean lagwad) साठी एकरी बियाणे किती वापरावे ?
सोयाबीनचे सरळ पेरणीसाठी 30 ते 35 किलो प्रति एकरी तर टोकण पेरणीसाठी 20 ते 25 किलो प्रति एकरी बियाणे लागते.
बियाणांची उगवण क्षमता –
सोयाबीन पिकांच्या बियाणांची उगवणक्षमता ही किमान ७०% किंवा त्यापेक्षा जास्त उगवणक्षमता असलेले बियाणे पेरणीसाठी वापरावे.
सोयाबीन लागवड (soybean lagwad) करताना बीज प्रक्रिया कशी करावी ?
1. उगवणीच्या काळात बुरशीजन्य रोगापासून संरक्षण होण्यासाठी जैविक बुरशीनाशक किंवा बुरशीनाशकाची बीजप्रक्रिया आवश्यक आहे.
2. त्यासाठी पेरणीपूर्व प्रती किलो बियाण्यास ३ ग्रम थायरम किंवा २ ग्रॅम थायरम २.५ ग्रॅम बाविस्टीन व ४ ग्रॅम ट्रायकोडर्मा या प्रमाणात बीजप्रक्रिया करावी.
3. तसेच सोयाबीन पिकास रायझोबीयम जॅपोनिकम व स्फुरद विरघळणारे जिवाणू यांची प्रत्येकी २५० ग्रॅम/१० किलो बियाणे याप्रमाणात बीजप्रक्रिया करावी व बियाणे सावलीत वाळवून पेरणीस वापरावे.
4. बीजप्रक्रिया करताना बियाणे हलक्या हाताने चोळावे तसेच प्रथम बुरशीनाशकाची बीजप्रक्रिया करावी व नंतर जैविक खतांची बीजप्रक्रिया करावी.
सोयाबीन खत व्यवस्थापन –
1. एकरी 12 किलो नत्र व 30 किलो स्फुरद वापरण्याची शिफारस आहे.
2. म्हणजे डीएपी एकरी 60 ते 70 किलो दिल्यास शिफारशीत मात्रा दिली जाते. काही ठिकाणी सुपर फॉस्फेट पेरणी पूर्वी वापरतात.
3. हे चांगल्या प्रतीचे असणे गरजेचे आहे.
4. ज्या जमिनीमध्ये पालाशचे प्रमाण कमी आहे अशा ठिकाणी 12:32:16 किंवा 14:35:14 ही खते सुद्धा उपयुक्त ठरतात.
5. सोयाबीनला खताची मात्रा पेरतानाच द्यावी, दुसऱ्या पिकांप्रमाणे नंतर नत्राची दुसरी मात्रा देऊ नये.
6. त्याचप्रमाणे सोयाबीनला एकरी दहा किलो सल्फर दाणेदार किंवा एक किलो सल्फर WDG + पाच किलो ह्युमिक ऍसिड दाणेदार, जसे रायझर-जी किंवा ह्यूमॉल किंवा ह्युमिसील पेरणी बरोबर दिल्यास चांगला फायदा होतो.
आंतरमशागत –
1. सोयाबीन पिकास सुरवातीचे ६-७ आठवडे हे तण वाढीच्या दृष्टीने संवेदनक्षम असल्याने सुरवातीला पीक तणविरहीत ठेवणे अधिक उत्पादनाच्या दृष्टीने महत्वाचे आहे.
2. त्यासाठी २०-३० दिवसांनी एक कोळपणी तर ४५ दिवसांनी दुसरी कोळपणी द्यावी.
3. त्याचबरोबर गरजेनुसार १-२ खुरपण्या देऊन पीक तणविरहीत ठेवावे.
4. तण नियंत्रणाच्या दृष्टीने रासायनिक तणनाशकामुळे चांगल्याप्रकारे सोयाबीन मधील तणांचा बंदोबस्त झाल्याचे दिसून येते.
तणनाशक केव्हा वापरावे –
1. तणांच्या बंदोबस्तासाठी उगवणीपूर्व तणनाशक पेंडीमिथॅलीन ३० ई.सी. पेरणीच्या (soybean lagwad) वेळी प्रति एकरी १ ते १.३ लिटर २५० ते ३०० लिटर पाण्यामध्ये मिसळून जमिनीवर फवारावे.
2. पीक उगवणीनंतर १५ – २० दिवसांनी एक कोळपणी व एक खुरपणी करून शेत तणमुक्त ठेवावे.
