शेतकरी मित्रांनो नमस्कार, Krushi Doctor (कृषी डॉक्टर) या शेती विषयक माहिती देणाऱ्या वेबसाइट वरती आम्ही आपले सहर्ष स्वागत करत आहे. आजच्या लेखामध्ये आपण सोयाबीन पिकातील खोड माशी (soybean stem fly) या किडी विषयी सविस्तरपणे माहिती पाहणार आहोत. यामध्ये खोडमाशी किड नेमकी काय आहे, ही किडी कशामुळे येते, त्याचा प्रसार कसा होतो, त्याची लक्षणे काय आहे आणि खोड माशी (stem fly of soybean) किडीच्या नियंत्रणासाठी काय उपाय योजना आहेत याबद्दल आपण माहिती या लेखामध्ये पाहणार आहोत.
प्रस्तावना –
1. कमीत कमी खर्चामध्ये जास्तीत जास्त उत्पादन देणारे पीक म्हणून सोयाबीन कडे पाहिले जाते.
2. या पिकाच्या लागवड क्षेत्रात प्रतिवर्षी झपाट्याने वाढ होत असून एकूण देशातील सोयाबीन लागवडीखालील क्षेत्रापैकी जवळपास 35 टक्के क्षेत्र एकट्या महाराष्ट्रात आहे.
3. सोयाबीन मध्ये 18 ते 20 टक्के तेलाचे आणि 38 ते 40 टक्के प्रथिनांचे प्रमाण असते.
4. जनावरांसाठी आणि पोल्ट्री उद्योगात देखील सोयाबीन पेंड एक पौष्टिक आहार म्हणून वापरला जातो.
5. सोयाबीन हे पीक आंतरपीक, पीक फेरपालटीमध्ये अतिशय महत्त्वाचे पीक असून सोयाबीनच्या भरघोस उत्पादनासाठी त्याचे लागवड तंत्रज्ञान तसेच शिफारसीनुसार तण आणि किडींचा बंदोबस्त करणे देखील गरजेचे आहे.
6. या लेखामध्ये आपण सोयाबीन वर येणाऱ्या खोडमाशी (soybean stem fly) या किडी विषयी सविस्तर माहिती पाहणार आहोत.
सोयाबीन मधील खोड माशीचा पिकावर प्रादुर्भाव | soybean stem fly attack –
1. विदर्भामध्ये सध्या सोयाबीन पिकावर काही प्रमाणात प्रौढ खोडमाशी आढळून येत आहे.
2. त्यामुळे सोयाबीन पिकावर खोडमाशीचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही.
3. शेतकऱ्यांचा शत्रू म्हणजे खोड माशी/ खोडकिडा.
4. सोयाबीनवर जर खोड माशीचा प्रादुर्भाव झाला तर संपूर्ण सोयाबीन पिकाचे नुकसान होते. त्यामुळे शेतकऱ्यांना खूप आर्थिक फटका बसतो.
5. जर आर्थिक नुकसान टाळण्यासाठी शेतकऱ्यांना खुप फवारणी करावी लागते. जर शेतकऱ्यांनी वेळीच फवारणी नियोजन केले तर त्याला निश्चित फायदा होतो
6. सोयाबीन पिकाचे वेळीच सर्वेक्षण करून, या किडींचे त्वरीत नियंत्रण करणे गरजेचे आहे.
सोयाबीन खोड किडीची ओळख व नुकसान | soybean stem fly symptoms –
1. खोड माशी (soybean stem fly) लहान, चमकदार काळया रंगाची असुन त्यांची लांबी 2 मि.मि. असते.
2. अंड्यातून निघालेली अळी पाय नसलेली,फिक्कट पिवळ्या रंगाची , 2-4 मि.मि. लांब असते.
3. ही अळी प्रथम जवळच्या पानाच्या शिरे ला छिद्र करते.
4. अळीनंतर पानाचे देठातुन झाडाचे मुख्य खोडात किंवा फांदीत प्रवेश करुन आतील भाग पोखरुन खाते.
5. प्रादुर्भावग्रस्त खोड चिरून पाहील्यास पांढुरक्या रंगाची अळी किंवा कोष लालसर नागमोडी भागात दिसते.
6. खोडमाशीचा प्रादुर्भाव पिकाचे सुरुवातीचे अवस्थेत झाल्यास किडग्रस्त झाड वाळते व मोठया प्रमाणात नुकसान होते.
7. खोडमाशी अळी तसेच कोष फांद्यात, खोडात असतो.
