शेतकरी मित्रांनो नमस्कार, Krushi Doctor (कृषी डॉक्टर) या शेती विषयक माहिती देणाऱ्या वेबसाइट वरती आम्ही आपले सहर्ष स्वागत करत आहे. आजच्या लेखामध्ये आपण ऊस पिकामध्ये आढळणाऱ्या पोक्का बोइंग (pokkah boeng disease of sugarcane) या बुरशीजन्य रोगाबद्दल सविस्तर माहिती पाहणार आहोत. यामध्ये प्रामुख्याने पोक्का बोईंग रोग म्हणजे काय, त्याचा प्रादुर्भाव कसा होतो, त्याचे नियंत्रण करण्यासाठी काय काय उपाय योजना आहेत याबद्दल आपण सविस्तर माहिती पाहणार आहोत.
प्रस्तावना –
1.पोक्का बोईंग (pokkah boeng disease of sugarcane) हा ऊस पिकावरील बुरशीजन्य रोग आहे.
2.याचा प्रादुर्भाव साधारणपणे पावसाळ्यात किंवा जून ते सप्टेंबर या काळात दिसून येतो.
3.पोक्का बोईंग फ्युसेरियम मोनिलिफॉर्मी या बुरशीमुळे पसरते.
4.शीर्ष भेदक कीटकां प्रमाणे झाडाच्या वरच्या भागावर परिणाम करते.
5. लक्षणांमधील या समानतेमुळे अनेकदा शेतकरी रोगाचे चुकीचे निदान करून पिकामध्ये चुकीच्या बुरशीनाशकाचा वापर करतात.
6.या रोगाचा जास्त प्रादुर्भाव झाल्यामुळे उसाच्या रोपाला वाढीसारख्या समस्यांना तोंड द्यावे लागते, जे प्राथमिक अवस्थेत नियंत्रण पद्धतीवर लक्ष देऊन काही प्रमाणात कमी करता येते.
7.या रोगास को 419, कोसी 671, व्हीएसआय 434, को 86032, एमएस 10001 आणि कोव्हीएसआय 9805 या ऊस जाती बळी पडतात.
पोक्का बोइंग मुळे पिकांचे होणारे नुकसान –
1.रोगाच्या सुरुवातीच्या अवस्थेत, वरची पाने देठाच्या जोडणीवर पिवळी आणि पांढरी होतात. काही दिवसांनी लालसर तपकिरी होऊन सुकतात.
2.शेणखताचा जास्त प्रादुर्भावामुळे पाने एकमेकात गुंतलेली आणि दोऱ्या सारखे दिसतात. कुजतात आणि पडतात.
3.नवीन येणारी पाने इतर पानांपेक्षा लहान असतात.
4.पिकातील प्रकाश संश्लेषण प्रक्रियेवर परिणाम होऊन झाडांची वाढ खुंटते.
पोक्का बोईंग रोगाचा प्रसार –
ऊसातील पोक्का बोइंग (pokkah boeng disease of sugarcane) या रोगाचा प्रसार प्रामुख्याने हवेमार्फत होतो. याशिवाय पाणी, पाऊस व कीटकांद्वारेदेखील या रोगाचा प्रसार होतो; मात्र रोगाचा प्रसार बेण्याद्वारे होत नाही.
पोक्का बोईंग (pokkah boeng disease of sugarcane) रोगाची लक्षणे –
1.पावसाळा हंगामापूर्वी पडलेल्या वळीव पावसामुळे हवेत आर्द्रता वाढते. त्या वेळी पोक्का बोंग या रोगास कारणीभूत असणाऱ्या फुजॅरियम मोनिलीफॉरमी या हवेद्वारे पसरणाऱ्या बुरशीची लागण उसाच्या शेंड्याकडील कोवळ्या पानांवर दिसून येते.
2. ऊसामध्ये सुरुवातीस तिसऱ्या व चौथ्या पानांच्या बेचक्यात पांढरट पिवळसर पट्टे दिसून येतात.सुरकुत्या पडून पाने आकसतात. त्यांची लांबी घटते.
2.अति तीव्रतेमध्ये पाने सडतात किंवा कुजतात. नंतर गळून पडतात किंवा एकमेकांत गुरफटतात. काही वेळा पोंगेमर किंवा शेंडा कुज दिसून येते.
3.रोगग्रस्त ऊसाच्या कांड्या वर कांडी काप सारखी लक्षणे दिसून येतात.
4.रोगट उसाच्या कांड्या आखूड झाल्याने व पांगशा फुटलेल्या उसाच्या उत्पादनात घट येते.
