शेयर करा

weed in cotton

शेतकरी मित्रांनो नमस्कार, Krushi Doctor वेबसाइट वरती आपले स्वागत आहे. आजच्या लेखामध्ये आपण कापूस पिकातील तण नियंत्रण (weed in cotton) कसे करावे या बद्दल सविस्तर मध्ये जाणून घेणार आहोत. शेतात वाढणाऱ्या निरनिराळ्या तणांमुळे अन्नद्रव्ये, पाणी, हवा, जागा व सूर्यप्रकाश इ. बाबतीत कापूस पिकासोबत स्पर्धा होऊन उत्पादनात घट येऊ शकते. तणांच्या अमर्यादित वाढीमुळे पिकांची पेरणी, पाणी देणे व आंतरमशागत अशा विविध कामांत अडथळा निर्माण होतो. विविध तणांमुळे कापूस पिकात ७४-८९ टक्क्यांपर्यंत घट येत असल्याचे विविध प्रयोगांचे निष्कर्ष आहेत. मागील दोन वर्षांत कापूस हंगामात झालेल्या सततच्या पावसामुळे तणांचा प्रादुर्भाव वाढला होता. परिणामी, तणनियंत्रणासाठी शेतकऱ्यांना खूप श्रम व पैसा खर्च करावा लागला.

कापूस-तण स्पर्धेचा संवेदनशील कालावधी कापूस पिकात पीक, तण स्पर्धेचा संवेदनशील कालावधी २० ते ६० दिवसांपर्यंत असतो. या काळात तण नियंत्रण न केल्यास उत्पादनात लक्षणीय घट येते. या कालावधीनंतर पीक तणमुक्त ठेवले, तरी उत्पादनात झालेली घट भरून निघत नाही. कापूस लागवड करताना दोन ओळींतील जास्त अंतर व सुरुवातीची कापूस पिकाची होणारी हळूवार वाढ यामुळे पेरणीनंतर सुरुवातीच्या काळात तणांचा मोठा प्रादुर्भाव होतो. सुरुवातीच्या ९ आठवड्यांपर्यंत (६० दिवसापर्यंत) कपाशीचे पीक तणमुक्त ठेवणे गरजेचे असते.



कापूस पिकातील (weed in cotton) एकात्मिक तण व्यवस्थापन –

1. जमिनीच्या मशागतीसाठी केलेल्या नांगरणी, वखरणी व जांभूळवाहीमुळे तणांना काही प्रमाणात अटकाव होतो. 2. कापूस पिकामध्ये तणनियंत्रणासाठी मुख्यत्वे कोळपणी (डवरणी) व निंदणी केली जाते.
3. पिकातील दोन ओळींतील अंतर जास्त असल्यास डवरणीचे काम खोल करता येते. दीर्घकाळ करणे शक्य होते.
4. शेतात हराळी, लव्हाळा या सारखी तणे असल्यास डवरणीचे काम नीट करता येत नाही. परिणामी, अन्य वार्षिक तणांचे नियंत्रण होण्यास अडथळा निर्माण होतो.
5. तणे एक व दोन पानांवर असताना डवरणी करून नष्ट करावीत. कारण या वेळी तणांच्या बियातील अन्नद्रव्यांचा साठा संपलेला असतो. ती केलेल्या मशागतीस लवकर बळी पडतात.
6. सध्या मजुरांच्या कमतरतेमुळे रासायनिक तणनियंत्रणाकडे शेतकऱ्यांचा ओढा वाढत आहे. प्रत्येक पद्धतीचे काही फायदे आणि तोटे असतात.
7. यामुळे कोणत्याही एकाच पद्धतीवर अवलंबून राहण्यापेक्षा एकात्मिक तणनियंत्रण पद्धतीचा अवलंब करावा. 8. तणांच्या नियंत्रणासाठी शक्य त्या उपलब्ध पद्धतीचा एकत्रित व सुसंगतपणे वापर करावा. त्यातही तणनाशकांचा कमीत कमी वापर करावा.

