शेयर करा

sucking pest

शेतकरी मित्रांनो नमस्कार, कृषि डॉक्टर (Krushi Doctor) या शेती-निगडीत माहिती देणाऱ्या वेबसाइट वरती आपले सहर्ष स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत – sucking pest म्हणजेच रसशोषक कीड नियंत्रण बद्दल. यामध्ये मी तुम्हाला रसशोषक किडी कोणत्या आहेत, त्यांची लक्षणे कोणती आहेत आणि त्यांना कंट्रोल करण्यासाठी आपण कोणत्या फवारण्या घेऊ शकतो ही पाहणार आहोत. त्यामुळे तुम्ही जर एक अभ्यासू शेतकरी असाल तर नक्कीच हा लेख तुमच्यासाठी खूप महत्वाचा ठरणार आहे. माझी तुम्हाला विनंती आहे की हा लेख पूर्ण वाचा आणि माहिती आवडली तर हा लेख तुमच्या इतर शेतकरी मित्रांसोबत शेयर नक्की करा. चला तर मग सुरू करुयात…

रसशोषक किडी म्हणजे काय? What is a sucking pest?

ज्या किडी पिकाच्या पानातील, फुलातिल आणि फळातील रसशोषून घेऊन पिकाला हानी पोहचवत असतात, त्यांना आपण रसशोषक किडी अस म्हणतो. या किडीची काही उदाहरणे जर आपण पाहिली तर – फुलकिडे (thrips), पांढरी माशी (white fly), मावा (aphids) आणि तुडतुडे (hoppers) इत्यादि.

शेती निगडीत सर्व माहिती विडियो स्वरूपात पाहण्यासाठी येथे क्लिक करा – कृषि डॉक्टर यूट्यूब चॅनल

रसशोषक (sucking pest) किडीमुळे पिकाचे कोणते नुकसान होते?

1. पानातील रसशोषल्यामुळे पाने निस्तेज होतात.
2. पानाची अन्न तयार करण्याची क्षमता कमी होते.
3. पाने पिवळी पडून वाळून जातात.
4. पान, फूल आणि फळांची गळ झालेली दिसून येते.
5. फळांची गुणवत्ता खालावते.
6. रसशोषक किडी मधून निघणाऱ्या चिकट द्रवामुळे पिकावर काळ्या बुरशीची वाढ होते.
7. वायरस रोगाचा प्रसार वेगाने होण्यासाठी या किडी प्रामुख्याने कारणीभूत असतात.
8. पिकाची वाढ खुंटते व उत्पादन कमालीचे घटते.

रसशोषक किडींचे (sucking pest) नियंत्रण कसे करावे?

1. सर्व प्रथम निरोगी आणि सहनशील जात निवडून पिकाची लागवड करा.
2. लागवड करताना योग्य अंतर निवडा.
3. पिकाची जास्त दाटी करू नका.
4. म्हणजेच दोन ओळीमध्ये हवा आणि सूर्यप्रकाश खेळता राहील याची काळजी घ्या.
5. शेत शक्य तितके तण विरहित ठेवन्याचा प्रयत्न करा.
6. मित्र किटकांचे संवर्धन करा.
7. अंतरपीक लागवडीचा अवलंब करा.
8. नत्र युक्त खतांचा गरजेनुसारच वापर करा.
9. प्रादुर्भाव ग्रस्त झाडे व पीक अवशेष प्लॉट मधून बाहेर काढून नष्ट करा.
10. पिकाच्या वाढीच्या अवस्थेमध्ये पिवळे व निळे चिकट सापळे प्लॉट मध्ये बसवा.
11. व किडीच्या नुकसानीच्या पातळीनुसार खालील औषधांचा वापर करा.

