शेयर करा

red gram variety

शेतकरी मित्रांनो नमस्कार, कृषि डॉक्टर (krushi doctor) या शेती निगडीत माहिती देणाऱ्या मराठी वेबसाइट वरती तुमचे स्वागत आहे. आज आपण या ठिकाणी तूर लागवडीसाठी, खास करून महाराष्ट्रासाठी टॉप 5 तूर पिकाच्या जातींची (red gram variety) माहिती पाहणार आहोत. या लेखामुळे तुम्हाला यंदा कोणती तूर लावावी, यासाठी मदत मिळेल. सोबतच मी तुम्हाला बोनस टिप्स म्हणून तूर पेरणीसाठी योग्य बीज मात्रा, पेरणी कालावधी आणि पेरणी अंतर देखील सांगणार आहे. त्यामुळे माझी तुम्हाला विनंती आहे की हा लेख पूर्ण वाचा आणि माहिती आवडली तर हा लेख तुमच्या इतर शेतकरी ग्रुप मध्ये शेयर नक्की करा.

red gram variety in maharashtra | बेस्ट तुरीच्या जातींची नावे –

नंबर वाणाचे नाव वैशिष्टे
1 आय.सी.पी.एल – ८७ ➡हा वाण अतिशय हळवा वाण आहे. 

➡हा वाण 130 दिवसाच्या आत काढणीस येतो.

➡या वाणामध्ये अंतरपीक शक्यतो नका घेऊ.

➡याचा बिया गडद लाल आणि मध्यम आकाराच्या असतात. 

➡मर रोगस  प्रतिकारक्षम. 

➡100 दाण्याचे वजन 10 ग्रॅम पर्यन्त मिळते. 

➡ओलीत क्षेत्र असल्यास पहिल्या बहाराच्या शेंगा तोडून दुस-या आणि तीस-या बहाराचे पीक मिळु शकते. 

2 ए.के.टी – ८८११ ➡हा हळवा वाण आहे . 

➡हा वाण 140 दिवसाच्या आत काढणीस येतो.

➡या वाणा मध्ये आंतरपीक घेऊ शकता. 

➡पश्चिम महारष्ट्र मध्ये हा वाण पेरू शकता. 

➡याचा बिया मध्यम आकाराच्या तांबड्या रंगाच्या असतात. 

➡हा वाण मर रोगास मध्यम प्रतीबंधक आहे. 

➡100 दाण्याचे वजन 9 ग्रॅम पर्यन्त मिळते.

3 बी.एस.एम.आर – ८५३ ➡हा वाण निम गरवे वाणामध्ये आहे . 

➡हा वाण 180 – 200 दिवसात तयार होतो. 

➡या वाणा मध्ये आंतरपीक घेऊ शकता.

➡वांझ रोग प्रतीबंधक आहे

➡वाळलेल्या दाण्याचा रंग पांढरा आहे.

4 बी डी एन – 711 ➡हा वाण निम गरावे असून कोरडवाहू शेतकऱ्यांसाठी एक वरदान आहे. 

➡हा वाण 160 – 170 दिवसात तयार होतो.

➡या वाणा मध्ये आंतरपीक घेऊ शकता. 

➡दाण्याचा रंग पांढरा आणि अति टपोरे दाणे. 

➡100 दाण्याचे वजन 10 – 12 ग्रॅम पर्यन्त मिळते.

➡मर अणि वांझ रोगास प्रतीबंधक आहे

5 पी के व्ही तारा ➡हा वाण निम गरावे आहे. 

➡हा वाण 160 – 170 दिवसात तयार होतो.

➡विदर्भामध्ये हा वाण खास आहे. 

➡या वाणा मध्ये आंतरपीक घेऊ शकता. 

➡याचा बिया मध्यम आकाराच्या तांबड्या रंगाच्या असतात. 

➡मर अणि वांझ रोगास प्रतीबंधक आहे.

Tur sowing season | तूर लागवड कालावधी –

जूनच्या दुसऱ्या पंधरवाढ्यात पेरणी करावी पेरणी जस जशी उशिरा होईल तशी उत्पादनात घट मिळेल म्हणून लास्ट ७ जुलैपूर्वी पेरणी पूर्ण करावी.

Tur seed rate per acre | तूर एकरी बियाणे मात्रा –

पेरणी करताना लवकर निघणाऱ्या वाणांसाठी पेरणीसाठी 8 – 9 किलो /एकर बियाणे लागते, मध्यम कालावधी साठी – 5 – 7 किलो/ एकर आणि उशिरासाठी टोकण पद्धतीने 2 – 2.5 किलो/ एकर बियाणे लागते.

Conclusion | सारांश –

मित्रांनो आशा करतो की कृषि डॉक्टर (krushi doctor) वेबसाइट वरील आजच्या लेखामध्ये दिलेली माहिती तुम्हाला समजली आहे आणि त्याचा तुम्हाला यंदाच्या हंगामात फायदा नक्की होईल. तूर पिकाबद्दल अधिक माहिती जाणून घेण्यासाठी आमच्या कृषि डॉक्टर यूट्यूब चॅनल ला नक्की भेट द्या. धन्यवाद …🙏

People also read | हे लेख देखील नक्की वाचा –

1. sugarcane trash: ऊस पाचट व्यवस्थापन
2. onion herbicide: कांदा तन नियंत्रण करणारी बेस्ट तन नाशके
3. nativo fungicide: नेटिवो बुरशीनाशकाची संपूर्ण माहिती
4. 7/12 utara online: 7/12 उतारा ऑनलाइन कसा काढावा?
5. mirchi lagwad: मिरची लागवड संपूर्ण माहिती

FAQs | सतत विचारले जाणारे प्रश्न –

1. तूर लागवड कधी करावी?
उत्तर – तूर पिकाची पेरणी ही खरीप हंगामात पुरेसा पाऊस झाल्यावर करावी. म्हणजेच जुनचा दूसरा आठवडा ते जुलै चा पहिला आठवडा.

2. तूर किती दिवसात येते?
उत्तर – तूर पीक हे 140 ते 160 दिवसांचे पीक आहे.

3. तूर हेक्टरी किती बियाण्याची आवश्यकता लागते?
उत्तर – पेरणी करताना लवकर निघणाऱ्या वाणांसाठी पेरणीसाठी 8 – 9 किलो /एकर बियाणे लागते, मध्यम कालावधी साठी – 5 – 7 किलो/ एकर आणि उशिरासाठी टोकण पद्धतीने 2 – 2.5 किलो/ एकर बियाणे लागते.

4. तूर डाळ कोणत्या राज्यात पिकते?
उत्तर – तुरीचे पीक हे प्रामुख्याने महाराष्ट्र, कर्नाटक, मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि आंध्र प्रदेश या राज्यामध्ये घेतले जाते.

5. तूर डाळ कधी पेरायची?
उत्तर – जुनचा दूसरा आठवडा ते जुलै चा पहिला आठवडा.

Author | लेखक –

सूर्यकांत कांबळे
मू. पो – इर्ले, तालुका – बार्शी, जिल्हा – सोलापूर.
राज्य – महाराष्ट्र. पिन – 413412


शेयर करा