शेतकरी मित्रांनो नमस्कार, Krushi Doctor (कृषी डॉक्टर) या शेती विषयक माहिती देणाऱ्या वेबसाइट वरती आम्ही आपले सहर्ष स्वागत करत आहे. आजच्या लेखामध्ये आपण भात पिकातील लष्करी आळी विषयी सविस्तरपणे माहिती पाहणार आहोत. यामध्ये ही लष्करी अळी (rice armyworm) नेमकी काय आहे, तिचा प्रादुर्भाव कशामुळे होतो, तिचा प्रसार कसा होतो, तिची लक्षणे काय आहे आणि लष्करी अळीच्या नियंत्रणासाठी काय उपाय योजना आहेत याबद्दल आपण माहिती या लेखामध्ये पाहणार आहोत.
प्रस्तावना –
भाताच्या कमी उत्पादकतेच्या विविध कारणांपैकी किडी हे प्रमुख कारण आहे. रोपे तयार करण्यापासून ते कापणीपर्यंत पिकात विविध किडींचा प्रादुर्भाव होत असतो. या पिकाला दुसरा पर्याय नसल्याने फेरपालट होत नाही. तसेच विविध पर्यायी खाद्य वनस्पती उपलब्ध होत असल्यामुळे किडीच्या पिढ्या अखंड उपजीविका करत असतात. भातावर येणाऱ्या महत्त्वाच्या किडींपैकी लष्करी आळीची (rice armyworm) माहिती या लेखात घेऊयात.
लष्करी अळीची ओळख | Introduction of fall armyworm in rice –
1. या किडीचे शास्त्रीय नाव मायथिम्ना सेपरेटा असे आहे.
2. किडीच्या पतंगाचे पुढील पंख जरासे गुलाबी तपकिरी रंगाचे असतात.
3. पंखांवर दोन फिक्कट गोलाकार ठिपके असतात. मागील पंखांवर ठळक शिरा दिसतात.
4. छोट्या अवस्थेतील अळ्या पुढे चालताना पाठ (मध्य शरीर) वर घेऊन ‘लूप’ करते.
5. स्पर्श करताच पटकन खाली पडते. मोठ्या अवस्थेतील अळ्या चालताना पाठ वर घेत नाहीत.
6. मोठी अळी चार सेंटीमीटरपर्यंत लांब वाढते.
7. पूर्ण वाढलेल्या अळीच्या पाठीवर व दोन्ही बाजूंनी पिवळसर पांढऱ्या रंगाचे पट्टे स्पष्टपणे दिसतात.
लष्करी अळीचा जीवनक्रम | Life Cycle of rice armyworm –
1. किडीची मादी (पतंग) भात किंवा गवताच्या पानांवर एका जागी परंतु दोन ते तीन सरळ रेषेत अंडी घालते.
2. एक मादी पतंग 150 पासून 500 किंवा त्यापेक्षा जास्त अंडी घालू शकते.
3. एका ठिकाणी 60 ते 100 अंडी असतात.
4. अंड्यातून पाच ते आठ दिवसांत अळी बाहेर येते.
5. या अळ्या सुरुवातीला लहान पाने खरवडून हिरवा भाग खातात.
6. मोठ्या होत जातात तशा संपूर्ण पाने मध्यशिरांसहित खातात.
7. पाकळ्या, ओंब्या, दाणे अधाशीपणे खातात.
8. अळी अतिशय खादाड असून 200 पेक्षा अधिक पिकांवर प्रादुर्भाव करते.
9. अळी अवस्था वीस ते तीस दिवसांची असते. पूर्ण वाढ झालेली अळी मातीमध्ये कोषावस्थेत जाते. द
10. हा ते वीस दिवसांत कोषामधून पतंग तयार होतो.
11. अशा प्रकारे एक ते दीड महिन्यात आणि खाद्य भरपूर असेल तर केवळ एक महिन्यात एक पिढी पूर्ण होते. त्यामुळे प्रादुर्भाव झपाट्याने वाढत जातो.
यजमान पिके | Host plant –
भाताव्यतिरिक्त मका, ऊस, भाजीपाला, फळपिके, फूलपिके अशा सर्वांवर कमी-जास्त प्रमाणात प्रादुर्भाव आढळतो.
भात पिकातील नुकसान | Rice losses due to armyworm –
1. भातपिकात एखाद्या उंदराने नुकसान केल्यासारखे ही अळी जमिनीवर मोठ्या प्रमाणात दाणे व पाकळ्या तोडून जमिनीवर टाकते.
2. प्रादुर्भावित शेतात असंख्य दाणे पडलेले दिसतात.
3. अर्धे खाऊन व अर्धे जमिनीवर पडल्याने जास्त प्रादुर्भावाच्या शेतामध्ये 80 ते 90 टक्के तर काहीवेळा 100 टक्क्यापर्यंत नुकसान होऊ शकते.
4. प्रादुर्भाव सुरुवातीच्या काळात लक्षात न आल्यास चार ते पाच दिवसांत खूप मोठे नुकसान होऊ शकते.