प्रादुर्भाव कमी असताना –

क्र घटक औषधाचे नाव फवारणी मात्रा
1 निम ऑइल IFC निम 1 मिलि / लीटर
2 एसिटामिप्रिड 20% एसपी टाटा माणिक 0.5 ग्राम / लीटर
3 इमिडाक्लोप्रिड 200 SL कॉन्फिडोर 0.5 ते 1 मिलि / लीटर

प्रादुर्भाव जास्त झाल्यावर –

क्र घटक औषधाचे नाव फवारणी मात्रा
1 थियामेथोक्सम २५% WG अरेवा 0.5 ग्राम / लीटर
2 फ्लोनिकैमिड 50% डब्ल्यूजी उलाला 0.4 ग्राम / लीटर
3 क्लोरोपाइरीफॉस 50% + साइपरमेथ्रिन 5% ईसी सुपर डी 2 मिलि / लीटर
4 लैम्ब्डा साइहलोथ्रिन 5% ईसी कराटे 0.5 मिलि / लीटर
5 लॅम्बडा 9.5% + थायामेथोक्सम 12.6% झेडसी अलिका 0.5 मिलि / लीटर
6 फिप्रोनिल 5% एससी रीजेंट 1 ते 2 मिलि / लीटर
7 स्पाइरोटेट्रामैट 150 ओडी मूवेंटो ओडी 1 मिलि / लीटर
8 सायंट्रानिलिप्रोल 10.26% बेनेविया 1 ते 2 मिलि / लीटर

वरील फवारण्या घेताना काही सूचना –

1. फवारणी ही नेहमी सकाळी 10 च्या आता किंवा 4 च्या नंतर घ्यावी.
2. फवारणीसाठी पानी नेहमी 6.5 ते 7.5 ph चे वापरावे.
3. भर उन्हात आणि वारे जास्त असताना फवारणी घेणे टाळावे.
4. फवारणी करताना नेहमी स्टीकर चा वापर करावा.
5. एकच-एक कीटकनाशक सारखे-सारखे वापरू नये.
6. म्हणजेच कीटकनाशकांचा आलटून-पालटून वापर करावा.
7. कीटकनाशक निवड करताना नेहमी लेबल क्लेम चा विचार करावा.

Conclusion | सारांश –

चला तर शेतकरी मित्रांनो, आशा करतो की कृषि डॉक्टर (Krushi Doctor) वेबसाइट वरील sucking pest: रसशोषक किडींचे A to Z नियंत्रण हा लेख तुम्हाला समजला आणि आवडला असेल. लेख जर आवडला असेल तर नक्कीच हा लेख तुमच्या इतर शेतकरी ग्रुप मध्ये शेयर करा. भेटूया एका नवीन विषयासह, तूर्तास – धन्यवाद🙏

People also ask | वारंवार विचारले जाणारे प्रश्न –

1. रसशोषक किडी म्हणजे काय?
उत्तर – ज्या किडी पिकाच्या पानातील रसशोषून घेतात त्यांना रसशोषक किडी अस म्हणतात. उदा – फुलकिडे (thrips), पांढरी माशी (white fly), मावा (aphids) आणि तुडतुडे (hoppers)

2. रसशोषक किडीची नावे कोणती आहेत?
उत्तर – रसशोषक किडी पुढील प्रमाणे – फुलकिडे (thrips), पांढरी माशी (white fly), मावा (aphids) आणि तुडतुडे (hoppers)

3. रसशोषक किडी पिकावर का येतात?
उत्तर – अनुकूल वतावरण, अधिक तणे, नत्र युक्त खतांचा अधिक वापर आणि अपुऱ्या नियोजनामुळे रसशोषक किडीचा प्रादुर्भाव येऊ आणि वाढू शकतो.

4. रसशोषक कीड नियंत्रण करण्यासाठी कोणती फवारणी करावी?
उत्तर – रसशोषक कीड नियंत्रण करण्यासाठी तुम्ही – निम ऑइल, टाटा माणिक, कॉन्फिडोर, अरेवा, उलाला, कराटे आणि अलिका अशा कीटकनाशकांचा वापर करू शकता.

Author | लेखक –

सूर्यकांत कांबळे
मू. पो – इर्ले, तालुका – बार्शी, जिल्हा – सोलापूर.
राज्य – महाराष्ट्र. पिन – 413412


शेयर करा
शॉपिंग कार्ट