शेतकरी मित्रांनो नमस्कार, Krushi Doctor (कृषी डॉक्टर) या शेती विषयक माहिती देणाऱ्या वेबसाइट वरती आम्ही आपले सहर्ष स्वागत आहे. आजच्या लेखामध्ये आपण आंबा मोहोर व्यवस्थापन (mango flower management) बद्दल सविस्तरपणे माहिती पाहणार आहोत. त्यामुळे तुम्ही जर आंबा उत्पादक शेतकरी असाल तर खास करून हा लेख तुमच्यासाठी खूप महत्वाचा आहे. माझी तुम्हाला विनंती आहे की हा लेख पूर्ण वाचा आणि माहिती आवडली तर तुमच्या इतर शेतकरी ग्रुप मध्ये शेयर नक्की करा. चला तर सुरू करुयात…
आंबा आपल्या सर्वांचे एक आवडीचे फळ. आंतराष्ट्रीय स्तरावर पहिले तर भारत आणि पाकिस्तानचे राष्ट्रीय फळ, बांग्लादेशाचे राष्ट्रीय झाड व फिलिपाईन्सचे राष्ट्रचिन्ह म्हणून प्रसिद्ध आहे.जगातील एकूण उत्पादनापैकी 56% आंबा हा एकट्या भारतामध्ये पिकतो. भारतामध्ये एकूण आंब्याच्या 1300 जाती आहे. आणि महाराष्ट्रात पाहिल तर केसर आणि हापूस या दोन जाती अतिशय फेमस आहेत.
आंब्याला मोहोर नेमका कधी येतो? mango flower time in India –
खास करून महाराष्ट्रामध्ये आंब्याला डिसेंबर ते जानेवारी दरम्यान मोहोर (mango blossom) येण्यास सुरुवात होते. परंतु शेतकऱ्यांनी जर वाढ नियंत्रक ( पॅक्लोब्युट्राझोल 23% Sc) म्हणजेच कल्टार वापरले असेल तर हाच मोहोर आपल्याला नोवेंबर मध्ये देखील आलेला दिसून येतो.
आंब्याच्या मोहोर वरती कोणते रोग येतात? mango flower diseases –
आपण जर महाराष्ट्राचा विचार केला तर आंब्याचे आपल्याला दोन प्रदेश दिसून येतात. आणि ते म्हणजे कोकण आणि उर्वरित महाराष्ट्र. कोकणात आपल्याला करपा रोग आणि तुडतुडे किडीचा प्रादुर्भाव जास्त दिसून येतो. तर उर्वरित महाराष्ट्रात आपल्याला भुरी रोगाचा प्रादुर्भाव जास्त दिसून येतो.
आंब्यातील मोहोर वर येणारे प्रमुख कीड व रोग –
1. भुरी रोग –
हा रोग ऑडिअम मॅंगिफेरी (oidium mangiferae) या बुरशीमुळे आंबा पिकातील मोहोर वर दिसून येतो. हा रोग आल्यानंतर आपल्याला आंब्याच्या झाडावर मोहोर व कच्च्या (छोट्या) फळांची गळ झालेली दिसून येते. मोहोर वरती पांढऱ्या बुरशीचा थर साचलेला दिसून येतो. या रोगासाठी 80 ते 85 % आद्रता, 15 ते 30 अंश तापमान आणि सतत वाहणारे वारे या गोष्टी कारणीभूत असतात.
2. करपा रोग –
हा रोग कोलेटोट्राइकम ग्लियोस्पोरियोइड्स (Colletotrichum gliosporioides) या बुरशीमुळे होतो. यामुळे आंबा पिकाची पाने, फांद्या, मोहोर व छोटी फळे वाळून जतात व नंतर ती गळून (mango flower drop) पडतात. या रोगाच्या प्रादुर्भाव हा 95 % पेक्षा जास्त आद्रता व 25 अंश तापमान असलेल्या भागात जास्त दिसून येतो.
3. तुडतुडे –
ही एक रस शोषक कीड आहे. हे आंबा पिकाच्या पानातील, फांद्यातील व फुलांमधील (amba mohor) रस शोषून घेतात. परिणामी त्यांची वाढ नीट होत नाही. हे कीटक त्यांच्या अंगातून एक लाल द्रव सोडत असतात. याच द्रवावर पुढे जाऊन बुरशी वाढते व तो भाग काळा पडतो.
( शेती निगडीत नव-नवीन विडियो पाहण्यासाठी येथे क्लिक करा – कृषि डॉक्टर यूट्यूब चॅनल)
एकात्मिक उपाय | mango flower disease control –
1. आंबा पिकाचे रोज निरीक्षण करा.
2. पानी हे गरजेनुसार द्या. पाण्याचा अतिरेक टाळा.
3. जमिनीमध्ये जास्तीत-जास्त वापसा परिस्तिती राहील याची काळजी घ्यावी.
4. खत व्यवस्थापन हे नेहमी माती परीक्षण करूनच करावे.
5. प्रादुर्भाव दिसतात, प्रादुर्भाव ग्रस्त पाने, फांद्या व मोहोर काढून टाकावा. जेणेकरून त्यांचा प्रसार पुढे होणार नाही.
