शेयर करा

root rot disease

शेतकरी मित्रांनो नमस्कार, Krushi Doctor (कृषी डॉक्टर) या शेती विषयक माहिती देणाऱ्या वेबसाइट वरती आम्ही आपले सहर्ष स्वागत करत आहे. आजच्या लेखामध्ये आपण हळद आणि आदरक पिकातील कंदकुज (root rot disease) नियंत्रण विषयी सविस्तरपणे माहिती पाहणार आहोत. यामध्ये कंदकुज म्हणजे नेमके काय आहे, त्याचा प्रादुर्भाव कशामुळे होतो, त्याचा प्रसार कसा होतो आणि कंदकुज नियंत्रणासाठी काय उपाय योजना आहेत याबद्दल आपण माहिती या लेखामध्ये पाहणार आहोत.

नुकसान | Damage from root rot disease in turmeric –

उत्पादनात 50 टक्‍क्‍यांपेक्षा अधिक घट होते.

हळद आणि अद्रक कंदकूज लक्षणे | Symptoms of root rot of disease –

अ) बुरशीजन्य कंदकुज | Fungal root rot disease –

1. कंदकुज चे प्रथम लक्षणे ही कंदातील कोवळ्या फुटींवर लगेच दिसून येतात.
2. प्रथम पानांचे शेंडे वरून व कडांनी पिवळे पडून खालपर्यंत वाळत जातात.
3. खोडाचा जमिनीलगतचा भाग काळपट पडतो.
4. याच ठिकाणी माती बाजूस करून पाहिल्यास गड्डा वरून काळा पडलेला व निस्तेज झालेला दिसतो.
5. प्रादुर्भावग्रस्त फुटवा ओढल्यास सहज हातामध्ये येतो.
6. या रोगामुळे साधारण उत्पादनात ५० टक्‍क्‍यांपेक्षा अधिक घट होते.



ब) जीवाणूजन्य कंदकूज | Bacterial root rot disease –

1. जीवाणूजन्य कंदकूज ओळखण्यासाठी रोगग्रस्त कंदाचा भाग धारदार ब्लेडने कापून स्वच्छ काचेच्या ग्लासमध्ये पाणी घेऊन त्याचे टोक त्यामध्ये बुडवावे.
2. त्यामधून दुधासारखा स्राव पाण्यामध्ये आल्यास जिवाणूजन्य कंदकूज आहे हे ओळखावे.

हळद आणि आदरक कंदकूज व्यवस्थापन | Root rot treatment

1. कंद पोसण्याच्या कालावधीमध्ये हळदीला पाण्याची गरज मर्यादित असते.
2. त्यामुळे सात महिने पूर्ण झाल्यानंतर हळदीस पाणी देण्याचा कालावधी हळूहळू कमी करत जावा.
3. आठ महिने पूर्ण झाल्यानंतर जमिनीच्या प्रकारानुसार पाणी बंद करावे.
4. त्यामुळे पानामधील अन्न कंदामध्ये उतरण्यास मदत होते व हळदीस उतारा चांगला मिळतो.
5. कंदकूज व्यवस्थापनासाठी जैविक बुरशीनाशक ट्रायकोडर्मा 2 ते 2.5 किलो प्रति एकरी 300 किलो सेंद्रिय खतामध्ये मिसळून जमिनीमध्ये द्यावे किंवा ड्रीप असलीस ट्रायकोडर्मा 2 लिटर प्रति एकरी द्यावे. याचा वापर प्रतिबंधात्मक म्हणूनच करावा.
6. कंदकूजीस सुरवात झाल्यानंतर ब्लिटॉक्स, टाटा रॅलीस इंडिया लिमिटेड, कॉपर ऑक्‍सिक्‍लोराइड 50 टक्के डब्ल्यू.पी. 45 ग्रॅम प्रति 15 लिटर पाणी या प्रमाणात आळवणी करावी.
7. रोगाची तीव्रता जास्त असल्यास रेडोमिल गोल्ड, सिंजेंटा, मेटॅलॅक्‍सिल 4 टक्के + मॅंकोझेब 64 टक्के डब्ल्यू.पी. (संयुक्त बुरशीनाशक) 45 ग्रॅम प्रति 15 लिटर पाणी या प्रमाणात आळवणी करावी.
8. आले पिकामध्ये जिवाणूजन्य मर असल्यास सोबत 2 मिली,कासु-बी, धानुका, कासुगामाइसिन 3 टक्के एस. एल. प्रतिलिटर पाणी या प्रमाणात आळवणी करावी.
9. आळवणी करताना जमिनीत वाफसा असावा. आळवणी केल्यानंतर पिकाला थोडासा पाण्याचा ताण द्यावा.
10. गरज वाटल्यास पुन्हा एकदा वरील औषधांची आळवणी करावी.

( शेती निगडीत नव-नवीन विडियो पाहण्यासाठी येथे क्लिक करा – कृषि डॉक्टर यूट्यूब चॅनल)

Conclusion I सारांश –

शेतकरी मित्रांनो तुम्हाला krushi doctor या वेबसाइट वरील आमचा root rot disease: हळद आणि आदरक पिकातील कंदकुज नियंत्रण हा लेख तुम्हाला कसा वाटला वाटला हे खाली कमेंट बॉक्स मध्ये सांगायला विसरू नका. आणि हा लेख जर तुम्हाला आवडला तर तुमच्या इतर शेतकरी मित्रांसोबत शेयर नक्की करा. आणखी अशा प्रकारची कृषीविषयक माहिती पाहण्यासाठी आमच्या krushi doctor या वेबसाईटला नक्की भेट द्या.

FAQ’s | वारंवार विचारले जाणारे प्रश्न –

1. हळदीची लागवड कधी करावी?
उत्तर – हळदीची लागवड साधारणपणे एप्रिल महिन्याच्या मध्यापासून जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यापर्यंत करावी.

2. हळदीचा मानवी जीवनात उपयोग सांगा?
उत्तर – पिवळी हळदी रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी चांगली आहे , तर अंबा हळदीचा वापर सूज, आघात, रक्त शुद्धीकरण आणि जखमा भरण्यासाठी जास्त केला जातो. हृदयरोग: ते खराब LDL कोलेस्टेरॉल आणि ट्रायग्लिसराइड्स कमी करण्यास मदत करू शकतात, ज्यामुळे हृदयविकाराचा धोका कमी होतो.

3. भारतात अदरक कोणत्या महिन्यात घेतले जाते?
उत्तर – आल्यासाठी लागवडीचा हंगाम मार्च-एप्रिल हा पावसाळ्याच्या प्रारंभी असतो. पिकाचा कालावधी साधारणतः 8-9 महिने (एप्रिल/मे ते डिसेंबर/जानेवारी) असतो. आल्याची लागवड पंक्तीमध्ये 30 सेमी अंतरावर 20-25 सेमी अंतरावर केली जाते.

4. भारतात आले कोठे पिकवले जाते?
उत्तर – भारतातील बहुतेक राज्यांमध्ये आल्याची लागवड केली जाते. तथापि, कर्नाटक, ओरिसा, आसाम, मेघालय, अरुणाचल प्रदेश आणि गुजरात या राज्यांचा देशाच्या एकूण उत्पादनात 65 टक्के वाटा आहे.

लेखक –
कृषि डॉक्टर सूर्यकांत


शेयर करा