शेयर करा

cotton variety

शेतकरी मित्रांनो नमस्कार, मी कृषि डॉक्टर आपल्या सर्वांचे Krushi Doctor या मराठी मधून शेतीची माहिती देणाऱ्या वेबसाइट वरती आपले सहर्ष स्वागत करतो. आज आपण पाहणार आहोत की आपण कापूस लागवडीसाठी कोणत्या टॉप 5 जातींची (cotton variety) निवड करायला हवी. तसेच या लेखामध्ये मी तुम्हाला कापूस पीक लागवडीचा योग्य हंगाम आणि लागवडीचे योग्य अंतर देखील सांगणार आहे. म्हणून माझी तुम्हाला एक विनंती आहे की जर तुम्ही एक कापूस उत्पादक शेतकरी असाल तर हा लेख खरच तुमच्यासाठी खूप महत्वाचा ठरणार आहे. लेख पूर्ण वाचा आणि माहिती आवडली तर हा लेख तुमच्या इतर कापूस उत्पादक शेतकरी ग्रुप मध्ये शेयर नक्की करा.

Best cotton variety in maharashtra | बेस्ट कापूस व्हरायटी –

नंबर नाव वैशिष्टे
1 Rasi 926 वैशिष्ट्ये – मोठा बोंडाचा आकार, वेचणीस सोपा, लीफ कर्ल व्हायरसला सहनशील, जास्त बोंडाची संख्या.

पिकाची वाढ – पसरणारी आणि सरळ वाढणारी

पेरणीची पद्धत – टोकन पद्धत

सिंचन – कोरडवाहू/बागायती

पीक कालावधी – 160 – 165 दिवस

उत्पन्न 12 – 14 क्विंटल / एकर

Ajeet 177 वैशिष्ट्ये – मोठा बोंडाचा आकार, जास्त फायबर, लाल पानांच्या रोगास (लाल्या रोग) अधिक सहनशील आणि रस शोषक किडींना माफक प्रमाणात सहनशील.

पेरणीची पद्धत – टोकन पद्धत

सिंचन – कोरडवाहू/बागायती

बोंडाचे वजन – 6 – 6.5 ग्रॅम

पीक कालावधी – 145 – 160 दिवस

उत्पादन – 12 – 15 क्विंटल / एकर

Rasi RCH 846 वैशिष्ट्ये – मोठा बोंडाचा आकार, वेचणीस सोपा, कीड व रोगांना सहनशील, लवकर परिपक्व होणारे वाण.

पेरणीची पद्धत- टोकन पद्धत

सिंचन – बागायती

पीक कालावधी – 140 – 145 दिवस

उत्पन्न – 14 – 15 क्विंटल / एकर

4 Nuziveedu Talent वैशिष्ट्ये – उंच, पसरणारे आणि दाट पाने असलेली झाडे, लवकर परिपक्व होणारे वाण, कापूस वेचणीस सोपा, रस शोषक किडीना सहनशील.

जमीन – मध्यम ते भारी जमीन

पेरणीची पद्धत – टोकन पद्धत

सिंचन – कोरडवाहू/बागायती

झाडाची उंची – 5 फूट

बोंडाचे वजन – 4.5 – 5 ग्रॅम

पीक कालावधी – 150 – 155 दिवस

उत्पादन – 10 – 12 क्विंटल / एकर

5 Crystal Avvall वैशिष्ट्ये – चांगली रोपाची उंची, मजबूत झाडे आणि विषाणू आणि रसशोषक कीटकांना सहन करणारी, प्रति एकर उच्च उत्पादन देणारी कापसाची संकरित वाण.

जमीन – सर्व प्रकारची माती

पेरणीची पद्धत – टोकन पद्धत

सिंचन – कोरडवाहू / बागायती

सिंचन गरज – 5-7

बोंडाचे वजन – 5.5 – 6 ग्रॅम

पीक कालावधी – 150 – 160 दिवस

उत्पादन – 12 – 14 क्विंटल / एकर

Cotton variety sowing time | कापूस लागवडीचा योग्य हंगाम –

👉बागायती – एप्रिल, मे
👉पावसावर आधारित – जून, जुलै

Cotton sowing spacing | कापूस लागवड अंतर –

लागवड प्रकार दोन ओळीतील अंतर (फुट) दोन रोपांतील अंतर (फुट) एकरी झाडांची संख्या
कोरडवाहू  4 1.5 7400
बागायती  5 2 4440

Cotton seed rate | कापूस एकरी बियाणे मात्रा –

👉950 ग्रॅम किंवा 2 पॅकेट/एकर

Conclusion | सारांश –

मित्रांनो आशा करतो की कृषि डॉक्टर (krushi doctor) वेबसाइट वरील आजच्या लेखामध्ये दिलेली माहिती तुम्हाला समजली आहे आणि त्याचा तुम्हाला यंदाच्या हंगामात फायदा नक्की होईल. कापूस पिकाबद्दल अधिक माहिती जाणून घेण्यासाठी आमच्या कृषि डॉक्टर यूट्यूब चॅनल ला नक्की भेट द्या. धन्यवाद …🙏

People also read | हे लेख देखील नक्की वाचा –

1. sugarcane fertilizer schedule: ऊस पिकातील संपूर्ण खत व्यवस्थापन
2. vermiwash: शेतीमध्ये वर्मीवॉश वापरण्याचे फायदे
3. sucking pest: रसशोषक किडींचे A to Z नियंत्रण
4. hydroponic fodder: हायड्रोपोनिक चारा निर्मिती कशी करावी?
5. taiwan pink: तैवान पिंक पेरू बद्दल A to Z माहिती

FAQs | सतत विचारले जाणारे प्रश्न –

1. कापूस कोणत्या प्रकारचे पीक आहे?
उत्तर – कापूस हे एक महाराष्ट्र तसेच संपूर्ण भारतामधील एक प्रमुख नगदी पीक आहे. ज्याची लागवड ही खरीप हंगामात (जून/जुलै) केली जाते.

2. कापसाच्या किती जाती आहेत?
उत्तर – कापसाच्या शेकडो जाती आता मार्केट मध्ये उपलब्ध आहेत. त्यातील काही देशी वान आहेत तर काही हायब्रिड. कापसाच्या सर्व जातींची सविस्तर माहिती वाचण्यासाठी BharatAgri Krushi Dukan वेबसाइटला नक्की भेट द्या.

3. कापूस हे मुख्य पीक आहे का?
उत्तर – हो कापूस हे एक खरीप मुख्य नगदी पीक आहे.

4. कापसाची लागवड कधी करावी?
उत्तर – कापूस पिकाची लागवड ही चांगला पाऊस झाल्यावर म्हणजे जून ते जुलै महिन्यात करावी.

5. कापूस पिकण्यास किती वेळ लागतो?
उत्तर – कापूस हे पीक साधारण 160 ते 190 दिवसात काढणीला येते.

6. कापसाचे रोप किती उंच वाढू शकते?
उत्तर – कापसाचे रोप हे न कापता तसेच जोपासले तर ते 15 ते 20 फुटा पर्यन्त वाढू शकते.

7. कापूस वेचणी कधी करायची?
उत्तर – कापसाची वेचणी ही कापूस चांगला परिपक्व झाल्यानंतर करावी. कापूस पिकण्यासाठी 5.5 ते 6.5 महिन्याचा कालावधी लागू शकतो.

 

Author | लेखक –

सूर्यकांत कांबळे
मू. पो – इर्ले, तालुका – बार्शी, जिल्हा – सोलापूर.
राज्य – महाराष्ट्र. पिन – 413412


शेयर करा