शेयर करा

pm kisan yojana

शेतकरी मित्रांनो नमस्कार, मी सूर्यकांत. स्वागत करतो Krushi Doctor या शेती निगडीत संपूर्ण माहिती देणाऱ्या वेबसाइट वरती. आज आपण जाणून घेणार आहोत, पी एम किसान योजनेबद्दल (pm kisan yojana) संपूर्ण माहिती. यामध्ये मी तुम्हाला सांगणार आहे, ही योजना नेमकी काय आहे, या योजनेसाठी अर्ज कसा करावा, याच्यामध्ये कोणाला आणि किती लाभ मिळणार आहे, या योजनेच्या अटी आणि शर्ती काय आहेत, या साठी कोणती कागदपत्रे आपल्याकडे असणे आवश्यक आहे आणि या योजनेसाठी आपण कोठे आणि कसा अर्ज करू शकतो. त्यामुळे तुम्ही जर एक अभ्यासू शेतकरी असाल तर हा लेख तुमच्यासाठी खूप महत्वाचा आहे. माझी तुम्हाला एक विनंती आहे की हा लेख पूर्ण वाचा आणि माहिती आवडली तर ही माहिती तुमच्या इतर शेतकरी ग्रुप मध्ये शेयर नक्की करा. चला तर मग सुरू करुयात…

पी एम किसान योजना नेमकी काय आहे?

आपल्या देशातील सर्व जमीन धारक किंवा शेतकऱ्यांना केंद्र सरकारने शेतकऱ्याच्या कुटुंबाला उत्पानचा आधार म्हणून ,शेती संबंधित, घरगुती गरजा पूर्ण करण्यासाठी केंद्र सरकारने पी एम किसान हि योजना आमलात आणली.

पी एम किसान योजना कोणासाठी आहे?

पी एम किसान योजनेचा लाभ अल्पभूधारक शेतकरी घेऊ शकतात. आधी असा नियम होता पण आता या मध्ये त्याचं क्षेत्र दोन हेक्टर आणि त्यापेक्षा जास्त असेल ते शेतकरी पी किसन योजनेसाठी पात्र आहेत.

पी एम किसान योजनेमधून कोणते लाभ मिळतात?

या योजनेत भारत सरकार प्रत्यके शेतकरी कुटुंबासाठी वर्षाला 6000 हजार रुपये आर्थिक मदत देते हि मदत शेतकरी कुटुंबाला वर्षेतून तीन वेळेस म्हणजेच चार महिन्याचा अंतराने देण्यात येते.

पी एम किसान योजनेसाठी लाभार्ती पात्रता काय आहे?

तो व्यक्ती व्यक्तिगत शेतकरी असावा त्याचा नावावर शेती असावी म्हणजे सातबारा, 8 अ उत्तर त्याचा नावाचा असावा.



पी एम किसान योजनेसाठी नवीन नोंदणी कशी करावी? । pm kisan yojana registration?

1. शेतकरी आपली कागद पत्रे गावातील तलाठी यांच्या कडे जमा करू शकतात ( आधार कार्ड आणि बॅंक पासबुक)
2. कॉमन सर्व्हिस सेंटर (csc) शेतकरी जाऊन नोंदणी करू शकतात.
3. आपण स्वतः पी एम किसान पोर्टल वर जाऊन फॉर्म भरू शकतो.

पी एम किसान योजनेची के वायसी प्रक्रिया कशी करावी? pm kisan yojana kyc

शेतकरी या यॊजनॆ मध्ये के-वयासी (e- kyc)केली नसेल तर त्याना आर्थिक मदत मिळत नाही त्या के वायसी करणे खूप गरजेचे आहे.
1. प्रथम पी एम किसान या वेबसाईड https://pmkisan.gov.in/ वर जावे, जशी तुम्ही वेबसाईड ओपन कराल तुम्हाला होम पेज दिसेल.
2. होम पेज वरती उजव्या (Right) साईडला (E-KYC ) इ- केवायसी असं बटण दिसेल त्यावर क्लीक करा.
3. तुम्ही बटण वर केलं तसे तुमचा समोर एक ओटीपी बेस बॉक्स उघडेल. या मध्ये आपला आधार कार्ड नंबर टाका.
4. नंतर आपला मोबाइल नंबर टाका तो टाकल्यावर मोबाइल मध्ये एक ओटीपी येईल तो ओटीपी बेस बॉक्स मध्ये टाकावं आणि खाली सबमिट बटण वर क्लीक करावे.
5. अशा प्रकारे आपण के वायसी पूर्ण करू शकता.