कापूस पिकामध्ये तण (weed in cotton) नियंत्रांच्या पद्धती –

अ) प्रतिबंधात्मक उपाय –

1. या उपाययोजना तणे उगवण्यापूर्वी किंवा शेतात तणांचे अस्तित्व जाणवण्यापूर्वीच अवलंबल्या जाव्यात.
2. प्रमाणित आणि स्वच्छ बियाणे पेरणीसाठी वापरावे
3. चांगले कुजलेले आणि तणांचे बी नसणारे शेणखत किंवा कंपोस्ट खत वापरावे.
4. ताभोवती कुंपणे, बांध यावर वाढणारी तणे फुलोऱ्यात येण्यापूर्वीच काढावीत. त्यासाठी वरचेवर स्वच्छता मोहीम राबवावी.
5. पाण्याचे पाट व इतर पाणथळ जागा तणमुक्त ठेवणे.
6. औत, अवजारे, जनावरे यांची ने-आण करतेवेळी तणांचे बी त्यांना चिकटून एका शेतातून दुसऱ्या शेतात पसरणार नाही, याची काळजी घेणे.



ब) निवारणात्मक उपाय-

1. तणांचा प्रादुर्भाव झाल्यानंतर त्यांचा बंदोबस्त करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या सर्व पद्धती या प्रकारात मोडतात.
2. मशागतीय किंवा तांत्रिक पद्धत – या पद्धतीमध्ये सर्व परंपरागत, प्रचलित पद्धतींचा समावेश होतो. जमिनीची पूर्वमशागत जांभूळवाही
3. कोळपणी व खुरपणी आंतरपीक पद्धत
4. पिकांची फेरपालट.
5. रासायनिक तणनियंत्रण सध्या वाढलेली मजुरी आणि मजुरांची कमतरता या दोन्ही गोष्टींमुळे शेतकऱ्यांचा कल रासायनिक तण नियंत्रणाकडे वाढत आहे.
6. कापूस पिकात उगवणपूर्व, तसेच उगवणपश्‍चात तणनाशकांचा (kapus tan nashak) वापर करता येतो. पेरणीच्या कामास अधिक प्राधान्य देत असल्याने उगवणपूर्व तणनाशकांचा वापर अल्प शेतकरी करतात.
7. बहुतांश शेतकरी हे उगवणपश्‍चात तणनाशकांचा वापर करतात. यामागे कपाशीसारख्या अधिक कालावधीच्या पिकामध्ये वेळेवर मजुरांची उपलब्धता होत नाहीत.
8. त्याच प्रमाणे सततच्या पावसानेही खुरपणी व डवरणी ही आंतरमशागतीची कामे करणे शक्य होत नाही.
9. कापूस पिकात शिफारशीत उगवणपूर्व आणि उगवणपश्‍चात तणनाशकांचा (kapus tan nashak) योग्य वेळी व योग्य प्रमाणातच वापर करावा.



कापूस पिकासाठी स्पेशल तन (cotton herbicide) नाशके –

1. पेंडीमेथॅलीन ३०% ई.सी., प्रोवेल, अरिस्टो बायोटेक अँड लाइफ सायन्स
वापराचे प्रमाण – ३.३ – ५.० लिटर/हेक्टर किंवा ५०-७० मि.लि./१०लिटर पाणी
वापराची वेळ – उगवणपूर्व, म्हणजेच पेरणीनंतर लगेच किंवा दुसऱ्या दिवशी जमिनीवर फवारावे.

2. डाययुरोन ८० डब्ल्यू.पी., डायरेक्स, बायर क्रॉप सायन्स
वापराचे प्रमाण – १.२-२.० लिटर/हेक्टर किंवा २०-३० ग्रॅम/१० लीटर
वापराची वेळ – उगवणपूर्व म्हणजेच पेरणीनंतर लगेच किंवा दुसऱ्या दिवशी जमिनीवर फवारावे.

3. पायरीथियोब्याक सोडिअम १०% ई.सी., अराडो, परिजात इंडस्ट्रीज दिल्ली.
वापराचे प्रमाण – ०.६२५-०.७५० लिटर/हेक्टर किंवा १२.५-१५ मि.लि./१० लीटर
वापराची योग्य वेळ – उगवणपश्‍चात, उभ्या पिकात पीक २०-३० दिवसांचे असताना. फवारणीनंतर ५-१० दिवस डवरणी करू नये.

4. पायरीथियोब्याक सोडिअम ६% ईसी, (१.०-१.२५ लिटर/हेक्टर)अराडो, परिजात इंडस्ट्रीज दिल्ली.
+ क्विझालोफोप इथाईल ४% ई.सी. १.०-१.२५ लिटर/हेक्टर
वापराची वेळ – पाणी उगवणपश्‍चात, उभ्या पिकात पीक २०-३० दिवसांचे असताना. फवारणीनंतर ५-१० दिवस डवरणी करू नये.

