
शेतकरी मित्रांनो नमस्कार, कृषी डॉक्टर या शेती निगडित माहिती देणाऱ्या मराठी वेबसाईटवर आपले सहर्ष स्वागत आहे. आज आपण या लेखामध्ये कापूस पिकामध्ये वापरता येणाऱ्या प्रमुख तणनाशकांची म्हणजेच cotton herbicides विषयी सविस्तर माहिती पाहणार आहोत. केंद्रीय कापूस संशोधन संस्था (CICR) च्या शिफारशीनुसार पिकाचे योग्य वेळी तण नियंत्रण करणे अत्यंत गरजेचे असते. मी तुम्हाला पिकातील तणनाशकांची नावे, त्यांच्यामधील घटक, वापराची पद्धत आणि मात्रा देखील सांगणार आहे. त्यामुळे तुम्ही जर एक कापूस उत्पादक शेतकरी असाल तर हा लेख तुमच्यासाठी खूपच महत्त्वाचा आहे. माझी तुम्हाला एक विनंती आहे की, हा लेख पूर्ण वाचा आणि माहिती आवडली तर इतर शेतकरी ग्रुपमध्ये शेअर नक्की करा.
📉 कापूस पिकातील तणांचा प्रादुर्भाव व होणारे नुकसान
मित्रांनो पीक कोणतेही असो, जर तुमच्या पिकात तणांचा प्रादुर्भाव असेल तर तुमच्या पिकाचे जवळपास 60 ते 70 टक्के नुकसान फिक्स आहे. कारण ही तणे आपल्या शेतामधील मुख्य पिकासोबत नेहमीच जागा, हवा, पाणी, खते आणि सूर्यप्रकाश यांच्यासाठी स्पर्धा करत असतात. यांचे जर आपण वेळीच नियंत्रण नाही केले तर आपल्याला पिकामध्ये पाणी देणे, आंतरमशागत करणे तसेच इतर कार्ये करणे अवघड होऊन जाते, सोबतच पिकाचे नुकसान होते ते वेगळेच. म्हणूनच खास करून कापूस पिकामध्ये सुरुवातीचे 60 दिवस आपला प्लॉट 100% तणमुक्त ठेवणे खूप गरजेचे आहे.
🌱 कापूस पीक उगवणीपूर्वी वापरता येणारी cotton herbicides
| तणनाशकाचे नाव | समाविष्ट घटक | मात्रा | वेळ |
|---|---|---|---|
| Dost Super (UPL) Dhanutop Super (Dhanuka) Stomp Xtra (BASF) |
Pendimethalin 38.7% CS | 700 मिली / एकर | लागवडीनंतर 48 तासांच्या आत. (सूचना – ही तणनाशके फक्त कोरड्या जमिनीवर वापरावीत व नंतर लगेच पाणी द्यावे.) |
| Dost (UPL) Dhanutop (Dhanuka) Bunker (PI) |
Pendimethalin 30% EC | 1 लिटर / एकर | लागवडीनंतर 48 तासांच्या आत. (सूचना – ही तणनाशके फक्त ओल्या जमिनीवर वापरावीत. म्हणजे अगोदर प्लॉटला पाणी द्यावे व मगच यांचा वापर करावा.) |
🌿 कापूस पीक उगवणीनंतर वापरता येणारी तणनाशके
| समाविष्ट घटक | नावे | मात्रा | वेळ |
|---|---|---|---|
| Pyrithiobac Sodium 10% EC | Hitweed (Godrej) Widigo (Adama) Fortem (UPL) |
400 मिली / एकर | लागवडीनंतर 20 ते 25 दिवसांनी. म्हणजेच जेव्हा आपले पीक 2 ते 3 पानांवर असेल. |
| Quizalofop Ethyl 5% EC | Targa Super (Dhanuka) Tathaastu (Katyayani) |
300 ते 400 मिली / एकर | लागवडीनंतर 20 ते 25 दिवसांनी. म्हणजेच जेव्हा आपले पीक 2 ते 3 पानांवर असेल. |
| Pyrithiobac Sodium 6% + Quizalofop Ethyl 4% MEC | Ghasa (Bayer) Hitweed Maxx (Godrej) Dozo Maxx (Dhanuka) Kevat Ultra (Tata) |
450 मिली / एकर | लागवडीनंतर 20 ते 25 दिवसांनी. म्हणजेच जेव्हा आपले पीक 2 ते 3 पानांवर असेल. |
⚠️ कापूस पिकामध्ये तणनाशके मारताना घ्यावयाची काळजी
- 1. तणनाशकांचा वापर नेहमी शिफारशीनुसार करावा.
