maka lagwad

शेतकरी मित्रांनो नमस्कार. Krushi Doctor (कृषी डॉक्टर) या शेती विषयक माहिती देणाऱ्या वेबसाईटवर आपले सहर्ष स्वागत आहे. जगात तृणधान्य पिकांच्या उत्पादनामध्ये गहू आणि भात या पिकानंतर मक्याचा नंबर लागतो. विशेषतः, निरनिराळ्या हवामानाशी जलद समरस होण्याची क्षमता असणारे मका हे एकमेव पीक आहे. म्हणूनच, आजच्या लेखामध्ये आपण मका लागवड (maka lagwad) याविषयी संपूर्ण माहिती पाहणार आहोत.

🌱 Maka Lagwad: आवश्यक जमीन आणि हवामान

  • जमीन: मका पिकासाठी पाण्याचा योग्य निचरा होणारी जमीन आवश्यक असते. जरी भारी ते मध्यम प्रतीची जमीन उपयुक्त असली, तरीही कोणत्याही प्रकारच्या जमिनीमध्ये मका लागवड करता येते. जमिनीचा सामू 6.5 ते 7 असावा.
  • हवामान: मका हे पीक उष्ण हवामानाला उत्तम प्रतिसाद देते. परिणामी, या पिकाची लागवड उन्हाळा, पावसाळा आणि हिवाळा या तिन्ही ऋतूंमध्ये करता येते. हे 21°C ते 27°C दरम्यान तापमान असलेल्या भागात चांगले वाढते.

📌 अधिकृत तांत्रिक माहिती (ICAR):

मका पिकाच्या आधुनिक वाणांबद्दल आणि लागवड तंत्रज्ञानाबद्दल भारत सरकारच्या ‘भारतीय मका अनुसंधान संस्था’ (IIMR) च्या अधिकृत पोर्टलवर माहिती वाचा:


Indian Institute of Maize Research (IIMR) – Official Portal

🌽 मका लागवडीसाठी उपयुक्त वाण

कालावधी वाणांची नावे
लवकर पक्व होणारे वाण किरण, प्रकाश, पी के व्ही एम – शतक
मध्यम कालावधीत पक्व होणारे पंचगंगा, मांजरी, पारस, महाराजा
उशिरा पक्व होणारे वाण आफ्रिकन टॉल, डेक्कन 103

🚜 लागवड, बियाणे आणि खत व्यवस्थापन

बियाण्याचे प्रमाण: संकरित वाणांच्या लागवडीसाठी एकरी 8 ते 9 किलो बियाणे लागते. परंतु, देशी वाणांसाठी 6 ते 7 किलो पुरेसे असते.

बीजप्रक्रिया: पेरणीपूर्वी बियाण्यास कार्बेन्डाझिम 2 ग्रॅम प्रति किलो या प्रमाणात प्रक्रिया करावी. त्याचप्रमाणे, तुम्ही थायरमचाही वापर करू शकता.

रासायनिक खते: लागवडीसोबत एकरी 10:26:26 (2 बॅग) + झिंक सल्फेट (10 किलो) + रायझर-जी (10 किलो) द्यावे. त्यानंतर, 20 ते 30 दिवसांनी 1 बॅग युरिया द्यावा.

📺 शेती निगडीत नव-नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा:

कृषी डॉक्टर यूट्यूब चॅनल

🛡️ कीड आणि रोग नियंत्रण

अमेरीकन लष्करी अळी: इमामेक्टिन बेंजोएट (5%) 0.4 ग्रॅम प्रति लिटर किंवा अलिका 0.50 मिली प्रती लिटर फवारावे.
खोडकिडा: फोरेट 10 जी. (10 ते 12 किग्रॅ/हेक्टरी) जमिनीत मिसळावे.
करपा रोग: मॅन्कोझेब 2.5 ग्रॅम प्रती लिटर पाणी या प्रमाणात 8 ते 10 दिवसांच्या अंतराने फवारावे.

सारांश | Conclusion

थोडक्यात सांगायचे तर, मका हे कमी कालावधीत चांगले उत्पन्न देणारे पीक आहे. अशा प्रकारे, जर तुम्ही योग्य वाणाची निवड, खत व्यवस्थापन आणि वेळेवर कीड नियंत्रण केले, तर संकरित वाणापासून हेक्टरी 90 ते 100 क्विंटल उत्पादन आरामात मिळते. हा मका लागवड (maka lagwad) वरील लेख आवडल्यास नक्की शेअर करा.

❓ वारंवार विचारले जाणारे प्रश्न (FAQs)

1) मका किती महिन्यात येते?
उत्तर – मकेसाठी साधारणतः 100 ते 120 दिवसांचा कालावधी लागतो.

2) भारतात कोणत्या महिन्यात मका पिकवला जातो?
उत्तर – मका हे सर्व ऋतूंमध्ये घेतले जाऊ शकते उदा. खरीप (पावसाळा), रब्बी (हिवाळा) आणि उन्हाळी.

SK

लेखक

सूर्यकांत कांबळे

संपर्क: +91 8956970102

krushidoctor.com


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *