शेतकरी मित्रांनो पुनः एकदा Krushi Doctor च्या एका नवीन लेखांमध्ये आपले स्वागत आहे. आजच्या लेखामध्ये आपण पिकामध्ये वेग-वेगळ्या रसशोषक कीड नियंत्रणासाठी वापरण्यात येणाऱ्या पिवळ्या ( yellow sticky traps ), निळ्या ( blue sticky traps ) आणि पांढऱ्या चिकट ( white sticky traps ) सापळ्या बद्दल सविस्तर जाणून घेणार आहोत. आज आपण पाहणार आहोत की शेतामध्ये चिकट सापळे नेमके का वापरावेत ? ते कसे वापरावेत ? आणि आपल्याला त्याचा नेमका के फायदा होणार आहे. त्यामुळे आजचा लेख तुमच्यासाठी खूप महत्वाचा ठरणार आहे, हा लेख संपूर्ण वाचा आणि आवडला तर शेयर करायला विसरू नका. चला तर मग सुरू करुयात –
चिकट सापळे म्हणजे काय ? | yellow sticky traps
1. चिकट सापळ्यांची सोप्पी व्याख्या जर पाहिली तर – 6 x 8 इंच आकाराचे प्लॅस्टिक पासून तयार केलेले सापळे ज्याच्या वरती विशिष्ट चिकट पदार्थ लावलेला असतो.
2. यांना एक विशिष्ट रंग देखील असतो जसा की – पिवळा, निळा किंवा पांढरा.
3. या सापळ्यांच्या विशिष्ट रंगामुळे रसशोषक कीटक या कडे आकर्षित होतात आणि याच्यावर असलेल्या चिकट पदार्थामुळे कीटक चिकटून बसतात व मरण पावतात.
4. परिणामी पिकामध्ये किटक नाशक फवारणी विना किट नियंत्रण घडू शकते.
चिकट सापळे किती कलरचे असतात ?
1. पिवळे चिकट सापळे ( yellow sticky traps )
2. निळे चिकट सापळे ( blue sticky traps )
3. पांढरे चिकट सापळे ( white sticky traps )
चिकट सापळे आपण कोण-कोणत्या पिकात लाऊ शकतो ? | yellow sticky traps
कपाशी, ऊस, धान, तूर, मुंग, उडीद, सोयाबीन, भुईमूग, चवळी, कांदा / लसूण, बटाटे, वांगी, मिरची, भेंडी, टोमॅटो, कार्ली, काकडी, संत्रा, डाळींब, द्राक्षे, पपई इत्यादी
चिकट सापळे कोण-कोणत्या कीटकांना नियंत्रित करतात ?
1. पिवळे चिकट सापळे ( yellow sticky traps ) – मावा, तुडतुडे, फुलकिडे, पांढरीमाशी, खोडमाशी, फळमाशी इत्यादी.
2. निळे चिकट सापळे ( blue sticky traps ) – फुलकिडे, लीफ मायनर (पाने पोखरणारी अळी)
3. पांढरे चिकट सापळे ( white sticky traps ) – पांढरी माशी आणि काही प्रकारचे मावा कीटक
चिकट सापळ्यांची वापरा कसा करावा ? | yellow sticky traps
1. सापळे शेतात पिकाच्या ओळीत झाडापासून २० सेमी दुर अंतरावर लावावे.
2. सापळे उत्तर-पूर्व (ईशान्य) व दक्षिण-पश्चिम (नैऋत्य) दिशेनेच लावावे. जास्त प्रमाणात किटक आकर्षित होतात.
3. पिकामध्ये कीटक नियंत्रणासाठी – ३०x१५ सेंमी आकाराचे ६४ सापळे प्रति एकर याप्रमाणे आपण सोयाबीन, भुईमूंग, उडीद, कांदा चवळी, कोबी, फुलकोबी, काकडी, कोहळे इत्यादी व तत्सम उंच पिकामध्ये वापरू शकतो.
4. किंवा आपण ३०x४० सेंमी आकाराचे ३६ सापळे प्रति एकर कपाशी, वांगी, भेंडी, टोमॅटो, मिरची, संत्रा, पपई, डाळींब, द्राक्ष व तत्सम उंच पिकामध्ये वापरू शकतो.
