1. ऊस तुटून गेल्यावर पाचट एकसारखे पसरून घ्यावे म्हणजे पाचट व्यवस्थापन करणे सोपे जाते.
2. पाचट कुट्टी मशीनच्या साह्याने बारीक करावे.
3. पाचट बारीक झाल्यावर त्यावरती एक पोते युरिया दोन पोते सिंगल सुपर फॉस्फेट असे एक एकर साठी पसरून फेकावे.
4. नंतर चार किलो पाचट कुजवणरे जिवाणू टाकावे किंवा लिक्विड जिवाणू दोन लिटर टाकवे.
5. ऊसाचे बुडखे चुकून राहिल्यास कोयत्याने कडून टाकावे.
6. सर्व काम झाल्यावर स्प्रिंकलर ने किंवा पाठपाणी देऊन घ्या.
7. अशा पद्दतीने काम केल्यास साडेचार ते पाच महिन्यात पाचट पूर्णपणे कुजून सेंद्रिय खत तयार होते.