हे देखील नक्की वाचा – खोडवा ऊस व्यवस्थापन (khodwa us niyojan): टार्गेट एकरी 100 टनाचे !
पोक्का बोइंग (pokkah boeng disease of sugarcane) या रोगाचा प्रादुर्भाव –
1.राज्यातील सर्व हवामान विभागात रोगाचा प्रादुर्भाव दिसून येतो.
2.जास्त पर्जन्यमानाच्या ठिकाणी हवेमध्ये वाढलेली आर्द्रता जास्त काळ राहिल्याने रोगाचे प्रमाण वाढते. 3.मॉन्सूनपूर्व वळीव पाऊस झाल्यावर रोगाचा प्रादुर्भाव ऊसाच्या पोग्यात किंवा कोवळ्या पानांवर दिसून येतो.
पोक्का बोइंग (pokkah boeng disease of sugarcane) या रोगासाठी एकात्मिक उपाययोजना –
1.रोगामुळे शेंडे कुज व पांगशा फुटलेले ऊस शेतातून वेगळे काढावे व नष्ट करावेत, जेणेकरून रोगाच्या प्रसारास काही प्रमाणात आळा बसेल.
2.माती परीक्षणावर आधारित रासायनिक खतांची (मुख्य व सुक्ष्म अन्नद्रव्यांची) मात्रा वेळेवर व योग्य प्रमाणात द्यावी. बोरॉन या सूक्ष्मअन्नद्रव्याची कमतरता असेल तर या रोगाची तिव्रता वाढते.
3.शेतात पाण्यामुळे दलदल होणार नाही, याची काळजी घ्यावी. पाण्याचा निचरा योग्य पद्धतीने करावा.
4. रासायनिक उपाय –
1. टाटा रॅलीस इंडिया लिमिटेड, टाटा ब्लीटॉक्स, कॉपर ऑक्सी क्लोराईड (50%wp) 2 ग्रॅम प्रती लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. किंवा
2. धानुका, धानुस्टिन, कार्बेन्डाझिम (50%wp) 1 ग्रॅम प्रती लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. किंवा
3. सिजेंटा इंडिया लिमिटेड, एबिक मॅन्कोझेब (75%wp)3 ग्रॅम प्रती लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
4. वरील बुरशीनाशकाच्या 10 दिवसांच्या अंतराने स्टिकरसह आवश्यकतेनुसार 2 ते 3 फवारण्या कराव्यात.
Conclusion I सारांश –
शेतकरी मित्रांनो तुम्हाला krushi doctor या वेबसाइट वरील आमचा ऊस पिकामध्ये आढळणाऱ्या पोक्का बोइंग (pokkah boeng disease of sugarcane) या बुरशीजन्य रोगाबद्दलचा हा लेख तुम्हाला कसा वाटला वाटला हे खाली कमेंट बॉक्स मध्ये सांगायला विसरू नका. आणि हा लेख जर तुम्हाला आवडला तर तुमच्या इतर शेतकरी मित्रांसोबत शेयर नक्की करा. आणखी अशा प्रकारची कृषीविषयक माहिती पाहण्यासाठी आमच्या krushi doctor या वेबसाईटला नक्की भेट द्या.
FAQ’s | वारंवार विचारले जाणारे प्रश्न –
1.पोक्का बोइंग हा रोग कोणत्या पिकावर आढळतो ?
उत्तर – पोक्का बोइंग हा बुरशीजन्य रोग ऊस या पिकावर आढळतो.
2. पोक्का बोईंग या रोगाचा प्रादुर्भाव ऊसाच्या कोणत्या जातीवर होतो ?
उत्तर – या रोगास को 419, कोसी 671, व्हीएसआय 434, को 86032, एमएस 10001 आणि कोव्हीएसआय 9805 या ऊस जाती बळी पडतात.
3. पोक्का बोईंग या रोगाचा प्रसार कसा होता ?
उत्तर – पोक्का बोइंग (pokkah boeng disease of sugarcane) या रोगाचा प्रसार प्रामुख्याने हवेमार्फत होतो. याशिवाय पाणी, पाऊस व कीटकांद्वारेदेखील या रोगाचा प्रसार होतो; मात्र रोगाचा प्रसार बेण्याद्वारे होत नाही.
4.पोक्का बोईंग हा रोग कोणत्या बुरशीमुळे पसरतो ?
उत्तर – पोक्का बोईंग फ्युसेरियम मोनिलिफॉर्मी या बुरशीमुळे पसरतो.
लेखक –
कृषी डॉक्टर सूर्यकांत
9168911489