3. अथवा पीक उगवणीनंतर १५-२० दिवसांनी इमिझाथ्यापर ४०० मिली. २०० – २५० लिटर पाण्यामध्ये मिसळून तणावर फवारावे.
तण उगवणीनंतर वापरण्याचे तणनाशक –
1. टरगा = बहुवार्षिक तणांच्या नियंत्रणासाठी दोन वेळेस वापरावे लागु शकते.
2. परस्युट (इमिझाथायपर) = तण उगवणीनंतर वापरता येते. तणाच्या वाढीचा काळ सक्रिय हवा.
सोयाबीन पाणी व्यवस्थापन –
खरीप हंगामात पावसात खंड पडल्यास सोयाबीनला एक किंवा दोन वेळा संरक्षणात्मक पाणी द्यावे.
फुलोरा अवस्था व दाणे भरण्याची अवस्था यातून नाजूक अवस्था असून फुलारा अवस्थांमध्ये पाण्याचा ताण पडल्यास उत्पादनामध्ये मोठ्या प्रमाणात घट येते.
सोयाबीन लागवड (soybean lagwad) करताना आंतरपीक कोणते निवडावे ?
– तूर + सोयाबीन (१:२).
– कपाशी + सोयाबीन (१:१).
– सोयाबीन + भुईमूग (१४, १:६).
– soybean + ज्वारी (१:२, २:२) .
– सोयाबीन + बाजरी (२:४, २:६).
soybean lagwad केल्यानंतर कापणी कधी करावी ?
सर्व वाण सुमारे 90 ते 120 दिवसात येतात, जेव्हा सोयाबीनची पाने कोरडी पडतात आणि गळतात तसेच सोयाबीनच्या शेंगा पण सुकतात तेव्हा सोयाबीनची कापणी करण्याची वेळ आलेली असते.
soybean lagwad मध्ये पीक संरक्षण कसे करावे ?
अ. कीड नियंत्रण –
1. खोड माशी – क्लोरोपायरीफॉस २0 टक्के इसी ( ट्रेड नाव – टर्मिनेटर, कंपनी नाव – एच पी एम केमिकल्स अँड फर्टीलायझर्स लिमिटेड) १.५ लि. प्रति है. किंवा ट्रायझेफॉस ४० टक्के इसी ( ट्रेड नाव – रायडर, कंपनी नाव – हेरंबा इंडस्ट्रीज लिमिटेड ) ८oo मि.ली. पेरणीनंतर ८ ते १० दिवसांनी आणि पीक फुलो-यात असताना ५oo-७o० लिटर पाण्यामध्ये मिसळून फवारावे.
2. पाने पोखरणारी अळी – पाण्यात मिसळणारी ५० टक्के कार्बारील भुकटी प्रती हेक्टरी २ किलो ५०० लिटर पाण्यात मिसळून फवारावी.
3. पाने खाणा-या व पाने गुंडाळणा-या अळ्या – क्रिनॉलफॉस २५ इसी १.५ ली ( ट्रेड नाव – गोल्ड लक्स, कंपनी नाव – क्रॉप केमिकल्स इंडिया लिमिटेड ) किंवा क्लोरोपायरीफॉस २o इसी १.५ ली. ( ट्रेड नाव – टर्मिनेटर, कंपनी नाव – ऍग्रोसिस ) किंवा इमामेक्टिन बेंझोएट ५ टक्के डब्लुजी ( ट्रेड नाव – एमाबेन, कंपनी नाव – सल्फर इंडिया प्रायव्हेट लिमिटेड ) १५० ग्रॅम यापैकी एका किटकनाशकाचा प्रती हेक्टरी ५००-७०० लीटर पाण्यात मिसळून फवारणी साठी आलटून पालटून वापर करावा.
4. रस शोषणा-या किडी (मावा, तुडतुडे, हिरवा ढेकूण इ.) – मेथिल डिमेटॉन २५ इसी ( ट्रेड नाव – ड्युराटॉक्स , कंपनी नाव – युपीएल ) ६oo मि.ली. किंवा फॉसफॉमिडॉन ८५ इसी ( ट्रेड नाव – किनाडॉन प्लस , कंपनी नाव – युपीएल ) २oo मि.ली. किंवा मोनोक्रोटोफॉस ३६ एस सी ( ट्रेड नाव – फॉस्किल, कंपनी नाव – युपीएल ) ८oo मि.ली. यापैकी एका कीटकनाशकांचा प्रती हेक्टरी ५00 लीटर पाण्यात मिसळून फवारा द्यावा.
