शेतकरी मित्रांनो नमस्कार, Krushi Doctor वेबसाइट वरती आपले स्वागत आहे. आजच्या लेखामध्ये आपण सोयाबीन पिकातील तण नियंत्रण (soybean tan nashak) कसे करावे? या बद्दल सविस्तर मध्ये जाणून घेणार आहोत. सोयाबीन हे एक महत्त्वाचे तेलबिया पीक आहे. भारताचा जगामध्ये सोयाबीन उत्पादनामध्ये पाचवा क्रमांक लागतो. भारतामध्ये 2022 मध्ये सोयबिनचे 127.20 लाख मेट्रिक टन इतके विक्रमी उत्पादन निघाले होते. महाराष्ट्रात हे पीक खास करून विदर्भ, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र आणि खानदेश या विभागांमध्ये प्रामुख्याने घेतले जाते. आजच्या ब्लॉग मध्ये तुम्हाला सोयाबीन पिकातील तण नियंत्रण कसे करावे याबाबत संपूर्ण माहिती मिळणार आहे त्यामुळे तुमच्या साठी हा ब्लॉग खूप महत्वाचा ठरणार आहे. म्हणून माझी तुम्हाला विनंती आहे की हा लेख संपूर्ण वाचा आणि लेख आवडला तर शेअर नक्की करा. चला तर मग सुरू करूयात –
सोयाबीन पिकातील प्रमुख तणे | weed in soybean crop –
1. सोयाबीन पिकामध्ये रुंद पानांचे तण तसेच अरुंद पानांचे तण यांचा समावेश होतो.
2. जंगली राजगिरा, जंगली ताग, हजार दाणा, महकुआ, बन मकोय, काळे दाणा, कोडोन, डब इत्यादी अनेक तणांची समस्या आहे.
3. सोयाबीन पिकामध्ये पेरणीनंतर 20 ते 45 दिवसांत तण वाढण्याची शक्यता असते.
सोयाबीन तण नियंत्रणाच्या विविध पद्धती | soybean weed control methods –
1. सोयाबीन पेरण्यापूर्वी एकदा शेतात खोल नांगरणी करून काही दिवस शेत मोकळे सोडावे.
2. खोल नांगरणी केल्यामुळे, शेतात उपस्थित तणांची मुळे वर येतात आणि कडक सूर्यप्रकाशात नष्ट होतात.
3. पेरणीनंतर २ ते ३ दिवसात पेंडीमेथालिनची फवारणी शेतात करावी.
4. तण नियंत्रणासाठी तण काढणे हा उत्तम पर्याय आहे.
5. बिया पेरल्यानंतर 20 ते 25 दिवसांनी पहिली खुरपणी करावी.
6. पेरणीनंतर साधारण ४० ते ४५ दिवसांनी दुसरी खुरपणी करावी.
7. पीक वाढीच्या अवस्थेत वेळीच तण नियंत्रित केले नाही तर तन अन्नद्रव्ये, पाणी आणि सूर्यप्रकाश आणि जागा यांच्याशी पिकासोबत स्पर्धा करते आणि त्याचा परिणाम उत्पादनावर दिसून येतो.
सोयाबीन पिकांमध्ये वापरता येणारी तणनाशके | soybean tan nashak –
अ) उगवणपूर्व | pre emergence herbicide –
1. पेंडीमिथॅलीन ३८.७ सीएस, दोस्त सुपर, यूपीएल
-> वापराची योग्य मात्रा – २० ते ३५ मिली / पंप
-> वापराची वेळ – उगवणपूर्व
2. डायफ्लोसुलम ८४ टक्के डब्ल्यूडीजी, स्ट्रॉन्गार्म, डाऊ एग्रो सायन्स
-> वापराची मात्रा – ०.४२ ग्रॅम / लीटर
-> वापराची वेळ – उगवणपूर्व, फक्त सोयाबीन सलग पिकात.
