unhali jowar lagwad

शेतकरी मित्रांनो नमस्कार, Krushi Doctor (कृषी डॉक्टर) या शेती विषयक माहिती देणाऱ्या वेबसाइट वरती आम्ही आपले सहर्ष स्वागत करत आहे. आजच्या लेखामध्ये आपण उन्हाळी ज्वारी लागवड (unhali jowar lagwad) करण्याची पद्धत पाहणार आहोत. यामध्ये उन्हाळी ज्वारी लागवडीसाठी जमीन आणि हवामान कशा प्रकारचे लागते, योग्य असणाऱ्या जाती, ज्वारीच्या लागवडीची (jowar cultivation) पद्धत आणि पाणी व्यवस्थापन, ज्वारीवर येणारे कीड आणि रोग व्यवस्थापन याबद्दल सविस्तर माहिती या लेखांमध्ये आपण पाहणार आहोत.

जमीन | Soil –

उन्हाळी ज्वारीच्या लागवडीसाठी शक्यतो मध्यम ते भारी जमिनीची निवड करावी.

उन्हाळी ज्वारी लागवड कधी करावी?

उन्हाळी ज्वारीची पेरणी डिसेंबरमध्ये केली असता अतिथंडीमुळे उगवण होत नाही. तसेच साधारणतः फेब्रुवारी महिन्यानंतर पेरणी केल्यास पीक अधिक तापमानात फुलोऱ्यात येते. त्यात दाणे भरत नाहीत. उत्पादनात मोठी घट होते. त्यामुळे उन्हाळी ज्वारीची पेरणीची योग्य वेळ म्हणजे संक्रांत होय. 15 ते 20 जानेवारीच्या दरम्यान उन्हाळी ज्वारीची पेरणी करावी.



ज्वारी लागवडीसाठी सुधारित वाणांची नावे –

1. उन्हाळी हंगामात आपणास दाण्या बरोबरच भरपूर कडबा उत्पादन गरजेचे असते.
2. त्यामुळे वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठात केलेल्या प्रयोगाच्या निष्कर्षानुसार शिफारशीत रब्बी सुधारीत वाणांचा वापर करावा.
3. या वेळी पेरणीसाठी खरीप वाणांचा वापर केल्यास अपेक्षित उत्पादन मिळत नाही.
4. विशेषतः असे वाण वातावरणानुसार मर रोगाला बळी पडू शकतात.
5. त्यामुळे शिफारशीत रब्बी वाणांचा उन्हाळी हंगामासाठी वापर करावा.
6. उन्हाळी हंगामासाठी मालदांडी-35-1 या लोकप्रिय वाणा बरोबर परभणी मोती, परभणी ज्योती, फुले रेवती, फुले वसुधा, फुले यशोदा, तसेच अकोला क्रांती या वाणांचे बियाणे पेरणीसाठी वापरावे.
7. बियाण्यासाठी पेरणी करणार असल्यास कृषी विद्यापीठाने विकसित केलेले शुद्ध बियाणे वापरावे.
8. तसेच विलगीकरणाचे योग्य अंतर राहिल, याची काळजी घ्यावी.
9. खरीप हंगामासाठी शिफारसीत व काळ्या ज्वारीस प्रतिकारक्षम पी. वी. के. 801 (परभणी श्‍वेता) या वाणाचीही बियाण्यासाठी लागवड करता येते.
10. यामुळे बियाण्यांचा आकार लहान राहत असला, तरी कणसातील एकूण बियांच्या संख्येमध्ये वाढ होते.
11. खरीप हंगामात हे बियाणे हेक्टरी 7.5 किलो इतके पुरेसे होते. अशा बियाण्याची उगवण 90 टक्क्यांच्या वर होते.

शेती निगडीत सर्व माहिती विडियो स्वरूपात पाहण्यासाठी येथे क्लिक करा – कृषि डॉक्टर यूट्यूब चॅनल

बीज प्रक्रिया कशी करावी?

