शेतकरी मित्रांनो नमस्कार, Krushi Doctor (कृषी डॉक्टर) या शेती विषयक माहिती देणाऱ्या वेबसाइट वरती आम्ही आपले सहर्ष स्वागत करत आहे. आजच्या लेखामध्ये आपण कांदा पिकामध्ये (kanda pik) दुभळका किंवा जोड कांदा येण्यामागची कारणे व उपाय याबद्दल माहिती पाहणार आहोत.त्यामुळे तुम्ही जर एक कांदा उत्पादक शेतकरी असाल तर हा लेख तुमच्यासाठी खूप महत्वाचा ठरणार आहे. माझी तुम्हाला विनंती आहे की हा लेख पूर्ण वाचा आणि माहिती आवडली तर हा लेख तुमच्या इतर शेतकरी ग्रुप मध्ये शेयर नक्की करा. चला तर मग सुरू करुयात …
दुभळका किंवा जोड कांदा म्हणजे नेमक काय?
सध्या बरेच शेतकरी कांदा पीक (kanda pik) लागवडीकडे वळले आहेत. त्यामधून त्यांना अपेक्षित असे उत्पन्नही मिळत आहे. परंतू अनेक शेतकऱ्यांची समस्या राहिलेली आहे की त्यांच्या कांदा प्लॉटमध्ये दुभाळका किंवा जोडकांदा तयार होत आहे. म्हणजेच एकाच कांद्यापासून दोन कांदे तयार होत आहेत. जोड कांद्याला बरेच ठिकाणी बेळा कांदा असे म्हणतात. आपल्यापैकी बरेच शेतकऱ्यांना ही गोष्ट माहित नाही की दुभळका किंवा जोडकांदा का तयार होतो आणि तो कांदा तयार होऊ नये म्हणून काय उपाययोजना कराव्यात. पण काळजी करू नका या लेखांमध्ये आपण याच सर्व प्रश्नांची उत्तरे जाणून घेणार आहोत.
दुभाळका किंवा जोड कांदा तयार होण्याची कारणे –
अ) खतांचा अतिरेक –
1. बरेच शेतकरी कांद्याचे जास्त उत्पादन मिळेल या गैरसमजातून जास्त रासायनिक खत टाकतात.
2. कांद्याचे खत व्यवस्थापन करताना जास्त प्रमाणात शेतकऱ्याकडून जर पोटॅश युक्त खतांचा अतिरिक्त वापर जास्त झाला तर पोग्यामधून डबल कोंब बाहेर येतो.
3. आणि कांद्याचे दोन भाग होऊन जोड कांदा तयार होऊ शकतो.
ब) अतिरिक्त पाण्याचा वापर –
1. दुभळका किंवा जोड कांदा तयार होण्यामध्ये अतिरिक्त पाण्याचा वापर हे एक प्रमुख कारण आहे.
2. शेतकरी बांधवांनो तुम्ही जर कांदा लागवड करताना योग्य प्रमाणात आणि वेळोवेळी पाणी न देता कांद्याला जास्त पाणी दिले तर आपल्याला कांद्याची पात तर हिरवीगार झालेली दिसते पण यामुळेच जोड कांदा देखील तयार होऊ शकतो.
क) गुणवत्तापूर्ण बियाण्यांचा अभाव –
1. प्रत्येक शेतकरी स्वतःसाठी काहीना काही प्रमाणात कांद्याची बी साठवून ठेवत असतो.
2. परंतु नंजर चुकीने शेतकऱ्यांकडून जोडकांद्याचे बियाणे तयार झाले आणि ते पेरणीसाठी वापरण्यात आले तर जोड कांदा तयार होऊ होतो.
ड) पोषक फवारणी –
1. कांदा पिकामध्ये फवारणी करताना आपण विविध संजीवके फवारणीसाठी वापरतो.
2. आणि याच फवारणीमध्ये आपण जर पोटॅशियमचा वापर जास्त प्रमाणात केला तर दुभाळका किंवा जोड कांदा तयार होतो.