5. हुमणी – पावसाळ्याच्या सुरुवातीला कडुनिंब व बाभळीच्या झाडावर कीटकनाशकांचा फवारा देऊन मुंग्यांचा नाश करावा. शेतात शेणखत पसरण्यापूर्वी त्यात असलेल्या हुमणीच्या अंडी व अळ्यांचा नाश करण्यासाठी १० टक्के फॉलिडॉल भुकटी मिसळावी. शेतात मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव आढळल्यास ५ टक्के क्लोरेडेन किंवा ५ टक्के हेप्टाक्लोर भुकटी प्रती हेक्टरी ६५ केिली जमिनीत मिसळावी.
ब. रोग नियंत्रण –
या पिकावर केवडा, तांबेरा, देवी, मूळकुजव्या इ. रोग येतात. या रोगाच्या नियंत्रणासाठी पहिली फवारणी हेक्झाकोनेझोल ५ इसी ( ट्रेड नाव – कॉनटाफ, कंपनी नाव – टाटा) १ लिटर (प्रतिबंधात्मक) आणि रोगाचा प्रादुर्भाव आढळल्यास दुसरी फवारणी प्रॉपिकोनेझोल २५ इसी ट्रेड नाव- झेरॉक्स, कंपनी नाव – धानुका ) १ लिटर या बुरशीनाशकांची प्रती हेक्टरी १ooo लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
Production | उत्पादन –
लागवडीच्या सुधारित तंत्रज्ञानाचा अवलंब केल्यास सोयाबीनपासून हेक्टरी 14 ते 15 क्विंटल उत्पादन मिळते.
Conclusion | सारांश –
सोयाबीन पिकाचे अधिक उत्पादन घ्यायचे असल्यास जमिनीची मशागत पासून काढणी पर्यंत नियोजनबद्ध व्यवस्थापन केल्यास नक्कीच जास्तीत जास्त उत्पादन घेता येइल. शेतकरी मित्रांनो तुम्हाला krushi doctor वेबसाइट वरील आमचा सोयाबीन लागवडी विषयी संपूर्ण माहिती soybean lagwad mahiti marathi हा लेख तुम्हाला कसा वाटला वाटला हे खाली कमेन्ट बॉक्स मध्ये सांगायला विसरू नका. आणि हा लेख जर तुम्हाला आवडला तर तुमच्या इतर शेतकरी मित्रांसोबत शेयर नक्की करा.
FAQs | वारंवार विचारले जाणारे प्रश्न –
1. सोयाबीन कधी काढावे?
उत्तर – जर पक्र अवस्थत पीक असताना पाऊस आला, तर पाऊस थांबल्यानंतर लगेच पिकाची कापणी करावी.
2. सोयाबीन उगवायला किती वेळ लागतो?
उत्तर – सोयाबीनचे बियाणे उगवायला साधारणपणे दोन दिवस लागतात. लागवडीनंतर सुमारे एक आठवड्यापर्यंत वनस्पती जमिनीतून बाहेर येत नाही. प्रत्येक वनस्पती 80 शेंगा आणि प्रति झाड सुमारे 160-200 बिया तयार करू शकते. प्रत्येक शेंगांमध्ये 2-4 मटारच्या आकाराचे बीन्स असतात ज्यात प्रथिने आणि तेल जास्त असते.
3. सोयाबीन निवडण्यासाठी तयार आहे हे तुम्हाला कसे कळेल?
उत्तर – जेव्हा 95% शेंगा त्यांच्या परिपक्व टॅन रंगाच्या असतात तेव्हा सोयाबीन पूर्णपणे परिपक्व होतात.
4. कोणते सोयाबीन बियाणे चांगले आहे?
उत्तर – जे एस 93-05, जे एस 95-60, जेएस 335, जे एस 80-21, एनआरसी 2, एनआरसी 37, पंजाब 1, कलितूर यासारख्या अनेक जाती उच्च बियाणे दीर्घायुष्य असलेल्या विकसित केल्या आहेत.
5. सोयाबीन साठी प्रती फूट किती बियाणे लागते?
उत्तर – प्रति फूट सहा रोपे मिळविण्यासाठी तुम्हाला प्रति फूट 7.9 बिया पेरणे आवश्यक आहे.
लेखक,
कृषि डॉक्टर
9168911489