शेयर करा

cotton herbicide

शेतकरी मित्रानो नमस्कार, कृषी डॉक्टर (krushi doctor) या शेती निगडित माहिती देणाऱ्या मराठी वेबसाईट वरती आपले सहर्ष स्वागत आहे. आज आपण या लेखामध्ये कापूस पिकामध्ये वापरता येणाऱ्या प्रमुख तणनाशकांची (cotton herbicides) माहिती पाहणार आहोत. मी तुम्हाला कापूस पिकातील तणनाशकांची नावे, त्याच्यामधील घटक, वापराची पद्धत आणि मात्रा देखील सांगणार आहे. त्यामुळे तुम्ही जर एक कापूस उत्पादक शेतकरी असाल तर हा लेख तुमच्या साठी खूपच महत्वाचा आहे. माझी तुम्हाला एक विनंती आहे कि, हा लेख पूर्ण वाचा आणि माहिती आवडली तर हा लेख तुमच्या इतर शेतकरी ग्रुप मध्ये शेअर नक्की करा.

कापूस पिकातील तणांचा प्रादुर्भाव व होणारे नुकसान –

मित्रांनो पीक कोणतंही असो, जर तुमच्या पिकात तणांचा प्रादुर्भाव असेल तर तुमच्या पिकाचे जवळपास ६० ते ७० नुकसान फिक्स आहे. कारण हि तणे आपल्या शेतामधील मुख्य पिकासोबत नेहमीच जागा, हवा, पाणी, खते आणि सूर्यप्रकाश यांच्यासाठी स्पर्धा करत असतात. यांचे जर आपण वेळीच नियंत्रण नाही केले तर आपल्याला पिकामध्ये पाणी देणे, आंतरमशागत करणे तसेच इतर कार्ये करणे अवघड होऊन जात, सोबतच पिकाचे नुकसान होत ते वेगळेच. म्हणुनच खास करून कापूस पिकामध्ये सुरुवातीचे ६० दिवस आपला प्लॉट १००% तण मुक्त ठेवणे खूप गरजेचे आहे.

कापूस पीक उगवणी पूर्वी वापरता येणारी तणनाशके । pre emergence herbicide for cotton –

तणनाशकाचे नाव समाविष्ट घटक मात्रा वेळ
Dost Super (UPL)
Dhanutop Super (Dhanuka)
Stomp Xtra (BASF)
Pendimethalin 38.7% CS ७०० मिली /एकर  लागवडी नंतर ४८ तासाच्या आत. (सूचना – हि तण नाशके फक्त कोरड्या जमिनीवर वापरावीत व नंतर लगेच पाणी द्यावे.) 
Dost (UPL)
Dhanutop (Dhanuka)
Bunker (PI)
Pendimethalin 30% EC  १ लिटर/एकर लागवडी नंतर ४८ तासाच्या आत. (सूचना – हि तण नाशके फक्त ओल्या जमिनीवर वापरावीत. म्हणजे अगोदर प्लॉट ला पाणी द्यावे व मगच यांचा वापर करावा.) 

कापूस पीक उगवणीनंतर वापरता येणारी तणनाशके । post emergence herbicide for cotton –

समाविष्ट घटक नावे मात्रा वेळ
Pyrithiobac Sodium 10% EC Hitweed (Godrej)
Widigo (Adama)
Fortem (UPL)
४०० मिली /एकर  लागवडी नंतर २० ते २५ दिवसांनी. म्हणजेच जेव्हा आपले पीक २ ते ३ पानावर असेल.
Quizalofop Ethyl 5% EC Targa Super (Dhanuka)
Tathaastu (Katyayani)
३०० ते ४०० मिली/एकर लागवडी नंतर २० ते २५ दिवसांनी. म्हणजेच जेव्हा आपले पीक २ ते ३ पानावर असेल.
Pyrithiobac Sodium 6% + Quizalofop Ethyl 4% MEC Ghasa (Bayer)
Hitweed Maxx (Godrej)
Dozo Maxx (Dhanuka)
Kevat Ultra (Tata)
४५० मिली / एकर लागवडी नंतर २० ते २५ दिवसांनी. म्हणजेच जेव्हा आपले पीक २ ते ३ पानावर असेल.

कापूस पिकामध्ये तणनाशके मारताना कोणती कोणती काळजी घ्यावी?

१. तणनाशकांचा वापर नेहमी शिफारशीनुसार करावा.
२. जास्त ढगाळ किंवा पावसाचे वातावरण असेल तर फवारणी करणे टाळावे.
३. भर उन्हात फवारणी करू नये.
४. तणनाशकांसोबत स्टिकर व्यतिरिक्त इतर कोणते हि औषध फवारू नये.
५. फवारणी झाल्यानंतर हात – पाय व फवारणी यंत्रे स्वछ धुवून ठेवावीत.
६. तणनाशकांची फवारणी करताना कोणत्याही प्रकारचे मद्य पण करू नये.
७. फवारणी नंतर औषधांच्या बाटल्या किंवा पॅकेट ची योग्य विल्हेवाट लावावी.