5. जर तुम्हाला किटकांचे फक्त निरीक्षण करायचे असेल तर एकरी 13 पिवळे व 12 निळे चिकट सापळे आपण लाऊ शकता.
6. सापळे लावताना पिकाच्या ऊंची नुसार लावावेत.
7. दर दिवशी या सापळ्यांचे निरीक्षण करावे. व गरजेनुसार कीटक नाशकांच्या फवारणीचे नियोजन करावे.
8. सापळे दर 2 ते 3 महीने झाल्यावर काढून नष्ट करावेत. व त्याठिकाणी गरज असेल तर दुसरे सापळे लावावेत.
9. आंतर मशागतीचे वेळी वखरणी / डवरणी करतांना बैलांचा / औजारांचा धक्का लागणार नाही याची काळजी घ्यावी.
10. पाऊस आणि वादळी वाऱ्यामध्ये ही सापळे खाली पडू नये म्हणून सापळ्यांच्या काठीला घट्ट जमिनीमध्ये खोचून बसवावे.
( सूचना – चिकट सापळ्यांप्रमाणेच आमचा “Nutrient deficiency in plants | अन्नद्रव्य कमतरता माहिती मराठी” हा लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा – Nutrient deficiency in plants )
पिकामध्ये चिकट सापळे वापरण्याचे फायदे कोणते आहेत ?
1. पर्यावरणास अनुकूल: चिकट सापळे हानिकारक रसायनांची गरज काढून टाकून पर्यावरणास एक अनुकूल कीटक नियंत्रनाचा उत्तम पर्याय देतात.
2. ते कीटकनाशकांवरील खर्च कमी करतात आणि फायदेशीर कीटक, पक्षी आणि इतर वन्यजीवांवर होणारा विपरीत परिणाम कमी करतात.
लक्ष्यित कीटक नियंत्रण: चिकट सापळ्यांमध्ये एक अत्यंत विशिष्ट सापळ्याची यंत्रणा असते, जे प्रामुख्याने उडणाऱ्या कीटकांना लक्ष्य करतात.
4. ही विशिष्टता सुनिश्चित करते की केवळ इच्छित कीटकच पकडले जातात आणि लक्ष्य नसलेल्या जीवांना हानी पोहचत नाही.
5. सुलभ निरीक्षण: चिकट सापळे कीटक नियंत्रण साधने आणि निरीक्षण साधने दोन्ही म्हणून काम करतात.
6. सापळ्यांची नियमित तपासणी केल्याने शेतकऱ्यांना किडीच्या प्रादुर्भावाच्या तीव्रतेचे मूल्यांकन करता येते आणि पुढील कीटक व्यवस्थापन धोरणांबाबत माहितीपूर्ण निर्णय घेता येतो.
7. किफायतशीर: इतर कीटक नियंत्रण पद्धतींच्या तुलनेत चिकट सापळे तुलनेने स्वस्त असतात.
8. ते सेट करणे सोपे आहे, कमीतकमी देखभाल करावी लागते आणि याचा खर्च देखील खूप कमी आहे, ज्यामुळे ते शेतकर्यांसाठी एक किफायतशीर उपाय बनतात.
चिकट सापळे कोठून खरेदी करावेत आणि यांची किंमत किती असते ?
चिकट सापळे तुम्ही नजीकच्या कृषि सेवा केंद्रामधून किंवा ऑनलाइन देखील खरेदी करू शकता. नजकीच्या कृषि सेवा केंद्रामध्ये तुम्हाला ते थोडे महाग मिळू शकतात म्हणून मी तुम्हाला सल्ला देतो की तुम्ही ते ऑनलाइन खरेदी करावेत. कारण ऑनलाइन तुम्हाला ते स्वस्त आणि मस्त मिळतील व कोणत्याही अधिकच्या किमतीसह सह ते घरपोच देखील मिळतील .
