शेयर करा

gandul khat

शेतकरी मित्रांनो नमस्कार, Krushi Doctor (कृषी डॉक्टर) या शेती विषयक माहिती देणाऱ्या वेबसाइट वरती आम्ही आपले सहर्ष स्वागत करत आहे. आजच्या लेखामध्ये आपण गांडूळ खत (gandul khat) निर्मिती ची संपूर्ण माहिती अगदी सोप्या भाषेत पाहणार आहोत. यामध्ये प्रामुख्याने गांडूळ खत कसे तयार करतात, गांडूळ खत तयार करण्यासाठी लागणाऱ्या गांडूळ जाती, गांडूळ खत(gandul khat) तयार करण्याच्या पद्धती आणि गांडूळ खतांमुळे होणारे फायदे याबद्दल सविस्तर माहिती पाहणार आहोत. आपण पाहतो की सध्याच्या काळात शेतकरी रासायनिक खतांचा वापर प्रमाणापेक्षा जास्त करत असल्यामुळे त्याचा दुष्परिणाम आपल्या पिकावर तसेच जमिनीवर दिसून येतो.

यापूर्वी शेतकरी शेणखत, कंपोस्ट खत, गाळाचे खत तसेच पिकांची फेरपालट यांचेद्वारे जमिनीची सुपिकता टिकवून ठेवत असे.तसेच जमिनीचा सुपीक थर होण्यासाठी गांडूळाचे महत्त्वाचे कार्य करते. गांडुळाच्या शरीरामध्ये प्रामुख्याने प्रोटोलिटिक, सेल्युलो लाटकीक आणि लीग्नो लायटिक एंझाईम असतात. गांडूळ खतामध्ये (vermicomposting) पिकाच्या वाढीसाठी आवश्यक मुख्य व सूक्ष्म अन्नद्रव्ये एकत्रित उपलब्ध असतात.



गांडूळ खताचे आपल्याला होणारे फायदे –

1. गांडूळ खतामध्ये सरासरी नत्र 1 ते 1.5 टक्के, स्फुरद 0.9 टक्के व पालाश 0.4 टक्के, कॅल्शिअम 0.44 टक्के तर मॅग्नेशिअमचे 0.15 टक्के प्रमाण असते.
2. तसेच लोह 175.20 पीपीएम, मॅग्नीज 96.51 पीपीएम जस्त 24.45 पीपीएम, तांबे 4.89 पीपीएम आणि कर्बे: नत्राचे प्रमाण 15.50 एवढे आहे.
3. गांडूळ खत ( gandul khat) हे भरपूर अन्नद्रव्ये, संप्रेरके असणारे दाणेदार सेंद्रिय खत असून जैविक गुणधर्म वाढविते.
4. गांडूळ खत (gandul khat) हा सेंद्रीय शेतातील एक महत्वाचा घटक आहे.
5. गांडूळ खतामुळे जमीन भुसभुशीत राहते, त्यामुळे जमिनीत हवा व पाणी खेळते राहते.
6. पिकांची वाढ अधिक वेगाने होते.
7. गांडूळ खतामुळे पाण्याचा योग्य निचरा होतो व जमिनीची पाणी साठवून ठेवण्याची क्षमता वाढते.
8. पाणी साठवून ठेवण्याची क्षमता वाढल्याने, पाऊस नियमित न झाल्यास, पिकाला पाण्याचा ताण पडत नाही.
9. बागायती पिकांबाबत सिंचनाचा खर्च कमी होतो व पाण्याची बचत होते.
10. गांडूळ खत (gandul khat) हे कचऱ्यापासून निर्माण होते. त्यामुळे प्रत्येक शेतकऱ्यांनी गांडूळ खत निर्माण करायला हवे.
11. अशाने उत्पादन खर्च कमी होतो आणि चांगला नफा मिळतो.