पेरणीपूर्वी बियाण्यास गंधक (300 मेश) 4 ग्रॅम किंवा थायरम 3 ग्रॅम प्रति किलो बियाणे या प्रमाणात प्रक्रिया करावी. तसेच पेरणीपूर्वी बियाण्यास थायोमेथोक्झाम (30% एफ.एस.) 10 मि.लि. किंवा इमिडाक्लोप्रिड (48 % एफ.एस.) 10 मि.लि. अधिक 20 मि.लि. पाणी प्रति 1 किलो बियाणे या प्रमाणे प्रक्रिया करावी. यामुळे खोडमाशीमुळे होणारी पोंगेमर कमी होऊन झाडाचा जोम वाढण्यास मदत होते.

पेरणी अंतर व बियाणे प्रमाण –

उन्हाळी ज्वारी (unhali jowar) ही ओलिताखालीच घेतली जात असल्यामुळे आणि ओलाव्याचा कार्यक्षम वापर होण्यासाठी दोन ओळींतील अंतर 45 सेंटिमीटर (18 इंच) असावे. हेक्टरी 12 किलो बियाणे वापरणे गरजेचे आहे.

आंतरपीक –

ज्वारी पिकात आंतरपिक म्हणून मूग, उडीद, सोयाबीन, मका, गहू इ. पिकांचे उत्पादन घेता येते. यामुळे पिकाचे उत्पादन आणि उत्पन्न वाढते.

रासायनिक खतांचा वापर –

ओलिताखालील उन्हाळी ज्वारी साठी 80:40:40 नत्र स्फुरद पालाश किलो प्रति हेक्टर द्यावे. ही मात्रा मिश्र खतातून देणार असल्यास 10:26:26 मिश्र खत 150 किलो आणि 50 किलो युरिया पेरणीच्या वेळी आणि 50 किलो युरिया पेरणीनंतर 30 ते 40 दिवसांनी पाण्याच्या पाळीसोबत द्यावे.

आंतरमशागत –

15 दिवसांच्या अंतराने 2 ते 3 कोळपण्या आणि एखादी निंदणी आवश्‍यक करावी.

पाण्याचे व्यवस्थापन –

उन्हाळी ज्वारीस साधारणपणे 5 ते 7 पाण्याच्या पाळ्या देण्याची गरज असते. पीक पाणीपाळीला उत्तम प्रतिसाद देते. खालील मुख्य वाढीच्या अवस्थेत पाण्याचे नियोजन करावे.

1. जोमदार वाढीचा काळ – (पेरणीनंतर 25 ते 35 दिवस)
2. पोटरीत येण्याचा काळ (पेरणीनंतर 55 ते 60 दिवस)
3. फुलोरा येण्याचा काळ – (पेरणीनंतर 70 ते 75 दिवस)
4. कणसात दाणे भरण्याचा काळ – (पेरणीनंतर 85 ते 90 दिवस)

रोग –

रोगाचे नाव लक्षणे उपाय
पोंगे मर (Pongamia disease) हा रोग बुरशीमुळे होतो. या रोगामुळे पिकाच्या पानावर, देठावर आणि दाण्यांवर पोंग्यासारखे वाढीचे ठिपके दिसतात. यामुळे पिकाची वाढ खुंटते आणि उत्पादनात घट होते. क्विनॉलफॉस (25 % ई.सी.) 15 मि.लि. प्रति 10 लिटर पाणी या प्रमाणात 1 किंवा 2 फवारण्या कराव्यात.
करपा (Leaf spot) हा रोग बुरशीमुळे होतो. या रोगामुळे पिकाच्या पानावर काळे, गोल किंवा अंडाकृती ठिपके दिसतात. यामुळे पिकाची पाने गळतात आणि उत्पादनात घट होते. इंडोफिल कंपनीचे इंडोफिल झेड 78 (झायनेब 75% डब्ल्यू. पी.) 200 ग्रॅम प्रति 100 लिटर पाणी या प्रमाणात फवारणी करावी.
दाणे कुजणे (Seedling rot) हा रोग बुरशीमुळे होतो. या रोगामुळे पिकाची रोपे उगवण्यापूर्वी कुजतात. यामुळे उत्पादनात घट होते. या साठी बीज प्रक्रिया करावी.

