शेतकरी मित्रांनो नमस्कार, Krushi Doctor (कृषी डॉक्टर) या शेती विषयक माहिती देणाऱ्या वेबसाइट वरती आम्ही आपले सहर्ष स्वागत करत आहे. आजच्या लेखामध्ये आपण ज्वारीच्या लागवड करण्यात येणाऱ्या निवडक वाणांची (jowar variety) आपण माहिती पाहणार आहोत.
रब्बी ज्वारी लागवडीचे नियोजन | Jowar variety sowing management –
1. रब्बी ज्वारी पेरणीसाठी सुधारित व शिफारस केलेल्या जातींची (jowar variety) निवड करावी. हलक्या जमिनीसाठी सिलेक्शन-3, फुले अनुराधा, तसेच मध्यम जमिनीसाठी फुले माऊली, फुले सुचित्रा, मालदांडी 35-1, भारी जमिनीसाठी- फुले वसुधा, फुले यशोदा, सी एच व्ही. 22, पीकेव्ही क्रांती, परभणी मोती या जाती निवडाव्यात. हुरड्यासाठी फुले उत्तरा व लाह्यांसाठी फुले पंचमी या जातींची निवड करावी. भारी जमीन बागायतीसाठी फुले रेवती जातीची निवड करावी.
2. रब्बी ज्वारी पेरणीपूर्वी मूलस्थानी जलसंधारण करावे. त्यासाठी उतारानुसार 10×12 चौ.मी. आकाराचे सपाट वाफे तयार करावेत. किंवा 2.70 मीटर अंतरावर उताराला आडवे सारा यंत्राने सारे पाडून दर 20 मीटरवर बळीराम नांगराच्या साहाय्याने दंड टाकावे.
3. पेरणी 15 सप्टेंबर ते 15 ऑक्टोबरपर्यंत पूर्ण करावी.
4. प्रतिहेक्टरी 10 किलो बियाणे वापरावे. पेरणीपूर्वी प्रति किलो बियाण्यास चार ग्रॅम गंधक (300 मेश) बीजप्रक्रिया करावी. त्यानंतर प्रति 10 किलो बियाण्यास 250 ग्रॅम ऍझोटोबॅक्टर व 250 ग्रॅम स्फुरद विरघळविणारे जिवाणू खताची बीजप्रक्रिया करावी.
5. पेरणीसाठी 45 x 15 सेंमी. अंतर ठेवावी.
6. बागायती पिकासाठी भारी जमिनीत एकूण 100 किलो नत्र, 50 किलो स्फुरद व 50 किलो पालाश प्रतिहेक्टरी द्यावे. त्यापैकी 50 किलो नत्र, 50 किलो स्फुरद व 50 किलो पालाश पेरणीच्यावेळी पेरून द्यावे. उरलेले 50 किलो नत्र पेरणीनंतर 25 ते 30 दिवसांनी द्यावे. मध्यम जमिनीत 80 किलो नत्र, 40 किलो स्फुरद व 40 किलो पालाश द्यावे. त्यापैकी अर्धा नत्र संपूर्ण स्फुरद व पालाश करताना द्यावा व उर्वरित 50 टक्के नत्र पेरणीनंतर 25 ते 30 दिवसांनी द्यावा.
7. कोरडवाहू हलक्या जमिनीतील पिकासाठी हेक्टरी 25 किलो नत्र पेरणीच्यावेळी पेरून द्यावे.
8. ज्वारी पीक पेरणीसाठी दोन चाडी पाभरीचा वापर करावा.
रब्बी ज्वारीच्या संकरित व सुधारित जाती | Best jowar variety for rabi 2023 –
1. फुले अनुराधा –
– हे वाण 105-110 दिवसात पक्व होतो.
– या वाणापासून 8-10 क्विंटल धान्याचे तर 30-35 किं./हे. कडब्याचे उत्पादन मिळते.
– ही जात खोडमाशीस अत्यंत प्रतिकारक आहे. खडखड्या रोगाची प्रतिकारक्षमता या जातींमध्ये अधिक आहे.
– कडब्याची प्रत आणि पाचकता ही जास्त आहे.
– ज्वारीची भाकरी ही चवदार आणि गोड आहे.
2. फुले यशोमती –
– या वाणापासून 9-11 किंटल धान्याचे तर 40-45 क्विं./हे. कडब्याचे उत्पादन मिळते.
– हा वाण 110-115 दिवसांत तयार होतो.
– या वाणापासून प्रचलित जाती फुले अनुराधा यापेक्षा हलक्या जमिनीत 10-15 टक्क्यांनी धान्याची तर 20-25 टक्क्यांनी कडब्याची उत्पादन क्षमता अधिक आहे.
– ही जात खोडमाशीस अत्यंत प्रतिकारक आहे. खडखड्या रोगाची प्रतिकारक्षमता या जातींमध्ये अधिक आहे.
– ज्वारीची भाकरी ही चवदार गोड आहे.
3. मालदांडी 35-1 –
– मध्यम खोल जमिनीत कोरडवाहू साठी शिफारस.
– पक्व होण्याचा कालावधी 118 ते 120 दिवस.
– दाणे चमकदार, पांढरे.
– भाकरीची चव चांगली.
– खोडमाशी प्रतिकारक्षम.
– धान्य उत्पादन सरासरी प्रति एकरी 6-7 क्विं. व कडबा 23 क्विं.
4. परभणी सुपर मोती –
– या वाणाची अवर्षणप्रवण भागात मध्यम ते भारी जमिनीसाठी शिफारस केलेली आहे.
