शेतकरी मित्रांनो नमस्कार, Krushi Doctor (कृषी डॉक्टर) या शेती विषयक माहिती देणाऱ्या वेबसाइट वरती आम्ही आपले सहर्ष स्वागत करत आहे. आजच्या लेखामध्ये आपण विद्राव्य खतांबद्दल (water soluble fertilizers) संपूर्ण माहिती पाहणार आहोत. यामध्ये प्रामुख्याने विद्राव्य खत म्हणजे नेमके काय आहे, विद्राव्य खत वापरण्याच्या पद्धती, विद्राव्य खत वापरल्यानंतर होणारे फायदे, विद्राव्य खत वापरताना घ्यायची काळजी, विद्राव्य खतांच्या मार्केट मधील टॉप कंपन्या, विद्राव्य खतांच्या मार्केटमधील किमती या सर्वांची माहिती आपण या लेखामध्ये सविस्तरपणे पाहणार आहोत.
विद्राव्य खते म्हणजे काय ? | What are water soluble fertilizers?
1. सध्या शेतीमध्ये रासायनिक खत वापरावर होणारा खर्च वाढत आहे.
2. काही खतांच्या किंमती दुप्पटी पर्यंत तर काही वेळा दुपटीहून अधिक वापरावर विशेष भर दिला आहे.
साहजिकच विद्राव्य खतांचा वापर वाढला आहे.
3. विद्राव्य खते पिकाच्या वाढीच्या अवस्थेनुसार द्यावयाची असतात.
4. सध्या बाजारात प्रमुख आणि सूक्ष्म अन्नद्रव्ये असलेली अनेक विद्राव्य खते पीक वाढीच्या विविध अवस्थेनुसार विविध ग्रेड मध्ये उपलब्ध आहेत.
5. विद्राव्य खते घन तसेच द्रवरुप स्वरुपात उपलब्ध आहेत. घन विद्राव्य खते एक किलो व पंचवीस किलोच्या पॅकिंगमध्ये बाजारात उपलब्ध आहेत.
6. अन्नद्रव्याच्या प्रमाणानुसार किंमतीमध्ये बदल होत असतो. ही खते पाण्यात 100 टक्के विरघळतात व आम्लधर्मीय आहेत.
7. विद्राव्य खते ठिबक संचातून तसेच फवारणीसाठी योग्य असतात.
8. काही विद्राव्य खतामध्ये मुख्य अन्नद्रव्ये बरोबर दुय्यम अन्नद्रव्ये (मॅग्रेशियम व सल्फर) व सूक्ष्म अन्नद्रव्ये (लोह, जस्त, तांबे) असतात.
9. विद्राव्य खते प्रामुख्याने पिकांवर फवारणीद्वारे दिल्याने जास्त फायदा होती. कारण ती पिकांना लवकर उपलब्ध होतात.
विद्राव्य खतांचा वापर पिकांसाठी कसा केला जाऊ शकतो?
अ) फवारणीद्वारे
ब) सूक्ष्म ठिबक सिंचनाद्वारे
विद्राव्य खतांमुळे होणारे फायदे | Benefits of npk water soluble fertilizers –
1. पिकाच्या मुळापाशी गरजेनुसार योग्य अन्नद्रव्य ठराविक प्रमाणात देता येते.
2. मजूर, पाणी व खते यांची बचत होते.
3. फर्टिगेशन तंत्रामुळे पाणी वापर कार्यक्षमता 40 ते 50 टक्के, खत वापर कार्यक्षमता 25 ते 30 टक्के वाढते.
ही विद्राव्य खते (water soluble fertilizers) सोडिअम व क्लोरिनमुक्त असल्याने जमिनीच्या गुणधर्मावर अनिष्ट परिणाम होत नाही.
4. पिकाची वाढ जोमाने झाल्याने रोगांना बळी पडण्याचे प्रमाण कमी होते.
5. खते विभागून जमीन, पिकाच्या व हवामानातील बदलानुसार देता येतात.
6. फवारणीद्वारे विद्राव्य खते दिल्यास ती त्वरित वनस्पतींना उपलब्ध होतात.
7. जमिनीतील पाण्याची कमतरता किंवा कडक उन्हाळा अशा परिस्थितीत फवारणीद्वारे खतांची पूर्तता करता येते.
8. अन्नद्रव्यांच्या कमतरतेची लक्षणे दिसू लागताच त्वरित ती कमतरता पानांद्वारे पोषक देऊन भरून काढता येते.