3. सल्फेक्ट्राझॉन ३९.६ टक्के डब्ल्यूएससी, स्पार्टन, अरिस्टो बायोटेक अँड लाइफ सायन्स
-> वापराची मात्रा – १५ मिली / पंप
-> वापराची योग्य वेळ – उगवणीपूर्व
4. इमॅझीथायपर २ टक्के इसी, ट्रेड नाव – चॉपर, कंपनीचे नाव – बीएएसएफ
-> वापराची मात्रा – ५० ते ६० मिली प्रती पंप
-> वापराची योग्य वेळ – उगवणीपूर्व
5. इमॅझीथायपर १० टक्के डब्ल्यूएसएल, चिता, एचपीएम केमिकल्स अँड फर्टिलायझर्स लि.
-> वापराची मात्रा – १५ ते २० मिली प्रती पंप
-> वापराची योग्य वेळ – उगवणीपूर्व किंवा सलग पिकात उगवण पश्चात.
( टीप – पीक १५ ते २० दिवसांचे असताना द्रावणात अमोनियम सल्फेट व प्रसारकद्रव्य योग्य मात्रेत व योग्य प्रमाणात मिसळून फवारावे. )
ब) उगवणपश्चात | post emergence herbicide –
1. इमाझामॉक्स 35% + इमाझेथापायरा 35% डब्ल्यूजी, ओडिसी, बीएएसएफ – २ एम एल / लीटर पानी – उगवणपश्चात – पीक १५ ते २० दिवसांचे असताना – किंवा तण २ ते ३ पानांच्या अवस्थेत असताना फवारणी.
-> द्रावणात प्रसारक द्रव्ये १.५ मिली प्रति लीटर पाणी अधिक २ ग्रॅम अमोनियम सल्फेट.
2. क्लोरीम्युरॉन इथाईल २५ डब्ल्यूपी, धानुका कुरीन, धानुका एग्रीटेक
-> वापराचे प्रमाण – ०.८ ग्रॅम प्रति पंप
-> वापराची योग्य वेळ – उगवणीपश्चात- पीक १० ते २० दिवसांचे असताना प्रसारक द्रव्य मिसळून घ्यावे.
3. क्विझॅलोफॉप पी ईथाईल ५ इसी, टारगा सुपर, धानुका एग्रीटेक
-> वापराची मात्रा – २० मिली प्रती पंप
-> वापराची योग्य वेळ – उगवणीपश्चात – पीक १५ ते २० दिवसांचे असताना
( टीप – फवारणीनंतर ५ ते १० दिवस डवरणी करू नये. द्रावणात प्रसारक द्रव्य १० मिली प्रति लीटर पाण्यात मिसळावे. )
4. प्रोपॅक्विझाफॉप १० इसी, अदामा एगिल, अदामा लिमिटेड
-> वापराची मात्रा – १५ मिली प्रती पंप
-> वापराची योग्य वेळ – उगवणपश्चात – उभ्या पिकात – पीक १५ ते २० दिवसांचे असताना.
5. प्रोपॅक्विझाफॉप २.५ टक्के अधिक इमॅझीथायपर ३.७५ टक्के डब्ल्यू डब्ल्यूएम, शाकेद, अदामा लिमिटेड.
-> वापराची मात्रा – ४० मिली प्रती पंप
-> वापराची योग्य वेळ – उगवणपश्चात- उभ्या पिकात- पीक १५ ते २० दिवसांचे असताना.
6. सोडियम ॲसिफ्लोरोफेन १६.५ टक्के अधिक क्लोडोनीफोप प्रोपॅजील १० इसी, यूपीएल आइरिस, यूपीएल (United phosphorus Limited) लिमिटेड
-> वापराची मात्रा – २० मिली प्रती पंप
-> वापराची योग्य वेळ – उगवणपश्चात- उभ्या पिकात- पीक १५ ते २० दिवसांचे असताना.
soybean tan nashak फवारताना घ्यावयाची काळजी | precautions in herbicide use –
1. लेबल क्लेमनुसारच वापर करावा.
2. ढगाळ व पावसाळी वातावरण तसेच धुके किंवा पाऊस असताना फवारणी करू नये.
3. वारा नसताना व जमिनीत ओलावा असताना उगवणीपूर्वी फवारणी करावी. स्वच्छ पाणी वापरावे.
4. जमिनीवर फवारावयाचे तणनाशक चांगली मशागत केलेल्या ढेकळेरहित जमिनीवर फवारावे. तणनाशक ढेकळाखाली उगवणाऱ्या तणांपर्यंत पोचू शकत नाही. पर्यायाने पूर्णपणे नियंत्रण होत नाही.
5. उगवणीपूर्व फवारणी पेरणीदिवशी किंवा दुसऱ्या दिवशी पिकाचे बी मातीने व्यवस्थित झाकल्यानंतरच करावी. 6. पीक अंकुरण झाल्यावर फवारणी करू नये.
7. उगवणीपूर्व तणनाशके फवारताना तणांची उगवण झालेली नसावी.
8. तणनाशकांकासाठी वेगळा पंप ठेवावा. ते शक्य नसल्यास तणनाशक फवारल्यानंतर संपूर्ण पंप (नळयांसहित) साबणाच्या पाण्याने २ ते ३ वेळा व नंतर साध्या पाण्याने २ ते ३ वेळा स्वच्छ धुऊन घ्यावा. जेणेकरून तणनाशकाचा अंश त्यात शिल्लक राहणार नाही.
9. फ्लॅट फॅन किंवा फ्लड जेट नोझल वापरावे. म्हणजे फवारणी सर्वत्र सारख्या प्रमाणात होईल. असे नोझल कमी दाबावर फवारा उडवते. त्यामुळे शेजारच्या पिकावर फवारा जात नाही.
10. फवारणी यंत्राचे अंशीकरण करून घ्यावे. अंशीकरण म्हणजे फवारणी करण्यापूर्वी विशिष्ट दाबाखाली ठरावीक क्षेत्रात किती द्रावण फवारले गेले हे तपासून घेणे. सर्वत्र सारख्या दाबाखाली फवारणी करावी.
11. तृणवर्गीय पिकात मूग, उडीद यासारखी द्विदलवर्गीय पिके असल्यास २,४-डी या तणनाशकाची फवारणी करू नये. कारण द्विदल वर्गीय पिके नष्ट होतील. इस्टर स्वरूप वापरू नये. पॉवर पंप वापरू नये.
12. तणनाशक वापराचा पूर्व अनुभव नसल्यास पहिल्या वेळेस कमी क्षेत्रावर वापर करावा.
13. फवारणी स्वतःच्या अथवा शेजारच्या शेतात उडणार नाही याची संपूर्ण दक्षता घ्यावी.
14. तणनाशकांचा संपर्क अन्य कीटकनाशके, बुरशीनाशके, बियाणे यांच्याशी येणार नाही याची काळजी घ्यावी.
15. वारंवार एकच तणनाशक न वापरता आलटून पालटून वापर करावा. एकदा पेरणीपूर्व तर दुसऱ्यावेळी शिफारशीप्रमाणे उगवणपश्चात तणनाशक वापरावे.
Conclusion | सारांश –
शेतकरी मित्रांनो आशा करतो की तुम्हाला Krushi Doctor website वरील आमचा “सोयाबीन तन नाशक माहिती (soybean tan nashak): जाणून घ्या सविस्तर आणि सोप्या भाषेत” हा लेख खूप आवडला असेल. सोयाबीन मधील तण नियंत्रण कसे करावे ही माहिती नक्कीच यंदाच्या खरीप हंगामामध्ये तुमच्या उपयोगी येईल. ही माहिती जर तुम्हाला खरच आवडली तर नक्कीच तुमच्या इतर शेतकरी ग्रुप मध्ये शेयर नक्की करा. आणि सोयाबीन पिकाबद्दल इतर कोणतीही माहिती तुम्हाला जाणून घ्यायची असेल तर आमच्या Krushi Doctor Sheti Mahiti पेजला भेट द्या.
लेखक
कृषि डॉक्टर
9168911489