शेतकरी मित्रांनो नमस्कार, Krushi Doctor (कृषी डॉक्टर) या शेती विषयक माहिती देणाऱ्या वेबसाइट वरती आम्ही आपले सहर्ष स्वागत करत आहे. आजच्या लेखामध्ये आपण soybean fertilizer dose: सोयाबीन खत व्यवस्थापन ची संपूर्ण माहिती पाहणार आहोत. आजच्या काळात सोयाबीन पिकाचा विचार केला तर, त्याची नियोजनपूर्वक पेरणी केली, तर ते शेतीत एक आशावादी चित्र ठरेल. सोयाबीन मध्ये 20% तेलाचे प्रमाण आणि 40% प्रथिनांमुळे विविध उपयोगी सोयाबीनला महत्त्वाचे स्थान प्राप्त झाले आहे. अशातच विदर्भ आणि मराठवाडा मध्ये सोयाबीनचे क्षेत्र झपाट्याने वाढले आहे. त्याचे मुख्य कारण म्हणजे सोयाबीन हे कमी कालावधीत येणारे पीक आहे. तसेच हे पीक कापसाला पर्यायी पीक म्हणून सध्या लागवड केली जाते. रब्बीमध्ये दुसरे पीक घेता येत असल्यामुळे दोन पिके एका हंगामामध्ये होतात.
मजुरांची आवश्यकता व द्विदल पीक व झाडाचा पालापाचोळा जमिनीवर पडल्याने हवेतील नत्र स्थिरीकरण होऊन जमिनीचा पोत सुधारतो. म्हणून सोयाबीनचा सर्व पिकांमध्ये चांगले मानले जाते. महाराष्ट्राच्या बऱ्याच जिल्ह्यामध्ये सोयाबीन घेतले जाते. त्यामुळे सोयाबीनच्या क्षेत्रात फार मोठ्या प्रमाणात वाढ झालेली आहे. आपण आज सोयाबीन खत व्यवस्थापन (soybean fertilizer dose) ची संपूर्ण माहिती पाहणार आहोत.
सोयाबीन पिकातील खत व्यवस्थापन | Soybean fertilizer dose –
1. सोयाबीन या पिकाचा कालावधी तीन महिन्याचा असतो.
2. म्हणून सोयाबीन पिकाचे नीट व्यवस्थापन करणे खूप आवश्यक आहे.
3. सोयाबीन हे हवेतूनच नत्र श्वसन करून गरज पूर्ण करते त्यामुळे या पिकाला नत्रची खूप गरज कमी भासते.
4. स्फुरद आणि पालाशची गरज जास्त असते त्यामुळे आपण याला स्फुरदयुक्त आणि पालश युक्त खते जास्त वापरावे लागतात.
5. सोयाबीन पेरणी करत असताना आपल्याला खत व्यवस्थापन (soybean fertilizer dose) हे लागवडीपूर्वी प्रति एकर दीड बॅग 10:26:26 टाकायचे आहे.
6. आणि त्यानंतर दहा किलो गंधक म्हणजेच सल्फर टाकायचा आहे.
7. पेरणी झाल्यानंतर 21 दिवसांनी शेताला पाणी देऊन आपल्याला आपल्या सोयाबीन वरती तणनाशक हे मारायच आहे.
8. यानंतर सोयाबीन उत्पादनात वाढ होण्यासाठी व सोयाबीन वाढीसाठी आपण काही विद्राव्य खतांचा देखील वापर करणार.
9. ज्यामध्ये आपण 10:26:26 आणि 19:19:19 अश्या खतांचा वापर आपण करणार.
10. आणि यानंतर जेव्हा आपल्या झाडाला शेंगा किंवा फुले येतील तेव्हा आपल्याला 0:52:34 हे खत वापर मारायचे आहे.
11. हे मारल्याने आपल्या झाडाची फुले गळणार नाहीत व शेंगा देखील गळणार नाहीत.
12. पेरणीनंतर 25 ते 27 दिवसांनी आपल्याला पिका वरती फवारणी घ्यायची आहे.
13. त्यावेळेस आपल्याला 13 40 13 पाच ग्रॅम अधिक चिलेटेड मायक्रो न्यूट्रिएंट्स एक ग्राम प्रति लिटर पाण्यामध्ये मिसळून आपल्यालाही फवारणी करायची आहे.
हे पण वाचा – कापूस लागवड करून एकरी घ्या 12 ते 15 क्विंटल उत्पादन
सोयाबीन पिकात जैविक खताचा वापर प्रती एकर कसा, कधी, व किती प्रमाणात करावा?
शेतकरी बंधूंनो सोयाबीन पिकाला 750 ग्रॅम सोयाबीनचे रायझोबियम म्हणजे रायझोबियम जापोनिकम व 750 ग्रॅम पीएसबी या जिवाणू खताची प्रति 30 किलो बियाण्यास (म्हणजेच एक एकराच्या बियाण्याला) या प्रमाणात बीज प्रक्रिया करून घ्यावी.
सोयाबीन पिकाला फवारणी युक्त खताचा (soybean fertilizer dose) वापर करून खताची मात्रा कशी द्यावी?