गांडूळ खतासाठी गांडूळाच्या योग्य जाती –

1. जगात साधारणतः गांडूळांच्या 300 हून अधिक जाती असल्या तरी प्रामुख्याने ईसिना फोइटीडा, युड्रीलस युजेनिया, पेरीनोक्सी, एक्झोव्हेटस, फेरीटीमा इलोंगेटा या गांडूळांच्या महत्त्वाच्या आणि योग्य जाती आहेत. या जातीची वाढ चांगली होऊन त्या खत तयार करण्याची प्रकिया 40 ते 45 दिवसात होते.
2. गांडूळखतात वनस्पतीच्या वाढीसाठी लागणारी अन्नद्रव्ये, संप्रेरके, उपयुक्त जीवाणू असून ते वनस्पतीची रोग प्रतिकारक क्षमता वाढवतात.

गांडूळ खत (gandul khat) तयार करण्याच्या पद्धती –

gandul khat (गांडूळ खत) दोन पद्धतीने तयार करता येते एक ढीग आणि दुसरी खड्डा पद्धत. दोन्ही पद्धतीमध्ये कृत्रिम सावलीची गरज आहे. सूर्यप्रकाश व पावसापासून त्यांचे संरक्षण करण्यासाठी छपराची शेड तयार करावी लागते.

गांडूळ खत (vermicompost fertilizer) तयार करण्यास खड्डा पद्धत –

1. आपल्याला खड्डा पद्धतीने गांडूळ खत तयार करण्यासाठी छपराच्या अथवा झाडांच्या दाट सावलीत खड्डे तयार करावेत.
2. त्या खड्ड्याची लांबी तीन मीटर, रुंदी दोन मीटर आणि खोली 60 सेंटिमीटर ठेवा.
3. आपण खड्ड्याच्या तळाशी नारळाचा काथ्या, गवत, भाताचे तूस व गव्हाचा कोंडा तीन ते पाच सेंटीमीटर जाडीचा अर्धवट कुजलेल्या शेणाचा, कंपोस्ट खताचा अथवा बागेतील चाळलेल्या मातीचा थर द्यावा.
4. तसेच दोन्ही थर पाण्याने पूर्ण ओले करून त्यावर साधारणतः 100 किलोग्राम सेंद्रीय पदार्थापासून गांडूळ खत तयार करण्यासाठी सात हजार प्रौढ गांडुळे सोडावी.
5. आणि त्यावर अर्धवट कुजलेल्या सेंद्रिय पदार्थांचा जास्तीत जास्त 50 सेंटीमीटर जाडीचा थर रचावा.
6. त्यावर गोणपाटाच्या आच्छादन देऊन नेहमी ते ओले ठेवावे.
7. आपण त्या खड्ड्यात टाकलेल्या गांडुळाच्या वाढीसाठी खड्ड्यातील सेंद्रिय पदार्थ मध्ये हवा खेळती राहणे आवश्यक आहे.
8. त्यासाठी सेंद्रिय पदार्थांचे थर घट्ट झाल्यास हाताने सैल करावे.
9. त्यामुळे खड्ड्यातील तापमान नियंत्रित राहील. अशाप्रकारे झालेल्या गांडूळ खताचा शंक्वाकृती ढीग करावा.
10. तसेच ढीगातील वरच्या भागातील खत वेगळे करून सावलीत वाळवून चाळुन घ्यावे.
11. चाळल्यानंतर वेगळी झालेली गांडुळे, त्यांची पिल्ले व अंडकोष यांचा पुन्हा गांडूळ खत तयार करण्यासाठी वापर करावा.

