शेयर करा

red gram pod borer

शेतकरी मित्रांनो नमस्कार, Krushi Doctor (कृषी डॉक्टर) या शेती विषयक माहिती देणाऱ्या वेबसाइट वरती आम्ही आपले सहर्ष स्वागत करत आहे. आजच्या लेखामध्ये आपण तूर पिकातील शेंगा पोखरणाऱ्या आळी विषयी सविस्तरपणे माहिती पाहणार आहोत. यामध्ये ही शेंगा पोखरणारी आळी (red gram pod borer) नेमकी काय आहे, तिचा प्रादुर्भाव कशामुळे होतो, तिचा प्रसार कसा होतो, तिची लक्षणे काय आहे आणि या अळीच्या नियंत्रणासाठी काय उपाय योजना आहेत याबद्दल आपण माहिती या लेखामध्ये पाहणार आहोत.

प्रस्तावना –

महाराष्ट्रात तूर हे प्रमुख डाळवर्गीय पिक आहे. राज्यात 10 ते 11 लाख हेक्टरवर या पिकाची लागवड केली जाते.
उत्पन्नात घट आणणाऱ्या अनेक कारणांपैकी तुरीवर होणारा किडींचा प्रादुर्भाव हे मुख्य कारण आहे. या डाळ वर्गीय पिकांवर पेरणीपासून पिक निघेपर्यंत जवळजवळ 200 प्रकारच्या किडींचा प्रादुर्भाव दिसून येतो. तसेच साठवणूकीमध्येही अनेक किडी तुरीवर स्वत:चे पोषण करतात. परंतु फुले व शेंगावर होणाऱ्या किडींचे आक्रमण अतिशय नुकसानकारक ठरले आहे. मागील काही दिवसांपासून ढगाळ वातावरण आहे. हे वातावरण तुरीवरील शेंगा पोखरणाऱ्या अळीला (red gram pod borer) पोषक आहे. या वातावरणात या किडीचे पतंग मोठ्या प्रमाणात आढळून येत आहेत. या किडीचा प्रादुर्भाव कळ्या व फुले लागल्यापासून शेंगा पर्यंतच्या काळात आढळून येतो. त्यामुळे पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होते.



शेंगा पोखरणाऱ्या अळीची ओळख आणि जीवनक्रम | Red gram pod borer symptoms & lifecycle –

1. या किडीचा पतंग शरीराने दणकट व पिवळसर रंगाचा असतो.
2. पंखा ची लांबी सुमारे 37 मीमी असते. पुढील तपकिरी पंख जोडीवर काळे असतात.
3. पुर्ण वाढ झालेली अळी 37 ते 50 मी मी लांब असुन पोपटी रंगाची असली तर विविध रंगछटा असलेल्या अळ्याही दृष्टीस पडतात.
4. होळीच्या शरीराच्या बाजुवर तुटक तुटक करड्या रंगाच्या उभ्या रेषा आढळतात.
5. अंडी पिवळसर पांढ-या रंगाची व गोलाकार असतात. या थंडीचा खालील भाग सपाट असून पृष्ठभाग घुमटाकार असतो.
6. त्यांच्या पृष्टभागावर उभ्या कडा असतात. कोश गडद तपकिरी रंगाचा असतो.
7. मादी नरापेक्षा मोठी असुन तिच्या शरीराच्या मागील भागावर केसांचा झुपका असतो.
8. या किडीची मादी सरासरी 200 ते 500 अंडी तुरीच्या कोवळी पाने,देठ, कळ्या आणि फुले तसेच शेंगांवर वेगवेगळ्या ठिकाणी घालते.
9. अवस्था तीन ते चार दिवसांचे असते. अंडीतून बाहेर पडलेल्या अळ्या सुरुवातीला सुस्त असून प्रथम कोवळी पाने व देठे कुरतडून खातात.
10. नंतर शेंगांना अनियमित आकाराची छिद्रे पाडून आत शिरतात व दाणे खातात.
11. डिसेंबर ते जानेवारी महिन्यात ढगाळ वातावरण असल्यास या किडीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढतो.
12. ही अळी सहा अवस्थांमधून जाऊन 18 ते 25 दिवसांच्या असते.
13. या किडीचा जीवनक्रम चार ते पाच आठवड्यात पूर्ण होतो.

शेंगा पोखरणाऱ्या अळी मुळे होणारे नुकसान | Crop damage by red gram pod borer –

तूर पिकावर शेंगा पोखरणाऱ्या किडींच्या (red gram pod borer) मध्ये हिरवी आळी अर्थात घाटे आळी हे भयंकर नुकसान कारक कीड आहे. या किडीस हिरवी अमेरीकन बोंडअळी, घाटेअळी इत्यादी नावाने संबोधण्यात येते. ही कीड बहुपक्षीय सोयाबीन कीड असून हरभरा, वाटाणा, सोयाबीन इत्यादी कडधान्यावर फार मोठ्या प्रमाणावर आढळून येते. याशिवाय कपाशी, ज्वारी, टोमॅटो, तंबाखू, सूर्यफूल इत्यादी पिकांवरही आढळून येते.