– या जातीस पक्व होण्यास 118 ते 120 दिवसांचा कालावधी लागतो.
– या वाणाचे दाणे मोत्यासारखे शुभ्र असतात. भाकरीची व कडब्याची प्रत चांगली आहे.
– या वाणाचे कोरडवाहूमध्ये सरासरी धान्य उत्पादन 30 ते 32 क्विंटल, तर कडबा उत्पादन 80 ते 90 क्विंटल मिळते.
5. फुले यशोदा –
– फुले यशोदा हे वाण स्थानिक वाणांच्या संग्रहातून विकसित केले आहे.
– हे वाण भारी जमिनीसाठी कोरडवाहूकरिता शिफारित केला आहे.
– या वाणांस 120-125 दिवस तयार होण्यासाठी लागतात.
6. फुले मधुर (आर.एस.एस. जी. व्ही. 46) –
– उत्कृष्ट प्रतीचा व चवदार हुरडा तसेच खोडमाशी कीड, खडखड्या रोग, करपा, पानावरील ठिपके आणि अवर्षणास प्रतिकारक आहे.
– या वाणाचा हुरडा हा 90-95 दिवसांमध्ये काढणीला येतो.
– यापासून 24-28 क्विंटल इतके हुरड्याचे प्रति हेक्टरी उत्पादन मिळते.
– कडब्याचे उत्पादनसुद्धा या वाणापासून 55-60 क्विंटल इतके मिळते.
7. फुले माऊली –
– पक्व होण्याचा कालावधी 110 ते 115 दिवस.
– भाकरीची चव उत्तम.
– जनावरांसाठी कडबा पौष्टिक व चवदार.
– हलक्या व मध्यम जमिनीसाठी लागवडीस योग्य.
– धान्याचे उत्पादन हलक्या जमिनीत एकरी 4-5 क्विं. कडबा 12-15 क्विंटल.
– धान्याचे उत्पादन मध्यम जमिनीत एकरी 7-8 क्विं. व कडबा 18-20 क्विंटल.
8. फुले चित्रा –
– फुले चित्रा ही जात एस. पी. व्ही. 655 आणि आर. एस. एल. जी. 112 यांच्या संकरातून निवड पद्धतीने विकसित केली आहे.
– या जातीला 118-120 दिवस तयार होण्यासाठी लागतात.
– यापासून 20-25 क्विंटल धान्याचे, तर 55-60 क्विंटल प्रति हेक्टरी कडब्याचे उत्पादन मिळते.
– कडब्याची आणि भाकरीची प्रत ही मालदांडी प्रमाणेच चांगली आहे.
9. फुले रेवती –
– पक्व होण्याचा कालावधी 118 ते 120 दिवस.
– दाणे मोत्यासारखे, पांढरे चमकदार.
– भाकरीची चव उत्कृष्ट.
– कडबा पौष्टीक व अधिक पाचक.
– भारी जमिनीत बागायतीसाठी शिफारस.
– धान्य उत्पादन सरासरी प्रती एकरी 17-18 क्विं. व कडबा 38-40 क्विं.
10. फुले उत्तरा –
– हुरड्याची अवस्था येण्यास 90-100 दिवस.
– हुरड्यासाठी शिफारस.
– भोंडातून दाणे सहज बाहेर पडतात.
– सरासरी 70-90 ग्रॅम इतका हुरडा मिळतो.
– हुरडा चवीस सरस अत्यंत गोड, शिवाय ताटेही गोड असल्याने जनावरे कडबा चवीने खातात.
Conclusion I सारांश –
शेतकरी मित्रांनो आशा करतो की तुम्हाला Krushi Doctor website वरील आमचा jowar variety: यंदाच्या रब्बी हंगामात ज्वारीच्या या वाणांची पेरणी करा आणि मिळवा एकरी 10 ते 12 क्विंटल उत्पादन हा लेख खूप आवडला असेल.ही माहिती नक्कीच यंदाच्या खरीप हंगामामध्ये तुमच्या उपयोगी येईल.ही माहिती जर तुम्हाला खरच आवडली तर नक्कीच तुमच्या इतर शेतकरी ग्रुप मध्ये शेयर नक्की करा.आणि मका पिकाबद्दल इतर कोणतीही माहिती तुम्हाला जाणून घ्यायची असेल तर आमच्या “Krushi Doctor” पेजला भेट द्या.
FAQ’s | वारंवार विचारले जाणारे प्रश्न –
1. ज्वारी किती महिन्याचे पीक आहे?
उत्तर – ज्वारीचे पीक तयार व्हावयाला सु. पाच महिने लागतात.
2. तुम्ही ज्वारीची लागवड किती खोलवर करता?
उत्तर – ज्वारीची लागवड विविध पंक्तीच्या रुंदी मध्ये किंवा नमुन्यांमध्ये करता येते, परंतु 30 इंच किंवा त्यापेक्षा कमी पंक्ती रुंद ओळी पेक्षा 10% अधिक उत्पादनक्षम असतील. ज्वारीचे बियाणे साधारणपणे 1.25 ते 1.5 इंच खोल जमिनीचा पोत आणि ओलावा यानुसार लावावे.
3. ज्वारी कोणत्या प्रकारच्या जमिनीत घेतली जाते?
उत्तर – ज्वारीची लागवड कमी सुपीक जमिनीवर करता येते आणि त्यासाठी मध्यम पाऊस आणि मध्यम तापमान आवश्यक असते. विशेषत: ज्वारीसाठी गाळाची माती किंवा मिश्रित काळी माती आणि लाल माती योग्य आहे.
लेखक –
सूर्यकांत इर्लेकर