कृषि औषधांची सर्व माहिती वाचण्यासाठी येथे क्लिक करा – Krushi Aushadhe

गांडूळ खत ( vermicompost) तयार करण्याची ढीग पद्धत –

1. आपल्याला ढीग पद्धतीने गांडूळ खत तयार करण्यासाठी साधारणतः 2.5 ते 3 मीटर लांबीचे आणि 90 सेंटिमीटर रुंदीचे ढीग तयार करावेत.
2. प्रथम जमीन पाणी टाकून ओली करून घ्यावी.
3. ढीगाच्या तळाशी नारळाचा काथ्या, गवत, भाताचे तूस यासारख्या लवकर न कुजणाऱ्या पदार्थांचा तीन ते पाच सेंटीमीटर जाडीचा थर रचावा त्यावर पुरेसे पाणी शिंपडून ओला करावा.
4. या थरावर तीन ते पाच सेंटीमीटर जाडीचा अर्धवट कुजलेल्या शेणाचा, कंपोस्टचा अथवा बागेतील चाळलेल्या मातीचा थर द्यावा.
5. या थराचा उपयोग गांडुळांना तात्पुरते निवासस्थान म्हणून होतो.
6. या थरावर पूर्ण वाढलेली गांडूळे अलवारपणे सोडावेत.
7. साधारणतः शंभर किलो ग्रॅम सेंद्रिय पदार्थापासून गांडूळ खत तयार करण्यासाठी सात हजार प्रौढ गांडुळे सोडावी.
8. दुसऱ्या थरावर पिकांचे अवशेष जनावरांचे मलमूत्र धान्याचा कोंडा, शेतातील तण, गिरीपुष्प शेवरी या द्विदल हिरवळीच्या झाडांची पाने, मासोळी खत, कोंबड्यांची विष्ठा इत्यादींचा वापर करावा.
9. या सेंद्रिय पदार्थांचे बारीक तुकडे करून आणि अर्धवट कुजलेल्या स्वरूपात वापरले तर अधिकच चांगले असते.
10. त्यातील कर व नत्राचे गुणोत्तर 30 ते 40 च्या दरम्यान असावे. संपूर्ण ढिगाची उंची 60 पेक्षा अधिक होणार नाही याची दक्षता घ्यावी.
11. कुजणाऱ्या सेंद्रिय पदार्थामध्ये चाळीस ते पन्नास टक्के पाणी असावे.
12. त्यासाठी ढिगावर गोणपाटाच्या आच्छादन देऊन झारीने दररोज पाणी फवारावे.
13. ढिगातील सेंद्रिय पदार्थाचे तापमान 25 ते 30 सेल्सियस अंशांच्या दरम्यान राहील याची काळजी घ्यावी.

गांडूळ खत (gandul khat) तयार होण्यास लागणारा कालावधी –

गांडुळाचा वापर करून गांडुळ खत तयार होण्यास साधारणतः 35 ते 50 दिवसाचा कालावधी लागतो.

गांडूळ खताची किंमत (gandul khat price) –

साधारणता गांडूळ खताची दहा किलोची बॅग आपल्याला 150-160 रुपयांपर्यंत मिळते.



Conclusion I सारांश –

शेतकरी मित्रांनो तुम्हाला krushi doctor या वेबसाइट वरील गांडूळ खत निर्मिती हा लेख तुम्हाला कसा वाटला वाटला हे खाली कमेंट बॉक्स मध्ये सांगायला विसरू नका. आणि हा लेख जर तुम्हाला आवडला तर तुमच्या इतर शेतकरी मित्रांसोबत शेयर नक्की करा. आणखी अशा प्रकारची कृषीविषयक माहिती पाहण्यासाठी आमच्या krushi doctor या वेबसाईटला नक्की भेट द्या.

FAQ’s | वारंवार विचारले जाणारे प्रश्न –

1) 1 किलो गांडुळाची किंमत किती आहे ?
उत्तर – तुम्ही किमान 150-200 रुपये प्रति किलोग्रॅम दराने जिवंत गांडुळे खरेदी करू शकता.

2) गांडूळ हा शेतकऱ्याचा मित्र का म्हणतात?
उत्तर – गांडूळ जैविक पदार्थांचे सुपिक मातीत रूपांतर करतो तसेच जमीन भुसभुशीत करतो त्यामुळे मातीत ऑक्सिजन खेळते राहते. म्हणून गांडूळाला ‘शेतकऱ्यांचा मित्र’ असे सुद्धा म्हणतात.

3) गांडूळ बायोमास म्हणजे काय?
उत्तर – गांडूळ बायोमास हे जमिनीची सुपीकता, बुरशी गुणवत्ता, ऱ्हास, प्रदूषण आणि अधिवास उत्पादकता यांचे योग्य जैविक सूचक आहे.

 

लेखक –

सूर्यकांत इर्लेकर
मू. पो – इर्ले, तालुका – बार्शी, जिल्हा – सोलापूर.
राज्य – महाराष्ट्र. पिन – 413412


शेयर करा