शेयर करा

vegetables grown in Maharashtra

शेतकरी मित्रांनो नमस्कार, Krushi Doctor (कृषी डॉक्टर) या शेती विषयक माहिती देणाऱ्या वेबसाइट वरती आम्ही आपले सहर्ष स्वागत करत आहे. आजच्या लेखामध्ये आपण भाजीपाला कोणत्या महिन्यात लावावा (vegetables grown in Maharashtra) याविषयी सविस्तर माहिती पाहणार आहोत जेणेकरून आपल्याला हमखास भाव भेटणार आहे.

प्रस्तावना –

1. भारतात एकूण लागवडीखालील क्षेत्रापैकी भाजीपाल्याखाली फक्त 2.5% क्षेत्र आहे.
2. महाराष्ट्रात ते 1.6% आहे. नाशिक, पुणे व सातारा या तीन जिल्ह्यांत भाजीपाल्याची लागवड (bhajipala lagwad) विशेष प्रमाणावर होते.
3. इतर कोणत्याही कृषी व्यवसायापेक्षा भाजीपाल्याच्या लागवडीपासून जास्त उत्पन्न मिळते.
4. एकाच शेतात वर्षातून एकापेक्षा जास्त पिके घेता येतात व त्यामुळे शेतकऱ्याच्या कुटुंबातील सर्वांना शेतावर वर्षभर काम मिळते.



भाजीपाल्याचे आहारातील महत्त्व | Importance of green vegetables –

1. भाजीपाल्यात खनिज द्रव्ये असतात.
2. कॅल्शियम, फॉस्फरस व लोह ही खनिज द्रव्ये बटाटा, रताळी व कांदे यांत विशेष प्रमाणात असतात. 3. भाजीपाल्यांतील जीवनसत्तवांमुळे त्याला विशेष महत्त्व हिरव्या व पिवळ्या रंगाच्या भाज्यांत अ आणि क ही जीवनसत्त्वे विशेष प्रमाणात असून ब गटातील जीवनसत्व आढळून येतात.
4. टोमॅटोमध्ये 34% क जीवनसत्त्व असते. बटाटे व रताळी यात ते 16% असते.
5. हिरव्या मिरच्यांतही क जीवनसत्त्व मोठया प्रमाणात असते. टोमॅटो, वांगी व भेंडी यांत अ व ब ही जीवनसत्व आढळून येतात.
6. गाजर, सलगमचा पाला, पालक, रताळी, बीटचा पाला ह्या भाज्यांत अ जीवनसत्त्व विशेष प्रमाणात आढळून येते.
7. वाटाणा व घेवडा यासारख्या भाज्यात प्रथिने पुष्कळ प्रमाणात असतात आणि बटाटे व रताळ्यासारख्या भाज्यांत कार्बोहायड्रेट विशेष प्रमाणात असतात.
8. काही भाज्या (उदा., सुरण) औषधी म्हणून उपयोगी असतात.
9. आहारात दर माणशी दररोज कमीत कमी 285 ग्रॅ. भाजीपाला असावा आणि त्यापेकी 115 ग्रॅ. पालेभाज्या असाव्यात, असे आहारशास्त्रज्ञांचे मत आहे परंतु भारतातील भाजीपाल्याचा वापर यापेक्षा फार कमी आहे.
10. यासाठी भाजीपाल्याचे उत्पादन पुष्कळच वाढविणे आवश्यक आहे.

लागवडीनंतर भाजीपाल्याला व्यवस्थित भाव न मिळण्याची कारणे –

1. एखादी कंपनी जसा उत्पादित मालावर आपला नफा निश्चित करीत असते तसा विचार शेतकरी करू शकत नाही.
2. कारण उत्पादनाची शाश्वती देता येत नाही आणि सर्व काही निसर्गाच्या लहरीपणावर अवलंबून असते.
3. एखादे पीक आले तर त्यावर कीडच येणार नाही हे तो ठरवू शकत नाही.
4. सगळे काही उघड्या आभाळाखाली असल्याने वादळ, अवकाळी, वाढत्या उन्हाच्या झळा या सर्व संकटाचा सामना करावा लागतो.
5. त्यातून पीक आले तर पुन्हा बाजारात दलालांच्या हाती दराच्या दोऱ्या असल्याने सर्व काही बेभरवशाचेच झाले आहे.
6. यातून दराची हमी कशी देता येईल याचा विचार तज्ज्ञांनी करण्याची गरज आहे.



