शेतकरी मित्रांनो नमस्कार, Krushi Doctor (कृषी डॉक्टर) या शेती विषयक माहिती देणाऱ्या वेबसाइट वरती आम्ही आपले सहर्ष स्वागत करत आहे. आजच्या लेखामध्ये आपण सोयाबीन पिकातील चक्री भुंगा (soybean girdle beetle) या किडी विषयी सविस्तरपणे माहिती पाहणार आहोत. यामध्ये चक्री भुंगा किड नेमकी काय आहे, ही किडी कशामुळे येते, त्याचा प्रसार कसा होतो, त्याची लक्षणे काय आहे आणि चक्री भुंगा (soybean chakri bhunga) किडीच्या नियंत्रणासाठी काय उपाय योजना आहेत याबद्दल आपण माहिती या लेखामध्ये पाहणार आहोत.
प्रस्तावना –
1. कमीत कमी खर्चामध्ये जास्तीत जास्त उत्पादन देणारे पीक म्हणून सोयाबीन कडे पाहिले जाते.
2. या पिकाच्या लागवड क्षेत्रात प्रतिवर्षी झपाट्याने वाढ होत असून एकूण देशातील सोयाबीन लागवडीखालील क्षेत्रापैकी जवळपास 35 टक्के क्षेत्र एकट्या महाराष्ट्रात आहे.
3. सोयाबीन मध्ये 18 ते 20 टक्के तेलाचे आणि 38 ते 40 टक्के प्रथिनांचे प्रमाण असते.
4. जनावरांसाठी आणि पोल्ट्री उद्योगात देखील सोयाबीन पेंड एक पौष्टिक आहार म्हणून वापरला जातो.
5. सोयाबीन हे पीक आंतरपीक, पीक फेरपालटीमध्ये अतिशय महत्त्वाचे पीक असून सोयाबीनच्या भरघोस उत्पादनासाठी त्याचे लागवड तंत्रज्ञान तसेच शिफारसीनुसार तण आणि किडींचा बंदोबस्त करणे देखील गरजेचे आहे.
6. या लेखामध्ये आपण सोयाबीन वर येणाऱ्या चक्रीभुंगा (soybean girdle beetle) या किडी विषयी सविस्तर माहिती पाहणार आहोत.
7. चक्री भुंग्याच्या प्रादुर्भावामुळे पिकाचे 35 टक्क्यांपर्यंत नुकसान होते.
8. चक्री भुंग्याच्या प्रादुर्भावामुळे शेंगा कमी लागतात. त्या पूर्ण भरत नाहीत.
चक्री भुंगा जीवनक्रम | Life cycle of soybean girdle beetle –
1. मादी भुंगा पानाचे देठ, खोड यावर दोन खापा करून त्यामध्ये अंडी घालतो.
2. दोन्ही खापांच्या मध्ये खालच्या खापे जवळ तीन छिद्रे करते.
3. मध्यभागातील छिद्रामध्ये अंडी घालते. अशा प्रकारे एक मादी एका जागी एक अशी जवळपास 78 अंडी घालते.
4. अंडी फिकट पिवळसर व लांबट आकाराची असतात. पूर्ण वाढ झालेली अळी पिवळी व गोलाकार असते.
5. अंड्यातून अळी बाहेर निघाल्यानंतर ती पानाचे देठ, खोड पोखरत खाली जमिनीकडे जाते. त्यामुळे खापेचा वरील भाग सुकून नंतर वाळतो.
6. अळी 34 ते 38 दिवसांनी कोषावस्थेत जाते. यापैकी काही अळ्या पुढील पावसाळ्यापर्यंत सुप्तावस्थेत जातात, तर काही अळ्या कोषामध्ये जातात.
7. कोषातून आठ ते नऊ दिवसांनी प्रौढ भुंगेरे बाहेर पडतात. हे भुंगे अंडी देतात. अंड्यातून अळ्या निघून पिकांचे नुकसान करतात.
8. पुढच्या पावसाळ्यापर्यंत त्या सुप्तावस्थेत जातात. अशा प्रकारे चक्री भुंग्यांचे दोन प्रकारचे जीवनक्रम असतात.
9. एका प्रकारामध्ये वर्षभरात एकच जीवनक्रम तर दुसऱ्या प्रकारामध्ये दोन जीवनक्रम पार पडतात.
10. सुप्तावस्था झाडाच्या खोडात राहते. पहिला पाऊस झाल्यानंतर अळीची सुप्तावस्था संपते व ती कोषावस्थेत जाते. कोषातून प्रौढ भुंगा बाहेर येतो व अंडी घालतो.
प्रादुर्भावाची वेळ | soybean girdle beetle infection period –
सोयाबीन चक्री भुंगा (soybean girdle beetle) किडीचा प्रादुर्भाव सोयाबीनचे पीक साधारपणे २० ते २५ दिवसांचे झाल्यानंतर सुरू होताना दिसतो.
प्रादुर्भावाची लक्षणे | soybean girdle beetle symptoms –
1. शेतात फिरताना झाडाचे एखादेच पान किंवा फांदी सुकलेले दिसते.
