red gram variety

शेतकरी मित्रांनो नमस्कार, कृषी डॉक्टर या शेती निगडीत माहिती देणाऱ्या मराठी वेबसाइटवर तुमचे स्वागत आहे. आज आपण या ठिकाणी तूर लागवडीसाठी, खास करून महाराष्ट्रासाठी टॉप 5 तूर पिकाच्या जातींची (red gram variety) सविस्तर माहिती पाहणार आहोत. भारतीय कृषी संशोधन परिषद (ICAR) च्या शिफारशीनुसार योग्य वाणाची निवड केल्यास उत्पादनात मोठी भर पडते. या लेखामुळे तुम्हाला यंदा कोणती तूर लावावी, यासाठी निश्चित मदत मिळेल. सोबतच मी तुम्हाला बोनस टिप्स म्हणून तूर पेरणीसाठी योग्य बियाणे मात्रा, पेरणी कालावधी आणि अंतर देखील सांगणार आहे. त्यामुळे हा लेख पूर्ण वाचा आणि माहिती आवडली तर तुमच्या इतर शेतकरी ग्रुपमध्ये शेअर नक्की करा.

🌾 महाराष्ट्रासाठी सर्वोत्तम red gram variety आणि त्यांची वैशिष्ट्ये

नंबर वाणाचे नाव वैशिष्ट्ये
1 आय.सी.पी.एल – 87 हा वाण अतिशय हळवा असून 130 दिवसांच्या आत काढणीस येतो. याचे दाणे गडद लाल असून मर रोगास प्रतिकारक आहे.
2 ए.के.टी – 8811 पश्चिम महाराष्ट्रासाठी उपयुक्त वाण. 140 दिवसात तयार होतो आणि मर रोगास मध्यम प्रतिबंधक आहे.
3 बी.एस.एम.आर – 853 हा निम गरवे वाण असून 180 ते 200 दिवसात तयार होतो. हा वाण वांझ रोगास प्रतिबंधक आहे.
4 बी डी एन – 711 कोरडवाहू शेतकऱ्यांसाठी वरदान. 160 ते 170 दिवसात तयार होतो. दाणे अतिशय टपोरे आणि पांढऱ्या रंगाचे असतात.
5 पी के व्ही तारा विदर्भासाठी खास वाण. 160 ते 170 दिवसांचा कालावधी असून मर आणि वांझ रोगास प्रतिबंधक आहे.

योग्य पेरणी वेळ

जास्तीत जास्त उत्पादनासाठी जूनच्या दुसऱ्या पंधरवड्यात किंवा 7 जुलैपर्यंत पेरणी पूर्ण करावी.

बियाणे मात्रा

वाणानुसार 2.5 किलो (टोकण) ते 9 किलो (पेरणी) प्रति एकर बियाणे लागते.

रोग नियंत्रण

सुधारित वाण निवडल्यास मर आणि वांझ यांसारख्या प्रमुख रोगांचा प्रादुर्भाव कमी होतो.

📅 तूर लागवड कालावधी आणि बियाणे नियोजन

पेरणीचा हंगाम: जूनच्या दुसऱ्या पंधरवड्यात पेरणी करणे फायदेशीर ठरते. उशिरा पेरणी केल्यास उत्पादनात मोठी घट येऊ शकते.

एकरी बियाणे प्रमाण:

  • ✅ लवकर येणारे वाण: 8 – 9 किलो / एकर
  • ✅ मध्यम कालावधीचे वाण: 5 – 7 किलो / एकर
  • ✅ उशिरा येणारे वाण (टोकण पद्धत): 2 – 2.5 किलो / एकर

सारांश

मित्रांनो, आशा करतो की कृषी डॉक्टर वेबसाइटवरील आजच्या लेखामध्ये दिलेली red gram variety बद्दलची माहिती तुम्हाला समजली असेल. योग्य वाणाची निवड आणि वेळेवर केलेली पेरणी हेच तूर पिकाच्या यशाचे गमक आहे. अधिक माहितीसाठी आमच्या यूट्यूब चॅनलला नक्की भेट द्या. धन्यवाद!

सतत विचारले जाणारे प्रश्न

1. तूर लागवड कधी करावी?

उत्तर – तूर पिकाची पेरणी जूनचा दुसरा आठवडा ते जुलैचा पहिला आठवडा या दरम्यान करावी.

2. तूर काढणीस किती दिवस लागतात?

उत्तर – वाणानुसार तूर पीक 140 ते 200 दिवसांत काढणीस तयार होते.

3. कोणत्या राज्यात तुरीचे उत्पादन जास्त होते?

उत्तर – महाराष्ट्र, कर्नाटक, मध्य प्रदेश आणि गुजरात या राज्यांमध्ये तुरीचे उत्पादन मोठ्या प्रमाणावर घेतले जाते.

KD

लेखक: कृषी डॉक्टर – सूर्यकांत कांबळे | पत्ता: इर्ले, ता. बार्शी, जि. सोलापूर, महाराष्ट्र – 413412 | संपर्क: +91 8956970102

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *