शेयर करा

soybean herbicide

शेतकरी मित्रानो नमस्कार, कृषी डॉक्टर (krushi doctor) या शेती निगडित माहिती देणाऱ्या मराठी वेबसाईट वरती आपले सहर्ष स्वागत आहे. आज आपण या लेखामध्ये सोयाबीन पिकामध्ये वापरता येणाऱ्या प्रमुख तणनाशकांची (soybean herbicide) माहिती पाहणार आहोत. मी तुम्हाला सोयाबीन पिकातील तणनाशकांची नावे, त्याच्यामधील घटक, वापराची पद्धत आणि मात्रा देखील सांगणार आहे. त्यामुळे तुम्ही जर एक सोयाबीन उत्पादक शेतकरी असाल तर हा लेख तुमच्या साठी खूपच महत्वाचा आहे. माझी तुम्हाला एक विनंती आहे कि, हा लेख पूर्ण वाचा आणि माहिती आवडली तर हा लेख तुमच्या इतर शेतकरी ग्रुप मध्ये शेअर नक्की करा.

मित्रांनो पीक कोणतंही असो, जर तुमच्या पिकात तणांचा प्रादुर्भाव असेल तर तुमच्या पिकाचे जवळपास ६० ते ७० नुकसान फिक्स आहे. कारण हि तणे आपल्या शेतामधील मुख्य पिकासोबत नेहमीच जागा, हवा, पाणी, खते आणि सूर्यप्रकाश यांच्यासाठी स्पर्धा करत असतात. यांचे जर आपण वेळीच नियंत्रण नाही केले तर आपल्याला पिकामध्ये पाणी देणे, आंतरमशागत करणे तसेच इतर कार्ये करणे अवघड होऊन जात, सोबतच पिकाचे नुकसान होत ते वेगळेच. म्हणुनच खास करून सोयाबीन पिकामध्ये सुरुवातीचे २५ ते ३० दिवस आपला प्लॉट तण मुक्त ठेवणे खूप गरजेचे आहे.

सोयाबीन पीक उगवणी पूर्वी वापरता येणारी तणनाशके । soybean pre emergent herbicide –

तणनाशकाचे नाव समाविष्ट घटक मात्रा वेळ
Dost Super (UPL)
Dhanutop Super (Dhanuka)
Stomp Xtra (BASF)
Pendimethalin 38.7% CS ७०० मिली/एकर  लागवडी नंतर ४८ तासाच्या आत. (सूचना – हि तण नाशके फक्त कोरड्या जमिनीवर वापरावीत व नंतर लगेच पाणी द्यावे.) 
Dost (UPL)
Plod (BASF)
Pendisul (Sulphur Mills)
Pendimethalin 30% EC  १ लिटर/एकर लागवडी नंतर ४८ तासाच्या आत. (सूचना – हि तण नाशके फक्त ओल्या जमिनीवर वापरावीत. म्हणजे अगोदर प्लॉट ला पाणी द्यावे व मगच यांचा वापर करावा.) 
Strongarm (Corteva) Diclosulam 84% WDG १२.४ ग्राम/एकर  लागवडी नंतर ४८ तासाच्या आत. 
Authority (FMC) Sulfentrazone 28% + Clomazone 30% WP १ किलो/एकर लागवडी नंतर ४८ तासाच्या आत. 

 

सोयाबीन उगवणी नंतर वापरता येणारी तणनाशके । post emergence herbicide for soybeans –

तणनाशकाचे नाव समाविष्ट घटक मात्रा वेळ
Shaked (ADAMA) Propaquizafop 2.5%+ Imazethapyr 3.75% w/w ME ८०० मिली/एकर सोयाबीन पेरणी नंतर २५ ते ३० दिवसांनी. म्हणजेच पीक २ ते ३ पानावर असताना. 
Fusiflex (Syngenta) Fluazifop-p-butyl 13.4 %EC ४०० मिली/एकर सोयाबीन पेरणी नंतर २५ ते ३० दिवसांनी. म्हणजेच पीक २ ते ३ पानावर असताना. 
Lagaam (UPL) Imazethapyr 10% SL ४०० मिली/एकर सोयाबीन पेरणी नंतर २५ ते ३० दिवसांनी. म्हणजेच पीक २ ते ३ पानावर असताना. 
Iris (UPL) Sodium Acifluorfen 16.5% + Clodinafop Propargyl 8% EC ४०० मिली/एकर सोयाबीन पेरणी नंतर २५ ते ३० दिवसांनी. म्हणजेच पीक २ ते ३ पानावर असताना. 

