शेयर करा

gram pod borer control

शेतकरी मित्रांनो नमस्कार, Krushi Doctor (कृषी डॉक्टर) या शेती विषयक माहिती देणाऱ्या वेबसाइट वरती आम्ही आपले सहर्ष स्वागत करत आहे. आजच्या लेखामध्ये आपण हरभरा पिकातील घाटे अळी विषयी सविस्तरपणे माहिती पाहणार आहोत. यामध्ये घाटे अळी नेमकी काय आहे, तिचा प्रादुर्भाव कशामुळे होतो, तिचा प्रसार कसा होतो, तिची लक्षणे काय आहे आणि घाटे अळीच्या रासायनिक नियंत्रणासाठी (gram pod borer control) काय उपाय योजना आहेत याबद्दल आपण माहिती या लेखामध्ये पाहणार आहोत.

घाटे अळीच्या अवस्था | Lifecycle of gram pod borer –

👉अंडी – अळी – कोष – पतंग
1. अळी अवस्था पिकाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान करते.
2. पतंग मजबूत बांध्याचे, फिक्कट पिवळ्या रंगाचे व पंखावर एक कला ठिपका असलेले असतो.
3. मागील पंखाच्या कडा धुरकट असतात.



प्रादुर्भावाची वैशिष्ट्ये –

1. विशेषतः पीक कळी व फुलोरा अवस्थेत आल्यावर अळीचा अधिक प्रादुर्भाव. मात्र, घाटे व परिपक्व होणाऱ्या दाण्यावरील प्रादुर्भाव जास्त नुकसानकारक ठरतो.
2. हरभऱ्यावर घाटे अळीचा प्रादुर्भाव 40 टक्के पर्यंत आढळतो.
3. साधारणतः एक अळी 30 – 40 घाट्याचे नुकसान करते.
4. काबुली हरभऱ्यावर देशी वाणापेक्षा घाटे अळीचा (gram pod borer) अधिक प्रादुर्भाव आढळतो.
5. टपोऱ्या देशी वाणावर लहान दाण्यांच्या वाणापेक्षा घाटे अळीचा जास्त प्रादुर्भाव आढळून येतो.
6. दाट पेरलेल्या हरभऱ्यामध्ये घाटे अळीचा प्रादुर्भाव अधिक होतो.

नुकसान | Damage by gram pod borer –

लहान अळ्या सुरुवातीला पानावरील आवरण खरडून खातात. अशी पाने काही अंशी जाळीदार व भुरकट पांढरी पडलेली दिसतात. विकसित घाटे अळी कळ्या व फुले कुरतडून खातात. पूर्ण वाढ झालेली अवस्था तोंडाकडील भाग घाट्यात घालून आतील दाणे फस्त करते.

( शेती निगडीत नव-नवीन विडियो पाहण्यासाठी येथे क्लिक करा – कृषि डॉक्टर यूट्यूब चॅनल)

हरभरा घाटे अळी एकात्मिक नियंत्रण | Gram pod borer control –

1. उन्हाळ्यात जमिनीची खोल चांगली नांगरणी करावी, त्यामुळे किडीचे कोश उघडे पडतात.
2. पक्षी ते वेचून खातात. यासाठी पक्ष्यांना आकर्षित करण्यासाठी चार-पाच दिवस आधी सकाळी लवकर थोडा भात शिजवून शेतात रिकाम्या जागी धुर्यावर विखरून टाकावा.
3. पक्षी थांबे एकरी 10 ते 20 प्रमाणात लावावेत किंवा पेरतेवेळी ज्वारी किंवा मक्‍याचे दाणे टाकावे.
4. याकडे पक्षी आकर्षित होतात. त्यावर बसून पक्षी अळ्यांचा फडशा पाडतात.
5. शिफारशीत आणि रोगास प्रतिकारक्षम वाण लागवडीसाठी निवडावे, तसेच शिफारशीत अंतरावर पेरणी करावी.
6. घाटे अळीच्या सर्वेक्षणासाठी गंध सापळ्यांचा वापर करावा.
7. हरभरा पिकात आंतरपीक किंवा मिश्र पद्धतीचा अवलंब करावा.
8. मुख्य पिकाभोवती झेंडू या सापळा पिकाची एक ओळ लावावी.
9. वनस्पती जन्य कीटकनाशकांचा वापर करावा. अळीचा प्रादुर्भाव दिसताच, निंबोळी अर्क ( 5%,) किंवा अझाडीरेक्टीन (300 पीपीएम) 5 मिली प्रति लिटर पाणी.
10. जैविक कीटकनाशक एचएनपीव्ही हेक्टरी 500 एल.ई म्हणजे 500 मिली विषाणू प्रति 500 लिटर पाण्यात मिसळावे.
11. त्यामध्ये 500 मिली चिकट द्रव्य आणि 50 ग्रॅम उत्तम दर्जाची नीळ टाकून फवारणी करावी.
12. ही फवारणी शेतात प्रथम-द्वितीय अवस्थेतील अळ्या असताना केल्यास अतिशय प्रभावी ठरते.
13. बिव्हेरिया बॅसियाना (1 टक्के विद्राव्य) 3 किलो प्रति हेक्टरी प्रति 500 लिटर पाणी किंवा 6 ग्रॅम प्रति लिटर पाणी या प्रमाणे फवारणी करावी.