या किडीची आर्थिक नुकसानीची पातळी –

आठ ते दहा पतंग प्रति सापळा दोन-तीन दिवसात किंवा एका वेळी प्रति एक दोन झाड किंवा पाच दहा टक्के नुकसान झालेल्या शेंगा.

तुरीवरील शेंगा पोखरणाऱ्या अळीचे व्यवस्थापन | Red gram pod borer control –

1. तुरीमध्ये एकरी 4 कामगंध सापळे (फेरोमोन ट्रॅप) घाटे अळीच्या पतंगा साठी पिकांच्यावर एक फूट उंचीवर लावावेत.
2. तुरीवरील मोठ्या अळ्या वरचेवर वेचून त्यांचा नायनाट करावा.
3. पिक कळी अवस्थेत असतांना निंबोळी अर्क 5 टक्केची फवारणी करावी.
4. अळ्या लहान अवस्थेत असताना एच.ए.एन.पी.व्ही. विषाणूची 250 एल.ई. प्रति हेक्टर प्रमाणे फवारणी करावी.

रासायनिक फवारणी | Red gram pod borer chemical control –

1. जर किडींचा प्रादुर्भाव आर्थिक नुकसानीच्या पातळीच्यावर आढळून आल्यास , एकालक्स, सिजेंटा, क्विनालफॉस 25 ई सी. 28 मिली. किंवा मेटाडोर, सिंजेंटा, लॅमडा सायहॅलोथ्रीन 5 ईसी 10 मिली प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
2. अळींचा प्रादुर्भाव जास्त असल्यास प्रोक्लेम, सिजेंटा, इमामेक्टीन बेंझोएट 5 एस जी 4.5 ग्रॅम किंवा फेगो, युपीएल, इंडोक्झाकार्ब 14.5 एस सी. 8 मिली किंवा वन-अप, धानुका, स्पिनोसॅड 45 एस सी 3 मिली किंवा फेम, बायर, फ्ल्युबेन्डामाईड 39.35 एस. सी. 2 मि.ली. प्रती 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.



टीप –

1. पावर स्प्रे साठी (पेट्रोल पंप) किटकनाशकाचे प्रमाण तीनपट वापरावे.
2. किटकनाशकाचा वापर आलटून पालटून गरज पडल्यास 10 दिवसाच्या अंतराने करावा.
3. शेतात किटकनाशकांचा वापर करतांना हतमोजे व तोंडावर मास्कचा वापर करावा व सुरक्षितेची योग्य ती काळजी घ्यावी.
4. फवारणी करताना एकाच किटकनाशकाची फवारणी लागोपाठ करु नये.
5. किटकनाशकाचा वापर आलटून- पालटून करावा, फवारणी करीता पाणी स्वच्छ वापरावे, प्रथम द्रावण भांड्यात तयार करुन मग फवारणी करीता वापरावे.
6. चांगल्या परिणामाकरिता द्रावणात स्टिकर चा वापर करावा.

Conclusion I सारांश –

शेतकरी मित्रांनो तुम्हाला krushi doctor या वेबसाइट वरील आमचा Red gram pod borer: तूर पिकातील शेंगा पोखरणाऱ्या आळीचे नियंत्रण हा लेख तुम्हाला कसा वाटला वाटला हे खाली कमेंट बॉक्स मध्ये सांगायला विसरू नका. आणि हा लेख जर तुम्हाला आवडला तर तुमच्या इतर शेतकरी मित्रांसोबत शेयर नक्की करा. आणखी अशा प्रकारची कृषीविषयक माहिती पाहण्यासाठी आमच्या krushi doctor या वेबसाईटला नक्की भेट द्या.

FAQ’s | वारंवार विचारले जाणारे प्रश्न –

1. तूर लागवड कधी करावी?
उत्तर – तुरीची पेरणी (Tur Sowing) वेळेवर म्हणजे 30 जूनपर्यंत होणे आवश्यक असते. पेरणी जसजशी उशिरा होईल त्याप्रमाणे उत्पादनात घट येते. यासाठी जास्तीत जास्त 7 जुलैपूर्वी पेरणी करावी, असा तज्ज्ञांचा सल्ला आहे. तूर लागवडीसाठी मध्यम ते भारी, पाण्याचा उत्तम निचरा होणारी जमीन असावी.

2. तूरीला कोणती बीजप्रक्रिया करावी?
उत्तर – पेरणीपूर्वी प्रति किलो बियाणास 2 ग्रॅम थायरम + 2 ग्रॅम कार्बेन्डाझिम किंवा 5 ग्रॅम ट्रायकोडर्मा व 25 ग्रॅम रायझोबियम गुळाच्या थंड द्रावणात मिसळून लावावे.

3. तुरीमध्ये कोणती आंतरपिके घेतली जातात?
उत्तर – तूर हे पीक सूर्यफूल, मूग,उडीद, सोयाबीन, भुईमुग, ज्वारी, बाजरी कपाशी या सरळ पिकामध्ये आंतरपिक म्हणून घेतले जाते

लेखक –

K Suryakant


शेयर करा
शॉपिंग कार्ट