शेयर करा

maka lagwad

शेतकरी मित्रांनो नमस्कार, Krushi Doctor (कृषी डॉक्टर) या शेती विषयक माहिती देणाऱ्या वेबसाइट वरती आम्ही आपले सहर्ष स्वागत करत आहे. आजच्या लेखामध्ये आपण मका लागवड (maka lagwad) याविषयी संपूर्ण माहिती पाहणार आहोत. यामध्ये प्रामुख्याने मका लागवडीसाठी कोणती जमीन आवश्यक आहे, मक्याचे विविध वाण, रासायनिक खते रोग आणि किडी याविषयी सविस्तर माहिती पाहणार आहोत. जगात तृणधान्य पिकांच्या उत्पादनामध्ये गहू आणि भात या पिकानंतर मक्याचा नंबर लागतो. निरनिराळ्या हवामानाशी जलद समरस होण्याची क्षमता असणारे मका हे एकमेव पीक आहे.

मका लागवडीसाठी (maka lagwad) आवश्यक जमीन –

1. मका पिकासाठी पाण्याचा योग्य निचरा होणारी जमीन आवश्यक असते.
2. भारी ते मध्यम प्रतीची जमीन उपयुक्त असली तरी कोणत्याही प्रकारच्या जमिनीमध्ये मका लागवड करता येते.
3. जमिनीचा सामू 6.5 ते 7 असावा.



Maka lagwad साठी उपयुक्त हवामान –

1. मका हे पीक उष्ण हवामानाला उत्तम प्रतिसाद देणारे पीक आहे.
2. या पिकाची लागवड (maka lagwad) उन्हाळा पावसाळा हिवाळा या तिन्ही ऋतूंमध्ये करता येते.
3. मका हे उबदार हंगामातील पीक आहे आणि त्याला किमान 100-120 दिवसांचा मोठा हंगाम लागतो.
4. हे 21°C ते 27°C दरम्यान तापमान आणि 600-900 mm वार्षिक पर्जन्यमान असलेल्या भागात चांगले वाढते.

मका लागवडीसाठी (maka lagwad) उपयुक्त वाण –

अ) लवकर पक्व होणारे वाण –
किरण
प्रकाश
पी के व्ही एम – शतक

ब) मध्यम कालावधीत पक्व होणारे –
पंचगंगा
मांजरी
पारस
महाराजा

क) उशिरा पक्व होणारे वाण –
आफ्रिकन टॉल
डेक्कन 103

maka lagwad करताना पूर्व मशागत कशी करावी ?

मकेच्या शेती (maize farming) साठी खरीप हंगामा करिता उन्हाळ्यामध्ये मान्सून पूर्व एक नांगरणी करून वखराच्या तीन ते चार पाळ्या द्याव्यात आणि जमीन भुसभुशीत करून घ्यावी.

भरखते –

वखराच्या शेवटच्या पाळीपूर्वी शेतात हेक्टरी 15 ते 20 गाड्या कंपोस्ट खत टाकावे.

मका लागवड (maka lagwad) कधी करावी ?

1. खरीप हंगाम – 15 जून ते 15 जुलै
2. रब्बी हंगाम 15 ऑक्टोबर ते 15 नोव्हेंबर
3. उन्हाळी हंगामात 15 जानेवारी ते 15 फेब्रुवारी

maka lagwad करण्यासाठी बियाण्याचे प्रमाण –

1. देशी अल्प धान्याच्या वाणांच्या लागवडीसाठी प्रति एकर 6 ते 7 किलो बियाणे लागते.
2. संकरित वाणांच्या लागवडीसाठी एकरी 8 ते 9 किलो बियाणे लागते.
3. दुसरीकडे, जर तुम्ही क्लस्टर वाणांची लागवड करत असाल तर तुम्हाला एकरी 7 ते 8 किलो बियाणे लागतील.

बीज प्रक्रिया पद्धत –

1. पेरणीपूर्वी बियाण्यास कार्बेन्डाझिम 2 ग्रॅम प्रति किलो या प्रमाणात प्रक्रिया करावी.
2. कार्बेन्डाझिमच्या जागी 2 ग्रॅम कॅप्टन प्रति किलो बियाण्यावरही प्रक्रिया केली जाऊ शकते.
3. याशिवाय 2.5 ग्रॅम थायरम प्रति किलो बियाण्यावर देखील प्रक्रिया केली जाऊ शकते.

शेती निगडीत नव-नवीन विडियो पाहण्यासाठी येथे क्लिक करा – कृषि डॉक्टर यूट्यूब चॅनल

रासायनिक खत –

1. लागवडी बरोबर – एकरी 10:26:26 – 2 बॅग + झिंक सल्फेट 10 किलो + रायझर-जी – 10 किलो

2. दुसरी मात्रा –

20 ते 30 दिवसांनी – युरिया 1 बॅग
40 ते 50 दिवसांनी – युरिया 25 किलो.

तणनाशक वापर –

1. पेरणीनंतर परंतु पीक उगवण्यापूर्वी अट्राझीन (50 टक्के) 500 ग्रॅम प्रति एकर किंवा
2. पेरणीनंतर 20 ते 22 दिवस दरम्यान तण 2-3 पानाचे असतांना टिंजर 30 मिली प्रती एकर फवारावे.