5. अळी दिवसा उन्हापासून संरक्षण करण्यासाठी जमिनीतील भेगांमध्ये किंवा पानांच्या सावलीत अथवा खोडामध्ये लपून राहते.
6. मात्र संध्याकाळी व रात्री झाडावर चढून ओंबीतील दाणे खाते. त्यामुळे जमिनीवर पांढऱ्या, पिवळ्या रंगाच्या लेंड्या किंवा विष्ठा पडलेली दिसते.
लष्करी आळी नियंत्रण | Rice armyworm control –
1. कोकणात भात पिकाच्या हळव्या, निमगरव्या आणि गरव्या अशा प्रकारातील जातींची लागवड केली जाते.
2. त्यापैकी सध्या हळव्या (कमी दिवसांत) तयार होणाऱ्या जातींचे भातपीक कापणीस तयार झाले आहे.
3 त्यामुळे या जातींवर अळीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात दिसत आहे. भात कापणीला आले असल्याने जास्त विषारी कीटकनाशके वापरू नये असा सल्ला देण्यात येत आहे.
4. हळव्या जातीचा भात पक्व झाला असल्याने तो त्वरित कापून घ्यावा.
5. भात कापून एकदा जमिनीवर आडवा झाला म्हणजे सहसा अळी खाण्यास येत नाही. तिचा मोर्चा दुसऱ्या उभ्या पिकाकडे वळतो.
6. जो भात कापणीला उशिरा येणारा आहे (गरवे वाण) जातींवर अळी स्थलांतरित होते. त्यामुळे तिकडे प्रादुर्भाव होण्याची शक्यता जास्त आहे.
7. अशावेळी शेताच्या बाजूने बांधावर धनुलक्स, धानुका,क्विनॉलफॉस दीड टक्के किंवा टर्मिनेटर 50, अग्रोसिस, क्लोरपायरीफॉस दीड टक्के भुकटी स्वरुपातील कीटकनाशक वापरावे.
8. म्हणजे एका शेतातून दुसऱ्या शेतात अळी स्थलांतरित होणार नाही.
9. फवारणीसाठी बिव्हेरिया बॅसियाना किंवा मेटारायझियम अनिसोपली यापैकी जैविक कीटकनाशक 5 मिलि किंवा निमतेल, करंज तेल यापैकी वनस्पतीजन्य कीटकनाशक 5 मिली प्रति लिटर पाणी या प्रमाणात संध्याकाळी फवारणी करावी. कारण या अळ्या संध्याकाळी व रात्री सक्रिय होतात.
10. भात कापणीला २० दिवसांपेक्षा जास्त कालावधी असेल तर रासायनिक कीटकनाशकांमध्ये सायरुक्स, युपीएल, सायपरमेथ्रिन (२५ इसी) ०.६ मिलि प्रति लिटर पाण्यातून संध्याकाळी फवारणी करावी.
11. शेतात पक्षी थांबे एकरी दहा ते बारा उभे करावेत.
12. पक्षांच्या दृष्टीक्षेपात सहज या अळ्या येत असल्याने सकाळी लवकर पक्षी या अळ्यांना आपले भक्ष्य बनवतात.
13. सुरुवातीपासून कामगंध सापळे एकरी सहा ते सात व एकरी एक प्रकाश सापळा लावावा.
14. म्हणजे किडीचे पतंग नष्ट होऊन अळीच्या उत्पत्तीवर नियंत्रण मिळते.
Conclusion I सारांश –
शेतकरी मित्रांनो तुम्हाला krushi doctor या वेबसाइट वरील आमचा भात या पिकातील लष्करी अळी (rice armyworm) नियंत्रण हा लेख तुम्हाला कसा वाटला वाटला हे खाली कमेंट बॉक्स मध्ये सांगायला विसरू नका. आणि हा लेख जर तुम्हाला आवडला तर तुमच्या इतर शेतकरी मित्रांसोबत शेयर नक्की करा. आणखी अशा प्रकारची कृषीविषयक माहिती पाहण्यासाठी आमच्या krushi doctor या वेबसाईटला नक्की भेट द्या.
FAQ’s | वारंवार विचारले जाणारे प्रश्न –
1. भातावर कोणत्या कीटकांचा हल्ला होतो?
उत्तर – अनेक कीटकांच्या ऑर्डर शी संबंधित कीटकांचा एक मोठा गट भाताच्या पानांवर खातात. बीटल (ऑर्डर कोलिओप्टेरा), लेपिडोप्टेरा ऑर्डरच्या अळ्या आणि टोळ (ऑर्थोप्टेरा ऑर्डर) च्या अळ्या आणि प्रौढ सर्वात सामान्य आहेत.
2. भातावरील प्रमुख कीड कोणती?
उत्तर – भाताचे खोड हे भाताच्या सर्वात महत्वाच्या किडी पैकी एक आहे कारण ते लवकर लागवड केलेल्या भातामध्ये सुमारे 20% आणि उशिरा लागवड केलेल्या भातामध्ये 80% उत्पादन कमी करू शकते.
लेखक –
K Suryakant