Conclusion | सारांश –

मित्रांनो आशा करतो की कृषि डॉक्टर (krushi doctor) वेबसाइट वरील आजच्या लेखामध्ये दिलेली कापूस तण नियंत्रणाची (cotton herbicides) संपूर्ण माहिती तुम्हाला समजली आहे आणि त्याचा तुम्हाला यंदाच्या हंगामात फायदा नक्की होईल. तूर पिकाबद्दल अधिक माहिती जाणून घेण्यासाठी आमच्या कृषि डॉक्टर यूट्यूब चॅनल ला नक्की भेट द्या. धन्यवाद …🙏

People also read | हे लेख देखील नक्की वाचा –

१. cotton variety: कापूस पिकाच्या टॉप 5 जातींची संपूर्ण माहिती
२. pink bollworm chemical control: कापूस पिकातील बोंड अळी नियंत्रण
३. leaf reddening in cotton: कापूस पिकातील लाल्या रोगाची संपूर्ण माहिती
४. pink bollworm: कापूस बोंड अळीचे संपूर्ण नियंत्रण कसे करावे?
५. cotton root rot: कापूस पिकामध्ये मूळकुज नियंत्रण कसे करावे?
६. kapus pahili favarni: कापूस पिकामध्ये पहिली फवारणी कोणती करावी?
७. cotton farming: कापूस लागवड करून एकरी घ्या 12 ते 15 क्विंटल उत्पादन
८. कापूस तन नाशक (weed in cotton) माहिती: कापूस पिकातील तन नाशक फवारणी वेळापत्रक
९. कापूस पिकातील नंबर 1 व्हरायटी: यूएस 7067 (us 7067 cotton seeds)
१०. कापूस पिकाच्या राशी 659 (rasi 659 cotton seed) वाणाची संपूर्ण माहिती
११. अजित 155 कापूस (ajeet 155 cotton seeds): वैशिष्टे, पोषक हवामान, बिजदर आणि किंमत
१२. कबड्डी कापूस बियाणे (kabaddi cotton seeds) : खरीप 2023 साठी नंबर 1 बियाणे

Our other websites । आमच्या इतर वेबसाइट्स –

१. कृषी औषधे (सर्व कृषी औषधांची माहिती देणारी वेबसाइट)
२. फसल जानकारी (शेती निगडित हिंदी मधून माहिती देणारी वेबसाइट)
३. कृषि दवा (सर्व कृषी औषधांची हिंदी मधून माहिती देणारी वेबसाइट)

FAQs | सतत विचारले जाणारे प्रश्न –

1. कापसात कोणते तणनाशक वापरावे?
उत्तर – कापूस पिकामध्ये तुम्ही पीक उगवणी पूर्वी – Dost Super (UPL), Dhanutop Super (Dhanuka) किंवा Stomp Xtra (BASF) यांचा वापर करू शकता तसेच पीक उगवाणी नंतर – Ghasa (Bayer), Hitweed Maxx (Godrej), Dozo Maxx (Dhanuka) किंवा Kevat Ultra (Tata) यांचा वापर करू शकता.

२. कापसावर राउंडअप वापरले जाते का?
उत्तर – नाही, शक्यतो कापूस पिकामध्ये राऊंडअप हे तणनाशक वापरू नये.

३. कापसावर ग्लायफोसेट फवारले जाते का?
उत्तर – नाही, कापूस पिकावर ग्लायफोसेट फवारले जात नाही.

४. कापूस तणनाशक प्रतिरोधक आहे?
उत्तर – जर योग्य आणि शिफारशीत तणनाशकांचा वापर केला तर कापूस त्यांना प्रतिरोध करू शकते.

५. कापसात कोणते तणनाशक जास्त वापरले जाते?
उत्तर – कापूस पिकामध्ये तुम्ही पीक उगवणी पूर्वी – Dost Super (UPL), Dhanutop Super (Dhanuka) किंवा Stomp Xtra (BASF) यांचा वापर करू शकता तसेच पीक उगवाणी नंतर – Ghasa (Bayer), Hitweed Maxx (Godrej), Dozo Maxx (Dhanuka) किंवा Kevat Ultra (Tata) या तणनाशकांचा वापर हा जास्त करून केला जातो.

Author | लेखक –

सूर्यकांत कांबळे
मू. पो – इर्ले, तालुका – बार्शी, जिल्हा – सोलापूर.
राज्य – महाराष्ट्र. पिन – 413412


शेयर करा