Blog

शेतकरी मित्रांनो नमस्कार, Krushi Doctor (कृषी डॉक्टर) या शेती विषयक माहिती देणाऱ्या वेबसाइट वरती आम्ही आपले सहर्ष स्वागत करत आहे. आजच्या लेखामध्ये आपण विहीर अनुदान योजनेबद्दल संपूर्ण माहिती पाहणार आहोत. विहीर अनुदान योजना (vihir anudan yojana) 2023 नक्की काय आहे, कोणासाठी आहे, या योजनेसाठी काय पात्रता आहे, या योजनेसाठी कोणती कागदपत्रे लागतात, या योजनेसाठी अर्ज कसा करायचा, या योजनेत अनुदान किती आहे याबद्दल सविस्तर माहिती आपण या लेखात पाहणार आहोत.
प्रस्तावना –
1. महाराष्ट्र शासन आपल्या राज्यातील आर्थिक दृष्ट्या गरीब नागरिकांचा तसेच शेतकऱ्यांचा सामाजिक तसेच आर्थिक विकास व्हावा यासाठी वेळोवेळी विविध योजनांची सुरुवात करत असते.
2. आज आपण राज्य शासनाद्वारे राज्यातील शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी सुरु करण्यात आलेल्या अशाच एका योजनेची संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत ज्या योजनेचे नाव विहीर अनुदान योजना (vihir anudan yojana) आहे.
3. या योजनेला मागेल त्याला विहीर योजना या नावाने देखील ओळखण्यात येते.
विहीर अनुदान योजनेचा उद्देश | Vihir anudan yojana objective –
1. राज्यातील आर्थिक दृष्ट्या गरीब शेतकऱ्यांना त्यांच्या शेतात पाण्याची उपलब्धता व्हावी या उद्देशाने विहीर अनुदान योजनेची सुरुवात करण्यात आली आहे.
2. राज्यातील आर्थिक दृष्ट्या गरीब कुटुंबाचा सामाजिक तसेच आर्थिक विकास करणे.
3. शेतकऱ्यांचे जीवनमान सुधारणे.
4. शेतकऱ्यांना आर्थिक पाठबळ देणे.
5. राज्यातील दारिद्र्य संपविणे हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे.
5. राज्यातील शेतकऱ्यांना विहीर खोदण्यासाठी अनुदान उपलब्ध करून त्यांना सशक्त व आत्मनिर्भर बनविणे.
6.राज्यातील शेतकऱ्यांना मागेल त्याला विहीर अनुदान योजनेच्या सहाय्याने विहीर खोदण्यासाठी अनुदान उपलब्ध करून देऊन त्यांना शेती करण्यासाठी प्रोत्साहित करणे तसेच राज्यातील इतर नागरिकांना शेती क्षेत्राकडे आकर्षित करणे.
7. शेतकऱ्यांना शेती सिंचनासाठी पाण्याचा स्रोत उपलब्ध करून देणे.
8. राज्यातील शेतकऱ्यांना त्यांच्या पिकांसाठी पाण्याची चिंता करण्याची आवश्यकता भासू नये तसेच पाण्याच्या चिंतेपासून मुक्तता करणे हे या योजनेचा मुख्य उद्देश आहे.
विहीर अनुदान योजनेचे लाभार्थी | Vihir anudan yojana beneficiary –
1. राज्यातील आर्थिक दृष्ट्या गरीब शेतकरी जे स्वतःच्या शेतात विहीर खोदण्यासाठी असमर्थ आहेत असे शेतकरी मागेल त्याला विहीर अनुदान योजनेचे लाभार्थी आहेत.
2. अनुसूचित जाती प्रवर्गातील व्यक्ती
3. अनुसूचित जमाती प्रवर्गातील व्यक्ती
4. भटक्या व विमुक्त जाती प्रवर्गातील व्यक्ती
5. इतर मागासवर्गीय प्रवर्गातील व्यक्ती
6. इतर मागास वर्गातील शेतकरी
7. महिला कर्ता असलेल्या कुटुंबातील महिला
8. इंदिरा आवास योजनेचे लाभार्थी
9. जॉब कार्ड धारक व्यक्ती
10. जमिनी सुधारक सुधारण्याचे लाभार्थी
11. दारिद्र्य रेषेखालील लाभार्थी
12. अल्पभूधारक शेतकरी ज्यांच्याकडे पाच एकर पर्यंत जमीन आहे असे शेतकरी.
13. शारीरिक दृष्ट्या विकलांग व्यक्ती कर्ता असलेली कुटुंबे.
मागेल त्याला विहीर योजनेअंतर्गत दिले जाणारे अनुदान | Vihir anudan yojana subsidy –
विहीर असून योजनेअंतर्गत लाभार्थी शेतकऱ्यांना त्यांच्या शेतात विहीर खोदण्यासाठी 4 लाख रुपयांचे असून देण्यात येते.
विहीर अनुदान योजनेअंतर्गत लाभार्थी निवड प्रक्रिया | Beneficiary selection process under well subsidy scheme –
1. योजनेअंतर्गत लाभार्थी निवड प्रक्रिया हि ग्रामसेवक यांच्या मार्फत करण्यात येईल.
2. ग्रामसभा / ग्रामपंचायतीच्या मान्यतेनंतर एका महिन्याच्या आत प्रशासकीय मान्यता देण्याची जबाबदारी गट विकास अधिकारी यांची राहील. प्रशासकीय मान्यता मिळाल्यानंतर 15 दिवसाच्या आत 3. तांत्रिक मान्यता देण्याची जबाबदारी तांत्रिक सहाय्यकाची राहील.
