शेयर करा

rice stem borer

शेतकरी मित्रांनो नमस्कार, Krushi Doctor (कृषी डॉक्टर) या शेती विषयक माहिती देणाऱ्या वेबसाइट वरती आम्ही आपले सहर्ष स्वागत करत आहे. आजच्या लेखामध्ये आपण भातामधील खोड किडा विषयी सविस्तरपणे माहिती पाहणार आहोत. यामध्ये भातामधील खोड किडा (rice stem borer) नेमका काय आहे, त्याचा प्रादुर्भाव कशामुळे होतो, त्याचा प्रसार कसा होतो, त्याची लक्षणे काय आहे आणि या खोड किड्याच्या नियंत्रणासाठी काय उपाय योजना आहेत याबद्दल आपण माहिती या लेखामध्ये पाहणार आहोत.

प्रस्तावना –

महाराष्ट्रात कोकणासह पूर्व विदर्भातील गोंदिया, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली, नागपूर या जिल्ह्यांत प्रामुख्याने भात पीक घेतले जाते. भाताच्या कमी उत्पादकतेच्या विविध कारणांपैकी या पिकावर येणाऱ्या किडी हे एक मुख्य कारण आहे. भात पिकावर रोपवाटिकेपासून भातकापणीपर्यंत विविध किडींचा प्रादुर्भाव होत असतो. पूर्व विदर्भात भात पिकाला दुसरा पर्याय नसल्यामुळे पीक फेरपालट होत नाही. अनेक वेळा पाण्याची सोय असल्यामुळे उन्हाळी भाताचेही उत्पादन घेतले जात असल्याने किडीसाठी पर्यायी खाद्य उपलब्ध होते. परिसरातील अन्य वनस्पतींवर किडींच्या असंख्य पिढ्या अखंड उपजीविका करत असतात. खोडकिडा (rice stem borer) ही यातील एक मुख्य कीड असून, तिचे वेळीच नियंत्रण केले पाहिजे.



खोड किडा ओळख –

या किडीचा पतंग 1 ते 2 से.मी. लांब, समोरील पंख पिवळे व मागील पांढरे असे असतात. मादी पतंगाच्या पंखाच्या खालील भागावर काळसर ठिपका असतो; तर नर पतंगाच्या पंखावर काळसर ठिपका नसतो.

भातावरील खोड किडीचा नुकसानीचा प्रकार | rice stem borer infestation type –

1. सुरवातीच्या काळात अळी कोवळ्या पानांवर उपजीविका करून नंतर खोडात प्रवेश करते.
2. आतील भाग पोखरून खाते. परिणामी, फुटवा सुटण्यास सुरुवात होतेवेळी रोपाचा गाभा मरतो.
3. यालाच ‘डेट हार्ट’ किंवा ‘कीडग्रस्त फुटवा’ असे म्हणतात.
4. या रोपांचा फुटवा ओढल्यास सहजासहजी निघून येतो.
5. पीक तयार होण्याच्या वेळी खोडकिडीचा प्रादुर्भाव झाल्यास दाणे न भरलेल्या पांढऱ्या लोंब्या बाहेर पडतात.
6. या लोंब्यांना कोकणात ‘पळिंज’ तर विदर्भामध्ये ‘पांढरी पिशी’ असे म्हणतात.

आर्थिक नुकसानीची पातळी –

1. पुनर्लागवड झाल्यानंतर त्वरित : 5 % कीडग्रस्त फुटवे किंवा एक अंडीपुज प्रति चौ.मी. दिसल्यास
2. फुटवा मध्यावस्था : 5% सुकलेले फुटवे
3. लोंब्याच्या तयार होण्याच्या आणि फुलोऱ्याच्या अवस्थेत : 1 पतंग प्रति चौ.मी

