शेयर करा

cotton farming in marathi

नमस्कार शेतकरी मित्रांनो, कृषी डॉक्टर (Krushi Doctor) या वेबसाईटवर आपले आम्ही सहर्ष स्वागत करत आहोत. आज आपण या लेखांमध्ये कापूस लागवड माहिती (cotton farming) याविषयी सविस्तर पणे पाहणार आहोत. कापसाला पांढरे सोने म्हटले जाते, याच कारण म्हणजे कापसाला आलेला भाव आणि त्याने मिळून दिलेले भरपूर आर्थिक उत्पन्न होय. विदर्भ मराठवाडा आणि सध्या पश्चिम महाराष्ट्रात नगदी पीक म्हणून शेतकरी कापूस लागवडीकडे वळला आहे.

कापूस लागवडीसाठी (cotton farming) आवश्यक हवामान –

1. कापसाचे पिक हे जास्त कालावधीचे पीक आहे. कपाशी शेतीसाठी (cotton farming) कोरडे आणि स्वच्छ उबदार हवामान लागते.
2. बियाण्यांच्या उगवणीसाठी 18 ते 20 अंश सेल्सिअस तापमान लागते. अधिक वाढीसाठी 20 ते 27 अंशाचे तापमान आवश्यक असते.
3. हवेतील आद्रता 75 टक्के पेक्षा कमी असावी लागते. चांगली बोंडे भरण्यासाठी आणि उमलण्यासाठी उष्ण दिवस आणि थंड रात्र उपयुक्त असते.



cotton farming साठी आवश्यक जमीन –

1. कपाशीची शेती (cotton farming) करण्यासाठी योग्य जमिनीची निवड करणे खूप गरजेचे असते.
2. कपाशी लागवड (kapus Lagwad mahiti) करण्यासाठी काळी, मध्यम ते खोल आणि पाण्याचा निचरा व्यवस्थित होणारी जमीन निवडावी.
3 जमिनीचा सामू साधारणपणे 6 ते 8.5 पर्यंत असावा.
4. कपाशी लागवड करण्याआधी एक खोल नांगरट आणि 2 ते 3 कुळवाच्या पाळी देऊन ढेकळे फोडावीत. आधीच्या पिकांची धसकटे, पाला आणि इतर कचरा गोळा करून तो जाळावा आणि शेत स्वच्छ करावे. हेक्टरी शेणखत 15 ते 20 टन वापरावे.

कापूस लागवडीसाठी (cotton farming) पेरणीतील अंतर –

अ) सुधारित वाण – 90 X 60 सेंटीमीटर

ब) संकरित वाण –
1. अमेरिकन X अमेरिकन – 90 X 60 सेंटीमीटर
2. अमेरिकन X इजिप्शियन – 90 X 120 सें.मी.

कापूस (cotton) पेरणीचा योग्य हंगाम –

1. शेतकऱ्यांना कपाशीची लागवड करण्यासाठी जून महिन्याचा पहिला आठवडा हा योग्य कालावधी समजला जातो.
2. या कालावधीत पेरणी केल्यास कीड व रोगाचे प्रमाण कमी होते.



पेरणीसाठी वाणांची निवड –

1. कपाशीची लागवडीसाठी (kapus Lagwad) सुधारित आणि संकरित वाणांची निवड करणे अतिशय महत्त्वाचे असते.
2. शिफारस केलेल्या वाणांची पेरणी करावी.
3. बियाणे प्रमाणित असल्याची खात्री करूनच विकत घ्यावे.

4. सुधारित वाण – ( अमेरिकन – LRA 5166, JLH 168 आणि फुले 688 )

5. संकरित वाण –
अ) अमेरिकन X अमेरिकन – H 10
ब) अमेरिकन X इजिप्शियन – DCH 32, Phule 388

6. महाराष्ट्रातील शिफारशी मधील निवडक बिटी संकरित कापूस वाण –
अ) अमेरिकन X अमेरिकन – राशी 2, राशी 659, राशी 656, अंकुर 9 किंवा अजित 155
ब) अमेरिकन X इजिप्शियन – काशिनाथ, सुपर फायबर किंवा अंकुर 1951

cotton farming साठी एकरी किती बियाणे लागते ?

