
शेतकरी मित्रांनो नमस्कार! शेतीविषयक अचूक माहिती देणाऱ्या आमच्या कृषी डॉक्टर वेबसाईटवर आपले सहर्ष स्वागत आहे. आज आपण धान (भात) पिकामध्ये वापरता येणाऱ्या प्रमुख rice herbicide (तणनाशके) बद्दल सविस्तर माहिती पाहणार आहोत. पीक कोणतेही असो, जर तणांचा प्रादुर्भाव असेल तर पिकाचे 60 ते 70 टक्के नुकसान निश्चित असते. त्यामुळे सुरुवातीचे 25 ते 30 दिवस प्लॉट तणमुक्त ठेवणे अत्यंत गरजेचे असते.
🌱 पेरणी किंवा रोप लागवडीपूर्वी वापरता येणारी तणनाशके
भात शेतीमध्ये तण नियंत्रणासाठी योग्य वेळी आणि योग्य प्रमाणात औषधांचा वापर करणे आवश्यक आहे. अधिक शास्त्रीय माहितीसाठी तुम्ही राष्ट्रीय तांदूळ संशोधन संस्था (ICAR-NRRI) च्या वेबसाईटला भेट देऊ शकता. खालील तक्त्यात लागवडीपूर्वी (Pre-emergence) वापरण्याच्या औषधांची यादी आहे:
| तणनाशकाचे नाव | समाविष्ट घटक | मात्रा (एकर) | वापरण्याची वेळ |
|---|---|---|---|
| Sathi (UPL) Ojika (IFFCO) |
Pyrazosulfuron ethyl 70 WDG | 80 ग्रॅम | रोप लागवडीनंतर 3-7 दिवसांनी व थेट पेरणीपूर्वी 5-10 दिवस आधी. |
| Craze (Dhanuka) Rifit (Syngenta) |
Pretilachlor 50% EC | 500 मिली | तण उगवणीपूर्वी (लागवडीनंतर 4-5 दिवसांनी). सूचना: फवारणीनंतर 2 दिवस प्लॉटला पाणी देणे टाळावे. |
🚜 Rice herbicide: उगवणीनंतर वापरता येणारी औषधे
| तणनाशकाचे नाव | समाविष्ट घटक | मात्रा (एकर) | वापरण्याची वेळ |
|---|---|---|---|
| Nominee Gold (PI) Adora (Bayer) Strider (UPL) Novelty Gold (Crystal) |
Bispyribac sodium 10% SC | 80 मिली | नर्सरी: 10-12 दिवसांनी लागवड: 10-14 दिवसांनी पेरणी: 15-20 दिवसांनी |
| Council active (Bayer) | Triafamone 20% + Ethoxysulfuron 10% WG | 90 ग्रॅम | लागवडीनंतर 10-14 दिवसांनी व पेरणीनंतर 15-20 दिवसांनी. |
| Cracker (Crystal) Vivaya (Corteva) |
Penoxsulam 1.02% + Cyhalofop Butyl 5.1% OD | 900 मिली | लागवडीनंतर 10-14 दिवसांनी व पेरणीनंतर 15-20 दिवसांनी. |
| Bentila (Crystal) | Bensulfuron Methyl 0.6% + Pretilachlor 6% GR | 4 किलो | लागवडीनंतर 10-14 दिवसांनी. |
| Sunrice (Bayer) | Ethoxysulfuron 15% WDG | 50 ग्रॅम | लागवडीनंतर 10-14 दिवसांनी व पेरणीनंतर 15-20 दिवसांनी. |
विशेष सूचना: वरील सर्व फवारण्या करताना प्लॉटमधील पाणी पूर्ण काढा आणि फवारणीनंतर पुढील 10 दिवस प्लॉटमध्ये पूर्ण पाणी भरून ठेवा.
⭐ फवारणी करताना कोणती काळजी घ्यावी?
- 1.
तणनाशकांचा वापर नेहमी शिफारशीनुसारच करावा.
- 2.
जास्त ढगाळ किंवा पावसाचे वातावरण असेल तर फवारणी करणे टाळावे.
- 3.
भर उन्हात कधीही फवारणी करू नये.
- 4.
तणनाशकांसोबत स्टिकर व्यतिरिक्त इतर कोणतेही कीटकनाशक किंवा औषध फवारू नये.
- 5.
फवारणी झाल्यानंतर हात, पाय व फवारणी यंत्रे स्वच्छ धुवून ठेवावीत.
- 6.
फवारणी करताना कोणत्याही प्रकारचे मद्यपान करू नये.
- 7.
फवारणीनंतर औषधांच्या रिकाम्या बाटल्या किंवा पॅकेटची योग्य विल्हेवाट लावावी.
हे लेख देखील नक्की वाचा:
- धान (भात) पिकातील लष्करी अळी नियंत्रण
- धान (भात) पिकातील खोड किडा नियंत्रण
- मार्केटमधील तुरीच्या टॉप 5 जातींची नावे
- मार्केट मधील टॉप 5 सोयाबीन सुधारित वाण
- कापूस पिकाच्या टॉप 5 जातींची संपूर्ण माहिती
सारांश
मित्रांनो, आशा करतो की आजच्या लेखामध्ये दिलेली rice herbicide बद्दलची माहिती तुम्हाला नक्कीच उपयुक्त वाटली असेल.
योग्य वेळी आणि योग्य प्रमाणात तणनाशकांचा वापर केल्यास तुमचे पीक तणमुक्त राहील आणि उत्पन्नात भरीव वाढ होईल. शेतीविषयी नवनवीन माहितीसाठी आमच्याशी जोडलेले राहा. धन्यवाद!
सतत विचारले जाणारे प्रश्न (FAQs)
प्रश्न 1: भातासाठी कोणते तणनाशक चांगले आहे?
उत्तर: भात पिकामध्ये तुम्ही Sathi, Craze, Nominee Gold, Council active किंवा Cracker यांसारखी विविध दर्जेदार तणनाशके वापरू शकता.
प्रश्न 2: भातशेतीमध्ये कोणते तणनाशक सर्वात जास्त वापरले जाते?
उत्तर: भात शेतीमध्ये Sathi, Craze, Nominee Gold, Council active आणि Cracker या औषधांचा सर्वाधिक वापर केला जातो.
प्रश्न 3: भातामध्ये नवीन पिढीची तणनाशके कोणती आहेत?
उत्तर: Sathi, Craze, Nominee Gold, Council active, Cracker, Bentila आणि Sunrice ही भात शेतीमधील नवीन पिढीची आधुनिक तणनाशके आहेत.
प्रश्न 4: सर्वात जास्त वापरले जाणारे ‘प्री-इमर्जन्स’ तणनाशक कोणते?
उत्तर: उगवणीपूर्वी वापरले जाणारे Sathi (UPL) हे तणनाशक शेतकऱ्यांमध्ये सर्वात जास्त लोकप्रिय आहे.
प्रश्न 5: प्रीटीलाक्लोर तणनाशक कसे वापरावे?
उत्तर: पिकामध्ये 2-3 सेमी पाणी भरा आणि लावणीनंतर 4 दिवसांच्या आत फवारणी करा. किंवा 20-25 किलो कोरड्या वाळूत 500 मिली प्रीटीलाक्लोर मिसळून लावणीनंतर 4 दिवसांच्या आत शेतात फेकावे.
लेखक
कृषी डॉक्टर – सूर्यकांत कांबळे
पत्ता: इर्ले, ता. बार्शी, जि. सोलापूर, महाराष्ट्र – 413412
संपर्क: +91 8956970102