शेयर करा

polysulphate

शेतकरी मित्रांनो नमस्कार, Krushi Doctor (कृषी डॉक्टर) या शेती विषयक माहिती देणाऱ्या वेबसाइट वरती आम्ही आपले सहर्ष स्वागत करत आहे. आजच्या लेखामध्ये आपण ICL या कंपनीच्या मार्केट मधील पॉलीसल्फेट (polysulphate) या खता बद्दल संपूर्ण माहिती पाहणार आहोत.

प्रस्तावना –

1. पॉलीसल्फेट (polysulphate) हे आयसीएल (इस्रायल केमिकल लिमिटेड) कंपनीचे नवीन आधुनिक आणि नाविन्यपूर्ण बहु-पोषक खत आहे.
2. पॉलीसल्फेट खत (polysulphate fertilizer) शेतकऱ्यांना कोणत्याही प्रकारच्या मातीत वापरण्यासाठी लहान दाणे किंवा पावडरच्या स्वरूपात थेट उपलब्ध केले जाते.
3. शेतकऱ्यांसाठी हे कमी उत्पादन खर्चात अधिक सुविधाजनक आणि प्रभावी खत आहे.
4. जे एकासह एकाच खतातून पिकांना चार वेगवेगळ्या आवश्यक पोषक घटक पुरवते.
5. पॉलीसल्फेट (polysulphate) सर्व प्रकारच्या मातीत आणि पिकांसाठी एक उपयोगी नैसर्गिक खत आहे.
6. भारतातील अनेक लोक पॉली सल्फेट या खताचा वापर करत आहेत आणि आपले उत्पन्न वाढवत आहेत.



पॉलीसल्फेट (polysulphate) मध्ये असणारे घटक –

1. पोटॅशियम ऑक्साईड 13.5%,
2. सल्फर 18.5%,
3. मॅग्नेशियम ऑक्साईड 5.5%,
4. कॅल्शियम ऑक्साईड 16.5%

ICL (इस्रायल केमिकल लिमिटेड) या कंपनी बद्दल माहिती –

1.इस्रायल केमिकल्स लिमिटेड (ICL) पोटॅश, ब्रोमाइन आणि इतर खनिज आणि रासायनिक संयुगे बनवणाऱ्या जगातील आघाडीच्या उत्पादनांपैकी एक आहे.
2.एकूण जागतिक पोटॅश उत्पादनात कंपनीचा वाटा अंदाजे 11 टक्के आणि जागतिक ब्रोमिन उत्पादनात 35 टक्के आहे.
3. हे पश्चिमेकडील बाजारपेठेद्वारे वापरल्या जाणार्‍या प्राथमिक मॅग्नेशियमच्या 9 टक्क्यांहून अधिक उत्पादन देखील करते.
4. कंपनीचे 60 टक्क्यांहून अधिक उत्पादन मृत समुद्र (पोटॅश, ब्रोमिन, मीठ, मॅग्नेशियम आणि मॅग्नेशियम क्लोराईड) आणि नेगेव वाळवंट (फॉस्फेट व चुनखडी) मधील सवलती मध्ये येते.

ही देखील माहिती नक्की वाचा – जाणून घ्या गांडूळ खत निर्मितीची संपूर्ण माहिती

पॉलीसल्फेट (polysulphate) चे फायदे | Polysulphate fertilizer uses –

1. गंधक, मॅग्नेशियम, पोटॅशियम आणि कॅल्शियम हे चार अन्नद्रव्य पुरवणारे एकमेव नैसर्गिक खत आहे.
2. सर्व पिकांसाठी आणि सर्व प्रकारच्या जमिनीसाठी उपयुक्त असे खत आहे.
3. पॉलीसल्फेट (polysulphate) हे क्लोराइड संवेदनशील पिकासाठी अत्यंत उपयुक्त खत आहे.
4. पॉलीसल्फेट या खतामुळे कांद्याची गुणवत्ता, साठवण क्षमता आणि उत्पादन क्षमता यामध्ये प्रामुख्याने वाढ होते.
5. पॉलीसल्फेट हे पिकांच्या वाढीसाठी आवश्यक असणारे सर्व पोषक तत्वे असणारे नावीन्यपूर्ण खत आहे.
6. पॉलीसल्फेट मध्ये गंधक असल्यामुळे पिकाच्या उत्पन्नात 40% वाढ होते.

आयसीएल पॉलीसल्फेट (polysulphate) खताची किंमत | Polysulphate fertilizer price –

मार्केटमध्ये या खताची किंमत 1250 रूपये प्रति 25 किलो बॅग आहे.

आयसीएल पॉलीसल्फेट (icl polysulphate) खत कुठे मिळेल ?

आयसीएल पॉलीसल्फेट खत पाहिजे असल्यास जवळच्या कृषी सेवा केंद्र मध्ये संपर्क साधावा किंवा 9168911489 या क्रमांकावर संपर्क करावा.



Conclusion I सारांश –

शेतकरी मित्रांनो तुम्हाला krushi doctor या वेबसाइट वरील आमचा आयसीएल पॉलीसल्फेट (polysulphate) या खताबद्दल लेख तुम्हाला कसा वाटला वाटला हे खाली कमेंट बॉक्स मध्ये सांगायला विसरू नका. आणि हा लेख जर तुम्हाला आवडला तर तुमच्या इतर शेतकरी मित्रांसोबत शेयर नक्की करा. आणखी अशा प्रकारच्या इतर खतांबद्दल माहिती पाहण्यासाठी आमच्या krushi doctor या वेबसाईटला नक्की भेट द्या.

 

लेखक –
कृषि डॉक्टर सूर्यकांत
9168911489


शेयर करा
शॉपिंग कार्ट