Blog

नमस्कार शेतकरी मित्रांनो ! कृषि डॉक्टर ( Krushi Doctor ) परिवरामध्ये आपले स्वागत आहे. आपण या ठिकाणी आज “कलिंगड कीड नियंत्रण ( watermelon pest control in marathi ): प्रमुख किडी आणि त्यावरील उपाय” या विषयावर माहिती जाणून घेणार आहोत. ही माहिती जर तुम्हाला जर आवडली तर नक्कीच तुम्ही ही माहिती तुमच्या इतर शेतकरी मित्रांसोबत शेयर देखील करू शकता. चला तर सुरू करूया –
एकात्मिक कीड व्यवस्थापन ( watermelon pest control ) –
1. मागील पिकांचे अवशेष नष्ट करावेत .
2. पिकांची फेरपालट करावी.
3. पीक नेहमी तणमुक्त ठेवावे.
4. रोगप्रतिकारक्षम जातींचा वापर करावा.
5. पूर्वी जर हे पीक मर रोगास बळी पडले असेल तर त्या जमिनीत पुढील पाच वर्षे हे पीक घेऊ नये.
6. कलिंगड लागवडी नंतर लगेच 5 ते 6 दिवसानंतर एकरी 13 पिवळे व 12 निळे चिकट सापळे लावावेत.
7. तसेच एकरी 4 ते 5 कामगंध सापळे देखील लावावेत.
8. पिकांवरील नुकसानीची लक्षणे लक्षात घेऊन कोणती कीड वा रोग आहे याची खात्री तज्ज्ञांच्या सल्ल्याने करून घ्यावी व त्यांच्या मार्गदर्शनानुसार नियंत्रणाचे उपाय योजावेत.
1. मावा कीड ( Aphid | watermelon pest control ) –
1. डायमेथोएट 30% EC – 2 मिलि / लीटर पानी ( टाटा कंपनीचे – टाफगोर )
2. स्पायरोटेट्रामॅट 11.01% + इमिडाक्लोप्रिड 11.01% w/w SC (240 SC – 0.5 ते 1 मिलि / लीटर पानी ( बायर कंपनीचे – मूव्हेंटो )
3. पायमेट्रोझिन (50% WG) – 1 ग्राम / लीटर पानी ( सिंजेन्टा कंपनीचे चेस )
4. थायामेथॉक्सम 25% WG – 0.5 ग्राम / लीटर पानी ( सिंजेन्टा कंपनीचे – एक्टरा )
5. प्रोफेनोफोस 40% + सायपरमेथ्रिन 4% EC – 1 ते 2 मिलि / लीटर पानी ( पीआई इंडस्ट्री चे रॉकेट )
2. फुलकिडे ( Thrips ) –
1. एसीफेट ५०० + इमिडाक्लोप्रिड १.८% एसपी – 2 ग्राम / लीटर पानी ( यूपीएल कंपनीचे लान्सर गोल्ड )
2. इमिडाक्लोप्रिड 200 SL (17. 8 % w/w) – 0.5 ते 1 मिलि / लीटर पानी ( बायर कंपनीचे कॉन्फिडोर )
3. फिप्रोनिल 5% SC – 0.5 ते 0.8 मिलि / लीटर पानी ( बायर कंपनीचे रीजेंट )
4. स्पिनोसॅड (44.03% w/w) – 0.3 मिलि / लीटर पानी ( डाऊ कंपनीचे ट्रेसर )
5. थायामेथॉक्सम 25% WG – 0.5 ग्राम / लीटर पानी ( सिंजेन्टा कंपनीचे – एक्टरा )
3. कातर कीड ( Cutoworm | watermelon pest control ) –
1. एमॅमेक्टिन बेंझोनेट 5% SGz – 0.5 ग्राम / लीटर पानी ( क्रिस्टल कंपनीचे प्रोक्लेम )
2. स्पिनोसॅड (44.03% w/w) – 0.3 मिलि / लीटर पानी ( डाऊ कंपनीचे किटकनाशक )
3. क्लोरपायरीफॉस 50% + सायपरमेथ्रिन 5% EC – 1 ते 2 मिलि / लीटर पानी ( घरडा केमिकल्स चे हमला )
4. क्लोराँट्रानिलिप्रोल 18.5% w/w – 0.4 मिलि / लीटर पानी ( एफएमसी कंपनीचे कोराजन )
5. फ्लुबेन्डियामाइड 480SC (39.35% w/w) – 0.5 ग्राम / लीटर पानी ( टाटा कंपनीचे टाकुमी )
4. पाने खाणारी आळी ( Leaf Eating Caterpillar ) –
1. एमॅमेक्टिन बेंझोनेट 5% SGz – 0.5 ग्राम / लीटर पानी ( क्रिस्टल कंपनीचे प्रोक्लेम )
