शेयर करा

sugarcane lavhala control

शेतकरी मित्रांनो नमस्कार, Krushi Doctor (कृषी डॉक्टर) या शेती विषयक माहिती देणाऱ्या वेबसाइट वरती आम्ही आपले सहर्ष स्वागत करत आहे. आजच्या लेखामध्ये आपण ऊस पिकातील लव्हाळा या तनासाठी कोणते तणनाशक (sugarcane lavhala control) वापरायचे, त्यासाठी कोणते एकात्मिक उपाय करायला पाहिजे याबद्दल माहिती पाहणार आहोत.

ओळख | Sugarcane lavhala identification –

1. लव्हाळा किंवा नागरमोथा हे बहुवार्षिक तण आहे. या तणाच्या प्रामुख्याने पिवळा लव्हाळा म्हणजेच सायप्रस इसक्युलन्ट्स (cyperus esculentus) आणि जांभळा लव्हाळा, अर्थात सायप्रस रोटून्डस (Cyperus rotundus) असे दोन प्रकार पडतात.
2. जांभळ्या प्रकारच्या लव्हाळ्याचे कंद जमिनीमध्ये थोड्या खोलीवर असतात. लव्हाळ्याच्या कंदाची साखळी तयार होऊन जमिनीत 45 ते 60 सेंमी खोलीपर्यंत पसरते.
3. पिवळ्या लव्हाळ्याचा जमिनीमध्ये कंद नसतात. त्या ऐवजी मुकुटासारखे लहान कोंब येतात. त्यातून लहान मुळे येऊन शेवटी टोकाला लहान कंद तयार होतात.
4. जमिनीची मशागत करून लव्हाळ्याचे मातृ झाड नष्ट केल्यानंतर त्याच्या मुकुटातील कोंबामधून नवीन लव्हाळा फुटतो.
5. पिवळ्या लव्हाळ्याचा प्रसार हा प्रामुख्याने बिया मार्फत होतो. या बियांची उगवण क्षमता 90 ते 95 टक्क्यांपर्यंत असते.
6. याचे कंद आकाराने लहान व हळूहळू वाढतात. तर जांभळ्या लव्हाळ्याच्या बियांची उगवण क्षमता 2 ते 10 टक्के एवढीच असते. याचे कंद आकाराने मोठे असून झपाट्याने वाढतात.
7. सुरुवातीच्या पहिल्या महिन्यामध्ये जांभळ्या लव्हाळ्याच्या मातृकंदापासून 4 नवीन कंद तयार होतात. आणि तिसऱ्या महिन्यापर्यंत कंदांची संख्या 100 पर्यंत पोहोचते. त्यामुळे जांभळा लव्हाळा हा पिवळ्या लव्हाळ्याच्या तुलनेत अधिक नुकसानकारक ठरतो.
8. मध्यम व हलक्या जमिनीमध्ये लव्हाळ्याचा प्रादुर्भाव खोल व काळ्या जमिनीपेक्षा अधिक असतो.



लव्हाळा तणामुळे उसाचे होणारे नुकसान | Sugarcane loss by lavhala –

1. ऊस पिकामध्ये तणनियंत्रण हा अत्यंत महत्त्वाचा घटक आहे. योग्य वेळी तणनियंत्रण न केल्यास उत्पादनात सरासरी 12 ते 72 टक्क्यांपर्यंत घट येण्याची शक्यता असते.
2. पीकवाढीच्या सुरुवातीच्या काळात तण नियंत्रण न केल्यास ऊस उत्पादनात प्रति हेक्टरी 17.5 टन एवढी घट येऊ शकते.
3. त्याशिवाय ऊसतोडणी किंवा काढणीचा खर्च अतिरिक्त वाढतो.
4. पहिल्या सात आठवड्यांमध्ये ऊस पिकात तणांमुळे नत्र 4 टक्के आणि स्फुरद व पालाश मध्ये 2.5 टक्के पालाश इतकी खतमात्रा ही जमिनीतून घेतली जाते.
5. त्यामुळे रासायनिक खतांच्या कार्यक्षमतेत घट येऊन पिकांना खतांच्या दिलेल्या मात्रा वाया जातात.
6. ऊस पिकामध्ये सुरुवातीची 120 दिवसांपर्यंतचा काळ हा अत्यंत संवेदनशील मानला जातो. त्यामुळे या अवस्थेत तणनियंत्रण अत्यंत आवश्यक असते.
7. ऊस लागवडीमध्ये विशेषतः लव्हाळा या तणाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात दिसून येतो. त्यामुळे लागवडीच्या सुरुवातीपासूनच तण नियंत्रणासाठी योग्य नियोजन करणे आवश्यक आहे.

ऊसातील लव्हाळा तण नियंत्रण | Sugarcane lavhala control –

अ) प्रतिबंधात्मक उपाय –

1. शेतामध्ये पूर्ण कुजलेले शेणखत किंवा कंपोस्ट खत वापरावे.
2. शेतातील पाणी पाट, बांध, कंपोस्ट खड्डे या जवळ तणे उगवू देऊ नयेत.
3. उगवल्यास फुलोऱ्यावर येण्यापूर्वी उपटून टाकावी. त्यामुळे तणांचा प्रसार रोखला जातो.