( शेती निगडीत नव-नवीन विडियो पाहण्यासाठी येथे क्लिक करा – कृषि डॉक्टर यूट्यूब चॅनल)

पी एम किसान योजनेची लिस्ट कशी पहावी? pm kisan yojana list

1. प्रथम पी एम किसान या वेबसाईड https://pmkisan.gov.in/ वर जावे, जशी तुम्ही वेबसाईड ओपन कराल तुम्हाला होम पेज दिसेल.
2. फार्मर कॉर्नर मध्ये लाभार्थी यादी मध्ये क्लिक करा.
3. नंतर आपल्याला तिथे तुमचं राज्य ,जिल्हा, तालुका, ब्लॉक,गाव हे सर्व भरून त्यानंतर गेट रिपोर्ट वरती क्लिक करा.
4. या पद्दतीने आपण आपल नाव योजने मध्ये आहे कि नाही चेक करू शकता.

पी एम किसान योजनेचे स्टेटस कसे चेक करावे? pm kisan yojana status

1. प्रथम पी एम किसान या वेबसाईड https://pmkisan.gov.in/ वर जावे, जशी तुम्ही वेबसाईड ओपन कराल तुम्हाला होम पेज दिसेल
2. नंतर फार्मर कॉर्नर मध्ये नो युवर स्टेटस या वरती क्लिक करा.
3. नो युवर स्टेटस वर क्लिक केल्यानंतर तुमचा रजिस्टर नंबर अणि कॅप्चा टाकून गेट ओटीपी वर क्लिक करा.
4. तुमचा आलेला ओटीपी सबमिट केल्यानंतर तुमच स्टेटस किंवा स्थिती कळेल.

सारांश । conclusion –

शेतकरी मित्रांनो तुम्हाला krushi doctor या वेबसाइट वरील pm kisan yojana: पी एम किसान योजना 2023-24 ची संपूर्ण माहिती हा लेख तुम्हाला कसा वाटला वाटला हे खाली कमेंट बॉक्स मध्ये सांगायला विसरू नका. आणि हा लेख जर तुम्हाला आवडला तर तुमच्या इतर शेतकरी मित्रांसोबत शेयर नक्की करा. आणखी अशा प्रकारची कृषीविषयक नव-नवीन माहिती पाहण्यासाठी आमच्या krushidoctor.com या वेबसाईटला नक्की भेट द्या.



वारंवार विचारले जाणारे प्रश्न । FAQ –

1. पी एम किसान योजनेची पात्रता काय आहे?
Ans – शेतकऱ्याच्या नावाचा सातबारा आणि ८अ निघाला पाहिजे म्हणजे शेती नावावर असली पाहिजे.

2. पी एम किसान चा पुढील हप्ता कधी मिळतील?
Ans – पुढील हप्ता फेब्रुवारी किंवा मार्च दरम्यान मिळेल.

3. पी एम किसान चे अकाऊंट रीजेक्ट का होते?
Ans – तुमचं कुटूंबामध्ये दोन लोक यॊजनॆच लाभ घेण्याचं प्रयत्न करत असतील तर अकाउंट रिजेक्ट होते.

4. पी एम किसान योजनेसाठी कोणती कागदपत्रे लागतात?
Ans – आधार कार्ड , बँक पासबुक, गट क्रमांक.

5. पी एम किसान चा हेल्पलाइन नंबर काय आहे?
Ans – PM-Kisan Helpline No. 155261 / 011-24300606

6. पी एम किसान ची नोंदणी कशी करावी?
Ans – पी किसान पोर्टल वर जाऊन नोंदणी करू शकता , तलाठ्या जवळ किंवा कॉमन सर्व्हिस सेंटर.

7. पी एम किसान चे पैसे येत नाहीत, काय करावे?
Ans – तुम्ही हेल्प लाईन नंबर वर कॉल करून विचारू शकता.

8. पी एम किसान साठी किती जमीन असावी लागते?
Ans – अमर्यादित जमीन चालते.

9. पत्नी आणि पती असे दोन्हीजन पी एम किसान योजनेचा लाभ घेऊ शकतात का?
Ans – कुटूंबातील एकच व्यक्तीला लाभ मिळतो.

10. पी एम किसान योजनेसाठी कोण पात्र होऊ शकत नाही?
Ans – सरकारी कामगार , डॉक्टर ,वकील , तसेच १०००० रुपाने पेक्षा जास्त पेन्शन असेल तर त्यांना नाही घेता येत.

11. मला पी एम किसान चे पैसे का मिळत नाहीत?
Ans – तुमचा नावावर जमीन नसल्यास नाही मिळत.

12. पी एम किसान चा हप्ता का मिळत नाही?
Ans – तुमचा e-kyc नसेल ,जमीन पडताळणी नसेल तर हप्ता नाही मिळत.

13. पी एम किसान ची तक्रार कोठे आणि कशी करावी?
Ans – फार्मर कॉर्नर मध्ये हेल्पडेस्क मध्ये माहिती भरावी किंवा हेल्प लाईन नंबर वर कॉल करू शकता.

 

लेखक –

सूर्यकांत इर्लेकर
मू. पो – इर्ले, तालुका – बार्शी, जिल्हा – सोलापूर.
राज्य – महाराष्ट्र. पिन – 413412


शेयर करा