शेतकरी मित्रांनो नमस्कार, Krushi Doctor (कृषी डॉक्टर) या शेती विषयक माहिती देणाऱ्या वेबसाइट वरती आम्ही आपले सहर्ष स्वागत करत आहे. आजच्या लेखामध्ये आपण हायड्रोपोनिक चारा (hydroponic fodder) तयार करण्याची पद्धत पाहणार आहोत. यामध्ये हायड्रोपोनिक चाऱ्यासाठी योग्य असणारी पिके, हायड्रोपोनिक चारा तयार करण्याची पद्धत आणि तसेच उत्पादन याबद्दल सविस्तर माहिती या लेखांमध्ये आपण पाहणार आहोत.
हायड्रोपोनिक्स चारा म्हणजे काय? | What is hydroponic fodder?
1. शेतकरी दूध विक्रीतून मिळणाऱ्या पैशातून कुटुंबाची आर्थिक गरज भागवतात.
2. मात्र, गेल्या काही दिवसांपासून शेतीचं क्षेत्र कमी होत असल्याचं समोर आलं आहे.
3. शेतकऱ्यांसमोर चाऱ्याची समस्या मोठ्या प्रमाणावर निर्माण होत आहे.
4. चाऱ्याच्या समस्येवर मार्ग काढण्यासाठी शेतकऱ्यासमोर हायड्रोपोनिक्स तंत्रज्ञानाचा वापर करुन चारा उपलब्ध करण्याचा मार्ग उपलब्ध झाला आहे.
5. शेतकरी हायड्रोपोनिक्स तंत्रज्ञानाद्वारे 10 दिवसांमध्ये चारा तयार करु शकतात.
6. मक्याच्या बियांपासून फक्त हायड्रोपोनिक चारा ट्रे मध्ये पाणी शिंपडून चारा पिकवता येतो.
7. या तंत्राचा वापर करून चारा तयार करण्यासाठी खूप कमी वेळ लागतो.
8. हायड्रोपोनिक्स तंत्राद्वारे शेतकरी बांधवांना फक्त 10 दिवसात चारा मिळू शकतो.
9. हायड्रोपोनिक तंत्रज्ञानाचा वापर करून शेती करणे खूप महाग आहे, कारण त्यात खूप खर्च होतो.
10. मात्र, स्थानिक बाजारपेठेत किंवा घरी उपलब्ध होणाऱ्या वस्तू आणि साधनं वापरून कमी खर्चात चारा पिकवता येऊ शकतो.
शेती निगडीत सर्व माहिती विडियो स्वरूपात पाहण्यासाठी येथे क्लिक करा – कृषि डॉक्टर यूट्यूब चॅनल
हायड्रोपोनिक चाऱ्याचे फायदे | Benefits of hydroponic fodder –
1. पोषक मूल्य – हायड्रोपोनिक्स चाऱ्यामध्ये पारंपारिक चारा कोरडे अन्न किंवा धान्यापेक्षा जास्त पोषक असतो. त्यात उच्च कार्बोहायड्रेट, खनिजे आणि जीवनसत्त्वे असतात.
2. वाढण्याची वेळ – पारंपारिक चाऱ्याच्या वाढवण्यासाठी अनेकदा दोन महिने लागतात, पण तुम्ही फक्त एका आठवड्यात हायड्रोपोनिक चारा वाढवू शकता.
3. पाण्याची कमी गरज – पारंपरिक चारा उत्पादनाच्या तुलनेत हायड्रोपोनिक चारा उत्पादनासाठी कमी पाणी लागते. एक किलो हायड्रोपोनिक चारा पिकवण्यासाठी फक्त 3 ते 4 लिटर पाणी आवश्यक आहे; दुसरीकडे, पारंपारिक चाऱ्यासाठी अंदाजे 70-100 लिटर पाणी लागते.
4. सोपे दैनंदिन उत्पादन – कमी पाण्याची समस्या असतानाही हायड्रोपोनिक चारा वर्षभर नियमितपणे तयार करता येतो.
