नमस्कार शेतकरी मित्रांनो ! कृषि डॉक्टर (Krushi Doctor)परिवरामध्ये आपले स्वागत आहे. आपण या ठिकाणी आज “उन्हाळी सोयाबीन लागवड (unhali soybean lagwad): लागवड ते काढणी संपूर्ण माहिती” या विषयावर माहिती जाणून घेणार आहोत. ही माहिती जर तुम्हाला जर आवडली तर नक्कीच तुम्ही ही माहिती तुमच्या इतर शेतकरी मित्रांसोबत शेयर देखील करू शकता. चला तर सुरू करूया –
1. उन्हाळी सोयाबीन लागवडीसाठी (unhali soybean lagwad) आवश्यक जमीन –
- उन्हाळी सोयाबीन लागवडीसाठी मध्यम ते भारी जमीन आवश्यक आहे .
- अत्यंत हलक्या जमीनीत सोयाबीनचे अपेक्षित उत्पादन येत नाही .
- जास्त आम्लयुक्त , क्षारयुक्त तथा रेताड जमीनीत सोयाबीनचे पीक घेऊ नये .
- जमीनीत सेंद्रिय कर्बाची मात्रा चांगल्या प्रमाणात असली पाहिजे.
- सामू ( 6.5 ते 7.5 )
- सेंद्रिय कर्ब ( 0.5 ते 1.0 % )
- चुनखडी ( 0.1 ते 2.0 % )
- विद्युत वाहकता ( <0.7 मिलिम्हॉस / सेंटीमीटर )
2. उन्हाळी सोयाबीन लागवडीसाठी (unhali soybean lagwad) आवश्यक हवामान –
- सोयाबीन हे पीक सुर्यप्रकाशास संवेदनशील आहे .
- सोयाबीन पीकासाठी समशितोष्ण हवामान अनुकूल असते . त्यामुळे उन्हाळी हंगामामध्ये पिकाची कायिक वाढीची अवस्था थोडीफार लांबण्याची शक्यता असते .
- उन्हाळी सोयाबीन लागवड ही २२ ते ३० अंश सेल्सिअस तापमानात चांगले येते ; परंतू , कमाल तापमान ३५ अंश सेल्सिअसपेक्षा जास्त झाले तर फूले व शेंगा गळतात .
- शेंगाची योग्य वाढ होत नाही आकार कमी होतो.
3. उन्हाळी सोयाबीन लागवडीसाठी सुधारित (unhali soybean lagwad) वाण –
- उन्हाळी सोयाबीन लागवड पेरणीसाठी किमान ७० टक्के उगवणक्षमता असलेले बियाणे आवश्यक आहे .
- पेरणीसाठी वनामकृवि , परभणीने विकसीत केलेल्या एमएयुएस ७१ , एमएयुएस १५८ व एमएयुएस ६१२ या वाणांची किंवा
- महात्मा फुले कृषि विद्यापीठ , राहुरीने विकसीत केलेल्या केडीएस ७२६ , केडीएस ७५३ या वाणांची किंवा
- जवाहरलाल नेहरु कृषी विश्वविद्यालय , जबलपूर ने विकसीत केलेल्या जेएस ३३५ , जेएस ९३-०५ , जेएस २०-२९ , जेएस २०-६९ , जेएस २०-११६ या वाणांची निवड करावी .
4. जमीनीची पूर्व मशागत –
- खरीप हंगामातील पिकाच्या काढणीनंतर एक खोल नांगरणी करून घ्यावी.
- नंतर आवश्यकते नुसार कुळवाच्या पाळ्या व रोटरणी करून घ्यावी व जमीन एक समान समतल करून घ्यावी.
- त्यानंतर शेणखत टाकणार असाल तर एकरी 2 ते 3 ट्रॉली शेणखत + 2 किलो कोंपोस्टिंग बॅक्टीरिया एकत्र मिसळून वापरावे.
5. बिजप्रक्रिया –
- कार्बोक्झीन ३७.५ % + थायरम ३७.५ % ची ( व्यापारी नाव – व्हिटावॅक्स पॉवर ) ३ ग्रॅम प्रति कि.ग्रॅ . बिजप्रक्रिया करावी .- बीज प्रक्रियेमुळे unhali soybean lagwad मध्ये कॉलर रॉट , चारकोल रॉट व – रोपावस्थेतील इतर रोगांपासून संरक्षण होते .