( शेती निगडीत नव-नवीन विडियो पाहण्यासाठी येथे क्लिक करा – कृषि डॉक्टर यूट्यूब चॅनल)
दुभाळका किंवा जोडकांदा तयार होऊ नये म्हणून उपाययोजना –
अ) खत व्यवस्थापन –
कृषी विद्यापीठाच्या शिफारशीनुसार जे खत वापरायला सांगितले आहे त्याच खतांचा वापर शेतकऱ्यांनी करायला पाहिजे. कोणत्याही खताचा अतिरिक्त वापर न करता नत्र, स्फुरद व पालाश यांचे प्रमाण प्रति हेक्टरी 100:50:50 किलो प्रमाणात घेऊन वापरावे. मिश्र खतांमध्ये आपण पोटॅशियम वापरले पाहिजे. वेगळे पोटॅश वापरण्याची गरज नाही. तसेच आपण कांदा लागवड केल्यानंतर बोरॉन चा वापर करणे अत्यंत गरजेचे आहे. त्यामुळे कांद्याला क्रॅक जात नाही आणि जोड कांदा तयार होत नाही.
ब) योग्य पाणी व्यवस्थापन –
कांदा लागवड (kanda pik) केल्यानंतर साधारणता 110 ते 120 दिवसांमध्ये कांदा काढायला येतो. त्यासाठी पाण्याचे योग्य व्यवस्थापन करणे गरजेचे आहे. कांद्याला शेवटचे पाणी 90 दिवसांपर्यंत द्यावे त्यानंतर पाणी देऊ नये. जर पाणी योग्य प्रमाणात दिले नाही किंवा जास्त प्रमाणात पाणी दिले तर कांद्याला क्रॅक जाऊन जोड कांदा तयार होतो.
क) गुणवत्ता पूर्ण बियाणांचा वापर –
कांदा लागवड करताना कंपनीचे बियाणे वापरणे खूप गरजेचे असते. कारण त्या बियाण्यांची निवड टेस्टिंगद्वारे केलेली असते. घरगुती बियाणे वापर केल्यास आपल्याला जोडकांदा बियाणे झालेले असल्यास समजत नाही. आणि अशी बियाणे वापरल्यास जोड कांदा तयार होतो व उत्पादनात घट येते.
Conclusion I सारांश –
शेतकरी मित्रांनो तुम्हाला Krushi Doctor या वेबसाइट वरील आमचा kanda pik: कांदा दुभाळणे किंवा जोड कांदा होण्यामागची कारणे व उपाय हा लेख तुम्हाला कसा वाटला वाटला हे खाली कमेंट बॉक्स मध्ये सांगायला विसरू नका. आणि हा लेख जर तुम्हाला आवडला तर तुमच्या इतर शेतकरी मित्रांसोबत शेयर नक्की करा. आणखी अशा प्रकारची कृषीविषयक माहिती पाहण्यासाठी आमच्या krushidoctor.com या वेबसाईटला नक्की भेट द्या.
FAQ’s | वारंवार विचारले जाणारे प्रश्न –
1. कांदा पीक लागवड कधी करावी?
उत्तर – महाराष्ट्रात कांद्याची लागवड खरीप हंगामात जून ते ऑक्टोबर, रब्बी हंगामात नोव्हेंबर ते फेब्रूवारी आणि उन्हाळी हंगामात जानेवारी ते जून महिन्यात करतात.
2. कांदा बियाणे किती दिवसात उगवते?
उत्तर – कांदा लागवडीपासून 120 दिवसात तयार होतो. हेक्टरी उत्पादन 250 ते 300 क्विंटल मिळते. लागवडीसाठी हेक्टरी कांद्याचे 10 किलो बियाणे पुरेसे असते.
3. कांदा वाढण्यास किती वेळ लागतो?
उत्तर – कांद्याला बियाण्यापासून परिपक्व होण्यासाठी 90-100 दिवस लागतात, जे सुमारे चार महिने असतात. तेच आपण जर रोप लागवड केळी तर कांदे सुमारे 80 दिवसांनी किंवा फक्त तीन महिन्यांच्या आत काढणीसाठी तयार होतात.
4. कांदा चाळ अनुदान कोणत्या योजनेतून देण्यात येते ?
उत्तर – राष्ट्रीय कृषी विकास योजनेतून यावर्षी देखील कांदा चाळ उभारण्यासाठी अनुदान दिले जाणार आहे.
लेखक –
सूर्यकांत इर्लेकर
मू. पो – इर्ले, तालुका – बार्शी, जिल्हा – सोलापूर.
राज्य – महाराष्ट्र. पिन – 413412