शेतकरी मित्रांनो नमस्कार, Krushi Doctor (कृषी डॉक्टर) या शेती विषयक माहिती देणाऱ्या वेबसाइट वरती आम्ही आपले सहर्ष स्वागत करत आहे. आजच्या लेखामध्ये आपण या लम्पी स्किन डिसीज (lumpy virus) रोग विषयी सविस्तरपणे माहिती पाहणार आहोत. यामध्ये नेमका काय आहे, तो रोग कशामुळे होतो, त्याचा प्रसार कसा होतो, त्याची लक्षणे काय आहे आणि लंपी स्किन रोगाच्या नियंत्रणासाठी काय उपाययोजना आहेत याबद्दल आपण माहिती या लेखामध्ये पाहणार आहोत.
लंपी आजार म्हणजे काय? | What is lumpy virus –
1. युरोपीयन अन्न सुरक्षितता प्राधिकरण अर्थात EFSA ने दिलेल्या माहितीनुसार, Lumpy skin disease हा एक विषाणूजन्य रोग असून,तो जनावरांना होतो.
2. लंपी हा पॉक्स व्हिरीडी कुळातला कॅप्री पॉक्स वायरस आहे, अशी माहिती वर्ल्ड ऑर्गनायझेशन फॉर अॅनिमल हेल्थ म्हणजेच WOAH ने दिली आहे.
3. भारतात लंपी व्हायरसची (lumpy virus) लागण 2019 मध्ये प्रथम झाली होती.
4. लंपी (lumpy disease) त्वचा रोग असून असे सांगितले जाते आहे,की हा आजार मच्छर चावल्या मुळे होतो.
5. लम्पी त्वचा रोग हा केवळ गोवंश व म्हैस वर्गातील जनावरांना होणारा विषाणूजन्य त्वचा (skin disease) रोग आहे.
6. हा रोग कीटकांपासून पसरतो.
7. माश्या आणि डासांच्या विशिष्ट प्रजाती तसेच उवांमुळे हा रोग पसरतो.
8. यापूर्वी कोणतेही विषाणू संसर्ग न झालेल्या प्राण्यांना याचा सर्वाधिक धोका आहे.
लंपी आजाराची लक्षणे | Lumpy virus symptom’s –
1. या रोगामध्ये मध्यम स्वरुपाचा ताप 2 ते 3 दिवस राहतो. परंतू काही वेळेस 105 ते 106 फॅ. एवढा ताप येऊ शकतो.
2. ताप येऊन गेल्यानंतर संपूर्ण शरीरावर त्वचेच्या खाली 2 ते 5 से.मी. आकाराच्या घट्ट गाठी येतात. विशेषतः डोके, मान, पाय, कास इ. ठिकाणी गाठी येतात.
3. या गाठी कित्येक महिने शरीरावर टिकून राहतात. गाठीमुळे पडलेले चट्टे शरीरावर ब-याच कालावधी करिता अथवा कायमच राहू शकतात.
4. तसेच तोंडात, घशात व श्वसन नलिकेत देखील पुरळ फोड येतात. तोंडातील पुरळ मुळे जनावरांच्या तोंडातून मोठया प्रमाणात लाळ गळत राहते.
5. तोंड, अन्न नलिका, श्वसन नलिका व फुफ्फुसामध्ये पुरळ व अल्सर निर्माण होऊ शकतात.
6. जनावरांचे पाय, मान व बाह्य जननेंद्रियामध्ये सुज आल्यामुळे जनावरास हालचाल करण्यास
अशक्तपणा, भूक कमी होणे व वजन कमी होणे ही लक्षणे दिसून येतात.
7. पायावर सूज येते.
8. एक किंवा दोन्ही डोळयामध्ये जखमा तयार होतात.
गाभण जनावरांचा गर्भपात होऊ शकतो.
9. बाधित जनावरे 2 ते 3 आठवड्यात बरी होतात.
लंपी रोगाचा प्रसार | Lumpy skin disease spread –
1. बाह्य कीटकांद्वारे (डास, माशा, गोचीड इ.).
2. बाधित जनावरांच्या त्वचेवरील व्रण, नाकातील स्त्राव, दूध, लाळ, विर्य, इ. माध्यमा मार्फत.
