शेतकरी मित्रांनो नमस्कार, Krushi Doctor (कृषी डॉक्टर) या शेती विषयक माहिती देणाऱ्या वेबसाइट वरती आम्ही आपले सहर्ष स्वागत करत आहे. आजच्या लेखामध्ये आपण गव्हाच्या लागवड करण्यात येणाऱ्या निवडक वाणांची (wheat variety) आपण माहिती पाहणार आहोत.
प्रस्तावना –
सध्या शेतकऱ्यांची रब्बी हंगामातील पिकांची तयारी सुरू झाली आहे. यामध्ये प्रामुख्याने गव्हाची पेरणी केली जाते. सध्या रब्बी हंगामाला सुरुवात झाली आहे. या हंगामात सर्वाधिक गव्हाची शेती करत असतात. चांगली थंडी पडत असल्याने शेतकरी आता गव्हाची लागवड करत आहेत. त्यासाठी गव्हांच्या योग्य बियाण्यांची (gahu biyane) निवड करणे आवश्यक आहे. यावर्षी गव्हाच्या शेतीतून बक्कळ कमाई करायची असेल तर शेतकरी बांधवांनी गव्हाच्या सुधारित जातींची (wheat variety) पेरणी केली पाहिजे. यामुळे तुमचे उत्पन्न वाढणार आहे.
गव्हाचे बेस्ट वाण | Best wheat variety –
अ) बागायती वेळेवर पेरणी –
1. त्र्यंबक (एन आय ए डब्ल्यू: 301) –
– दाणे टपोरे आणि आकर्षक.
– सरबती वाण
– तांबेरा रोगास प्रतिकारक
– चपाती साठी उत्तम
– पीक 110 ते 115 दिवसात काढणीस तयार
– उत्पादन क्षमता (क्विंटल/हेक्टर) – 45 ते 50
2. गोदावरी (एन आय डी डब्ल्यू: 295) –
– बन्सी वाण
– तांबेरा रोगास प्रतिकारक्षम
– रवा, शेवया, कुरडई साठी उत्तम
– प्रथिनांचे प्रमाण 12 टक्के
– दाणे मोठे, पिवळसर व तेजदार.
– पीक 110 ते 115 दिवसात काढणीस तयार होते.
– उत्पादन क्षमता (क्विंटल/हेक्टर) – 45 ते 50
3. तपोवन (NIAW-917) –
– सरबत्ती वाण (sharbati wheat)
– दाणे मध्यम परंतु ओब्यांची संख्या जास्त
– तांबेरा रोगास प्रतिकारक
– चपाती व पावासाठी उत्तम
– पीक 110 ते 115 दिवसात काढणीस तयार होते.
– उत्पादन क्षमता (क्विंटल/हेक्टर) – 18 ते 20
4. फुले समाधान (एनआयएडब्ल्यू: 1994) –
– बागायती वेळेवर किंवा उशिरा पेरणी
– तांबेरा रोगास तसेच मावा किडीस प्रतिकारक
– चपाती साठी उत्तम
– प्रचलित वाणापेक्षा नऊ ते दहा दिवस लवकर कापणीस तयार होतो.
– वेळेवर पेरणी केल्यास 105 ते 110 दिवसांत पक्व होतो.
– उशिरा पेरणी केल्यास 110 ते 115 दिवसात फक्त होतो.
– उत्पादन क्षमता (क्विंटल/हेक्टर) –
1. वेळेवर पेरणी – 45 ते 50
2. उशिरा पेरणी – 42 ते 45
ब) बागायती उशिरा पेरणी –
1. कादवा (NI-9947) –
– सरबती वाण (sharbati gehu)
– चपाती साठी उत्तम,
– तांबेरा रोगास प्रतिकारक्षम
– पीक 100 दिवसात काढणीस तयार होते.
– उत्पादन क्षमता (क्विंटल/हेक्टर) – 14 ते 16
2. निफाड 34 (NIAW-34) –
– बागायती उशिरा पेरणी
– दाणे मध्यम आकर्षक
– तांबेरा रोगास प्रतिकारक.
– चपाती साठी उत्तम वाण
– पीक 105 ते 110 दिवसात काढणीस तयार होते.
– उत्पादन क्षमता (क्विंटल/हेक्टर) – 35 ते 40
3. NKAW-4627 –
– सरबती वाण
– तांबेरा रोगास प्रतिकारक्षम,
– चपातीसाठी योग्य,
– उशिरा येणाऱ्या तापमानास सहनशील.
– पीक 105 दिवसात काढणीस तयार होते.
