शेतकरी मित्रांनो नमस्कार, स्वागत आहे Krushi Doctor या ऑनलाइन कृषि परिवरामध्ये. तुम्हाला माहीत आहे ? आपण बऱ्याचदा एखाद्या अन्नद्रव्य कमतरतेला रोग समझून बसतो. कारण आपल्याला माहीतच नसत की तो रोग आहे की एखाद्या विशिष्ट अन्नद्रव्याची कमतरता ( nutrient deficiency in plants ). म्हणूनच आपण आजच्या लेखामध्ये पाहणार आहोत की पिकावर येणाऱ्या विविध अन्नद्रव्य कमतरता आपण आपल्या शेतावरच कश्या प्रकारे तपासू शकतो आणि त्यावर योग्य उपाय करून आपले पीक निरोगी ठेऊ शकतो. चला तर वेळ न घालवता सुरू करुयात.
पिकातील nutrient deficiency कशी ओळखाल?
1. नत्र | nitrogen deficiency in plants –
– पानांचा भाग पिवळा पडणे, सुरुवात जुन्या पानापासून सुरू होते.
– झाडाची वाढ खुंटते. जोम कमी होतो.
2. स्पूरद | phosphorus deficiency –
– पानांवर जांभळट किंवा लालसर रंग येतो.
– फुल आणि फळ धारणा उशीरा होते.
3. पालाश | potassium deficiency in plants –
– पानांच्या कडा पिवळसर किंवा तपकिरी होतात.
– देठ कमकुवत होते आणि पीक रोगांना लवकर बळी पडते.
4. कॅल्शियम | calcium deficiency in plants –
– कोवळ्या पानांची वाढ खुंटते.
– फळांमध्ये ब्लॉसम-एंड रॉट नावाचा रोग आढळून येतो.
5. मॅग्नेशियम | magnesium deficiency in plants –
– पानांच्या शिरांमधील भाग पिवळा पडतो. सुरुवात ही जुन्या पानापासून होते.
– पानांच्या कडा कुरवाळू लागतात आणि ठिसूळ होऊ लागतात.
6. गंधक | sulphur deficiency in plants –
– कोवळी आणि नवीन पाने पिवळी पडतात.
– पिकाची वाढ कमी होते आणि परिपक्वता देखील लांबते.
7. लोह | iron deficiency in plants –
– पानांच्या शिरा दरम्यान भाग पिवळसर होतो आणि शिरा हिरव्या राहतात.
– पाने पांढरी झालेली दिसून येतात.
8. मॅंगनीज | Manganese deficiency in plants –
– पानांच्या शिरा दरम्यान भाग पिवळा पडतो आणि त्याची सुरुवात ही लहान पानांपासून होते.
– रोपाची वाढ कमी होते आणि पानावर क्लोरोसिस आढळून येते.
9. जस्त | zinc deficiency in plants –
– पानांचा आकार कमी होतो.
– पानांची विकृत वाढ दिसून येते आणि इंटरव्हेनल क्लोरोसिस देखील पाहायला मिळते.
10. तांबे | Copper deficiency in plants –
– पानांचे टोक कोमेजते आणि रंग तपकिरी होतो.
– पिकाची वाढ खुंटते आणि पिकावर डायबॅक नावाचा रोग आढळून येतो.
( सूचना – अन्नद्रव्य कमतरता प्रमाणेच आमची इतर माहिती विडियो स्वरूपात पाहण्यासाठी आमच्या Krushi Doctor या यूट्यूब चॅनल ला भेट द्या. )
nutrient deficiency वरील ठोस उपाय –
1. खत व्यवस्थापन – पिकाचे खत व्यवस्थापन ही माती परीक्षण वर आधारित करा. हळुवार पने रिलीज होणारी खते आणि जास्तीत जास्त सेंद्रिय खतांचा वापर करा.
2. सेंद्रिय खतांचा अधिक वापर – मातीमध्ये विविध आणि अधिक प्रमानामध्ये सेंद्रिय खतांचा वापर करा. उदा – शेणखत, गांडूळ खत, कोंबड खत, सिटी कोंपोस्ट, निंबोळी पेंड तसेच शेतामधील इतर टाकाऊ पदार्थ.
3. रासायनिक विद्राव्य खतांच्या फवारण्या – शिफारशीत आणि नामांकित कंपन्यांची विद्राव्य खते फवारणीसाठी वापरा. जेणेकरून त्वरित रिजल्ट मिळतील.
4. जमिनीचा सामू ( ph ) दुरुस्त करा – मूळावाटे कोणत्याही अन्नद्रव्याचे आपटेक होण्यासाठी जमिनीचा आणि पाण्याचा सामू ( ph ) संतुलित असणे फार महत्वाचे आहे. त्यामुळे त्वरित माती परीक्षण करून जमिनीचा सामू अगोदर दुरुस्त करून घ्यावी. सामू कमी म्हणजे 6.5 पेक्षा कमी असले तर जमिनीत चुना मिसळावा आणि सामू ( ph ) जर जास्त असेल तर जमिनीमध्ये तुम्ही गंधक मिसळू शकता.
