शेतकरी मित्रांनो नमस्कार, Krushi Doctor (कृषी डॉक्टर) या शेती विषयक माहिती देणाऱ्या वेबसाइट वरती आम्ही आपले सहर्ष स्वागत करत आहे. आजच्या लेखामध्ये आपण सोयाबीन या पिकासाठी कोणत्या फवारण्या (soybean spray schedule) केल्या पाहिजेत याबद्दल माहिती पाहणार आहोत. सोयाबीन पिकाची गुणवत्ता लक्षात घेता, त्याची नियोजनपूर्वक पेरणी केली, तर ते शेतीत एक आशावादी ठरेल. सोयाबीन मध्ये 20% तेलाचे प्रमाण आणि 40% प्रथिनांमुळे विविध उपयोगी सोयाबीनला महत्त्वाचे स्थान प्राप्त झाले आहे.
विदर्भ आणि मराठवाडा मध्ये सोयाबीनचे क्षेत्र झपाट्याने वाढले आहे. त्याचे मुख्य कारण म्हणजे कमी कालावधीत येणारे पीक, पीक कापसाला पर्यायी पीक, रब्बीमध्ये दुसरे पीक घेता येत असल्यामुळे दोन पिके एका हंगामामध्ये होतात. आज आपण या लेखामध्ये सोयाबीन पिकामध्ये घेण्यात येणार्या फवारण्या (soybean spray schedule) आणि त्यासाठी लागणारी औषधे याबद्दल माहिती पाहणार आहोत.
सोयाबीन फवारणी वेळापत्रक | soybean spray schedule –
अ) पहिली फवारणी | Soyabean pahili favarni –
1. फवारणीची वेळ – सोयाबीनची पहिली फवारणी 15 ते 20 दिवसानंतर करावी.
2. फवारणी औषधे – प्रोक्लेम, सिंजेंटा (इमामेक्टीन बेंझोएट 5%) 15 ग्रॅम + 19:19:19 खत (महाधन कंपनी) 75 ग्रॅम + युपियल, साफ (कार्बेन्डाझिम 12%+ मन्कोझेब 63% wp) 15 ग्रॅम + टाटा बहार, टाटा रॅलीस – 30 मिली.
3. वरील सर्व औषधे एकत्र करून 15 लिटर पंपामध्ये मिक्स करून फवारावी.
ब) दुसरी फवारणी | Soyabean dusri favarni –
1. फवारणीची वेळ – सोयाबीन ची दुसरी फवारणी 35 ते 40 दिवसाच्या दरम्यान करावी.
2. फवारणी औषधे – 12:61:00 खत (महाधन कंपनी) 75 ग्रॅम + बायर कॉन्फिडोर (इमिडाक्लोप्रिड 17.8% SL)- 0.5 मिली/लीटर पाणी + बायर एम्बिशन (अमीनो एसिड आणि फुल्विक एसिड) – 2 मिली/लीटर पाणी.
3. वरील सर्व औषधे एकत्र करून 15 लिटर पंपामध्ये मिक्स करून फवारावी.
हे देखील वाचा – जाणून घ्या गांडूळ खत निर्मितीची संपूर्ण माहिती
क) तिसरी फवारणी | Soyabean tisri favarni –
1. फवारणीची वेळ – सोयाबीनची तिसरी फवारणी 55 ते 60 दिवसानंतर करावी.
2. फवारणी उद्देश – सोयाबीन मध्ये फुलांची संख्या आणि उत्पादन वाढवण्यासाठी ही फवारणी करावी लागते.
3. फवारणी औषधे – गोदरेज डबल (होमोब्रैसिनोलाइड 0.04%) – 1 मिली/लीटर पाणी + महाधन एनपीके 00:52:34 – 5 ग्रॅम/लीटर पाणी + महाधन कॉम्बी – चिलेटिड – 1 ग्रॅम/लीटर पाणी
4. वरील सर्व औषधे एकत्र करून 15 लिटर पंपामध्ये मिक्स करून फवारावी.