9. पिकामध्ये अन्नद्रव्यांच्या कमतरतेची लक्षणे दिसल्यास लगेच त्या अन्नघटकांच्या संबंधित विद्राव्य खतांची फवारणी केल्यास ही खते प्रभावीपणे कार्य करतात.
विद्राव्य खते (water soluble fertilizers) वापरताना घ्यावयाची काळजी –
1. एक किलो विद्राव्य ड्रीप खते जसे 19:19:19, 12:61:00 आणि 00:52:34 इत्यादी विरघळण्यासाठी कमीत कमी 15 लिटर पाणी वापरावे.
2. खते विरघळण्यासाठी पाणी स्वच्छ वापरावे.
3. योग्य मिश्रणासाठी पाण्यामध्ये खते टाकावीत. उलटे खतामध्ये पाणी टाकू नये.
4. चिलेटेड मायक्रोन्यूट्रिएंट वापरानंतर पॉकेट सीलबंद करून ठेवावे.
5. ठिबकमधून खते द्यायची संपल्यानंतर दहा मिनिटांपेक्षा जास्त वेळ पाणी देऊ नये.
6 .विद्राव्य खतांच्या उत्कृष्ट परिणामासाठी कंपनीच्या शिफारशीप्रमाणे उत्पादनाचा वापर करावा.
7. एक किलो 00:00.50 ड्रिप खत विरघळण्यासाठी कमीत कमी वीस लिटर पाणी वापरावे.
8. खते देताना पिकाची अवस्था, वाफसा, वातावरण याचा नीट अभ्यास करणे गरजेचे आहे.
9. सर्व ड्रीपर्स समान पातळीवर असणे गरजेचे आहे. यामुळे सर्व पिकाला योग्य प्रमाणात खते मिळतात.
10. ठिबक सिंचन संचात कोठेही लिकेज असता कामा नये. अन्यथा खते वाया जातात.
शेतीमध्ये लागणाऱ्या सर्व कृषि औषधांची माहिती जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा – कृषि औषधे
कोणती विद्राव्य खते एकमेकात मिसळू नये? | Fertilizer compatibility –
1. कॅल्शियम नायट्रेट व कॅल्शियम अधिक बोरॉन मिश्र खत ची ड्रीप खते 13:00:45 व्यतिरिक्त कोणत्याही खताबरोबर मिसळू नये.
2. फॉस्फरिक ऍसिड बरोबर कोणती फवारणी अथवा ड्रिप खत मिसळू नये.
3. कोणत्याही खताबरोबर कॅल्शियम, कॉपर युक्त खते तसेच सल्फर मिसळू नये.
4. कॅल्शिअम नायट्रेट आणि 20:20:20 किंवा 12:61:00 या प्रकारची स्फुरद युक्त खते एकत्र टाकीत मिसळल्यास कॅल्शियम व फॉस्फेटची रासायनिक प्रक्रिया होऊन कॅल्शिअम फॉस्फेट तयार होतो. जो पाण्यात अविद्राव्य असल्याने फिल्टरमध्ये अडकतो. त्यामुळे खत पिकाला उपलब्ध होत नाही.
खालील खतांच्या जोड्या एकमेकांत कधीच मिसळू नयेत –
1. कॅल्शियम नायट्रेट + 0:52:34
2. कॅल्शियम नायट्रेट + 12:61:0
3. कॅल्शियम नायट्रेट + अमोनियम सल्फेट
4. कॅल्शियम नायट्रेट + अमोनियम नायट्रेट
5. कॅल्शियम नाइट्रेट + पोटॅशियम सल्फेट
6. मॅग्नेशियम सल्फेट + 12:61:0
7. मॅग्नेशियम सल्फेट + 0:52:34
8. मॅग्नेशियम सल्फेट + कॅल्शियम नायट्रेट
9. कॅल्शियम नायट्रेट + फॉस्फोरिक ऍसिड
10. फॉस्फरिक ऍसिड + 12:61:0
विद्राव्य खतांच्या मार्केट मधील टॉप कंपन्या | top fertilizer companies in maharashtra –