संकरित वाणाचे एकरी 800-900 ग्रॅम बियाणे लागते.

कापूस लागवडीपूर्वी बीज प्रक्रिया कशी करावी ?

अ) बुरशीनाशक –
1. अप्रमाणित बियाण्यास थायरम बुरशीनाशकांची प्रक्रिया प्रति किलो बियाण्यास ३ ग्रॅम या प्रमाणात करावी. 2. त्यामुळे मर, करपा यांसारख्या रोगांचा प्रादुर्भाव कमी होतो.

ब) जीवाणू संवर्धक –
1. हवेतील नत्राचे स्थिरीकरण करुन नत्र खतांच्या मात्रेत बचत करण्यासाठी अझाटोबॅक्टर किंवा ऍझोस्पिरीलम या जिवाणू संवधर्काची प्रति किलो बियाण्यास २५ ग्रॅम या प्रमाणात प्रक्रिया करावी.
2. तसेच जमिनीतील मातीच्या कणांद्वारे धरुन ठेवलेले स्फुरद पिकांना उपलब्ध करुन देण्यासाठी स्फुरद विरघळणा-या जिवाणू संवर्धकाची प्रक्रिया करावी म्हणजे नत्र व स्फुरदयुक्त खताच्या मात्रेमध्ये जवळजवळ २५ ते ३० टक्के बचत होते.



पेरणी नंतर कापूस पिकाचे खत व्यवस्थापन कसे करावे ?

1. कापसाला 120 : 60 : 60 किलोग्रॅम नत्र, स्‍फुरद व पालाश प्रती हेक्‍टरी द्यावे.
2. म्‍हणजचे मराठवाड्यात कोरडवाहू लागवडीमध्‍ये बीटी कापूस पिकास एकरी 48 किलोग्रॅम नत्र, 24 किलोग्रॅम प्रत्‍येकी स्‍फुरद व पालाश द्यावे.
3. कोरडवाहू लागवडीमध्‍ये 40 टक्‍के नत्र पेरणीच्‍या वेळी, 30 टक्‍के नत्र एक महिन्‍यानंतर व उर्वरित 30 टक्‍के नत्र दोन महिन्‍यानंतर विभागून देण्‍यात यावे.
4. संपूर्ण स्‍फुरद व पालाश पेरणीच्‍या वेळीच द्यावे.

cotton farming मध्ये पाणी व्‍यवस्‍थापन कसे करावे ?

1. कापूस हे पीक महाराष्‍ट्रात खरीप हंगामात घेत असल्‍यामुळे या कालावधीत पावसाळा हा ऋतू चालू असतो.
2. त्‍यामुळे फारशी पाण्‍याची गरज भासत नाही. मात्र अलीकडील काळात ओलीता खालील कापूस पिकाच्‍या क्षेत्रात काही प्रमाणात वाढ झालेली दिसून येत आहे.
3. यामध्‍ये प्रामुख्‍याने शासनाच्‍या विविध योजनांमधून साकारलेले लघुपाटबंधारे, छोटे-मोठे पाझर तलाव, साठवण तलाव, विहिरी, बंधारे व शेततळे यामुळे महाराष्‍ट्रातील बागायत कापूस पिकाचे क्षेत्र व उत्‍पादन वाढत आहे.
4. पिकाच्‍या जास्‍तीत जास्‍त उत्‍पादनासाठी योग्‍य पाणी व्‍यवस्‍थापन करणे गरजेचे आहे.

cotton farming मध्ये संजीवकाचा वापर कसा करावा ?

1. कपाशीला लागणारे पात्या, फुले, बोंडे यांची कीड, रोग व हवामानातील बदलामुळे मोठ्या प्रमाणात गळ होते व त्यामुळे उत्पादनात घट येते.
2. नैसर्गिक कारणांमुळे होणारी पात्या, फुले, बोंडे यांची गळ कमी करण्यासाठी नॅप्थॅलीन ऍसिटिक ऍसिड (प्लॅनोफिक्स) या संजीवकाची हेक्टरी १०० मि.ली व ५०० लिटर पाणी या प्रमाणात मिसळून पात्या लागल्या असतील तेव्हा पहिली फवारणी करावी.
2. दुसरी फवारणी त्यानंतर १५ ते २० दिवसांनी करावी. यामुळे उत्पादनात १० टक्के वाढ होते.