पाणी व्यवस्थापन –

1) पेरणीनंतर 20 ते 40 दिवसांनी (पिक वाढीची अवस्था)
2) 40 – 60 दिवसांनी पीक फुलोऱ्यात असताना
3) 75 – 95 दिवसानंतर पिक दाणे भरण्याच्या अवस्थेत संरक्षित पाण्याची पाळी देणे आवश्यक आहे.

मक्‍यामध्ये घ्यावयाची आंतरपिके –

1. कडधान्य – उडीद, मूग, चवळी
2. तेलबिया – भुईमूग, सोयाबीन
3. भाजीपाला – मेथी, कोबी, कोथिंबीर, पालक इत्यादी
4. पेर भात + मका

मका पिकावरील वरील किड नियंत्रण –

1. खोडकिडा – कार्बारील 85% डब्ल्यूपी (व्यापारी नाव – देवीकार्ब, देवीदयाल कंपनी) 1764 ग्रॅम/हेक्टरी 500 ते 1000 लिटर पाण्यातून फवारावे. तसेच फोरेट 10 जी. (व्यापारी नाव – उमेट, युपीएल) 10 ते 12 किग्रॅ/हेक्टरी प्रमाणे जमिनीत मिसळावे.

2. गुलाबी अळी – ट्रायकोग्रामा चिलोनिस ची परोपजीवी अंडी असलेले 8 कार्ड प्रती हेक्टरी लावावेत.

3. कणसे पोखरणारी अळी – ट्रायकोग्रामा चिलोनिस या परोपजीवीचे अंडी असलेले 8 कार्ड प्रती हेक्टरी लावावेत. आणि निंबोळी अर्क 5% उगवणीनंतर 15 दिवसांनी फवारावे.

4. मावा – क्रायसोपा कार्निया परोपजीवीचे 5000 अंडी प्रति हेक्टरी सोडावेत.

5. अमेरीकन लष्करी अळी – इमामेक्टिन बेंजोएट (5%) (व्यापारी नाव -मिसाईल, क्रिस्टल कंपनी) 0.4 ग्रॅम प्रति लिटर किंवा थायामेथोक्झाम (12.60 %) अधिक लॅम्बडा सायहॅलोथ्रिन (9.50 %) (व्यापारी नाव – अलिका, सिंजंटा कंपनी) (संयुक्त कीटकनाशक) 0.50 मिली प्रती लिटर किंवा स्पिनोसॅड 3 मिली प्रती लिटर (स्पिंटोर, बायर कंपनी) यांच्या फवारण्या कराव्यात.

रोग नियंत्रण –

1. फुलोऱ्यापूर्वीचा खोड कुजव्या रोग – रोगाची लक्षणे दिसून येताच ७५% कॅप्टन १२ ग्रॅम प्रती १०० लिटर पाणी प्रमाणात जमिनीतून दिल्यास पिथीयम खोड कुजव्या रोगा चे नियंत्रण करणे शक्य होते.

2. करपा – मॅन्कोझेब 2.5 ग्रॅम प्रती लिटर पाणी या प्रमाणात 8 ते 10 दिवसांच्या अंतराने फवारावे.

उत्पादन (maize production per acre) –

सर्वसाधारणपणे संमिश्र वाणापासून हेक्टरी 50 क्विंटल व संकरित वाणापासून हेक्टरी 95 ते 100 क्विंटल उत्पादन मिळते.



Conclusion I सारांश –

शेतकरी मित्रांनो तुम्हाला krushi doctor या वेबसाइट वरील आमचा मका लागवड (maka lagwad) हा लेख तुम्हाला कसा वाटला वाटला हे खाली कमेंट बॉक्स मध्ये सांगायला विसरू नका. आणि हा लेख जर तुम्हाला आवडला तर तुमच्या इतर शेतकरी मित्रांसोबत शेयर नक्की करा. आणखी अशा प्रकारची कृषीविषयक माहिती पाहण्यासाठी आमच्या krushi doctor या वेबसाईटला नक्की भेट द्या.

People also ask | वारंवार विचारले जाणारे प्रश्न –

1) मका किती महिन्यात येते?
उत्तर – मकेसाठी साधारणता 100 ते 120 दिवसांचा कालावधी लागतो.

2. भारतात कोणत्या महिन्यात मका पिकवला जातो?
उत्तर – मका हे सर्व ऋतूंमध्ये घेतले जाऊ शकते उदा. खरीप (पावसाळा), पावसाळ्यानंतर, रब्बी (हिवाळा) आणि वसंत ऋतू.

3. मक्याच्या वाढीसाठी किती तापमान आवश्यक असते ?
उत्तर – मक्याच्या वाढीसाठी 21°C ते 27°C तापमान आवश्यक असते.

 

लेखक –

सूर्यकांत इर्लेकर
मू. पो – इर्ले, तालुका – बार्शी, जिल्हा – सोलापूर.
राज्य – महाराष्ट्र. पिन – 413412


शेयर करा