6. फवारणीसाठी खालील वेळापत्राकचा वापर करावा –
फवारणी क्रमांक | वेळ | घटक (प्रमाण – 15 लीटर पाण्यासाठी) | सूचना |
1 | मोहोर दिसण्याच्या 15 दिवस आधी | लॅम्बडा सायहॅलोथ्रिन 5 ईसी – 15 ml किंवा एज़ाडिरेक्टिन 1000 पीपीएम – 7.5 ml | संपूर्ण झाडावर फवारणी घ्यावी. |
2 | मोहोर चे डोळे फुटताच | गंधक – 30 ग्राम किंवा कार्बेन्डाझिम – 15 ग्राम + थायामेथोक्सम 25 wg – 7.5 ग्राम | यामुळे भुरी व तुडतुडे रोग कंट्रोल होतील. |
3 | दुसऱ्या फवारणीच्या 15 दिवसांनी | गंधक – 30 ग्राम किंवा कार्बेन्डाझिम – 15 ग्राम किंवा
हेक्साकोनाझोल 5 sc – 8 ml (यापैकी एक बुरशीनाशक) + इमिडाक्लोप्रिड 17.8 एस.एल – 7.5 ml |
जर यावेळेस मोहोर उमलत असेल तर यामधील कीटकनाशक घेणे टाळावे. कारण या वेळेस मधमाशी संवरक्षण करणे देखील खूप महत्वाचे असते. |
4 | तिसऱ्या फवारणीच्या 15 दिवसांनी | गंधक – 30 ग्राम किंवा कार्बेन्डाझिम – 15 ग्राम किंवा
हेक्साकोनाझोल 5 sc – 8 ml (यापैकी एक बुरशीनाशक) + थायामेथोक्सम 25 wg – 5 gm |
प्रत्येक फवारणीमध्ये स्टीकर अवश्य मिसळावे. |
5 | चौथ्या फवारणीच्या 15 दिवसांनी | गंधक – 30 ग्राम किंवा कार्बेन्डाझिम – 15 ग्राम किंवा
हेक्साकोनाझोल 5 sc – 8 ml (यापैकी एक बुरशीनाशक) + बुप्रोफेज़िन 25 एस.सी – 15 एम एल |
प्रत्येक फवारणीमध्ये स्टीकर अवश्य मिसळावे. |
6 | पाचव्या फवारणीच्या 15 दिवसांनी (गरज असली तरच ही फवारणी घ्यावी.) | गंधक – 30 ग्राम किंवा कार्बेन्डाझिम – 15 ग्राम किंवा
हेक्साकोनाझोल 5 sc – 8 ml (यापैकी एक बुरशीनाशक) + डेल्टामेथ्रिन 2.5 एस.सी – 7.5 एम एल |
प्रत्येक फवारणीमध्ये स्टीकर अवश्य मिसळावे. |
वरील फवारण्या घेताना ही काळजी नक्की घ्या –
1. फवारणी करताना पाण्याचा ph हा 6.5 ते 7.5 च्या दरम्यान असावा.
2. फवारणी मध्ये स्टीकर ची मात्रा नक्की घ्या.
3. फवारणी ही शक्य झाल्यास संध्याकाळी घ्या.
4. भर उन्हात फवारणी घेणे टाळा.
5. फवारणी करताना मधमाशीचा विचार नक्की करा.
6. फवारणी करताना जमिनीत हलका ओलावा असावा.
सूचना – शेतीनिगडीत सर्व कृषि औषधांची माहिती जाणून घेण्यासाठी आमच्या खालील Krushi Aushadhe या वेबसाइटला नक्की भेट द्या. या ठिकाणी तुम्हाला सर्व कृषि औषधांची A to Z माहिती वाचायला मिळेल. आणि तुम्हाला जर वरील सर्व औषधे आताच ऑनलाइन खरेदी करायची असल्यास BharatAgri Krushi Dukan वेबसाइट ला भेट द्या.
Conclusion I सारांश –
शेतकरी मित्रांनो तुम्हाला krushi doctor या वेबसाइट वरील mango flower: आंबा मोहोर व्यवस्थापन हा लेख तुम्हाला कसा वाटला वाटला हे खाली कमेंट बॉक्स मध्ये सांगायला विसरू नका. आणि हा लेख जर तुम्हाला आवडला तर तुमच्या इतर शेतकरी मित्रांसोबत शेयर नक्की करा. आणखी अशा प्रकारची कृषीविषयक माहिती पाहण्यासाठी आमच्या krushi doctor या वेबसाईटला नक्की भेट द्या.
People also ask | वारंवार विचारले जाणारे प्रश्न –
1. आंब्याला फुल येण्यासाठी किती वेळ लागतो?
उत्तर – आंबा पिकाला फुले म्हणजेच मोहोर येण्यास 3 ते 4 वर्ष लागतात.
2. मी माझ्या आंब्याचा आकार कसा वाढवू शकतो?
उत्तर- यासाठी तुम्हाला तुमच्या झाडाचे खत व्यवस्थापन, पानी व्यवस्थापन व कीड-रोग व्यवस्थापन चांगले करावे लागेल.
3. आंब्याचा मोहोर का गळतो?
उत्तर – कीड किंवा रोगाचा प्रादुर्भाव झाला असेल तर मोहोर गळू शकतो.
4. आंबा पिकातील मोहोर गळ थांबयसाठी कोणती फवारणी करावी?
उत्तर – गंधक – 30 ग्राम किंवा कार्बेन्डाझिम – 15 ग्राम किंवा हेक्साकोनाझोल 5 sc – 8 ml (यापैकी एक बुरशीनाशक) + इमिडाक्लोप्रिड 17.8 एस.एल – 7.5 ml प्रती 15 लीटर पाण्यात मिसळून फवारणी घ्यावी.
लेखक –
सूर्यकांत इर्लेकर
मू. पो – इर्ले, तालुका – बार्शी, जिल्हा – सोलापूर.
राज्य – महाराष्ट्र. पिन – 413412