कापूस पिकाची वेचणी –

1. शेतातील अंदाजे ३० ते ३५ टक्के बोंडे फुटल्यावर पहिली वेचणी करावी, त्यानंतर साधारणपणे १५ ते २० दिवसांच्या अंतराने २ ते ३ वेचण्या कराव्यात.
2. कापसाची वेचणी सकाळी करणे अधिक चांगले, कारण हवेतील ओलाव्याने काडीकचरा, असलेला व किडका आणि कवडी कापूस वेगळा वेचावा.
3. प्रत्येक जातीचा कापूस वेगळा साठवावा, वेचल्यानंतर कापूस ३-४ दिवस उन्हात वाळवून स्वच्छ व कोरड्या जागी साठवावा.



कापूस पिकातील कीड आणि रोग व्यवस्थापन –

1. बुरशीजन्य करपा (अल्टरनेरिया ब्लाइट) – प्रॉपिकोन्याझोल (५०० मिली) (ट्रेड नाव – बंपर, कंपनी नाव – प्लांटीक्स क्रॉप केअर) किंवा कॉपर ऑक्सिक्लोराइड (१५०० ग्रॅ.)( ट्रेड नाव- ब्लिटॉक्स, कंपनी नाव – टाटा )+ स्ट्रेप्टोसायक्लीन (६० ग्रॅ.)(ट्रेड नाव- अलेस्त्रा, कंपनी नाव- हिंदुस्तान एंटीबायोटिक )५०० लि. पाण्यात मिसळून १०-१५ दिवसाचे अंतराने दोन फवारण्या कराव्यात.

2. जीवाणूजन्य करपा (बॅक्टेरिअल लीफ ब्लाइट) – प्रॉपिकोन्याझोल (५०० मिली) (ट्रेड नाव – बंपर, कंपनी नाव – प्लांटीक्स क्रॉप केअर) किंवा कॉपर ऑक्सिक्लोराइड (१५०० ग्रॅ.) + स्ट्रेप्टोसायक्लीन (६० ग्रॅ.) ५०० लि. पाण्यात मिसळून १०-१५ दिवसाचे अंतराने दोन फवारण्या कराव्यात.

3. मर व मूळकूज (बिल्ट व रुट रॉट) – तीन ग्रॅम प्रति किलोप्रमाणे थायरम किंवा ४ ग्रॅंम प्रति किलो प्रमाणे ट्रायकोडरमाची बीजप्रक्रिया करावी, रोग प्रतिकारक वाण वापरावे.

4. मावा –
1. बीज प्रक्रिया – इमिडाक्लोप्रिड ७० डब्ल्यू.एस ४ ग्रॅम (ट्रेड नाव – कॉन्फिड्डोर , कंपनी नाव- बायर क्रॉप सायन्स) किंवा कार्बोसल्फान २५ डी.एस ६० ग्रॅम प्रतिकिलो बियाण्यास
2. खोडप्रक्रिया – ऑक्सीडिमेटॉन मिथील २५ ई.सी. ( ट्रेड नाव – मेटासिस्टॉक्स, कंपनी नाव- युनायटेड फॉस्फरस लिमिटेड ) हे आंतरप्रवाही किटकनाशक १:४ या प्रमाणात पाण्यात मिसळून कपाशी पिकाच्या हिरव्या खोडावर मध्यभागी एका बाजूने ४-५ इंच भागावर लावावे.
3. ५ % निंबोळी अर्काची फवारणी.
4. क्रायसोपा अंडी ५०,०००/- प्रति हेक्टरी पिकावर सोडावीत.
5. डायमिथोएट ३० ई.सी ( ट्रेड नाव- टाफगोर , कंपनी नाव – टाटा रॅलिस) १३ मिली ऑसिफेट ७५ एस.पी. १० ग्रॅम प्रती १० लिटर पाण्यात मिसळून फवारावे.

