
शेतकरी मित्रांनो नमस्कार, कृषी डॉक्टर या शेती निगडीत माहिती देणाऱ्या मराठी वेबसाइटवर तुमचे स्वागत आहे. आज आपण या ठिकाणी phule samarth onion variety बद्दल संपूर्ण माहिती पाहणार आहोत. महात्मा फुले कृषी विद्यापीठ (MPKV) ने संशोधित केलेल्या या वाणाची संपूर्ण माहिती जशी की – हे कांदा बियाणे नेमकं कुठे विकसित करण्यात आलं, हे कोणत्या भागासाठी तसेच हंगामासाठी शिफारशीत आहे, या जातीची एकरी बियाणे मात्रा किती आहे, या जातीची वैशिष्ट्ये नेमकी कोणती आहेत व जर आपण ही जात लावली तर आपल्याला एकरी किती उत्पादन मिळणार आहे. तुम्ही जर एक कांदा उत्पादक शेतकरी असाल तर हा लेख पूर्ण वाचा आणि माहिती आवडली तर तुमच्या इतर शेतकरी ग्रुपमध्ये शेअर नक्की करा.
मित्रांनो तुम्हाला तर माहितीच आहे की, कांदा हा आता आपल्या दररोजच्या आहारातील एक प्रमुख घटक बनला आहे. आपण जर कांदा उत्पादनामध्ये संपूर्ण जगाचा विचार केला तर चीन 1 ल्या तर भारत हा 2 ऱ्या क्रमांकावर येतो. भारतामध्ये प्रामुख्याने कांदा हे पीक – महाराष्ट्र, ओडिसा, कर्नाटक, उत्तर प्रदेश, तामिळनाडू, बिहार, आंध्रप्रदेश, गुजरात आणि मध्यप्रदेश या राज्यांमध्ये घेतले जाते. आणि आपण जर महाराष्ट्राचा विचार केला तर – नाशिक, पुणे, धुळे, सातारा, सोलापूर आणि नगर जिल्ह्यांमध्ये कांदा उत्पादन जास्त झालेले दिसून येते. महाराष्ट्रामध्ये नाशिक हा जिल्हा कांदा उत्पादनामध्ये अग्रेसर आहे. संपूर्ण राज्याच्या 35 ते 40% कांदा उत्पादन हे एकट्या नाशिकमध्ये घेतले जाते आणि संपूर्ण भारताच्या तुलनेत हे प्रमाण 10% इतके आहे.
🥇 महाराष्ट्रामधील बेस्ट कांदा जाती
| हंगाम | लागवड वेळ | सुधारित जाती |
|---|---|---|
| खरीप | जुलै – ऑगस्ट | फुले समर्थ, बसवंत 780 आणि अॅग्रीफाऊंड डार्क रेड |
| रांगडा | सप्टेंबर – ऑक्टोबर | बसवंत 780, फुले समर्थ आणि एन-2-4-1 |
| उन्हाळी | नोव्हेंबर – डिसेंबर | एन-2-4-1, ॲग्रीफाऊंड लाईट रेड आणि अर्का निकेतन |
🧅 phule samarth onion variety ची वैशिष्ट्ये व माहिती
| तपशील | माहिती |
|---|---|
| कांदा जातीचे नाव | फुले समर्थ |
| संशोधन ठिकाण | महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी. |
| संशोधन आणि बियाणे निर्मिती वर्ष | 2004 |
| शिफारशीत हंगाम | खरीप आणि लेट खरीप |
| एकरी बियाणे मात्रा | 2.5 ते 3 किलो |
| रंग | आकर्षक लाल रंग |
| एका कांद्याचे वजन | 80 ते 120 ग्राम |
| पीक कालावधी | 90 ते 100 दिवस |
| साठवणूक मर्यादा | 2.5 ते 3 महिने |
| आकार | गोलाकार |
| लागवड पद्धत | बियाणे पेरणी किंवा रोप लागवड |
| लागवड अंतर | दोन ओळींमध्ये – 15 सेंटीमीटर दोन रोपांमध्ये – 10 सेंटीमीटर |
🏢 फुले समर्थ कोणत्या कंपनीचे खरेदी करावे?