रासायनिक नियंत्रण | Chemical gram pod borer control –

1. इंडोक्झाकार्ब 14.5% SC – 0.8 मिलि / लिटर पाणी (किंगडोक्सा, घरडा केमिकल्स)
2. क्लोराँट्रानिलिप्रोल 18.5 sc – 0.3 मिलि / लीटर पानी (एफएमसी कंपनीचे कोराजन)
3. फ्लुबेन्डियामाइड 480SC (39.35% w/w) -100 मिलि / एकर (बायर कंपनीचे फेम)
4. इमामेक्टीन बेंझोएट 5% एस जी – 0.25 ग्राम / लीटर पानी (यूपीएल कंपनीचे प्रोक्लेम)



Conclusion I सारांश –

शेतकरी मित्रांनो तुम्हाला krushi doctor या वेबसाइट वरील आमचा gram pod borer control: हरभरा घाटे अळी नियंत्रण हा लेख आपणास कसा वाटला हे कमेंट बॉक्स मध्ये सांगायला विसरू नका. आणि हा लेख जर तुम्हाला आवडला तर तुमच्या इतर शेतकरी मित्रांसोबत शेयर नक्की करा. आणखी अशा प्रकारची कृषीविषयक माहिती पाहण्यासाठी आमच्या krushi doctor या वेबसाईटला नक्की भेट द्या.

FAQ’s | वारंवार विचारले जाणारे प्रश्न –

1. हरभरा शेंगा बोअरचे नियंत्रण कसे करावे?
उत्तर – लागवडीपूर्वी जमिनीची खोलवर नांगरट करावी. पिकाच्या मध्ये-मध्ये मका व ज्वारी ची ताटे लावावीत. प्लॉट जास्तीत – जास्त तणमुक्त ठेवावा. एकरी 4 ते 5 कामगंध सापळे लावावेत. आणि प्रादुर्भाव वाढल्यानंतर शिफारशीत कीटकनाशकांच्या फवारण्या कराव्यात.

2. हरभरा पीक किती दिवसाचे आहे?
उत्तर – हरभरा पिकाचा कालावधी हा जाती नुसार वेग-वेगळा असू शकतो. पण सरासरी हरभरा पीक हे 100 ते 110 दिवसांनी काढणीला येते.

3. हरभरा शेंगा बोअरर म्हणजे काय?
उत्तर – ही एक हरभरा पिकातील कीड आहे. याचे शास्त्रीय नाव – ग्रॅम पॉड बोअरर (हेलीकोव्हरपा आर्मिगेरा हबनर) हे आहे. जी हरभरा पिकाच्या घाट्या मध्ये जाऊन आतील दाना खाऊन टाकते.

4. हरभऱ्याचे उत्पादन कोणता देश करतो?
उत्तर – तसे पाहिले तर जगभरातील सर्वाधिक उत्पादन हे भारत देशामध्ये घेतले जाते परंतु जगातील इतर 550 हून अधिक देशामध्ये चणा म्हणजेच हरभरा पिकाचे उत्पादन घेतले जाते.

लेखक
सूर्यकांत इर्लेकर
मू. पो – इर्ले, तालुका – बार्शी, जिल्हा – सोलापूर.
राज्य – महाराष्ट्र. पिन – 413412


शेयर करा