सोयाबीन पिकामध्ये तण नाशके फवारणी करताना कोणती काळजी घ्यावी?

१. तणनाशकांचा वापर नेहमी शिफारशीनुसार करावा.
२. जास्त ढगाळ किंवा पावसाचे वातावरण असेल तर फवारणी करणे टाळावे.
३. भर उन्हात फवारणी करू नये.
४. तणनाशकांसोबत स्टिकर व्यतिरिक्त इतर कोणते हि औषध फवारू नये.
५. फवारणी झाल्यानंतर हात – पाय व फवारणी यंत्रे स्वछ धुवून ठेवावीत.
६. तणनाशकांची फवारणी करताना कोणत्याही प्रकारचे मद्य पण करू नये.
७. फवारणी नंतर औषधांच्या बाटल्या किंवा पॅकेट ची योग्य विल्हेवाट लावावी.

Conclusion | सारांश –

मित्रांनो आशा करतो की कृषि डॉक्टर (krushi doctor) वेबसाइट वरील आजच्या लेखामध्ये दिलेली सोयाबीन तणनाशकांची संपूर्ण (soybean herbicide) माहिती तुम्हाला समजली आहे आणि त्याचा तुम्हाला यंदाच्या हंगामात फायदा नक्की होईल. तूर पिकाबद्दल अधिक माहिती जाणून घेण्यासाठी आमच्या कृषि डॉक्टर यूट्यूब चॅनल ला नक्की भेट द्या. धन्यवाद …🙏

People also read | हे लेख देखील नक्की वाचा –

१. best soybean variety: मार्केट मधील टॉप 5 सोयाबीन सुधारित वाण
२. bihar hairy caterpillar: सोयाबीन पिकातील वायरल झालेल्या केसाळ आळीचे संपूर्ण नियंत्रण
३. soybean stem fly: सोयाबीन खोड माशी नियंत्रणची A to Z माहिती
४. soybean girdle beetle: सोयाबीन चक्री भुंगा किडीचे नियंत्रण
५. soybean mosaic virus: सोयाबीन मोजेक वायरस नियंत्रण
६. soybean spray schedule: सोयाबीन पहिली फवारणी कोणती घ्यावी?
७. soybean fertilizer dose: सोयाबीन खत व्यवस्थापन ची संपूर्ण माहिती
८. soybean tan nashak: सोयाबीन पिकातील तन नाशक फवारणी वेळापत्रक
९. soybean lagwad: सोयाबीन लागवड करून एकरी घ्या 14 ते 15 क्विंटल उत्पादन
१०. उन्हाळी सोयाबीन लागवड (unhali soybean lagwad): लागवड ते काढणी संपूर्ण माहिती

Our other websites । आमच्या इतर वेबसाइट्स –

१. कृषी औषधे (सर्व कृषी औषधांची माहिती देणारी वेबसाइट)
२. फसल जानकारी (शेती निगडित हिंदी मधून माहिती देणारी वेबसाइट)
३. कृषि दवा (सर्व कृषी औषधांची हिंदी मधून माहिती देणारी वेबसाइट)

FAQs | सतत विचारले जाणारे प्रश्न –

१. सोयाबीनसाठी कोणते तणनाशक सर्वोत्तम आहे?
उत्तर – सोयाबीन पिकामध्ये तुम्ही पीक उगवणी पूर्वी – Dost (UPL), Plod (BASF), Strongarm (Corteva) किंवा Authority (FMC) यांच्या वापर करू शकता तर पीक उगवणी नंतर – Shaked (ADAMA), Fusiflex (Syngenta) किंवा Lagaam (UPL) यांचा वापर करू शकता.

२. सोयाबीन तणनाशक किती दिवसांनी मारावे?
उत्तर – सोयाबीन पिकामध्ये तुम्ही बियाणे पेरणी नंतर २० ते २५ दिवसांनी तण नाशक फवारणी घेऊ शकता.

३. सोयाबीनपासून तण कसे दूर ठेवायचे?
उत्तर – यासाठी तुम्ही सोयाबीन पिकामध्ये खुरपणी किंवा तणनाशकांची फवारणी घेऊ शकता.

Author | लेखक –

सूर्यकांत कांबळे
मू. पो – इर्ले, तालुका – बार्शी, जिल्हा – सोलापूर.
राज्य – महाराष्ट्र. पिन – 413412


शेयर करा