सापळे खरेदी करण्यासाठी येथे क्लिक करा – पिवळे व निळे चिकट सापळे
याची अंदाजे किंमत आहे – 250 /- रुपये ( 13 पिवळे आणि 12 निळे चिकट सापळे )
Conclusion | सारांश –
चला तर शेतकरी मित्रांनो, आशा करती की krushi Doctor वेबसाइट वरील आमचा हा ब्लॉग तुम्हाला आवडला आहे आणि येत्या हंगामात याचा नक्कीच तुम्हाला भरगोस फायदा देखील होईल. माझी सर्व शेतकरी बांधवांना विनंती आहे की तुम्ही देखील तुमच्या शेतामध्ये ही सापळे वापरा आणि तुमचे, तुमच्या पिकाचे आणि निसर्गाचे आरोग्य सुरक्षित करा. तुम्हाला ही माहिती आवडिली असेल तर शेयर नक्की करा. धन्यवाद !!!
FAQs | सतत विचारले जाणारे प्रश्न –
1. पिवळे चिकट सापळे काम करतात का?
उत्तर –
अ) पिवळे चिकट सापळे हे खास करून पिकावर सुरुवातीच्या अवस्थेमध्ये वापरले जातात.
ब) याचे प्रमुख कार्य हे पिकावर रसशोषक किडीचा प्रादुर्भाव किती झाला आहे, हे समजण्याचे आहे.
क) त्याच्यामुळे आपल्याला पिकाच्या कीड व रोगाचे पूर्व नियोजन करता येते.
ड) पिवळ्या सापळ्यामुळे आपल्याला खास करून पांढऱ्या माशीचे नियंत्रण करता येते.
2. पिवळ्या चिकट सापळ्यांचा उद्देश काय आहे?
उत्तर –
अ) पिवळे चिकट सापळे हे खास करून पिकावर सुरुवातीच्या अवस्थेमध्ये वापरले जातात.
ब) पिवळ्या सापळ्या चे प्रमुख कार्य हे पिकावर रसशोषक किडीचा प्रादुर्भाव किती झाला आहे, हे समजण्याचे आहे. त्याच्यामुळे आपल्याला पिकाच्या कीड व रोगाचे पूर्व नियोजन करता येते.
क) पिवळ्या सापळ्यामुळे आपल्याला खास करून पांढऱ्या माशीचे नियंत्रण करता येते. याचा वापर आपण एकरी 25 ते 30 इतका करू शकतो ( निरीक्षण करण्यासाठी ).
ड) आणि जर तुम्हाला सापळा लाऊन पांढरी माशी नियंत्रण करायचे असेल तर याची संख्या तुम्हाला एकरी 80 ते 100 इतकी करावी लागेल.
3. पिवळे चिकट सापळे किती प्रभावी आहेत?
उत्तर –
अ) पिवळे चिकट सापळे हे खूप प्रभावी आहेत.
ब) तुम्हाला सुरुवातीच्या काळात किटकांचा ( पांढऱ्या माशीचा ) प्रादुर्भाव किती झाला आहे हे पटकन समजते.
क) ज्याच्यामुळे आपल्याला पांढऱ्या माशीचे नियंत्रण सुरुवातीच्या अवस्थेमध्येच करता येते. जेणेकरून आपला खर्च देखील कमी होतो.
4. पिवळे चिकट सापळे किती वेळा बदलायचे?
उत्तर –
अ) पिवळे चिकट सापळे तुम्ही 45 ते 50 दिवस ठेऊ शकता. दर आठवड्याला सापळ्याचे निरीक्षण करावे.
ब) आणि प्रादुर्भावानुसार सापळे बदलावे. म्हणजे प्रादुर्भाव जास्त असेल तर सापळे 30 ते 40 दिवसात बदला किंवा जर प्रादुर्भाव कमी असेल तर सापळे हे तुम्ही 2 ते 3 महीने वापरू शकता.
क) पावसाळ्यामध्ये हा कालावधी आणखीन कमी होऊ शकतो.
5. थ्रिप्ससाठी कोणत्या रंगाचे चिकट सापळे?
उत्तर – थ्रिप्स किडीच्या नियंत्रांसाठी आपल्याला निळ्या रंगांचे सापळे पिकामध्ये लावणे गरजेचे आहे. याचे देखील प्रमाण पिवळ्या सापळ्या प्रमाणेच आहे. एकरी 25 ते 30.
लेखक
कृषि डॉक्टर सूर्यकांत ( इर्लेकर )
9168911489