मित्रांनो तुम्हाला फुले समर्थ ही जात असलेले मार्केटमध्ये भरपूर साऱ्या कंपनीचे कांदा बियाणे मिळेल. पण तुम्ही जर योगीराज सीड्सचे फुले समर्थ हे वाण खरेदी केले तर तुम्हाला 80 ते 90% इतकी उगवण क्षमता मिळू शकते आणि उत्पादन देखील चांगले मिळण्याची गॅरंटी या कंपनीमध्ये आहे. मार्केटमध्ये उपलब्ध असलेल्या काही कंपन्या खालीलप्रमाणे आहेत:
- 1. पंचगंगा
- 2. महा सीड्स
- 3. योगीराज सीड्स
- 4. ऍग्रोनर्मदा
- 5. श्री निवास सीड्स
- 6. महावीर सीड्स
- 7. मयुरेश
- 8. बॉम्बे सीड्स
- 9. फ्युजन सीड्स
- 10. मोरया ऍग्रो सीड्स
- 11. हर्ष सीड्स
- 12. सिद्धांत सीड्स
💰 फुले समर्थ बियाणे किंमत
मित्रांनो हे बियाणे तुम्हाला मार्केटमध्ये वेगवेगळ्या किमतीसह मिळू शकते. पण याची जर आपण अंदाजित प्रति किलो किंमत पाहिली तर ती 1500 ते 1800 रुपये इतकी असू शकते. तुम्हाला जर हे बियाणे होलसेल रेटमध्ये घरबसल्या खरेदी करायचे असेल तर तुम्ही 9168911489 या व्हाट्सअँप नंबरवरती आम्हाला संपर्क करू शकता.
सारांश
मित्रांनो आशा करतो की कृषी डॉक्टर वेबसाइटवरील आजच्या लेखामध्ये दिलेली phule samarth onion variety बद्दलची माहिती तुम्हाला नक्कीच समजली असेल आणि त्याचा तुम्हाला यंदाच्या हंगामात फायदा होईल. शेतीविषयी अधिक माहिती जाणून घेण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनलला नक्की भेट द्या. धन्यवाद…🙏
📚 हे लेख देखील नक्की वाचा
❓ सतत विचारले जाणारे प्रश्न (FAQs)
1. कांद्याची कोणती जात सर्वोत्तम आहे?
उत्तर – हंगामानुसार कांद्याच्या वेगवेगळ्या जाती प्रसिद्ध आहेत. जसे की खरीप हंगामासाठी – फुले समर्थ, बसवंत 780 आणि अॅग्रीफाऊंड डार्क रेड, रांगडा लागवडीसाठी – बसवंत 780, फुले समर्थ आणि एन-2-4-1 आणि उन्हाळीसाठी – एन-2-4-1, ॲग्रीफाऊंड लाईट रेड आणि अर्का निकेतन.
2. फुले समर्थ कांदा बियाणांची किंमत किती आहे?
उत्तर – मित्रांनो हे बियाणे तुम्हाला मार्केटमध्ये वेगवेगळ्या किमतीसह मिळू शकते. पण याची जर आपण अंदाजित प्रति किलो किंमत पाहिली तर ती 1500 ते 1800 रुपये इतकी असू शकते.
3. कांद्याची कोणती जात जास्त उत्पादन देणारी आहे?
उत्तर – कांद्यामध्ये तुम्हाला भीमशक्ती, भीमा श्वेता आणि फुले समर्थ या जाती अधिक उत्पादन देऊ शकतात.
4. कांद्याचे बियाणे प्रति एकर किती वापरावे?
उत्तर – एका एकरासाठी साधारणपणे 2.5 ते 3 किलो बियाणे लागते.
5. कोणता कांदा लागवडीस सर्वात सोपा आहे?
उत्तर – खास करून महाराष्ट्रामध्ये तुम्ही पुढील जाती अगदी सहजपणे उगवू शकता. खरीपसाठी – फुले समर्थ, बसवंत 780 आणि अॅग्रीफाऊंड डार्क रेड, रांगडा लागवडीसाठी – बसवंत 780, फुले समर्थ आणि एन-2-4-1 आणि उन्हाळीसाठी – एन-2-4-1, ॲग्रीफाऊंड लाईट रेड आणि अर्का निकेतन.
लेखक: कृषी डॉक्टर – सूर्यकांत कांबळे | पत्ता: इर्ले, ता. बार्शी, जि. सोलापूर, महाराष्ट्र – 413412 | संपर्क: +91 8956970102