- या शिवाय बिजप्रक्रियेसाठी ट्रायकोडर्मा व्हिरीडी ( ८-१० ग्रॅम / कि.ग्रॅ . बियाणे ) चा वापर सुध्दा करावा .
- या बुरशी नाशकांच्या बिज प्रक्रियेनंतर बियाण्यास रायझोबियम जिवाणू खत ( ब्रेडी रायझोबियम ) + स्फुरद विरघळणारे जिवाणू खताची ( पीएसबी ) २५० ग्रॅम प्रति १० कि.ग्रॅ . किंवा १०० मिली / १० कि.ग्रॅ . ( द्रवरुप असेल तर ) याची बिजप्रक्रिया करावी .
6. पेरणीची योग्य वेळ –
- उन्हाळी हंगामी सोयाबीनच्या बिजोत्पादनाकरिता डिसेंबरचा शेवटचा आठवडा ते जानेवारीच्या पहिल्या पंधरवाड्या पर्यंत पिकाची पेरणी करावी .
- जर पेरणीस उशीर झाला तर पिक फुलोऱ्यात असतांना व दाणे भरण्याच्या अवस्थेत असतांना म्हणजेच मार्च व एप्रिल महिन्यात जास्त तापमानामुळे फुले शेंगा गळ होते व दाण्याचा आकार लहान होतो .
- त्यामुळे उत्पादनात मोठ्या प्रमाणात घट होऊ शकते .
- जर डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यात किमान तापमान १० अंश सेल्सीअसच्या खाली गेले असेल तर पेरणी थोडी लांबवून तापमान साधारणत : १५ अंश झाल्यास पेरणी करावी .
- कमी तापमानात पेरणी केल्यास उगवणीसाठी १० ते १२ दिवस लागतात .
( सोयाबिन प्रमाणेच आमचे इतर महत्वपूर्ण लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा – Krushi Doctor Sheti Mahiti )
7. पेरणी अंतर आणि पद्धत –
1. सोयाबीनची पेरणी ४५ x ५ सें.मी. अंतरावर व २.५ ते ३.० सें.मी. खोलीवर करावी .
2. पेरणीच्या वेळेस बियाणे जास्त खोलीवर पडल्यास व्यवस्थित उगवण होत नाही .
8. उन्हाळी सोयाबीन लागवडीसाठी (unhali soybean lagwad) बियाण्याचे प्रमाण –
– उन्हाळी सोयाबीन लागवडीसाठी हेक्टरी ६५ कि.ग्रॅ . बियाणे वापरावे ( एकरी २६ किलो ).
9. खत व्यवस्थापन –
- उन्हाळी सोयाबीन लागवड मध्ये हेक्टरी ३० कि.ग्रॅ.नत्र + ६० कि.ग्रॅ . स्फुरद + ३० कि.ग्रॅ . पालाश + २० कि.ग्रॅ .
- गंधक पेरणीच्या वेळेसच द्यावे .
- पेरणी करतेवेळी खते ही बियाण्याच्या खालीच पडतील व त्यांचा बियाण्याशी सरळ संपर्क येणार नाही याची काळजी घ्यावी .
- गंधकाचा वापर सोयाबीनसाठी अत्यंत आवश्यक आहे . त्याच प्रमाणे हेक्टरी २५ किलो झिंक सल्फेट आणि १० कि.ग्रॅ . बोरॅक्स द्यावे .
- या पिकास नत्र , स्फुरद , पालाश , मॅग्नेशिअम , गंधक , कॅल्शियम , मॉलिब्डेनम , बोरॉन , लोह , जस्त व मँगनीज ही अन्नद्रव्ये वाढीसाठी , फुलधारणेसाठी व शेंगात दाणे भरण्यासाठी आवश्यक असतात .
- उन्हाळी हंगामात पाणी देण्यामध्ये खंड पडल्यास पोटॅशियम नायट्रेटच्या दोन फवारण्या अनुक्रमे ३५ व्या व ५५ व्या दिवशी १०० ग्रॅम पाण्यामध्ये टाकून फवारणी करावी .
- पेरणीनंतर नत्रयुक्त खतांचा वापर टाळावा तसेच माती परिक्षण अहवालानुसार रासायनिक खतांची मात्रा कमी जास्त करावी .
- पिक २० ते २५ दिवसाचे असतांना जर सुक्ष्म अन्नद्रव्यांच्या कमतरतेमुळे पिवळे पडल्यास मायक्रोला ( ग्रेड -२ ) या सुक्ष्मअन्नद्रव्यांची ५० ते ७५ मि.ली. प्रति १० लिटर पाण्यामध्ये फवारणी करावी .
- पिक शेंगा लागण्याच्या अवस्थेत असतांना १ ९ : १ ९ : १ ९ या लिक्विड रासायनिक खताची १०० ग्रॅम प्रति १० लिटर पाण्यामध्ये टाकून फवारणी करावी तसेच शेंगा भरण्याच्या अवस्थेत असतांना ०:५२:३४ या लिक्विड रासायनिक खताची १०० ग्रॅम प्रति १० लिटर १० लिटर.
10. आंतरमशागत –
- पिक २० ते ३५ दिवसाचे असतांना दोन कोळपण्या ( १५ ते २० दिवस पहिली आणि ३० ते ३५ दिवसांनी दुसरी ) व एक निंदणी करुन शेत तणविरहित ठेवावे .
- एकदा सोयाबीनला फुले लागली की कोळपणी करु नये अन्यथा सोयाबीनच्या मुळा तुटून नुकसान होते .
11. पानी व्यवस्थापन –
- पेरणीच्या अगोदर तुषार सिंचनाने पाणी देवून पेरणी करावी .
- थंडीमुळे तापमान कमी असेल तर पूर्णत : उगवणीसाठी १० ते १२ दिवस लागू शकतात .
- चांगल्या उगवणीसाठी पेरणीनंतर ५ दिवसांनी पुन्हा तुषार सिंचनाने हलके पाणी द्यावे .
- जानेवारी व फेब्रुवारी महिन्यात १० ते १२ दिवसांच्या अंतराने तसेच मार्च व
- एप्रिल महिन्यात ८ ते १० दिवसांच्या अंतराने पाणी द्यावे .
- उन्हाळी सोयाबीन लागवड मध्ये रोप , फुलोऱ्याची व शेंगा भरण्याची अवस्था या पाण्याचा ताणास संवेदनशील असल्यामुळे या कालावधीत पाटाने पाणी द्यावे .
- ज्या शेतात बिजोत्पादन घ्यावयाचे आहे त्या शेतात पाणी साचणार नाही याची काळजी घ्यावी .
Conclusion | सारांश –
वरील माहितीनुसार आपण जर सोयाबीन पिकामध्ये सुरुवातीपासून काळजी घेऊन सर्व गोष्टींचा स्वत अभ्यास केला आणि त्यानुसार आपल्या सोयाबीन पिकाचे नियोजन केले तर सोयाबीन पिकामध्ये देखील आपण सहज पने कमी उत्पादन खर्चासह एकरी तब्बल 15 क्विंटल इतके उत्पादन घेऊ शकतो.
वारंवार विचारले जाणारे प्रश्न ( FAQ ) –
1. सोयाबीन एकरी किती पेरावे?
उत्तर – चांगली उगवण होईन अधिक उत्पादन मिळवण्यासाठी एकरी 35 ते 40 किलो बियाणे पुरेसे आहे.
2. सोयाबीन कधी काढावे?
उत्तर – ज्यावेळेस सोयाबीन संपूर्ण पिवळे पडेल, पाने वाळून गळून जातील आणि सोयाबीन दाण्यामध्ये 15 ते 18 टक्के ओलावा शिल्लक राहील त्यावेळेस सोयाबीन काढणी करावी.
3. हिवाळी सोयाबीन येते का?
उत्तर – सोयाबीन हे तापमानस अतिसंवेदनशील पीक आहे. सोयाबीन पेरणी नंतर जर तापमान खूपच कमी असेल तर सोयाबीन पिकाची उगवण होत नाही, आणि पुढची शाखिय वाढ देखील खूपच कमी आणि हळू-हळू होते. त्यामुळे शक्यतो सोयाबीन हिवाळी हंगामात पेरणे टाळावे.
4. सोयाबीन उत्पादन कसे वाढवावे?
उत्तर – सोयाबीन उत्पादन वाढवण्यासाठी पुढील गोष्टी करणे खूप गरजेचे आहे – शेताची योग्य मशागत, योग्य वेळी पेरणी, सुधारित बियाणे निवड, बीज प्रक्रिया, माती परीक्षण वर आधारित खत व्यवस्थान, काटेकोर पानी व्यवस्थापन, तण व्यवस्थापन, कीड व रोगाचे एकात्मिक व्यवस्थापन इत्यादि.
लेखक –
सूर्यकांत इर्लेकर
मू. पो – इर्ले, तालुका – बार्शी, जिल्हा – सोलापूर.
राज्य – महाराष्ट्र. पिन – 413412