2. पान फक्त सुकलेले असेल तर चक्रीभुंग्याने नुकतेच अंडे दिलेले असते.
3. जर पान वाळलेले असेल तर काही दिवसांपूर्वी अंडे दिलेले असते.
4. पान वाळलेले असेल तर काही दिवसांपूर्वी दिलेल्या अंड्यातून लवकरच अळी निघण्याची स्थिती असेल. या किडीचा प्रौढ भुंगा फिकट तपकिरी रंगाचा असतो.
5. त्याचे समोरचे पंख खालच्या बाजूने एक तृतीयांश ते अर्धा भाग काळया रंगाचे असतात.
6. अंड्यातून अळी निघाल्यानंतर ती पानाचे देठ, खोड पोखरत खाली जमिनीकडे जाते. त्यामुळे खापेच्या वरील भाग सुकून नंतर वाळतो.
7. चक्री भुंग्याच्या प्रादुर्भावामुळे शेंगा कमी लागतात व त्या पूर्ण भरत नाहीत.
8. तसेच पीक काढणीच्यावेळी खापा केलेल्या जागून खोड तुटून पडते, त्यामुळे देखील नुकसान होते.
चक्री भुंगा (soybean girdle beetle) किडी साठी पोषक वातावरण –
1. सलग रिमझिम पाऊस व सततचे ढगाळ वातावरण या किडीस पोषक असते.
2. सतत अधिक आर्द्रता असलेल्या वातावरणात या किडीची वाढ झपाट्याने होते.
3. नत्रयुक्त खतांचा असमतोल व अतिवापरामुळे किडीची वाढ झपाट्याने होते.
एकात्मिक कीड व्यवस्थापन | IPM –
अळी व भुंग्याच्या प्रभावी व्यवस्थापनासाठी खाली एकात्मिक किड व्यवस्थापन पद्धतीचा अवलंब करावा.
अ) मशागतीची पद्धत –
1. वेळेवर पेरणी करावी.
2. ज्या भागामध्ये या किडीचा प्रादुर्भाव दिसून येतो तेथे पेरणी जूनअखेरपर्यंत पूर्ण करावी.
3. दोन ओळीतील आणि झाडातील अंतर योग्य ठेवावे जेणेकरून पीक दाटणार नाही.
4. माती परीक्षणानुसार खताच्या मात्रा द्याव्यात व जास्त नत्राचा वापर टाळावा.
5. वेळेवर आंतर मशागत करून पीक तण विहिरीत ठेवावे.
6. यांत्रिक पद्धत भुंग्याना आकर्षित करण्यासाठी प्रकाश सापळ्यांचा (लाईट ट्रॅप) 1 प्रति हेक्टरी लावावा.
ब) जैविक पद्धत –
1. विविध मित्र कीटकांचे संवर्धन करावे.
2. 5 टक्के निंबोळी अर्काची फवारणी करावी.
क) रासायनिक पद्धत –
किडीच्या नियंत्रणासाठी थायोमेथॉक्झाम + लॅम्बडा सायहॅलोथ्रीन (अलिका, सिजेंटा) @ 80 मिली प्रति एकर याप्रमाणे घेऊन पिकात फवारणी करावे.
Conclusion I सारांश –
शेतकरी मित्रांनो तुम्हाला krushi doctor या वेबसाइट वरील आमचा सोयाबीन या पिकातील चक्री भुंगा या किडीचे (soybean girdle beetle) एकात्मिक नियंत्रण हा लेख तुम्हाला कसा वाटला वाटला हे खाली कमेंट बॉक्स मध्ये सांगायला विसरू नका. आणि हा लेख जर तुम्हाला आवडला तर तुमच्या इतर शेतकरी मित्रांसोबत शेयर नक्की करा. आणखी अशा प्रकारची कृषीविषयक माहिती पाहण्यासाठी आमच्या krushi doctor या वेबसाईटला नक्की भेट द्या.
FAQ’s | वारंवार विचारले जाणारे प्रश्न –
1. सोयाबीन मध्ये चक्री भुंग्याचा प्रादुर्भाव किती दिवसानंतर दिसून येतो?
उत्तर – या किडीचा प्रादुर्भाव सोयाबीनचे पीक साधारपणे २० ते २५ दिवसांचे झाल्यानंतर सुरू होताना दिसतो.
2. चक्री भुंगा नियंत्रणासाठी कोणते कीटकनाशक वापरावे?
उत्तर – किडीच्या नियंत्रणासाठी थायोमेथॉक्झाम + लॅम्बडा सायहॅलोथ्रीन (अलिका, सिजेंटा) @ 80 मिली प्रति एकर याप्रमाणे घेऊन पिकात फवारणी करावे.
3. चक्री भुंग्याच्या प्रसारासाठी कोणते वातावरण पोषक असते?
उत्तर – सलग रिमझिम पाऊस व सततचे ढगाळ वातावरण या किडीस पोषक असते. तसेच सतत अधिक आर्द्रता असलेल्या वातावरणात या किडीची वाढ झपाट्याने होते.
लेखक –
कृषी डॉक्टर सूर्यकांत
9168911489