कीड –

किडीचे नाव लक्षणे उपाय
खोडमाशी (Stalk borer) या किडी पिकाच्या खोडात छिद्र पाडतात आणि आतून खातात. यामुळे पिकाची वाढ खुंटते आणि उत्पादनात घट होते. बायर कंपनीचे ॲडमायर (इमिडाक्लोप्रिड 70% डब्लू. एस.) 0.3 ग्रॅम प्रति लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
मावा (Aphids) या किडी पिकाच्या पानावर, देठावर आणि दाण्यांवर आक्रमण करतात. यामुळे पिकाची वाढ खुंटते आणि उत्पादनात घट होते. धानुका कंपनीचे अरेवा – 0.5 ग्राम / लीटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
तुडतुडे (Leafhopper) या किडी पिकाच्या पानावर आक्रमण करतात. यामुळे पिकाची पाने पिवळी पडतात आणि उत्पादनात घट होते. बायर कंपनीचे कॉन्फिडोर (इमिडाक्लोप्रिड 17.1%) 50 ते 100 मिली प्रती एकर प्रमाणात घेऊन फवारणी करावी.
कोळी (Spider mites) या किडी पिकाच्या पानावर आक्रमण करतात. त्यामुळे पिकाच्या पानावर पिवळे ठिपके दिसतात आणि उत्पादनात घट होते. सिंजेंटा कंपनीचे एकालक्स (क्विनॉलफॉस 25% ई.सी.) 2 मिली प्रती लिटर पाणी वापरून फवारणी करावी.

काढणी –

ज्वारीचे पीक 80 ते 100 दिवसात तयार होते. पिकाची काढणी पिकातील 80% दाणे पिवळे झाल्यावर करावी. काढणीसाठी कापणी यंत्राचा वापर करावा.

उत्पादन –

उत्पादनक्षम वाण आणि योग्य तंत्रज्ञानाचा वापर केल्यास उन्हाळी ज्वारीचे हेक्टरी उत्पादन 40 ते 50 क्विंटल मिळू शकते.



Conclusion I सारांश –

शेतकरी मित्रांनो तुम्हाला krushi doctor या वेबसाइट वरील आमचा unhali jowar lagwad: उन्हाळी ज्वारी लागवड संपूर्ण माहिती हा लेख तुम्हाला कसा वाटला वाटला हे खाली कमेंट बॉक्स मध्ये सांगायला विसरू नका. आणि हा लेख जर तुम्हाला आवडला तर तुमच्या इतर शेतकरी मित्रांसोबत शेयर नक्की करा. आणखी अशा प्रकारची कृषीविषयक माहिती पाहण्यासाठी आमच्या krushi doctor.com या वेबसाईटला नक्की भेट द्या.

FAQ’s | वारंवार विचारले जाणारे प्रश्न –

1. ज्वारीचे सर्वाधिक उत्पादन कोणत्या राज्यात घेतले जाते?
उत्तर – भारतात ज्वारीचे सर्वाधिक उत्पादक महाराष्ट्र हे आहे जे एकूण उत्पादनाच्या जवळपास 54 टक्के आहे.

2. ज्वारी किती महिन्याचे पीक आहे?
उत्तर – ज्वारीचे पीक तयार व्हायला पाच महिने लागतात.

3. ज्वारीच्या वाढीच्या अवस्था काय आहेत?
उत्तर – धान्य ज्वारी उदयानंतर विकासाच्या तीन वेगळ्या टप्प्यांतून जाते – रोपांचा विकास, पॅनिकल आरंभ आणि पुनरुत्पादन.

लेखक –

सूर्यकांत कांबळे
मू. पो – इर्ले, तालुका – बार्शी, जिल्हा – सोलापूर.
राज्य – महाराष्ट्र. पिन – 413412

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *