शेतकरी मित्रांनो नमस्कार, Krushi Doctor (कृषी डॉक्टर) या शेती विषयक माहिती देणाऱ्या वेबसाइट वरती आम्ही आपले सहर्ष स्वागत करत आहे. आजच्या लेखामध्ये आपण कापूस पिकातील पातेगळ विषयी सविस्तरपणे माहिती पाहणार आहोत. यामध्ये पातेगळ (cotton flower drop) म्हणजे नेमके काय आहे, पाते गळ कशामुळे होते,त्याची लक्षणे काय आहे आणि नियंत्रणासाठी काय उपाय योजना आहेत याबद्दल आपण माहिती या लेखामध्ये पाहणार आहोत.
प्रस्तावना –
1. कापूस हे एक नगदी पीक आहे.
2. जगातील कपाशीखालील क्षेत्राच्या एक चतुर्थांश क्षेत्र भारतात कापूस लागवडीखाली आहे.
3. भारताच्या महाराष्ट्र राज्यात मोठ्या प्रमाणात कापसाचे पीक घेतात. तसेच गुजरात, आंध्रप्रदेश आणि मध्यप्रदेश या राज्यांतही कापसाची लागवड केली जाते.
4. महाराष्ट्रातील यवतमाळ जिल्ह्याला ‘पांढऱ्या सोन्याचा जिल्हा’ म्हणून ओळखल्या जाते.
5. सध्या बहुतांश कापूस उत्पादक जिल्ह्यात कपाशीची पेरणी पूर्ण झाली आहे.
6. सध्याचे बदलते हवामान पाहता परिणाम पिकांवर होत असून त्याच्या अन्नसाखळीत खंड पडतो आहे.
7. कारण यामुळे जमिनीतील मूळ हे अन्नद्रव्ये घेऊ शकत नाही.
8. परिणामी नैसर्गिकरीत्या कापसाच्या किंवा कोणत्याही पिकाची पातेगळ (cotton flower drop) होते.
कापूस पातेगळ होण्यास कारणीभूत घटक | Reasons behind cotton flower drop –
1. सुर्यप्रकाश कमी असणे,वाढलेले तापमान,पावसाचा खंड / जमीनीत ओल नसणे, ढगाळ हवामान इ. या घटकांमध्ये विपरीत बदल होतो.
2. त्यामुळे झाडामध्ये तयार होणारे अन्नघटकाचे पात्या, फुले व बोंडे या भागांकडे वहन होण्यास अडथळा येतो व परिणामी त्यांची गळ होते.
3. वाढलेल्या तापमानामुळे किंवा उमलणा–या फुलांवर पाऊस पडल्यामुळे परागसिंचन आवश्यक त्या प्रमाणात होत नाही.
4. तसेच फुलांवरील किडीमुळे पाते फुलांची गळ (kapus pategal) होते.
5. उशीरा लागवड झालेल्या पिकामध्ये गळ होण्याचे प्रमाण अधिक आढळते.
6. कोरडवाहू लागवडीमध्ये पावसाची दीर्घकाळ उघडीप असणे व त्याच्या जोडीला तापमानात झालेली वाढ यामुळे पातेगळ होते.
7. महाराष्ट्र मध्ये लागवड जून-जुलै महिन्यात होते. सुरुवातीच्या काळात पाते लागण्याच्या वेळी जुलै -ऑगस्ट महिन्यात ढगाळ हवामानामुळे पिकाला सूर्यप्रकाश अपूरा मिळतो.
8. त्याचप्रमाणे बोंडे लागण्याच्या काळात ऑगस्ट-सप्टेंबर महिन्यात पावसाचा खंड पडल्यामुळे ओल कमी होते.
9. या कारणांमुळे पाते, फुले व बोंडाची गळ होते.
कापूस पातेगळ साठी उपाय | cotton flower drop control –
अ) पाणी व्यवस्थापन –
पाणी जमिनीत साचणार नाही म्हणून जमीन उत्तम निच–याची असावी फुले लागण्याच्या अवस्थेत अधिक तापमान, ढगाळ हवामान किंवा पावसाचा खंड येणार नाही अशाप्रमाणे लागवड करावी.
ब) पीक व्यवस्थापन –
1. एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन द्वारे आवश्यक अन्नद्रव्यांचा पुरवठा करावा.
2. फवारणीद्वारे विद्राव्य खतांचा योग्य वेळी वापर करावा.