5. मल्चिंग – बेडवर मल्चिंग करणे हा अतिशय उत्तम पर्याय आहे बेडमधील ओलावा, सूक्ष्मजीव आणि अन्नद्रव्य योग्य प्रमानात ठेवण्याचा. आपण जर बेडवर जैविक किंवा प्लॅस्टिक मल्चिंग केले तर मुळांची वाढ चांगली होते आणि मुळाद्वारे खतांचे अपटेक चांगले होते. परीनामी पिकावर कोणत्याही अन्नद्रव्यांची कमतरता दिसत नाही.
6. पिकाची फेरपालट करा – दरवर्षी एकाच जमिनीमध्ये एकच-एक पीक घेणे टाळावे. कारण प्रत्येक पिकाची अन्नद्रव्य गरज ही वेग-वेगळी असते. आपण जर एकच पीक घेत राहिलो तर विशिष्ट अन्नद्रव्यांची कमतरता जमिनीत मध्ये तयार होऊ शकते. त्यामुळे पिके बदलावी जेणे करून खते संतुलित प्रमानामध्ये वापरली जातील.
7. पाण्याचे योग्य नियोजन करा – जमिनीला कधीही अधिक किंवा कमी पानी देऊ नका. अधिक पानी दिल्याने जमीनितील अन्नद्रव्य मुळांच्या कक्षेच्या बाहेर जाऊन वाया जातात.
( सूचना – nutrient deficiency in plants प्रमाणेच आमचे इतर लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा – Krushi Doctor Sheti Mahiti )
Conclusion | सारांश –
अशा प्रकारे शेतकरी मित्रांनो Krushi Doctor वेबसाइट वरील आमचा “Nutrient deficiency in plants बद्दल A to Z माहिती” हा लेख आपण जर थोडासा अभ्यास करून आपल्या जमीनचे आणि पिकाचे खत व्यवस्थापन केले तर नक्कीच खतावर होणारा अतिरेक खर्च कमी होऊन आपल्या पिकाचे उत्पादन कमालीचे वाढू शकते. तुम्हाला जर हा लेख आवडला असेल असेल तर हा लेख तुम्ही तुमची इतर शेतकरी WhatsApp Group वरती देखील शेयर करू शकता, धन्यवाद!!!
FAQs | सतत विचारले जाणारे प्रश्न –
1. सूक्ष्म अन्नद्रव्ये किती आहेत?
उत्तर – पिकाच्या चांगल्या वाढीसाठी एकूण 16 अन्नद्रव्याची गरज असते. यामधील 3 ( ऑक्सिजन, कार्बन डायऑक्साइड आणि पानी ) हे निसर्गातून मोफत मिळतात. यानंतर उर्वरित 13 मधील – 3 ही मुख्य अन्नद्रव्ये असतात जशी की – नत्र, स्पूरद आणि पालाश जी पिकाला जास्त प्रमाणात लागतात. यानंतर माध्यम प्रमानात लागणारी 3 म्हणजे – कॅल्शियम, मॅग्नेशियम आणि गंधक. व उर्वरित 7 ही कमी प्रमानात लागतात. ती म्हणजे – लोह, बोरॉन, मॅंगनीज, जस्त, तांबे, मॉलिब्डेनम आणि निकेल.
2. वनस्पती अन्नद्रव्य म्हणजे काय?
उत्तर – पिकाच्या वाढीसाठी आवश्यक असणाऱ्या 16 घटकांना वनस्पती अन्नद्रव्य असे म्हणतात. यांची नावे पुढील प्रमाणे – ऑक्सिजन, कार्बन डायऑक्साइड, पानी, नत्र, स्पूरद, पालाश, लोह, बोरॉन, मॅंगनीज, जस्त, तांबे, मॉलिब्डेनम आणि निकेल.
3. मुख्य अन्नद्रव्य म्हणजे काय?
उत्तर – जी अन्नद्रव्ये पिकाला चांगल्या वाढीसाठी अतिशय जास्त प्रमानात लागतात त्यांना मुख्य अन्नद्रव्य असे म्हणतात. यांची नावे पुढील प्रमाणे – ऑक्सिजन, कार्बन डायऑक्साइड, पानी, नत्र, स्पूरद आणि पालाश.
4. पिकांच्या वाढीसाठी किती मूलद्रव्यांची आवश्यकता भासते?
उत्तर – पिकाच्या चांगल्या वाढीसाठी एकूण 16 अन्नद्रव्याची गरज असते. त्यांची नावे पुढील प्रमाणे – ऑक्सिजन, कार्बन डायऑक्साइड, पानी, नत्र, स्पूरद, पालाश, लोह, बोरॉन, मॅंगनीज, जस्त, तांबे, मॉलिब्डेनम आणि निकेल.
5. 17 आवश्यक घटक कोणते आहेत?
उत्तर – पिकाच्या चांगल्या वाढीसाठी पुढील 17 अन्नद्रव्य लागतात – हायड्रोजन, ऑक्सिजन, कार्बन डायऑक्साइड, नायट्रोजन, फॉस्फरस, पोटॅशियम, कॅल्शियम, मॅग्नेशियम, सल्फर, क्लोराईड, लोह, बोरॉन, मॅंगनीज, जस्त, तांबे, मॉलिब्डेनम आणि निकेल.
लेखक –
कृषि डॉक्टरसूर्यकांत ( इर्लेकर )