5. फुलकिडे – डायमेथोएट ३० ईसी ( ट्रेड नाव- टाफगोर टाटा रॅलीस , कंपनी नाव- टाटा) १३ मिली, २५ ईसी किंवा फिप्रोनील ५ ई.सी. ( ट्रेड नाव – प्रोंटो शाम्पू , कंपनी नाव – सुपर बायोटेक कंपनी) ३० मिली प्रती १० लिटर पाण्यात मिसळून फवारावे.

6. पांढरी माशी – ऍसिटीमिप्रिड २० एस.पी . (ट्रेड नाव – चिपको, कंपनी नाव – अवेंटीस क्रॉप सायन्सेस ) २ ग्रॅम किंवा – ट्रायझोफॉस ४० ई.सी ३५ मि.ली. प्रती १० लिटर पाण्यात मिसळून फवारावे.

7. पिठ्या ढेकूण – व्हर्टिसिलीयम लेकानी ( ट्रेड नाव – बायो लाईन, कंपनी नाव – बायोटेक इंटरनॅशनल लिमिटेड ) ५० ग्रॅम प्रती १० लिटर पाण्यात मिसळून फवारावे.

कापूस (cotton production) पिकाचे उत्पादन किती निघते ?

– प्रत्येक वेचणीचे उत्पादन – ३ ते ४ क्विंटल प्रति एकर
– संपूर्ण उत्पादन – १२ – १५ क्विंटल प्रति एकर



Conclusion | सारांश –

कापूस पिकाचे अधिक उत्पादन घ्यावयाचे असल्यास जमिनीची मशागती पासून काढणी पर्यंत नियोजनबद्ध व्यवस्थापन केल्यास नक्कीच जास्तीत जास्त उत्पादन घेता येइल. शेतकरी मित्रांनो तुम्हाला krushi doctor वेबसाइट वरील आमचा कापूस लागवडी विषयी संपूर्ण माहिती kapus lagwad mahiti marathi (cotton farming) हा लेख तुम्हाला कसा वाटला वाटला हे खाली कमेन्ट बॉक्स मध्ये सांगायला विसरू नका. आणि हा लेख जर तुम्हाला आवडला तर तुमच्या इतर शेतकरी मित्रांसोबत शेयर नक्की करा.

FAQs | वारंवार विचारले जाणारे प्रश्न –

1. कापसाची लागवड कधी करावी?
उत्तर – कापूस पिकाची लागवड मे महिन्याच्या शेवटचा आठवडा ते जूनच्या पहिल्या आठवड्यात करावी. तर कोरडवाहू कापूस पिकाची लागवड मान्सूनचा तीन-चार इंच पाऊस पडल्यानंतर करावी. १५ जुलैनंतर पेरणी केल्यास उत्पादनात घट येते.

2. कापूस किती दिवसाचे पीक आहे?
उत्तर – कपाशीचे पीक सुमारे सहा महिने शेतात राहत असल्यामुळे योग्य जमिनीची निवड अत्यंत महत्त्वाची असते.

3. प्रत्येक एकरी कापसाचे उत्पन्न कसे मोजतात?
उत्तर – उदाहरणार्थ, एक उत्पादक 10 फूट ओळीत (40″ अंतर) सरासरी 100 बॉल मोजतो.

4. भारतातून सर्वाधिक कापूस आयात कोणता देश करतो?
उत्तर – बांगलादेशानंतर चीन हा भारतातून कापूस आयात करणारा दुसरा सर्वात मोठा देश आहे आणि भारतातून 80% पेक्षा जास्त कापूस आयात करतो.

5. कापसाची एक गाठ म्हणजे किती किलो?
उत्तर – जगातील प्रमुख उत्पादक देशांचे १९७० अखेरचे कापूस उत्पादन हजार गाठींंमध्ये (१ गाठ = २२३ किग्रॅ.)

लेखक,

कृषि डॉक्टर
9168911489


शेयर करा