भाज्यांचे वार्षिक वेळापत्रक | calendar for vegetable grown in Maharashtra –

A. मुख्य पीक – जास्त कालावधी व अंतर लागणारी पिके –

1. कांदा –

लागवड – मे – जून
काढणी – सप्टेंबर – ऑक्टोबर

लागवड – ऑगस्ट – सप्टेंबर
काढणी – डिसेंबर – जानेवारी

लागवड – ऑक्टोबर – नोव्हेंबर
काढणी – फेब्रुवारी – मार्च – एप्रिल

2. काकडीवर्गीय भाज्या: दुधी, दोडका, कारली, काकडी, तांडा, पडवळ –

लागवड – मे – जून
काढणी – जुलै – ऑगस्ट

लागवड – सप्टेंबर – ऑक्टोबर
काढणी – नोव्हेंबर – डिसेंबर

लागवड – जानेवारी – फेब्रुवारी
काढणी – मार्च – एप्रिल

3. टोमॅटो, वांगी, मिरची, ढोबळी –

लागवड – मे – जून
काढणी – ऑगस्ट – सप्टेंबर – ऑक्टोबर

लागवड – सप्टेंबर – ऑक्टोबर
काढणी – डिसेंबर – जानेवारी

लागवड – जानेवारी – फेब्रुवारी
काढणी – मार्च – एप्रिल



B. आंतरपीक : कमी कालावधी आणि उभट वाढ –

1. कोबी, फ्लॉवर, नवलकोल –

लागवड – जून – जुलै
काढणी – सप्टेंबर – ऑक्टोबर

लागवड – ऑगस्ट – सप्टेंबर
काढणी – नोव्हेंबर – डिसेंबर

लागवड – ऑक्टोबर – नोव्हेंबर
काढणी – जानेवारी – फेब्रुवारी

लागवड – डिसेंबर – जानेवारी
काढणी – मार्च – एप्रिल

2. श्रावण घेवडा, चवळी, मटार आदी शेंगभाज्या –

लागवड – मे
काढणी – जुलै – ऑगस्ट

लागवड – जुलै
काढणी – सप्टेंबर – ऑक्टोबर

लागवड – सप्टेंबर
काढणी – नोव्हेंबर – डिसेंबर

लागवड – नोव्हेंबर
काढणी – जानेवारी – फेब्रुवारी

लागवड – जानेवारी
काढणी – मार्च – एप्रिल

3. भेंडी आणि गवार –

लागवड – मे – जून
काढणी – जुलै – ऑगस्ट

लागवड – सप्टेंबर
काढणी – नोव्हेंबर

लागवड – जानेवारी – फेब्रुवारी
काढणी – मार्च – एप्रिल

4. बटाटा –

लागवड – जून
काढणी – सप्टेंबर

लागवड – सप्टेंबर – ऑक्टोबर
काढणी – जानेवारी

5. सलाड व कंदभाज्या: गाजर, बीट, मुळा, सलाड (हिवाळी ) –

लागवड – जून – जुलै
काढणी – ऑगस्ट – सप्टेंबर

लागवड – ऑगस्ट – सप्टेंबर
काढणी – ऑक्टोबर – नोव्हेंबर

लागवड – ऑक्टोबर – नोव्हेंबर
काढणी – डिसेंबर – जानेवारी

लागवड – डिसेंबर – जानेवारी
काढणी – फेब्रुवारी – मार्च

6. विशेष भाज्या: – तोंडली, पापडी, डबल बीन्स, पावटा, वेल घेवडा, शेवगा, सुरण, आले, हळद, आांबेहळद, कढीपत्ता, मका –

लागवड – मे
काढणी – ऑक्टोबर – नोव्हेंबर – डिसेंबर – जानेवारी



Conclusion I सारांश –

शेतकरी मित्रांनो तुम्हाला krushi doctor या वेबसाइट वरील आमचा महाराष्ट्रात भाजीपाला कोणत्या महिन्यात लावावा (vegetable grown in maharashtra) हा लेख तुम्हाला कसा वाटला वाटला हे खाली कमेंट बॉक्स मध्ये सांगायला विसरू नका. आणि हा लेख जर तुम्हाला आवडला तर तुमच्या इतर शेतकरी मित्रांसोबत शेयर नक्की करा. आणखी अशा प्रकारची कृषीविषयक माहिती पाहण्यासाठी आमच्या krushi doctor या वेबसाईटला नक्की भेट द्या.

FAQ’s | वारंवार विचारले जाणारे प्रश्न –

1. भाज्यांमध्ये कोणते घटक आढळतात?
उत्तर – भाज्यांमध्ये पोटॅशियम, मॅग्नेशियम, कॅल्शियम आणि फॉस्फरस सारख्या मॅक्रोन्युट्रिएंट्स तसेच जस्त, लोह आणि तांबे यासारख्या आवश्यक ट्रेस घटकांचा समावेश आहे.

2. मिरची लागवड कधी करावी?
उत्तर – हंगाम खरीप पिकाची लागवड जून, जूलै महिन्‍यात आणि उन्‍हाळी पिकाची लागवड जानेवारी फेब्रूवारी महिन्‍यात करावी.

3. भाज्यांचे 4 मुख्य प्रकार कोणते आहेत?
उत्तर – पानेदार हिरवे – कोशिंबिरीसाठी वापरण्यात येणारा एक पाला व त्याचे झाड, पालक आणि चांदीचे बीट . क्रुसिफेरी – कोबी, फुलकोबी, ब्रसेल्स स्प्राउट्स आणि ब्रोकोली. मज्जा – भोपळा, काकडी आणि झुचीनी. रूट – बटाटा, रताळे आणि यम.

4. टोमॅटो वर कोणत्या प्रकारच्या किडी येतात?
उत्तर – टोमॅटो वर फळे पोखरणारी अळी, पाने खाणारी अळी, मावा, पांढरी माशी, फुल किडे इत्यादी प्रकारच्या किडी येतात.

5. माणसाच्या आहारात दररोज किती भाजीपाला असावा आणि सध्या किती आहे?
उत्तर – आहारात दर माणशी दररोज कमीत कमी 285 ग्रॅ. भाजीपाला असावा आणि त्यापेकी 115 ग्रॅ. पालेभाज्या असाव्यात, असे आहारशास्त्रज्ञांचे मत आहे परंतु भारतातील भाजीपाल्याचा वापर यापेक्षा फार कमी आहे.



लेखक –

कृषी डॉक्टर सूर्यकांत
9168911489


शेयर करा