ड) चौथी फवारणी | Soyabean forth spray –
1. फवारणी उद्देश – सोयाबीन वरील चक्रीभुंगा, ॲन्थ्रॅक्नोज बुरशी चे नियंत्रण तसेच पिकाची वाढ चांगली होण्यासाठी फवारणी करावी.
2. फवारणी औषधे – बायर, एंट्राकोल (प्रोपीनेब 70% डब्लू पी) – 2 ग्रॅम/लीटर पाणी + एफमसी, कोरेजेन (क्लोराँट्रानिलिप्रोल 18.5%) – 0.4 मिली/लीटर पाणी + महाधन 00:00:50 – 5 ग्रॅम/लीटर पाणी
3. वरील सर्व औषधे एकत्र करून 15 लिटर पंपामध्ये मिक्स करून फवारावी.
फवारणी करताना घ्यावयाची काळजी | soybean spray schedule –
1. फवारणी ही सकाळी 11 च्या आत किंवा सायंकाळी 4 च्या नंतर करावी.
2. फवारणी साठी योग्य पीएच चे म्हणजेच 6.5 ते 7.5 ph चे पानी वापरावे.
3. फवारणी करताना जमिनीत ओलावा असेल याची काळजी घ्यावी.
4. वारे जर जास्त वेगाने वाहत असेल तर फवारणी घेऊ नये.
5. फवारणी द्रावण तयार करताना एक घटक पाण्यात टाकून पानी 2 मिनिट चांगले ढवळावे व नंतर दूसरा घटक मिसळावा.
6. म्हणजेच एकदम सर्व घटक पाण्यात मिसळू नये.
7. फवारणी करताना स्टीकर चा अवलंब अवश्य करावा.
Conclusion I soybean spray schedule –
शेतकरी मित्रांनो तुम्हाला krushi doctor या वेबसाइट वरील आमचा सोयाबीन फवारणी वेळापत्रक (soybean spray schedule) हा लेख तुम्हाला कसा वाटला वाटला हे खाली कमेंट बॉक्स मध्ये सांगायला विसरू नका. आणि हा लेख जर तुम्हाला आवडला तर तुमच्या इतर शेतकरी मित्रांसोबत शेयर नक्की करा. आणखी अशा प्रकारची कृषीविषयक माहिती पाहण्यासाठी आमच्या krushi doctor या वेबसाईटला नक्की भेट द्या.
People also ask | सतत विचारले जाणारे प्रश्न –
1.सोयाबीन किती खोलीवर पेरावे?
उत्तर – खरिपात जूनच्या पहिल्या पंधरवड्यात वाफसा आल्यावर 75 ते 100 मिलिमीटर पाऊस झाल्यानंतर तीन ते पाच सेंटिमीटर खोलीवर पेरणी केली पाहिजे.
2.सोयाबीन बियाणे एकरी किती पेरावे?
उत्तर – हेक्टरी 65 किलो (एकरी 26 किलो) बियाणे वापरावे. हेक्टरी झाडांची संख्या 4.4 ते 4.5 लाख ठेवावी.
3.आपण कॉर्न कधी फवारणी करू शकता?
उत्तर – जेव्हा कॉर्न 8 इंच पेक्षा कमी उंच असेल तेव्हा आपण कॉर्न फवारणी करू शकतो.
4. सोयाबीनची पाने पिवळी का पडतात?
उत्तर – पिवळा मोजेक व्हायरस मुळे आणि नायट्रोजन मॅग्नेशियम आणि यांच्या कमतरतेमुळे सोयाबीनची पाने पिवळी पडतात.
हे देखील वाचा – जाणून घ्या जमीनच्या सेंद्रिय कर्ब ची A to Z माहिती
लेखक –
कृषी डॉक्टर सूर्यकांत
9168911489