2. स्पिनोसॅड (44.03% w/w) – 0.3 मिलि / लीटर पानी ( डाऊ कंपनीचे ट्रेसर )
3. प्रोफेनोफोस 40% + सायपरमेथ्रिन 4% EC – 1 ते 2 मिलि / लीटर पानी ( पीआई इंडस्ट्री चे रॉकेट )
4. क्लोरपायरीफॉस 50% + सायपरमेथ्रिन 5% EC – 1 ते 2 मिलि / लीटर पानी ( घरडा केमिकल्स चे हमला )
5. नोव्हॅल्युरॉन 5.25% + इंडोक्साकार्ब 4.5% w/w SC – 2 मिलि / लीटर पानी ( अदामा कंपनीचे प्लेनथोरा )
5. लाल कोळी ( Red Mite ) –
1. अबॅमेक्टिन 1.9% EC – 1 मिलि / लीटर पानी ( क्रिस्टल कंपनीचे आबासीन )
2. स्पायरोमेसिफेन 240 SC (22.9 % w/w) – 0.3 मिलि / लीटर पानी ( क्रिस्टल कंपनीचे ओबेरॉन )
3. प्रोपरगाईट 57% ईसी ( धानुका कंपनीचे ओमाइट )
6. फळमाशी ( Fruit Fly | watermelon pest control ) –
1. लॅम्बडा सायहॅलोथ्रिन 5% EC – 2 मिलि / लीटर पानी ( सिंजेन्टा कंपनीचे कराटे )
2. स्पिनोसॅड (44.03% w/w) – 0.3 मिलि / लीटर पानी ( डाऊ कंपनीचे ट्रेसर )
3. कार्बोसल्फान 25% EC – 1 ते 2 मिलि / लीटर मिलि ( एफएमसी कंपनीचे मार्शल )
4. क्लोरपायरीफॉस 50% + सायपरमेथ्रिन 5% EC – 1 ते 2 मिलि / लीटर पानी ( घरडा केमिकल्स चे हमला )
5. नोव्हॅल्युरॉन 5.25% + इंडोक्साकार्ब 4.5% w/w SC – 2 मिलि / लीटर पानी ( अदामा कंपनीचे प्लेनथोरा )
( कलिंगड प्रमाणेच आमचे इतर लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा – Krushi Doctor Sheti Mahiti )
7. लाल भुंगा ( Red beetle ) –
1. एसीफेट ५०० + इमिडाक्लोप्रिड १.८% एसपी – 2 ग्राम / लीटर पानी ( यूपीएल कंपनीचे लान्सर गोल्ड )
2. इमिडाक्लोप्रिड 200 SL (17.8 % w/w) – 0.5 ते 1 मिलि / लीटर पानी ( बायर कंपनीचे कॉन्फिडोर )
3. फिप्रोनिल 5% SC – 0.5 ते 0.8 मिलि / लीटर पानी ( बायर कंपनीचे रीजेंट )
4. स्पिनोसॅड (44.03% w/w) – 0.3 मिलि / लीटर पानी ( डाऊ कंपनीचे ट्रेसर )
5. थायामेथॉक्सम 25% WG – 0.5 ग्राम / लीटर पानी ( सिंजेन्टा कंपनीचे – एक्टरा )
8. पांढरी माशी ( White fly ) –
1. एसीटामिप्रिड 20% एसपी – 0.5 ग्राम / लीटर पानी ( धानुका कंपनीचे धनप्रीत )
2. स्पायरोटेट्रामॅट 11.01% + इमिडाक्लोप्रिड 11.01% w/w SC (240 SC – 0.5 ते 1 मिलि / लीटर पानी ( बायर कंपनीचे – मूव्हेंटो )
4. बुप्रोफेझिन 20% + एसीफेट 50% – 1 ते 2 ग्राम / लीटर पानी ( टाटा कंपनीचे ओडिस )
5. इंस्कॅलिस – 2 मिलि / लीटर पानी ( बिएएसएफ कंपनीचे सेफीना )
9. नाग आळी ( Leaf Miner ) –
1. क्विनालफॉस 25% EC – 2 मिलि / लीटर पानी ( सिंजेन्टा कंपनीचे एकालक्स )
3. कार्टॅप हायड्रोक्लोराइड 75% SG – 1 ग्राम / लीटर पानी ( धानुका कंपनीचे मोरटार )
सोबतच काही स्मार्ट टिप्स –
1. फवारणी ही सकाळी 11 च्या आत किंवा सायंकाळी 4 च्या नंतर करावी.
2. फवारणी साठी वापरण्यात येणारे पानी हे 6.5 ते 7.5 ph चे असावे.
3. फवारणी करताना जमिनीमध्ये ओलावा असेल याची काळजी घ्यावी.
4. फवारणी करताना वाऱ्याचा वेग देखील कमी असावा.
5. फवारणी मिश्रनामध्ये एका पेक्षा जास्त घटक मिसळू नये.