भातावरील खोड किडीचे एकात्मिक पद्धतीने व्यवस्थापन | rice stem borer control –

1. खोडकिडा प्रतिकारक धानाच्या जाती उदा. साकोली-8, सिंदेवाही-5, रत्ना या जातीची लागवड करावी.
2. रोवणीपूर्वी रोपांचे शेंडे तोडून बांबूच्या टोपलीत जमा करावीत. ती टोपली खांबावर टांगावी, त्यामुळे रोपाच्या शेंड्यावर असणारी खोडकिड्याची अंडी नष्ट होण्यास मदत होते.
3. रोपांची मुळे रोवणीपूर्वी क्‍लोरपायरीफॉस (20% प्रवाही) 1 मिली प्रती लिटर पाणी याप्रमाणे द्रावणात 12 तास बुडवून ठेवावेत. नंतर रोवणी किंवा लागवड करावी.
4. पिकाची वरचेवर पाहणी करून कीडग्रस्त फुटवे काढून नष्ट करावेत. हे काम हंगामातून तीन ते चार वेळा करावे.
5. शेतात पक्षी थांबे लावावे.
6. जर शेतामध्ये 5 % कीडग्रस्त फुटवे दिसल्यास, फवारणी प्रतिलिटर पाणी क्विनॉलफॉस 3.2 मिली
7. शक्‍य असल्यास ट्रायकोग्रामा जपोनिकम या परोपजिवी किटकाची हेक्‍टरी अंडी 50 हजार या प्रमाणात दर 7 ते 8 दिवसांच्या अंतराने तीन ते चार वेळा शेतात सोडावे.
8. भात कापणी जमिनीलगत करावी. वापसा झाल्यावर नांगरणी करून धसकटे गोळा करून ती जाळून टाकावीत.



रासायनिक उपाय | rice stem borer chemical control –

1.क्लोरएन्ट्रानिलिप्रोल 18.5 एससी @ 3 मिली किंवा फ्लूबेंडायमाईड 20 डब्ल्यूजी @ 2.5 ग्रॅम किंवा फिप्रोनील 80 डब्ल्यूजी @ 1 ग्रॅम किंवा फ्लुबेंडायमाईड 4% + बुप्रोफेंझिन 20 ग्रॅम एससी @ 10 मिली प्रति 10 लिटर पाण्यामध्ये मिसळून फवारणी करावी.

औषधाची फवारणी करताय ? मग हे करा –

1. दोन किंवा अधिक किडनाशके एकात मिसळून फवारणी करु नये.
2. किडनाशकांचा सांगितलेल्या प्रमाणात वापर करा.
3. किडीने आर्थिक नुकसानीची पातळी ओलांडल्याचा अंदाज घेऊन प्रथम वनस्पतीजन्य किंवा निमआधारित कीडनाशकाची फवारणी करावी.
4. कीडनाशकासोबत रासायनिक खते, सूक्ष्म अन्नद्रव्ये, संजीवके, अथवा जैविक खते मिसळून करून फवारणी नये.
5. फवारणी करिता स्वच्छ पाण्याचा वापर करा.
6. किडीचे परिणामकारक नियंत्रण करण्यासाठी पहिल्या फवारणी नंतर 7– 8 दिवसांनी दुसरी फवारणी करावी.
7. वारंवार तेच किडनाशक फवारणी करु नये.
8. किडी अमावश्याच्या रात्री अंडी घालत असल्यामुळे 3 – 4 दिवस अगोदर फवारणी केल्यास अधिक परिणामकारक ठरते.
9. तणनाशक फवारणी केलेला पंप स्वच्छ धुवून घेतल्याशिवाय कीडनाशक फवारणी करू नये.

Conclusion I सारांश –

शेतकरी मित्रांनो तुम्हाला krushi doctor या वेबसाइट वरील आमचा rice stem borer: धान (भात) पिकातील खोड किडा नियंत्रण हा लेख तुम्हाला कसा वाटला वाटला हे खाली कमेंट बॉक्स मध्ये सांगायला विसरू नका. आणि हा लेख जर तुम्हाला आवडला तर तुमच्या इतर शेतकरी मित्रांसोबत शेयर नक्की करा. आणखी अशा प्रकारची कृषीविषयक माहिती पाहण्यासाठी आमच्या krushi doctor या वेबसाईटला नक्की भेट द्या.



FAQ’s | वारंवार विचारले जाणारे प्रश्न –

1. धानावरील प्रमुख कीड कोणती?
उत्तर – भाताचे खोड हे भाताच्या सर्वात महत्वाच्या किडी पैकी एक आहे कारण ते लवकर लागवड केलेल्या भातामध्ये सुमारे 20% आणि उशिरा लागवड केलेल्या भातामध्ये 80% उत्पादन कमी करू शकते.

2. तांदळाचा जिवाणूजन्य रोग म्हणजे काय?
उत्तर – बॅक्टेरियल ब्लाइट हा भातावरील सर्वात गंभीर रोगांपैकी एक आहे. रोग जितका लवकर होतो तितका जास्त उत्पादन कमी होते. जेव्हा रोगास अनुकूल वातावरणात संवेदनाक्षम वाणांची लागवड केली जाते तेव्हा जिवाणूजन्य प्रकोपामुळे उत्पन्नाचे नुकसान 70% पर्यंत असू शकते.

लेखक –

K Suryakant


शेयर करा