ब) निवारनात्मक उपाय –

1. उन्हाळ्यामध्ये आपल्याला शेतीची खोल नांगरट करायची आहे. जेणेकरून जमिनीतील लव्हाळ्याच्या गाठी वर येतील आणि उन्हामध्ये त्या तळून नष्ट होतील.
2. नांगरणी नंतर त्या ठिकाणी दोन ते तीन वेळा कोळपणी करायची आहे.
3. पिक फेरपालट, सेंद्रिय मल्चिंग, आंतरपीक या पद्धतीचा वापर करावा.

क) जीव जिवाणूंचा वापर –

1. कीटक, जिवाणू, बुरशी, वनस्पती यांचा वापर करूनही तणनियंत्रण करता येते.उदा.
2. लव्हाळा या तणाचे निर्मूलन बॅक्ट्रा वेरुटाना या जैविक कीटक यांद्वारे करता येते.

ड) लव्हाळा तण नियंत्रण करण्यासाठी तन नाशके –

1. उगवणपूर्व (प्रमाण / प्रति एकर) | Pre emergence herbicide –

👉टाटा मेट्री, टाटा इंडिया लिमिटेड, मेट्रीब्युझीन (70 टक्के डब्ल्यू.पी.) 400 ग्रॅम
👉डायुरेक्स, आदामा, डायुरॉन (80 टक्के डब्ल्यू.पी) 800 ग्रॅम

2. उगवनी नंतर वापरता येणारी तन नाशके | Post emergence herbicide –

👉सेम्प्रा, धानुका, हॅलो सल्फुरॉन मिथाईल (75 टक्के डब्ल्यू जी) 36 ग्रॅम प्रति एकर प्रमाणे तण 2 ते 3 पानांवर असताना फवारणी करावी किंवा
👉वीडोर, क्रिस्टल, 2, 4 डी अमाईन सॉल्ट (58 टक्के एस.एल.) 2.50 लिटर प्रति एकर

2. पीक लागवड नसलेल्या क्षेत्रामध्ये तण उगवणीनंतर (आंतरप्रवाही तणनाशक) –

👉ऑल राऊंडर, नॅशनल पेस्टिसाइड अँड केमिकल्स
👉ग्लायफोसेट
👉प्रमाण – 800 मिलि प्रति एकरी



तणनाशकांची फवारणी करताना घ्यावयाची काळजी –

1. तणनाशकांची शेतात फवारणी करतेवेळी प्रथमोपचार साहित्य नेहमी तयार ठेवावे.
2. खाद्य पदार्थ, औषधे व तणनाशकांचा संपर्क येऊ देऊ नये.
3. तणनाशके लहान मुलांच्या संपर्कात येणार नाही, अशा ठिकाणी कुलूपबंद ठेवावीत.
4. तणनाशकांच्या डब्यावरील पतंगाच्या आकाराचे चिन्ह व त्याचा अर्थ लक्षात घेऊन योग्य तणनाशकाची निवड करावी.
5. पीक, कीड व रोग निहाय तणनाशकांची निवड करून शिफारशीत प्रमाणात फवारणी करावी.
6. तणनाशक फवारणी साठी वापरलेला पंप चुकूनही कीडनाशकांच्या फवारणी साठी वापरू नये.
7. तणनाशक हाताळताना व फवारणी करताना अंगरक्षक कपडे, हातमोजे, चष्मा, मास्क, टोपी, गमबुट इ. चा वापर करावा व संपूर्ण शरीर झाकले जाईल याची काळजी घ्यावी.
8. तणनाशके द्रावण हाताने न ढवळता काडीच्या साहाय्याने हातात हात मोजे घालून ढवळावे.
9. तणनाशके अंगावर पडू नयेत यासाठी वाऱ्याच्या विरुद्ध दिशेने फवारणी करू नये.
10. फवारणीचे काम पूर्ण झाल्यानंतर अंगावरील कपडे स्वच्छ धुवावेत.
11. तणनाशकांचे रिकामे डब्बे तसेच शेतात फेकून न देता पाण्याचे स्त्रोत विहीर, नदीपासून दूर जमिनीत खोल गाडून टाकावे.

Conclusion I सारांश –

शेतकरी मित्रांनो तुम्हाला krushi doctor या वेबसाइट वरील sugarcane lavhala control: ऊस पिकातील लव्हाळा नियंत्रण हा लेख तुम्हाला कसा वाटला वाटला हे खाली कमेंट बॉक्स मध्ये सांगायला विसरू नका. आणि हा लेख जर तुम्हाला आवडला तर तुमच्या इतर शेतकरी मित्रांसोबत शेयर नक्की करा. आणखी अशा प्रकारची कृषीविषयक माहिती पाहण्यासाठी आमच्या krushi doctor या वेबसाईटला नक्की भेट द्या.

FAQ’s | वारंवार विचारले जाणारे प्रश्न –

1. लव्हाळा या तणाचा उपयोग कशासाठी होतो?
उत्तर – सुगंधी तेल आणि अगरबत्ती बनवण्यासाठी लव्हाळा या तणाचा उपयोग होतो.

2. लव्हाळा हे तण कोणत्या वर्गात मोडते?
उत्तर – लव्हाळा हे तण एकदल वर्गीय आहे.

3. लव्हाळा या तणाचा प्रादुर्भाव कोणत्या पिकात होतो?
उत्तर – लव्हाळा या तणाचा प्रादुर्भाव सोयाबीन ऊस मका भात या पिकांमध्ये होतो.

4. तणनाशके वापरणे सुरक्षित आहे का?
उत्तर – तणनाशकांसह सर्व रसायने मानवी आरोग्यासाठी संभाव्य घातक आहेत.



लेखक –

k Surykant


शेयर करा