8.अशा किडग्रस्त झाडावरील फुलांची गळ होते व शेंगातील दाण्याचे वजन कमी होऊन उत्पादनात 16 – 30 टक्के घट होते.
सोयाबीन खोडमाशी चे एकात्मिक नियंत्रण | soybean stem fly control –
1. भारी जमिनीत पेरणीचे आंतर 45 बाय 5 सें.मी. आणि मध्यम जमिनीत 30 सें.मी. बाय 10 सें. मी. ठेवावे. जेणेकरून पिकात जास्त दाटी होणार नाही.
2. सोयाबीन पिकात बीज प्रक्रिया करताना प्रथम रासायनिक बुरशीनाशक, नंतर रासायनिक कीटकनाशक, नंतर जैविक बुरशीनाशक व नंतर जिवाणू संवर्धन या क्रमाने शिफारशीप्रमाणे योग्य पद्धत अंगीकार करून बीजप्रक्रिया करावी.
3. सोयाबीन पिकातील खोडमाशी च्या प्रादुर्भाव वर लक्ष ठेवण्यासाठी सोयाबीन पिकात उगवणीनंतर 8 ते 10 दिवसांनी प्रति हेक्टर 25 पिवळे चिकट सापळे सोयाबीन पिकात लावावे.
4. शेतकरी बंधूंनो, सोयाबीन वरील खोडमाशी (soybean stem borer) साठी उष्ण तापमान,जास्त आद्रता, भरपूर पाऊस व त्यानंतर कोरडे वातावरण अशा बाबी वाढीसाठी पोषक ठरतात. म्हणून अशा वातावरणात पेरणीनंतर वेळोवेळी या किडी संदर्भात शेतकर्यांनी जागरूक राहून वेळोवेळी निरीक्षण घ्यावी आणि योग्य ती उपाययोजना करावी.
5. बीजप्रक्रिया – प्रति किलो बियाणास थायोमेथोक्झाम 30 टक्के एफ एस (इफको, तईयो प्लस) 10 मिली
6. कीटकनाशकांचा वापर -( फवारणी – प्रति १० लिटर पाणी ) –
अ) क्लोरॲन्ट्रानिलीप्रोल (18.5 एस सी) (टोपिक, सिजेंटा)२.५ मि.ली. किंवा
ब) थायामिथॉक्झाम (12.60 टक्के) + लॅम्बडा सायहॅलोथ्रीन 9.50 झेड सी (अलिका, सिजेंटा) 2.5 मि.ली.
(टीप – फवारणीचे प्रमाण नॅपसॅक पंपासाठी आहे)
Conclusion I सारांश –
शेतकरी मित्रांनो तुम्हाला krushi doctor या वेबसाइट वरील आमचा सोयाबीन या पिकातील खोड माशी या किडीचे (soybean stem fly) एकात्मिक नियंत्रण हा लेख तुम्हाला कसा वाटला वाटला हे खाली कमेंट बॉक्स मध्ये सांगायला विसरू नका. आणि हा लेख जर तुम्हाला आवडला तर तुमच्या इतर शेतकरी मित्रांसोबत शेयर नक्की करा. आणखी अशा प्रकारची कृषीविषयक माहिती पाहण्यासाठी आमच्या krushi doctor या वेबसाईटला नक्की भेट द्या.
FAQ’s | वारंवार विचारले जाणारे प्रश्न –
1. सोयाबीन पिकातील खोडमाशी च्या प्रसारासाठी साठी कोणते वातावरण पोषक असते?
उत्तर – सोयाबीन वरील खोडमाशीसाठी उष्ण तापमान,जास्त आद्रता, भरपूर पाऊस व त्यानंतर कोरडे वातावरण अशा बाबी वाढीसाठी पोषक ठरतात.
2. सोयाबीन पिकात खोडमाशीचा प्रादुर्भाव किती दिवसांपर्यंत दिसून येतो?
उत्तर – उगवणी पासून 7-10 दिवसापर्यंत या किडीचा प्रादुर्भाव पिकावर मोठ्या प्रमाणात दिसून येतो.
3. सोयाबीन पिकातील खोड माशीच्या नियंत्रणासाठी कोणते कीटकनाशक वापरावे?
उत्तर – सोयाबीन पिकातील खोड माशीच्या नियंत्रणासाठी थायामिथॉक्झाम 12.60 टक्के + लॅम्बडा सायहॅलोथ्रीन 9.50 झेड सी (अलिका, सिजेंटा) 2.5 मि.ली. प्रति 10 मिली पंप वापरावे.
लेखक –
कृषी डॉक्टर सूर्यकांत
9168911489