3. संसर्गजन्य असल्याने या विषाणूचा प्रसार हा बाधित जनावरांपासून निरोगी जनावरास स्पर्शा द्वारे होऊ शकतो त्यामुळे बाधित जनावरे ही निरोगी जनावरांपासून वेगळी ठेवणे अत्यंत महत्वाचे आहे.
लंपी आजार जनावरांची काळजी कशी घ्याल? | Control measures for lumpy virus –
1. गोठ्यात माशा,डास होणार नाही याची काळजी घ्यावी.
2. जनावराच्या अंगावर उवा दिसत असल्यास त्यांच्यावर प्रतिबंधात्मक उपाय करावा.
3. जनावरांचा गोठा स्वच्छ ठेवावा.
4. निरोगी जनावरांना लंपी बाधित जनावरांपासून वेगळे ठेवावे.
5. लंपी रोगाने आजारी असलेल्या जनावरांना चरण्यासाठी बाहेर सोडू नये.
6. गायी आणि म्हशींना वेगवेगळ्या ठिकाणी बांधावे.
लंपी व्हायरस लसीकरण | lumpy skin disease treatment –
Lumpy virus आजाराने बाधित गावांमध्ये तसेच बाधित गावापासून 5 किलोमीटर त्रिज्येत येणाच्या सर्व गावांमध्ये 4 महिने वयावरील गाय व म्हैस वर्गातील जनावरांना 1 मिली प्रति जनावर याप्रमाणे गोट फॉक्स उत्तर काशी स्ट्रेन लस टोचण्यात यावी. यावेळेस प्रत्येक जनावरांकरिता स्वतंत्र सुई वापरण्याची दक्षता घ्यावी.
लंपी आजार उपाययोजनेसाठी एक कोटी रुपयांची तरतूद –
1. लंपी आजाराच्या उपाय योजनेसाठी प्रत्येक जिल्ह्यासाठी 1 कोटी रुपयांच्या निधीची तरतूद करण्यात आली आहे.
2. लंपी आजाराने मृत्यू झाल्यास नुकसानभरपाई देण्याचा निर्णय महाराष्ट्र मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला.
3. NDRF च्या निकषानुसार ही मदत दिली जाणार असून यासाठी जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून प्रत्येक जिल्ह्यासाठी एक कोटी रुपयांची तरतूद केली गेली आहे.
लम्पी रोग हेल्पलाइन नंबर | Lumpy virus helpline number –
लम्पी आजाराबाबत मदतीसाठी पशुपालकांनी पशुवैद्यकीय दवाखान्यात अथवा विभागाचा टोल फ्री क्रमांक 18002330418 किंवा राज्यस्तरीय कॉल सेंटरमधील पशुसेवेचा टोल फ्री क्रमांक 1962 यावर संपर्क साधण्याचे आवाहनही करण्यात आले आहे.
Conclusion I सारांश –
शेतकरी मित्रांनो तुम्हाला krushi doctor या वेबसाइट वरील आमचा लम्पी स्किन डिसीज (lumpy virus) नियंत्रण हा लेख तुम्हाला कसा वाटला वाटला हे खाली कमेंट बॉक्स मध्ये सांगायला विसरू नका. आणि हा लेख जर तुम्हाला आवडला तर तुमच्या इतर शेतकरी मित्रांसोबत शेयर नक्की करा. आणखी अशा प्रकारची कृषीविषयक माहिती पाहण्यासाठी आमच्या krushi doctor या वेबसाईटला नक्की भेट द्या.
FAQ’s | वारंवार विचारले जाणारे प्रश्न –
1. लंपी रोग माणसाला होतो का?
उत्तर – लंपी रोग माणसाला होत नाही. तसेच प्राण्यांपासून मिळणाऱ्या दुधातून हा संक्रमित होत नाही.
2. लंपी रोगाची लक्षणे कोणती आहेत?
उत्तर – जनावरांमध्ये ताप, त्वचेवर गाठी, डोळे आणि नाकातून स्राव, दूध उत्पादन कमी होणं आणि आहार घेण्यात अडचण निर्माण होणं. गाभण गायी आणि म्हशींचा गर्भपात होतो.
3. लंपी रोगावर कोणते औषध आहे?
उत्तर – या रोगावर थेट कोणतेही औषध नाही. लसीकरण करणे हा एकमेव उपाय आहे.
लेखक –
कृषी डॉक्टर सूर्यकांत
9168911489