- 2. जास्त ढगाळ किंवा पावसाचे वातावरण असेल तर फवारणी करणे टाळावे.
- 3. भर उन्हात फवारणी करू नये.
- 4. तणनाशकांसोबत स्टिकर व्यतिरिक्त इतर कोणतेही औषध फवारू नये.
- 5. फवारणी झाल्यानंतर हात-पाय व फवारणी यंत्रे स्वच्छ धुवून ठेवावीत.
- 6. तणनाशकांची फवारणी करताना कोणत्याही प्रकारचे मद्यपान करू नये.
- 7. फवारणीनंतर औषधांच्या बाटल्या किंवा पॅकेटची योग्य विल्हेवाट लावावी.
सारांश
मित्रांनो आशा करतो की कृषी डॉक्टर वेबसाईटवरील आजच्या लेखामध्ये दिलेली cotton herbicides ची संपूर्ण माहिती तुम्हाला समजली आहे आणि त्याचा तुम्हाला यंदाच्या हंगामात फायदा नक्की होईल. तूर पिकाबद्दल अधिक माहिती जाणून घेण्यासाठी आमच्या कृषी डॉक्टर यूट्यूब चॅनलला नक्की भेट द्या. धन्यवाद…🙏
📚 हे लेख देखील नक्की वाचा
❓ सतत विचारले जाणारे प्रश्न (FAQs)
1. कापसात कोणते तणनाशक वापरावे?
उत्तर – कापूस पिकामध्ये तुम्ही पीक उगवणीपूर्वी – Dost Super (UPL), Dhanutop Super (Dhanuka) किंवा Stomp Xtra (BASF) यांचा वापर करू शकता तसेच पीक उगवणीनंतर – Ghasa (Bayer), Hitweed Maxx (Godrej), Dozo Maxx (Dhanuka) किंवा Kevat Ultra (Tata) यांचा वापर करू शकता.
2. कापसावर राउंडअप वापरले जाते का?
उत्तर – नाही, शक्यतो कापूस पिकामध्ये राऊंडअप हे तणनाशक वापरू नये.
3. कापसावर ग्लायफोसेट फवारले जाते का?
उत्तर – नाही, कापूस पिकावर ग्लायफोसेट फवारले जात नाही.
4. कापूस तणनाशक प्रतिरोधक आहे का?
उत्तर – जर योग्य आणि शिफारशीत तणनाशकांचा वापर केला तर कापूस त्यांना प्रतिरोध करू शकतो.
5. कापसात कोणते तणनाशक जास्त वापरले जाते?
उत्तर – कापूस पिकामध्ये तुम्ही पीक उगवणीपूर्वी – Dost Super (UPL), Dhanutop Super (Dhanuka) किंवा Stomp Xtra (BASF) यांचा वापर करू शकता तसेच पीक उगवणीनंतर – Ghasa (Bayer), Hitweed Maxx (Godrej), Dozo Maxx (Dhanuka) किंवा Kevat Ultra (Tata) या तणनाशकांचा वापर हा जास्त करून केला जातो.
लेखक: कृषी डॉक्टर – सूर्यकांत कांबळे | पत्ता: इर्ले, ता. बार्शी, जि. सोलापूर, महाराष्ट्र – 413412 | संपर्क: +91 8956970102