
शेतकरी मित्रांनो नमस्कार, मी कृषी डॉक्टर सूर्यकांत आपले Krushi Doctor वेबसाईटवर सहर्ष स्वागत करतो. पपई हे कमी कालावधीत आणि कमी खर्चात जास्त नफा देणारे फळपीक आहे. आज आपण या लेखात papaya variety (पपई सुधारित जाती) या विषयावर सविस्तर माहिती पाहणार आहोत. अधिकृत फलोत्पादन मार्गदर्शनासाठी तुम्ही राष्ट्रीय फलोत्पादन बोर्डाच्या (NHB) संकेतस्थळाला भेट देऊ शकता.
पपईचे पीक साधारणपणे 10 ते 13 महिन्यांत तयार होते. लागवडीसाठी योग्य papaya variety निवडणे हा यशस्वी उत्पादनाचा पाया आहे. अलीकडच्या काळात ‘रेड लेडी 786’ आणि ‘तैवान’ सारख्या संकरित जातींमुळे शेतकऱ्यांचा कल पपई लागवडीकडे वाढला आहे. पपईच्या उभयलिंगी जातींपासून अधिक उत्पादन मिळत असल्याने, रोपवाटिकेतून रोपे निवडताना विशेष काळजी घेणे गरजेचे आहे.
📍 पपई सुधारित जाती | Best Papaya Variety List
| No. | जातीचे नाव | प्रमुख वैशिष्ट्ये |
|---|---|---|
| 1 | रेड लेडी 786 | नर आणि मादी फुले एकाच झाडावर असतात. फळांची साठवण क्षमता उत्कृष्ट आहे. |
| 2 | कुर्ग हनीड्यू | फळे चवीला अतिशय गोड आणि लांब आकाराची असतात. प्रति झाड 30-40 फळे मिळतात. |
| 3 | पुसा डॉर्फ | झाडे ठेंगणी असल्याने सोसाट्याच्या वाऱ्यात देखील टिकून राहतात. उत्पादन अधिक मिळते. |
| 4 | तैवान 785/786 | भरपूर उत्पादन (100-125 फळे). ही जात व्हायरस रोगाला कमी बळी पडते. |
शेती निगडित सर्व माहिती व्हिडिओ स्वरूपात पाहण्यासाठी येथे क्लिक करा –
💰 पपई बियाणे किंमत आणि खरेदी
पपईच्या दर्जेदार बियाण्याची अंदाजे किंमत खालीलप्रमाणे असते:
- 1 ग्राम: 448 रुपये
- 10 ग्राम: 4500 रुपये
तुम्ही पपईचे ओरिजनल बियाणे डिस्काउंटसह ऑनलाइन खरेदी करण्यासाठी येथे क्लिक करा.
सारांश | Conclusion
शेतकरी मित्रांनो, आधुनिक papaya variety ची निवड करून तुम्ही पपई शेतीतून भरघोस नफा मिळवू शकता. हा लेख आवडला असल्यास आपल्या शेतकरी ग्रुपमध्ये नक्की शेअर करा. अधिक माहितीसाठी आमच्या Krushi Doctor वेबसाईटला भेट देत राहा.
सतत विचारले जाणारे प्रश्न (FAQs)
1. पपईला फळ येण्यासाठी किती वेळ लागतो?
उत्तर: लागवडीनंतर साधारणपणे 7 ते 11 महिन्यांत पपईची फळे काढणीसाठी तयार होतात.
2. पपई लागवड कोणत्या महिन्यात करावी?
उत्तर: पपईची लागवड मुख्यत्वे जून-जुलै, सप्टेंबर-ऑक्टोबर किंवा जानेवारी-फेब्रुवारी मध्ये केली जाते.
3. पपईच्या बियाण्यांमध्ये नर आणि मादी ओळख कशी करावी?
उत्तर: सहसा गडद काळ्या रंगाच्या बिया मादी झाडे देतात, तर फिक्कट तपकिरी बिया नर झाडे देण्याची शक्यता असते.
लेखक: सूर्यकांत कांबळे
इर्ले, बार्शी, सोलापूर | महाराष्ट्र
संपर्क: +91 8956970102