शेयर करा

watermelon fertilizer schedule

– शेतकरी मित्रांनो नमस्कार, स्वागत आहे तुमचे krushi Doctor या वेबसाइट वरती.
– आज आपण पाहणार आहोत “कलिंगड खत व्यवस्थापन (watermelon fertilizer schedule): A to Z गाईड” बद्दलची संपूर्ण माहिती.
– रब्बी हंगामातील पैसे देणारे पीक म्हणून महाराष्ट्रातील अनेक शेतकरी कलिंगड या पिकाकडे बघतात.
– महाराष्ट्र मध्ये कलिंगडाची जवळपास 650 ते 700 हेक्टर क्षेत्र व लागवड केली जाते.
– कलिंगडाचे फळ हे मधुर आणि चविष्ट असते. उन्हाळ्यामध्ये कलिंगडाचे ज्यूस प्राषन करण्यास अनेक जण पसंती देतात.
– महाराष्ट्रातील अनेक शेतकरी जरी कलिंगडाचे पिक घेत असले तरी त्यांना आवश्यक व समाधानकारक उत्पन्न मिळत नाही.
– याचे मुख्य कारण म्हणजे त्याचे “कलिंगड खत व्यवस्थापन” आणि पाणी व्यवस्थापन योग्यरित्या होत नसल्याने पिकाचे उत्पन्न कमी होते.

या लेखातील प्रमुख विषय

1. कलिंगड खत व्यवस्थापन (watermelon fertilizer schedule) कसे करावे?

– कलिंगडाचे पिक 70 ते 80 दिवसात काढणीला येते त्यामुळे याच काळात त्याची योग्यरित्या वाढ झाली पाहिजे.
– यासाठी योग्य वेळेत योग्य खतांची उपलब्धता झाली पाहिजेत.
– आपण सुरुवातीला समजूनच घेतले पाहिजे की कलिंगड हे एक खादाड पीक म्हणून ओळखले जाते.
– त्यामुळे याला सुरुवातीपासूनच वॉटर सोल्युबल खतांची मात्रा दिली पाहिजे.



2. टरबूज पिकास लागवडी पूर्वी खत (watermelon fertilizer schedule) कोणते द्यावे?

– कलिंगड किंवा टरबूज पिकास लागवडीपूर्वी कोणतेही रासायनिक खत न देता फक्त 1 ट्रॉली किंवा दोन बैलगाडी भरून, व्यवस्थित कुजलेले शेणखत एकरभर क्षेत्रात टाकायचे आहे.
– शेणखत फक्त व्यवस्थितरीत्या कुजलेले असावे जेणेकरून त्याचा हा अपाय झाडांच्या मुळावरती झाला नाही पाहिजेत.

3. कलिंगड पिकाचा बेसल डोस (watermelon fertilizer schedule) कोणता द्यावा?

– सुरुवातीला च बेसल डोस हा आपण बेडवर टाकायचा आहे. त्यामध्ये डीएपी 50 किलो, एम ओ पी 50 किलो, हुमिक ॲसिड दाणेदार 25 किलो, अमोनियम सल्फेट 50 किलो, निंबोली पेंड 200 किलो, फरटेरा 4 किलो या पद्धतीचा बेसल डोस प्रति एकर साठी आपण पूर्ण करायचा आहे.

4. टरबूज पिकास पहिला खताचा (watermelon fertilizer schedule) डोस?

– पिक सुरुवातीच्या काळात, म्हणजेच 15ते 25 दिवसांच्या या कालावधीमध्ये टरबूज पिकास 25 कीलो 19- 19 – 19 हे खत द्यावे.
– परंतु या 10 दिवसांमध्ये 25 किलो एकदाच नाव देता दोन दिवसांमध्ये पाच – पाच किलोचे टप्पे करत पिकास 19-19-19 हे खत द्यावे.
– म्हणजेच 25 किलो खत 10 दिवसांमध्ये द्यायचे आहे. त्याचबरोबर 2 किलो मॅग्नेशियम सल्फेट 5 वेळेस म्हणजे 10 किलो द्यायचे आहे.

5. कलिंगड पिक २५ ते ३५ दिवसाच्या कालावधीत असताना ( खताचा दूसरा टप्पा )

– पिक 25 ते 35 या दहा दिवसांच्या कालावधीमध्ये असताना 12- 61 – 00 हे खत सुद्धा 25 किलो दहा दिवसांमध्ये संपवायचे आहे.
– म्हणजे याचेही पाच पाच किलोचे टप्पे करत दोन दिवसाच्या अंतराने द्यायचे आहे.
– आणि सोबतच मॅग्नेशियम सल्फेट द्यायचं आहे.
– तर हे सुद्धा 15 किलो दहा दिवसांमध्ये द्यायचे आहे.
– याचेही तीन किलोचे टप्पे करत दोन दिवसांच्या अंतराने द्यायचे आहे.

6. कलिंगड पिक ३५ दिवसाच्या कालावधीत असताना ( खताचा तिसरा टप्पा )

– कलिंगड पिकाचा 35 व्या दिवशी योग्य खत दिले पाहिजे.
– आणि ते योग्य खत म्हणजे कॅल्शियम नायट्रेट आणि बोरॉन तर हे फक्त पाच किलो कॅल्शियम नायट्रेट आणि एक किलो बोरॉन प्रति एकर द्यायचे आहे.



7. कलिंगड पिक ३५ ते ४५ दिवसाच्या कालावधीत असताना ( खताचा चौथा टप्पा )

– कलिंगड पिकाचा खताचा चौथा टप्पा म्हणजे 36 ते 45 दिवसांचा कालावधी आणि या कालावधीमध्ये पिकाला कळी व फुलधारणा येते.
– तर या कालावधीमध्ये 13 40 13 या खतांची मात्रा पाच पाच किलो दोन दिवसांच्या अंतराने द्यायचे आहे.
– दहा दिवसांच्या कालावधीमध्ये 25 किलो हे खात आपल्याला द्यायचे आहे.