5. रसायने किंवा कीटकनाशके – हायड्रोपोनिक चारा पिकवण्यासाठी कोणत्याही रसायनांची किंवा कीटकनाशकांची गरज नसते
6. कमी कर्मचारी आणि वाहतूक खर्च – त्यासाठी कमी कामगार आणि वाहतूक खर्चाची गरज होती. बहुतेक शेतकरी पशुधन गोठ्याच्या शेजारी हायड्रोपोनिक चारा उगवतात.
7. जनावरांच्या शरीरात प्रथिने, खनिजे, जीवनसत्त्वाच्या उपलब्धतेत वाढ होते.
8. जमिनीवर चारा उत्पादन घेण्याच्या तुलनेत 5 ते 10 टक्के पाण्याची आवश्यकता आहे.
9. प्रथिने, जीवनसत्त्वे, अँटीऑक्सिडंट्स, फॉलिक ऍसिड, ओमेगा-3, स्निग्ध पदार्थ हरितद्रव्य मोठ्या प्रमाणात असतात.
10. पशुखाद्याचा खर्च 40 टक्के कमी होतो.
11. जनावरांच्या रोगप्रतिकारक शक्तीत वाढ होते.
12. दुधाच्या फॅट मध्ये वाढ होते. किमान अर्धा लिटर दुधात वाढ होते.
13. जनावरांची प्रजनन क्षमता सक्षम होते.
प्रति किलो हायड्रोपोनिक्स चार्यामधील घटक | Content in Hydroponic fodder –
1. कॅल्शियम- 0.11 %
2. विटामीन A- 25.01 %
3. विटामीन C- 45.01 %
4. विटामीन E- 26.03%
5. प्रथिने- 13 ते 20 %
6. रायझेस्टिक फायबर- 80.92 % (दुध निर्मितीसाठी अत्यावश्यक)
हायड्रोपोनिक्स चारा निर्मितीसाठी वापरण्यात येणारी पिके | Crops for hydroponic fodder in India –
1. मका (maize)
2. गहू (wheat)
3. बार्ली (Barley)
हायड्रोपोनिक चारा निर्मिती (Hydroponic fodder system) –
1. हायड्रोपोनिक चारा तयार करण्यासाठी बांबू, तोट्या, प्लास्टिक ट्रे, 50 टक्के क्षमतेचे शेडनेट, मिनी स्प्रिंकलर किंवा फॉगर सिस्टिम व टायमर यांची गरज असते.
2. या साधनसामग्रीचा वापर करून 72 स्क्वेअर फूट जागेत बसेल असा 25 फूट x 10 फूट x 10 फूट आकाराचा सांगाडा अवघ्या 15 हजार रुपये खर्चात तयार होतो.
3. यामध्ये प्रकाश, तापमान, आर्द्रता आणि पाण्याचे नियंत्रण करून दररोज 100 ते 125 किलो पौष्टिक हिरवा चारा तयार करता येतो.
4. चारा तयार करण्यासाठी मका, गहू, बाजरी, बार्ली याचा वापर केला जातो.
5. धान्याला ई.एम.च्या द्रावणात बीजप्रक्रिया करावी लागते.
6. हे धान्य 12 तास भिजत ठेवून, 24 तास गोणपाटात अंधाऱ्या खोलीत ठेवावे.
7. त्यानंतर प्लॅस्टिक ट्रेमध्ये (3 फूट x 2 फूट x 3 इंच ) साधारणतः 1.5 ते 1.75 किलो बी पसरावे.
8. अशा प्रकारे प्रति दुभत्या जनावरांना दहा हायड्रोपोनिक चारा ट्रे (हायड्रोपोनिक चारा ट्रे) या प्रमाणे जनावरांच्या संख्येवरून ट्रेची संख्या ठरवावी.
9. हे प्लॅस्टिक ट्रे हायड्रोपोनिक चारा निर्मिती (hydroponic chara nirmiti) गृहात सात ते आठ दिवस ठेवावेत.
10. एक इंच विद्युत मोटारीला लॅटरलची जोड देऊन फॉगर पद्धतीद्वारे प्रत्येक दोन तासाला पाच मिनिटे याप्रमाणे दिवसातून सात वेळा पाणी द्यावे.