5. क्विझालोफोप इथाईल ५% ई.सी., टारगा सुपर, निस्सान केमिकल कॉर्पोरेशन
वापराची मात्रा – १.० लिटर/हेक्टर किंवा २० मि.लि.प्रती १० लीटर पाणी
वापराची योग्य वेळ – उगवणपश्‍चात, उभ्या पिकात तृणवर्गीय तणे असल्यास, पीक ३०-४० दिवसांचे असताना फवारावे.
( टीप – फवारणीनंतर ५-१० दिवस डवरणी करू नये. द्रावणात प्रसारक द्रव्ये १० मि.लि. प्रति १० लिटर पाणी अवश्य टाकावे. )

6. फिनोक्सीप्रॉफ इथाईल ९.३% डब्ल्यू./डब्ल्यू./ई.सी., व्हीप सुपर, बायर क्रॉप सायन्स
वापराची मात्रा – ७५० मि.लि./हेक्टर किंवा १५ मि.लि./१०लीटर पाणी
वापराची योग्य वेळ – उगवणपश्‍चात, उभ्या पिकात तृण वर्गीय तणे असल्यास पीक ३०-४० दिवसांचे असताना फवारावे. फवारणीनंतर ५-१० दिवस डवरणी करू नये. द्रावणात प्रसारक द्रव्ये १० मिलि. प्रति १० लिटर पाण्यात अवश्य टाकावे.



कापूस पिकात तणनाशके (weed in cotton) फवारताना कोणती काळजी घ्यावी ?

1. तणनाशकाच्या (kapus tannashak) डब्यावरील लेबल नीट वाचून घ्यावे.
2. शिफारशीत मात्रेनुसार व वेळेनुसार फवारावे.
3. ढगाळ व पावसाळी वातावरण, धुके किंवा पाऊस असताना तणनाशकाची फवारणी करू नये.
4. वारा नसताना व जमिनीत ओलावा असताना उगवणपूर्व तणनाशकाची फवारणी करावी.
5. कडक उन्हात उगवणपश्‍चात तणनाशकाची फवारणी टाळावी.
6. उगवणपूर्व तणनाशकाची फवारणी पेरणीच्या दिवशी किंवा दुसऱ्या दिवशी पिकाचे बी मातीने व्यवस्थित झाकल्यानंतरच करावी.
7. शिफारशीच्या मात्रेतच वापर करावा.
8. वारंवार एकच तणनाशक (kapus tannashak) न वापरता आलटून पालटून वापर करावा. एकदा पेरणीपूर्व तर दुसऱ्यावेळी शिफारशीप्रमाणे उगवणपश्‍चात तणनाशक वापरावे.
9. फेरपालट केल्यास पर्यायाने तणनाशक बदलल्यास तणनाशकाचा जमिनीतील अंश कमी होतो.
10. सेंद्रिय खताचा हेक्‍टरी १० ते १५ टन वापर केल्यास जमिनीतील तणनाशकाचे अंश धरून ठेवले जातात तसेच अधिकच्या सेंद्रिय खतांमुळे जमिनीतील सूक्ष्म जीवजंतूचे प्रमाण सुध्दा वाढते.
11. खोल नांगरट केल्यास जमिनीच्या थरांची उलथापालथ होऊन वरचा जास्त अंश असलेला थर अशा मशागतीमुळे खोल जातो.
12. त्यामुळे तणनाशकाच्या अंशाचा पिकांवर प्रतिकूल परिणाम दिसून येत नाही.



Conclusion | सारांश –

शेतकरी मित्रांनो आशा करतो की तुम्हाला Krushi Doctor वेबसाइट वरील आमचा “कापूस लागवड (cotton farming): एकरी 12 ते 15 क्विंटल उत्पादन घेण्याचा फॉर्म्युला” हा लेख नक्कीच आवडला असेल. तुम्हाला जर कापूस पिकाची इतर कोणतीही माहिती जाणून घ्यायची असेल तर आमच्या Krushi Doctor Sheti Mahiti पेज ला भेट द्या.

लेखक
कृषि डॉक्टर
9168911489


शेयर करा
शॉपिंग कार्ट