3. शरीर क्रियात्मक कारणांमुळे होणाऱ्या पातेगळ साठी 20 पी पी एम नॅप्थॅलीन ऍसिटिक ऍसिड (एन ए ए) ची फवारणी करावी.
4. संजीवकाची फवारणी करताना त्यात अन्य कोणतेही रसायन मिसळू नये.
5. पाते लागणे ते फुले लागण्याच्या काळात 2% डी ए पी (200 ग्रॅम प्रति 10 लिटर) खताची 1-2 वेळा फवारणी करावी.
6. एन ए ए व डी ए पी च्या फवारण्या शक्यतो सकाळ किंवा सायंकाळी कराव्या.
7. बागायती लागवडीमध्ये त्याचप्रमाणे नत्रयुक्त खते व वाढ संप्रेरकांचा वापर अधिक केल्यास काही वाणांमध्ये अवास्तव कायिक वाढ होते.
8. अशावेळी पाने फुलांची गळ होऊ शकते. कायिक वाढ सिमीत ठेवण्यासाठी वाढ रोधक यांचा (मेक्वाट क्लोराईड – 50 पी पी एम-12 मिली /10 लिटर) फवारणीद्वारे पाते लागताना वापर करावा.
9. यामुळे कायिक वाढ कमी होऊन उपलब्ध ओलाव्याचा वापर पाते, फुले व बोंडे वाढीसाठी होईल.
क) विद्राव्य खतांचा वापर –
1. फवारणीद्वारे विद्राव्य खते दिल्यास लवकर उपलब्ध होतात.
2. पाते / बोंडे येण्याच्या अवस्थेमध्ये डि. ए. पी किंवा युरिया खताची 2% (200 ग्रॅम / 10 लिटर) प्रमाणात फवारणी करावी.
3. तसेच फुले लागणे व बोंडे भरण्याच्या काळात पोटॅशिअम नायट्रेट (13:0:45) 2% प्रमाणात फवारणीद्वारे द्यावे.
ड) रासायनिक पद्धत | cotton flower drop chemical control –
सद्यस्थितीत सुरु असलेला पावसाने फुलात पाणी साचून बुरशी तयार होते त्यामुळे फुलगळ होते ते थांबवण्यासाठी बाविस्टीन हे बुरशीनाशक 15 ते 20 ग्रॅम प्रती पंप कोणत्याही गरजेनुसार कीटकनाशकां सोबत फवारणी करा. त्याचप्रमाणे जमिनीत पाणी साचू न देता त्याला जमिनीच्या उतारानुसार बाहेर काढा.
Conclusion I सारांश –
शेतकरी मित्रांनो तुम्हाला krushi doctor या वेबसाइट वरील आमचा कापूस या पिकातील पाते गळ (cotton flower drop) नियंत्रण हा लेख तुम्हाला कसा वाटला वाटला हे खाली कमेंट बॉक्स मध्ये सांगायला विसरू नका. आणि हा लेख जर तुम्हाला आवडला तर तुमच्या इतर शेतकरी मित्रांसोबत शेयर नक्की करा. आणखी अशा प्रकारची कृषीविषयक माहिती पाहण्यासाठी आमच्या krushi doctor या वेबसाईटला नक्की भेट द्या.
FAQ’s | वारंवार विचारले जाणारे प्रश्न –
1. कपाशीमध्ये कोणत्या घटकामुळे पातेगळ होते?
उत्तर – सुर्यप्रकाश कमी असणे,वाढलेले तापमान,पावसाचा खंड / जमीनीत ओल नसणे, ढगाळ हवामान इ. या घटकांमध्ये विपरीत बदल होतो.त्यामुळे झाडामध्ये तयार होणारे अन्नघटकाचे पात्या, फुले व बोंडे या भागांकडे वहन होण्यास अडथळा येतो व परिणामी त्यांची गळ होते.
2. कपाशीमध्ये नत्रयुक्त खतांचा जास्त वापर केल्यावर काय परिणाम होतो?
उत्तर – नत्रयुक्त खतांचा अतिवापर केल्यामुळे केवळ शाकीय वाढ जास्त होते. जमिनीतील उपलब्ध ओलावा व अन्नद्रव्ये कमी होऊन पाण्याचा व पोषण द्रव्यांचा ताण वाढतो. परिणामी मूळकूज सारख्या रोगाची शक्यता वाढते.
3. कापसात कोणते खत जास्त वापरले जाते?
उत्तर – कापूस उत्पादनात सर्वात जास्त वापरले जाणारे खत म्हणजे नायट्रोजन आहे.
लेखक –
कृषी डॉक्टर सूर्यकांत
9168911489