11. एका दिवसासाठी 200 लिटर पाणी लागते. ही यंत्रणा स्वयंचलित आहे.
12. पाण्याची टाकी उंच ठिकाणी ठेवल्यास सायफन पद्धतीने विद्युत मोटारीचा वापर न हायड्रोपोनिक्स चाऱ्यास पाणी देता येते.
13. चाऱ्याची 7 ते 8 दिवसात 20 ते 25 सेंमी. उंचीपर्यंत वाढ होते.
14. साधारणपणे एक किलो गव्हापासून सात ते आठ किलो तर एक किलो मक्यापासून आठ ते नऊ किलो हिरवा चारा तयार होतो.
हायड्रोपोनिक्स चारा जनावरांना किती द्यावा? (Hydroponic fodder use) –
1. हा चार जास्त पचनीय असल्यामुळे जनावरे आवडीने खातात.
2. पूर्णपणे वाढ झालेला हायड्रोपोनिक चारा एक प्रकारे चटई सारखा दिसतो.
3. ज्याच्या तळाला मक्याची दाणे, मुळे आणि रोप एकमेकात गुंतून असतात.
4. यामुळे ट्रे मधून चारा काढायला सोपा जातो व हा चारा जसाच्या तास किंवा तुकडे करून देता येतो.
5. गुरांना फक्त हायड्रोपोनिक चारा दिल्यास अपचन, पोटफुगी होण्याची शक्यता असते म्हणून कधीही हा चारा सुक्या चाऱ्यासोबत द्यावा.
6. एका जनावराला हा चारा 20 किलो पर्यंत देवू शकतो.
7. सात ते आठ किलो हायड्रोपोनिक चारा दिल्यास सुमारे 1 किलो तयार पशुखाद्य / पेंड कमी करू शकतो. हा चारा सर्व वयोगटातील तसेच सर्व प्रकारच्या रवंथ करणाऱ्या जनावरांना खायला देवू शकतो.
Conclusions | सारांश –
जमिनीचे क्षेत्र दिवसेंदिवस कमी होत आहे. तसेच शेत मजुरांचा अभाव, कमी पर्जन्यमान या कारणांमुळे जनावरांसाठी चारा लागवडीचे क्षेत्र कमी झाले आहे. या साठी चांगला पर्याय म्हणजे हायड्रोपोनिक चारा (hydroponic fodder) निर्मिती आहे. या तंत्रज्ञानामुळे कमी जागेत, कमी पाण्यात, कमी कालावधीत, स्वस्तात हिरवा पौष्टिक चारा निर्मिती होते. हायड्रोपोनिक्स तंत्राद्वारे शेतकरी बांधवांना फक्त 10 दिवसात चारा मिळू शकतो.
FAQs | वारंवार विचारले जाणारे प्रश्न –
1. हायड्रोपोनिक्स म्हणजे काय?
उत्तर – हायड्रोपोनिक्स मधील हायड्रो म्हणजे पाण्यावर केली जाणारी शेती.
2. हायड्रोपोनिक्स चारा निर्मितीसाठी कोणते बियाणे वापरू शकतो?
उत्तर – चारा तयार करण्यासाठी मका, गहू, बाजरी, बार्ली याचा वापर केला जातो.
3. हायड्रोपोनिक्स चारा निर्मिती मध्ये किती दिवसात चारा तयार होतो?
उत्तर – हायड्रोपोनिक्स चारा निर्मिती मध्ये 10 दिवसात चारा तयार होतो
4. हायड्रोपोनिक्स चाऱ्यामुळे काय फायदा होतो?
उत्तर – दुधाचे 10 ते 15 % उत्पन्न वाढते तसेच जनावराची त्वचेवर चकाकी आणि चेहऱ्यावर तेज येते.
लेखक –
सूर्यकांत कांबळे
मू. पो – इर्ले, तालुका – बार्शी, जिल्हा – सोलापूर.
राज्य – महाराष्ट्र. पिन – 413412