( कलिंगड खत व्यवस्थापन प्रमाणेच आमचे इतर महत्वाचे लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा – Krushi Doctor Sheti Mahiti )

8. कलिंगड पिक ४७ ते ६० दिवसाच्या कालावधीत असताना ( खताचा पाचवा टप्पा )

– कलिंगड पिकाचा खताचा पाचवा टप्पा म्हणजे पीक 47 ते 60 व्या दिवशी असताना पिकाला फळाची सेटिंग झालेली असते, फळे लागलेली असतात.
– त्यामुळे योग्य खत देणेही तितकेच महत्त्वाचे असते. तर या कालावधीमध्ये 00-52 -34 हे खत देणे महत्वाचे आहे.
– हे खत 25 किलो दहा दिवसांमध्ये द्यायचे आहे त्यामुळे दोन दिवसांचे टप्पे करत पाच पाच किलो खत दिले तरी शक्य आहे.

9. कलिंगड पीक 60 दिवसांचे पूर्ण झाल्यानंतर ( खताचा सहावा टप्पा )

– कॅल्शियम नायट्रेट आणि बोरॉन परत एकदा द्यायचे आहे.
– आपल्याला फळाचा आकार आणि क्वालिटी हवी असेल तर कॅल्शियम नायट्रेट पाच किलो आणि बोरॉन एक किलो सोडायचे आहे.
– तर पीक 60 ते 70 दिवसांचे असताना 13-00- 45 हे खत द्यायचे आहे.
– जेणेकरून कलिंगड फळाची साईज आणि कॉलिटी दर्जेदार व उत्तम राहील.
– त्यांनतर शेवटचा डोस आपल्याला बऱ्यापैकी माहिती असेल की 00-00- 50 हा खत आपण पिकांना देतो.
– त्याचप्रमाणे या पिकातही या खात्याचा शेवटी वापर आपण करावा.



Conclusion | सारांश –

शेतकरी मित्रांनो मी आशा करतो की Krushi Doctor वरील आमचा “कलिंगड खत व्यवस्थापन (watermelon fertilizer schedule): A to Z गाईड” हा लेख नक्कीच आवडला असेल. जर खरच ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर ही माहिती तुमच्या इतर शेतकरी मित्रांसोबत शेयर करा. आणि जर आपण वरती सांगितल्या प्रकारे कलिंगड पिकाचे खत व्यवस्थापन केले तर नक्कीच तुम्हाला दर्जेदार आणि भरघोस उत्पन्न मिळणार आहे.

FAQs | सतत विचारले जाणारे प्रश्न –

1. टरबूजसाठी सर्वोत्तम खत कोणते आहे?
उत्तर – टरबूज म्हणजे कलिंगड पिकास 40:50:50 NPK (नत्र, स्पूरद आणि पालाश) प्रती एकर देणे आवश्यक आहे. मग हे प्रमाण आपण आपल्या प्रमाणे देऊ शकता. म्हणजेच चांगल्या नामांकित कंपनीचे खत वापरुन आपण हे प्रमाण पिकाला देऊ शकता. नामांकित कंपन्या जशा की – महाधन, जय किसान, ग्रोमोर, झेटोल, यारा, इफको, आयसीएल आणि आरसीएफ इत्यादि.

2. टरबूजसाठी कोणते एनपीके सर्वोत्तम आहे?
उत्तर – टरबूज म्हणजे कलिंगड पिकास 40:50:50 NPK (नत्र, स्पूरद आणि पालाश) प्रती एकर देणे आवश्यक आहे. मग हे प्रमाण आपण आपल्या प्रमाणे देऊ शकता. म्हणजेच चांगल्या नामांकित कंपनीचे खत वापरुन आपण हे प्रमाण पिकाला देऊ शकता. नामांकित कंपन्या जशा की – महाधन, जय किसान, ग्रोमोर, झेटोल, यारा, इफको, आयसीएल आणि आरसीएफ इत्यादि.

3. खरबूजांसाठी NPK प्रमाण काय आहे?
उत्तर – टरबूज म्हणजे कलिंगड पिकास 40:50:50 NPK (नत्र, स्पूरद आणि पालाश) प्रती एकर देणे आवश्यक आहे.

4. टरबूज पिकाचे वेळापत्रक काय आहे?
उत्तर – टरबूज पिकाच्या वेळापत्रकामध्ये खत व्यवस्थापन आणि कीड व रोग व्यवस्थापनचा समावेश असतो. हे वेळापत्रक मिळवण्यासाठी आपल्याला जवळच्या कृषि विद्यान केंद्राला संपर्क करणे आवश्यक आहे. नाहीतर आपण काही नामांकित खाजगी कंपन्याकडून देखील हे वेळापत्रक बनऊन घेऊ शकता. नामांकित कंपनीशी संपर्क करण्यासाठी येथे क्लिक करा – BharatAgri

5. टरबूज फळाचा आकार कसा वाढवायचा?
उत्तर – कलिंगड पिकाचा आकार वाढवण्यासाठी तुम्हाला वेळो-वेळी पिकाला योग्य ते पानी देणे आवश्यक आहे. तसेच माती परीक्षण वर आधारित खत व्यवस्थापन देखील तितकेच गरजेचे आहे.

 

लेखक –

कृषि डॉक्टर सूर्यकांत ( इर्लेकर )
मो – 9168911489


शेयर करा