1. Coromandel international (Gromor)
2. Smartchem technologies ltd (Zetol)
3. Nagarjuna fertilizers (Mahadhan)
4. RCF (Rashtriya Chemicals and Fertilizers Limited)
5. IFFCO (Indian Farmers Fertiliser Cooperative)
6. KRIBHCO Fertilizers Limited
7. Zuari Agro Chemicals Ltd (Jai Kisan)
8. Yara Fertilisers India Pvt. Ltd.
9. ICL Specialty Fertilizers India
10. IFC (Indian Farmer Company)
विद्राव्य खतांच्या मार्केटमधील किंमती | Water soluble fertilizers list & Prices –
12:61:00 –
1 किलो – 230 ते 260 रुपये
25 किलो – 1150 ते 1300 रुपये
19:19:19 –
1 किलो – 150 ते 200 रुपये
25 किलो – 1600 ते 1700 रुपये
13:40:13 –
1 किलो – 250 ते 300 रुपये
25 किलो – 1600 रुपये
00:52:34 –
1 किलो – 230 ते 260 रुपये
25 किलो – 1100 ते 1200 रुपये
00:00:50 –
1 किलो – 200 ते 250 रूपये
25 किलो – 1200 ते 1300 रुपये
कॅल्शियम नायट्रेट –
1 किलो – 220 ते 260 रुपये
25 किलो – 1100 ते 1200 रुपये
पोटॅशियम शोनाईट –
1 किलो – 230 ते 260 रुपये
25 किलो – 1100 ते 1300 रुपये
24:24:00 –
1 किलो – 260 ते 280 रुपये
25 किलो – 1400 ते 1500 रुपये
टीप –
1. वरील सर्व खतांच्या किमतीत डीलर, खत विक्रेते, ऑनलाइन प्लॅटफॉर्म यांच्यानुसार बदल होऊ शकतो.
2. वरील खतांच्या ऑनलाइन खरेदीसाठी तुम्ही 9168911489 या क्रमांकावर संपर्क साधू शकता.
Conclusion I सारांश –
शेतकरी मित्रांनो तुम्हाला krushi doctor या वेबसाइट वरील water soluble fertilizers: विद्राव्य खतांची संपूर्ण माहिती हा लेख तुम्हाला कसा वाटला वाटला हे खाली कमेंट बॉक्स मध्ये सांगायला विसरू नका. आणि हा लेख जर तुम्हाला आवडला तर तुमच्या इतर शेतकरी मित्रांसोबत शेयर नक्की करा. आणखी अशा प्रकारच्या खतांबद्दल आणि कृषीविषयक माहिती पाहण्यासाठी आमच्या krushi doctor या वेबसाईटला नक्की भेट द्या.
FAQ’s | वारंवार विचारले जाणारे प्रश्न –
1. विद्राव्य खतांमध्ये कोणती अन्नद्रव्य असतात?
उत्तर – विद्राव्य खतामध्ये मुख्य अन्नद्रव्य बरोबर दुय्यमअन्नद्रव्ये (मॅग्नेशियम व सल्फर) व सूक्ष्म अन्नद्रव्ये (लोह, जस्त, तांबे) असतात.
2. कॅल्शियम नायट्रेट आणि स्फुरद युक्त खते एकमेकात मिसळल्यास काय होते?
उत्तर – कॅल्शिअम नायट्रेट आणि 20:20:20 किंवा 12:61:00 या प्रकारची स्फुरद युक्त खते एकत्र टाकीत मिसळल्यास कॅल्शियम व फॉस्फेटची रासायनिक प्रक्रिया होऊन कॅल्शिअम फॉस्फेट तयार होतो. जो पाण्यात अविद्राव्य असल्याने फिल्टरमध्ये अडकतो. त्यामुळे खत पिकाला उपलब्ध होत नाही.
3. विद्राव्य खते किती किलोच्या पॅकिंग मध्ये उपलब्ध असतात?
उत्तर – घन विद्राव्य खते एक किलो व पंचवीस किलोच्या पॅकिंगमध्ये बाजारात उपलब्ध आहेत.
4. विद्राव्य खतांचा वापर पिकांसाठी कसा केला जाऊ शकतो?
उत्तर – फवारणीद्वारे आणि सूक्ष्म ठिबक सिंचनाद्वारे पाण्यासोबत विद्राव्य खतांचा वापर पिकांसाठी केला जातो.
People also read | आमचे हे देखील लेख नक्की वाचा –
1. ऊस पिकातील पोक्का बोइंग रोग नियंत्रण
2. आयसीएल पॉली सल्फेट चा उपयोग आणि फायदे
3. सीताफळ लागवड करण्याची आधुनिक पद्धत
4. माती परीक्षण कसे करावे? जाणून घ्या अचूक पद्धत आणि फायदे
5. पानी परीक्षण कसे करावे? जाणून घ्या संपूर्ण माहिती
लेखक –
सूर्यकांत इर्लेकर
मू. पो – इर्ले, तालुका – बार्शी, जिल्हा – सोलापूर.
राज्य – महाराष्ट्र. पिन – 413412