Conclusion | सारांश –
शेतकरी मित्रांनो, आशा करतो की तुम्हाला Krushi Doctor वरील आमचा “कलिंगड कीड नियंत्रण ( watermelon pest control ): प्रमुख किडी आणि त्यावरील उपाय ” हा लेख तुम्हाला आवडला आहे. आणि येणाऱ्या हंगामात नक्कीच याचा तुम्हाला फायदा होईल. या माहितीनुसार आपण जर कलिंगड पिकामध्ये सुरुवातीपासून काळजी घेऊन सर्व गोष्टींचा स्वत अभ्यास केला आणि त्यानुसार आपल्या कलिंगड पिकाचे नियोजन केले तर कलिंगड पिकामध्ये देखील आपण सहज पने कमी उत्पादन खर्चासह अतिशय चांगले उत्पादन घेऊ शकतो.
FAQs | सतत विचारले जाणारे प्रश्न –
1. कलिंगड (टरबूज) कीटकांचे नियंत्रण कसे करावे?
उत्तर – टरबूज पिकामध्ये कीड नियंत्रण करण्यासाठी आपल्याला एकात्मिक कीड नियंत्रण हा उपक्रम राबवणे गरजेचे आहे. यामध्ये तुम्ही चिकट सापळे, कामगंध सापळे, तन नियंत्रण, खत व्यवस्थापन, सापळा पीक लावने आणि प्रादुर्भाव जास्त झाल्यावर कीटकनाशकांच्या फवारण्या करणे इत्यादि गोष्टी करू शकता.
2. कलिंगड (टरबूज) पिकात कोणत्या किडी येतात?
उत्तर – टरबूज पिकामध्ये पुढील किडी प्रामुख्याने दिसून येतात – मावा (Aphid), कातर कीड (Cutworm), फुलकिडे (Thrips), पाने खणारी आळी ( Leaf eating caterpillar ), लाल कोळी (Red Mite), फळ माशी ( Fruit Fly), लाल भुंगा (Red Beetle), पांढरी माशी (White Fly) आणि नाग आळी (Leaf Miner) इत्यादि.
3. कलिंगड (टरबूज) पिकावर कोणती कीटकनाशके वापरली जातात?
उत्तर – टरबूज पिकामध्ये वेग-वेगळ्या किडी येतात आणि त्यानुसार कीटक नाशके देखील वे-वेगळी आहेत. त्यामुळे सर्व प्रथम आपण पिकावर कोणत्या किडीचा प्रादुर्भाव झाला आहे, याची खात्री करावी व मग शिफारशीत कीटकनाशक फवारणीचा निर्णय घ्यावा.
4. कलिंगड (टरबूज) मध्ये फळ माशी कसे नियंत्रित कराल?
उत्तर – टरबूज पिकातील फळमाशी नियंत्रण करण्यासाठी तुम्ही पुढील कीटकनाशकांचा वापर करू शकता – लॅम्बडा सायहॅलोथ्रिन 5% EC – 2 मिलि / लीटर पानी ( सिंजेन्टा कंपनीचे कराटे ), स्पिनोसॅड (44.03% w/w) – 0.3 मिलि / लीटर पानी ( डाऊ कंपनीचे ट्रेसर ), कार्बोसल्फान 25% EC – 1 ते 2 मिलि / लीटर मिलि ( एफएमसी कंपनीचे मार्शल ), क्लोरपायरीफॉस 50% + सायपरमेथ्रिन 5% EC – 1 ते 2 मिलि / लीटर पानी ( घरडा केमिकल्स चे हमला ) किंवा नोव्हॅल्युरॉन 5.25% + इंडोक्साकार्ब 4.5% w/w SC – 2 मिलि / लीटर पानी ( अदामा कंपनीचे प्लेनथोरा ).
5. कलिंगड (टरबूज) मध्ये फळ माशी नियंत्रण साठी कोणता सापळा वापरावा?
उत्तर – टरबूज पिकातील फळमाशी नियंत्रण करण्यासाठी तुम्ही एस के एग्रोटेक कंपनीचा “मेलोण फ्लाय ट्रॅप” वापरू शकता. याच्या बद्दल अधिक माहिती जाणून घेण्यासाठी पुढील लिंक वरती क्लिक करा – SK Agrotech Pheromone Eco Trap with Melon Fly Lure.
लेखक –
कृषि डॉक्टर सूर्यकांत
मो. 9168911489
 
	 
		 
			 
		 
			 
		 
			 
		 
			 
		 
			 
		 
			 
		 
			 
											 
											 
											