शेतकरी मित्रांनो नमस्कार, Krushi Doctor (कृषी डॉक्टर) या शेती विषयक माहिती देणाऱ्या वेबसाइट वरती आम्ही आपले सहर्ष स्वागत आहे . आजच्या लेखामध्ये आपण कलिंगड च्या १० टॉप जाती (top 10 watermelon variety) पाहणार आहोत. या लेखामध्ये आपण कलिंगडाची जाती, कंपनी नाव आणि कलिंगडाचे वैशिष्ट्ये इ. माहिती पाहणार आहोत. तुम्ही जर एक कलिंगड उत्पादक शेतकरी असाल तर खास करून तुमच्यासाठी हा लेख खूप महत्वाचा आहे. माझी तुम्हाला एक विनंती आहे की हा लेख पूर्ण वाचा आणि माहिती आवडली तर शेयर नक्की करा.
( शेती निगडीत नव-नवीन विडियो पाहण्यासाठी येथे क्लिक करा – कृषि डॉक्टर यूट्यूब चॅनल)
मार्केट मधील टॉप 10 जाती । Top 10 watermelon variety –
व्यापारी नाव | कंपनी | वैशिष्ट्ये |
सागर किंग (अंडाकृत /Ice box) |
सागर सीड (सर्व सिजन) |
१. वजन – ३ ते ५ किलो २. कलर – गर्द लाल ३. टीएसएस % -१२. ५ ते १३.५ ४. काढणी – ६० ते ७० दिवस |
सुपर क्वीन (अंडाकृती /Ice box) |
सिजेंटा (सर्व सिजन) |
१. वजन – ३ ते ४ किलो २. कलर – चमकदार लाल कुरकुरीत आणि मऊ बारीक ३. टीएसएस % १२ ते १४ ४. काढणी – ७५ ते ८० दिवस |
मॅक्स (अंडाकृती/Ice box) |
बी एस एफ/नन्हेम्स (रब्बी & उन्हाळी) |
१. वजन – ४ ते ५ किलो २. कलर – कुरकुरीत गर्द लाल ३. टीएसएस % – ११ ते १३ ४. काढणी – ७० ते ७५ दिवस |
मेलोडी -१३५८ (अंडाकृती /Ice box) |
कलश (ऑगस्ट-एप्रिल) |
१. वजन – ४ ते ५ किलो २. कलर – चमकदार लाल कुरकुरीत ३. टीएसएस % – १२ ते १३ ४. काढणी – ६५ ते ७० दिवस |
ऑगस्टा F1 (बॉक्स/sugar baby) |
सिंजेन्टा
|
१. वजन – ७ ते १० किलो २. कलर – चमकदार लाल कुरकुरीत ३. टीएसएस % – ११ ते १२ ४. काढणी – ८५ ते ९० टोकण नंतर ५. इतर – लांब वाहतुकी साठी चांगले |
बाहुबली F1 (अंडाकृती /Ice box) |
सीमन्स (रब्बी & उन्हाळी) |
१. वजन – ३ ते ७ किलो २. कलर – गर्द लाल ३. टीएसएस % – १५ ते १३. ७ ४. काढणी – ६५ ते ७० दिवस |
अपूर्वा (चट्टा पट्टा/jubilee) |
सेमिनिस (उन्हाळी) |
१. वजन – ८ ते १० किलो २. कलर – ग्रेन्युलर टेक्सचरसह गडद लाल ३. टीएसएस % – १० ते १२ ४. काढणी – ९० ते १०० दिवस ५. इतर – उष्ण हवामानात वाढतो |
जुबली किंग (चट्टा पट्टा/jubilee) |
सिजेंटा (रब्बी) |
१. वजन – ८ ते १२ किलो २. कलर – लाल ३. टीएसएस % – १० ते ११ ४. काढणी – ८५ ते ९० दिवस (बी लागवड) |
माही शुगरबेबी |
महिको (खरीप & उन्हाळी) |
१. वजन – ६ ते ७ किलो २. कलर – क्रिप्स, गडद लाल आणि फर्म ३. टीएसएस % – १० ते १२ ४. काढणी – 65 ते 70 दिवस |
सूचना / precaution / note –
1. फुलांच्या सेटिंग काळात मधमाशी ला हानी होतील अशा औषधाची फवारणी टाळावी . उदा . फॉस ग्रुप औषध.
2. तुम्हाला जर या जातींची अधिक माहिती जाणून घ्यायची असेल तर येथे क्लिक करा – Krushi Aushadhe
3. तुम्हाला जर कलिंगड बियाणे खरेदी करायचे असेल किंवा त्यांच्या किमती जाणून घ्यायच्या असतील तर येथे क्लिक करा – BharatAgri Krushi Dukan
Conclusion I सारांश –
शेतकरी मित्रांनो तुम्हाला krushi doctor या वेबसाइट वरील आमचा watermelon variety: मार्केट मधील कलिंगड च्या १० टॉप जाती हा लेख तुम्हाला कसा वाटला वाटला हे खाली कमेंट बॉक्स मध्ये सांगायला विसरू नका. आणि हा लेख जर तुम्हाला आवडला तर तुमच्या इतर शेतकरी मित्रांसोबत शेयर नक्की करा. आणखी अशा प्रकारची कृषीविषयक माहिती पाहण्यासाठी आमच्या krushidoctor.com या वेबसाईटला नक्की भेट द्या.
वारंवार विचारले जाणारे प्रश्न / FAQ –
1. प्रथम कलिंगड लागवड करत असेल तर कोणती जात निवडावी?
उत्तर – मेलोडी ,मॅक्स
2. आपलं नियोजन चांगलं असेल तर कलिंगडची कोणती जात निवडावी?
उत्तर – सुगरकिंग किंवा सुपरक्विन
3. अंडाकृती मध्ये कोणत्या जाती आहेत?
उत्तर – मॅक्स , सागरकिन्ग , सुपरक्विन , मेलोडी , बाहुबली .
4. बॉक्स (sugar baby) कोणत्या जाती आहेत?
उत्तर – ऑगस्टा F1, माही शुगरबेबी .
5. चट्ट्या पट्ट्यात (jubilee) मध्ये कोणत्या जाती आहेत?
उत्तर – जुबली किंग ,अपूर्वा
6. कलिंगड एक एकर मध्ये किती रोपे किंवा बियाची लागवड करू शकता?
उत्तर – ६००० ते ७००० रोपे किंवा बीया
7. व्हायरस आणि मर रोग सहनशील जात कोणती?
उत्तर – बाहुबली F1.
8. एक वेलाला किती फळ निघू शकता?
उतार – दोन किंवा तीन.
लेखक
सूर्यकांत इर्लेकर
मू. पो – इर्ले, तालुका – बार्शी, जिल्हा – सोलापूर.
राज्य – महाराष्ट्र. पिन – 413412