विहीर अनुदान योजनेअंतर्गत विहिर कोठे खोदावी याबाबत माहिती –
1. दोन नाल्यांच्या मधिल क्षेत्रात व नाल्यांचे संगमाजवळ जेथे मातीचा किमान 30 से.मी. चा थर व किमान 5 मीटर खोलीपर्यंत मऊ (झिजलेला खडक) आढळतो तेथे.
2. नदी व नाल्या जवळील उथळ गाळाच्या प्रदेशात.
जमिनीच्या सखल भागात जेथे किमान 30 से. मी. पर्यंत मातीचा थर व किमान 5 मीटर खोली पर्यंत मुरुम (झिजलेला खडक) आढळतो.
3. नाल्याच्या तिरावर जेथे उंचवटा आहे तेथे, परंतु सदर उंचावर चोपण किंवा चिकण माती नसावी.
4. घनदाट व गर्द पानांच्या झाडांच्या प्रदेशात .
5. नदी व नाल्याचे जुने प्रवाह पात्र जेथे आता नदी पात्र नसतांना देखील वाळु, रेती व गारगोट्या थर दिसून येते.
6. नदीचे/ नाल्याचे गोलाकार वळणाच्या आतील भूभाग.
7. अचानक दमट वाटणाऱ्या अथवा असणाऱ्या जागेत.
मागेल त्याला विहीर अनुदान योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे | Magel tyala vihir yojana maharashtra documents –
1. आधार कार्ड
2. रेशन कार्ड
3. रहिवासी दाखला
4. मोबाईल नंबर
5. ई-मेल आयडी
6. रोजगार हमी योजनेचे जॉब कार्ड
7. उत्पन्नाचा दाखला
8. बँक खात्याचा तपशील
9. जमिनीचे कागदपत्रे ७/१२ व ८अ
10. पासपोर्ट आकाराचे फोटो
11. सामुदायिक विहीर असल्यास सर्व लाभार्थी मिळून 0.40 हेक्टर पेक्षा अधिक सलग जमीन असल्याचा पंचनामा
12. सामुदायिक विहीर असल्यास समोपचाराने पाणी वापराबाबत सर्व लाभार्थ्यांमध्ये करारपत्र
विहीर अनुदान योजनेअंतर्गत अर्ज करण्याची पद्धत | Vihir anudan yojana 2023 application process –
1. अर्जदार शेतकऱ्याला सर्वात प्रथम आपल्या क्षेत्रातील ग्राम पंचायत कार्यालयात जावे लागेल व ग्राम सेवकाकडून विहीर अनुदान योजनेचा अर्ज घ्यावा लागेल किंवा जिल्हा कार्यालयात कृषी विभागात जाऊन विहीर अनुदान योजनेचा (vihir yojana) अर्ज घ्यावा लागेल व अर्जात विचारलेली सर्व माहिती भरून अर्जासोबत आवश्यक अशी कागदपत्रे जोडून अर्ज जमा करावा लागेल.
2. अर्ज पेटी दर सोमवारी उघडण्यात येऊन त्यातील अर्ज ऑनलाईन भरण्याचे कार्य ग्रामपंचायतीचे असेल. 3.हे कार्य ग्रामपंचायत स्वतःचे डाटा एंट्री ऑपरेटर किंवा ग्राम रोजगार सेवक यांच्या मदतीने करेल.
4. याप्रमाणे मनरेगाच्या सर्व मागण्या ऑनलाईन भरल्या जातील ही जबाबदारी त्या ग्रामपंचायतीसाठी जबाबदार असलेले तांत्रिक सहाय्यकाची राहील.
5. वेळ प्रसंगी तांत्रिक सहाय्यकास सुद्धा ऑनलाईनसाठी डाटा एंट्री करावी लागली तर करतील.
अशा प्रकारे तुमची विहीर अनुदान योजनेअंतर्गत अर्ज प्रक्रिया पूर्ण होईल.
Conclusion I सारांश –
शेतकरी मित्रांनो तुम्हाला krushi doctor या वेबसाइट वरील आमचा विहीर अनुदान योजना (vihir anudan yojana) हा लेख तुम्हाला कसा वाटला वाटला हे खाली कमेंट बॉक्स मध्ये सांगायला विसरू नका. आणि हा लेख जर तुम्हाला आवडला तर तुमच्या इतर शेतकरी मित्रांसोबत शेयर नक्की करा.आणखी अशा प्रकारची कृषीविषयक माहिती पाहण्यासाठी आमच्या worklink.digital/krushidoctor/ या वेबसाईटला नक्की भेट द्या.
FAQ’s | वारंवार विचारले जाणारे प्रश्न –
1. विहीर अनुदान योजना कोणत्या राज्यासाठी लागू आहे?
उत्तर – विहीर अनुदान योजना महाराष्ट्र राज्यासाठी लागू आहे
2. विहीर अनुदान योजनेचे लाभार्थी कोण आहेत?
उत्तर – महाराष्ट्र राज्यातील शेतकरी या योजनेचा लाभ मिळवण्यासाठी पात्र आहेत.
3. विहीर अनुदान योजनेचा लाभ काय आहे?
उत्तर – विहीर अनुदान योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना त्यांच्या शेतात विहीर खोदण्यासाठी 4 लाख रुपयांचे आर्थिक सहाय्य दिले जाते.
4. विहीर अनुदान योजनेचा उद्देश काय आहे?
उत्तर – आर्थिक दृष्ट्या गरीब शेतकऱ्यांना आर्थिक पाठबळ देणे.
लेखक –
कृषी डॉक्टर सूर्यकांत
9168911489