1. शिफारशीत रासायनिक खत मात्रा (soybean fertilizer dose) पेरणीनंतर 50 व 70 दिवसांनी दोन टक्के युरिया म्हणजे दोन किलो युरिया अधिक 100 लिटर पाणी या प्रमाणात द्रावण तयार करू द्रावण तयार करून फवारणी करावी.
2. किंवा शेंगा धरण्याच्या अवस्थेत दोन टक्के (200 ग्रॅम अधिक दहा लिटर पाणी या प्रमाणात घेऊन) 19 :19 :19 या या विद्राव्य खताची फवारणी करावी.
3. सोयाबीन पिकात पाण्याच्या ताणाचे अवस्थेत पिक फुलोरा अवस्था नंतर पंधरा दिवसांनी एक टक्का पोटॅशियम नायट्रेट म्हणजे च 100 ग्रॅम 13 : 0 : 45 अधिक दहा लिटर पाणी याप्रमाणे फवारणी घ्यावी.
4. सोयाबीन पिकात चुनखडीयुक्त जमिनी मध्ये लोहाच्या कमतरतेमुळे सोयाबीनची पाने पिवळी पडतात व योग्य उत्पादन मिळत नाही.
5. त्यामुळे माती परीक्षण करून घ्या चुनखडीयुक्त जमिनीतलोहाची कमतरता असल्यास फेरस सल्फेट 0.5% (50 ग्रॅम) + 0.25 टक्के (25 ग्रॅम) कळीचा चुना अधिक दहा लिटर पाणी या मिश्रणाची फवारणी दोन वेळा करा.
6. म्हणजे पहिली फवारणी पीक फुलावर येण्यापूर्वी आणि दुसरी शेंगा भरण्याच्या अवस्थेमध्ये लोहाची कमतरता असेल तरच शास्त्रज्ञांच्या मार्गदर्शनाखाली करावी.
सोयाबीन पिकात खत व्यवस्थापन (soybean fertilizer dose) करताना घ्यावयाच्या सर्वसाधारण काळजी –
1. सोयाबीन पिकास माती परीक्षणाच्या आधारावर एकीकृत अन्नद्रव्य व्यवस्थापन पद्धतीचा अंगीकार करून च खताची किंवा अन्नद्रव्यांचे व्यवस्थापन करावे.
2. असंतुलित अविवेकी व अतिरेकी खताचा वापर टाळा विशेषता उभ्या पिकाला नत्रयुक्त खताचा अवाजवी वापर टाळा.
3. आवश्यकतेनुसार तज्ञांचा सल्ला घेऊन योग्य खताची निवडून निवड करून शिफारशीत अन्नद्रव्यांची मात्रा त्या खतातून शिफारशीप्रमाणे जाते का?
4. तसेच ते आर्थिक दृष्ट्या परवडण्यासारखे आहे का?
5. व जमिनीच्या आरोग्यासंदर्भात सुद्धा ते हितावह आहे का?
6. या सर्व बाबीची शहानिशा करून शास्त्रोक्त शिफारशीप्रमाणे सोयाबीन पिकात अन्नद्रव्यांचे व्यवस्थापन किंवा खताचे व्यवस्थापन करा.
हे पण वाचा – yellow sticky traps आणि blue sticky traps: वापर आणि फायदे
Conclusion I सारांश –
शेतकरी मित्रांनो आशा करतो की तुम्हाला Krushi Doctor website वरील आमचा soybean fertilizer dose: सोयाबीन खत व्यवस्थापन ची संपूर्ण माहिती हा लेख खूप आवडला असेल. ही माहिती नक्कीच यंदाच्या खरीप हंगामामध्ये तुमच्या उपयोगी येईल. ही माहिती जर तुम्हाला खरच आवडली तर नक्कीच तुमच्या इतर शेतकरी ग्रुप मध्ये शेयर नक्की करा. आणि सोयाबीन पिकाबद्दल इतर कोणतीही माहिती तुम्हाला जाणून घ्यायची असेल तर आमच्या Krushi Doctor Sheti Mahiti पेजला भेट द्या.
FAQ’s | वारंवार विचारले जाणारे प्रश्न –
1) सोयाबीन पीक किती दिवसात येते?
उत्तर – सोयाबीन पीक 90 ते 105 दिवसात म्हणजेच 3 ते 3.5 महिन्यात येते.
2) सोयाबीनला कोणत्या प्रकारच्या खताची गरज आहे ( NPK dose for soybean)?
उत्तर – सोयाबीनला आवश्यक असलेल्या मॅक्रोन्यूट्रिएंट्समध्ये नायट्रोजन (N), फॉस्फरस (P), आणि पोटॅशियम (K) यांचा समावेश होतो.
3) सोयाबीनची लोकप्रिय जात कोणती आहे?
उत्तर – पिवळे सोयाबीन उत्पादन प्रमाण आणि वाणांच्या बाबतीत सर्वात सामान्य आहे.
4) महाराष्ट्रात कोणते सोयाबीन बियाणे चांगले आहे?
उत्तर – सोयाबीन KDS-726 हे सोयाबीन वाण उच्च तंत्रज्ञानाचा वापर करून हेक्टरी 40 क्विंटल उत्पादन उच्च तंत्रज्ञानाचा वापर केला आहे.
लेखक –
कृषी डॉक्टर सूर्यकांत
9168911489