– उत्पादन क्षमता (क्विंटल/हेक्टर) – 16 ते 18
क) जिरायती पेरणीसाठी –
1. गोदावरी (NIAW-15) –
– दाणे टपोरे, चमकदार, आकर्षक
– तांबेरा रोगास प्रतिकारक
– प्रथिने प्रमाण 12 टक्के.
– रवा,शेवया,कुरडया साठी उत्तम वाण
– पीक 110 ते 115 दिवसात काढणीस तयार होते.
– उत्पादन क्षमता (क्विंटल/हेक्टर) – 5 – 6
2. शरद (AKDW-2997-16) –
– बन्सी वाण
– तांबेरा रोगास प्रतिकारक्षम,
– रवा, शेवई व कुरडई साठी उत्तम.
– पीक 100 दिवसात काढणीस तयार होते.
– उत्पादन क्षमता (क्विंटल/हेक्टर) – 5 – 6
3. पंचवटी (एन.आय.डी.डब्ल्यू: 15) –
– दाणे टपोरे, चमकदार आणि आकर्षक.
– तांबेरा रोगास प्रतिकारक
– रवा, शेवया,कुरड्या साठी उत्तम.
– पीक 105 ते 110 दिवसात काढणीस तयार होते.
– उत्पादन क्षमता (क्विंटल/हेक्टर) – 12 ते 15
ड) जिरायत किंवा मर्यादित पाण्यावर पेरणीसाठी (पेरणीनंतर 45 दिवसांनी एक पाणी) –
1. नेत्रावती (NIAW-1415) –
– सरबती वाण
– तांबेरा रोगास प्रतिकारक्षम
– चपाती साठी उत्तम
– प्रथिने 12 टक्के
– जिरायती क्षेत्रात 105 ते 108 व मर्यादित सिंचनाखाली 108 ते 111 दिवसात काढणीस तयार होतो.
– उत्पादन क्षमता (क्विंटल/हेक्टर) – 10 ते 12
सरबती वाण बाजार किंमत | sharbati wheat price 100 kg –
अंदाजे 2500 रुपये/ क्विंटल.
सारांश | Conclusion –
गहू पिकाचे कमी खर्चामध्ये जास्तीत जास्त उत्पादन काढायचे असल्यास खत, पाणी आणि कीड रोग नियोजन सोबत चांगले उत्पादन देणाऱ्या सुधारित जातींची (wheat variety) लागवड केल्यास अपेक्षित उत्पादन मिळू शकते. बाजार मागणीनुसार योग्य त्या जातीची लागवड केल्यास चांगला बाजारभाव मिळतो. शेतकरी मित्रांनो आशा करतो की तुम्हाला Krushi Doctor website वरील आमचा wheat variety: गहू लागवडीसाठी बेस्ट जातींची माहिती हा लेख खूप आवडला असेल. ही माहिती नक्कीच यंदाच्या रब्बी हंगामामध्ये तुमच्या उपयोगी येईल. ही माहिती जर तुम्हाला खरच आवडली तर नक्कीच तुमच्या इतर शेतकरी ग्रुप मध्ये शेयर नक्की करा. आणि गहू पिकाबद्दल इतर कोणतीही माहिती तुम्हाला जाणून घ्यायची असेल तर आमच्या Krushi Doctor Sheti Mahiti पेजला भेट द्या.
FAQs | वारंवार विचारले जाणारे प्रश्न –
1. गहू लागवडीसाठी जमीन कशी असावी?
उत्तर – गहू लागवडीसाठी पाण्याचा चांगला निचरा होणारी, मध्यम ते भारी जमीन निवडावी.
2. गव्हाची पेरणी कधी करावी?
उत्तर – जिरायती गव्हाची पेरणी ऑक्टोबरच्या दुसऱ्या पंधरवड्यात करावी. बागायती गव्हाची पेरणी नोव्हेंबरच्या पहिल्या पंधरवड्यात करावी.
3. शरबती गहू कसा ओळखाल?
उत्तर – शरबती धान्य चमकदार, ठळक, सोनेरी रंगाचे, रोगमुक्त आणि धान्यावर कमी पिवळे बेरी डाग असलेले , उच्च प्रथिनेयुक्त आणि सर्वात चवदार चपात्या तयार होणारे असते.
4. बागायती गहू पेरणीसाठी कोणते वाण लावावे?
उत्तर – त्रंबक, गोदावरी, तपोवन किंवा फुल समाधान या वाणाची लागवड करावी.
5. जिरायत गहू पेरणीसाठी कोणते वाण लावावे?
उत्तर – गोदावरी किंवा शरद वाणाची लागवड करावी.
लेखक –
सूर्यकांत इर्लेकर