शेयर करा

uzi fly control

शेतकरी मित्रांनो नमस्कार, Krushi Doctor (कृषी डॉक्टर) या शेती विषयक माहिती देणाऱ्या वेबसाइट वरती आम्ही आपले सहर्ष स्वागत करत आहे. आजच्या लेखामध्ये आपण रेशीम कीटकावरील उझी माशी चे नियंत्रण (uzi fly control) विषयी सविस्तर माहिती पाहणार आहोत. यामध्ये प्रामुख्याने उझी माशीचा प्रादुर्भाव कसा होतो, उझी माशीच्या नियंत्रणासाठी काय उपाय योजना आहेत याबद्दल आपण सविस्तर माहिती पाहणार आहोत.

उझी माशी विषयी –

रेशीम कीटक व अळीवर उपजीविका करणारी परोपजीवी कीड म्हणजे उझी माशी (शा. नाव – एक्झोरिस्टा बॉम्बीस) होय. या उझी माशीच्या प्रादुर्भावामुळे कोषांचे 5 ते 15 टक्क्यापर्यंत नुकसान होते. कर्नाटकमध्ये प्रादुर्भावाचे प्रमाण अधिक असून, महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये प्रादुर्भाव दिसून येत आहे.

प्रजाती –

1. भारतीय उझी माशी
2. जपानी उझी माशी
3. काळी उझी माशी
4. टसर उझी माशी

नुकसानीचा प्रकार –

उझी माशी (uzi mashi) एक किंवा दोन पांढऱ्या दुधाळ रंगाची, टाचणीच्या डोक्याच्या आकाराची अंडी 4 थ्या किंवा 5 व्या वाढीच्या अवस्थेतील अळीच्या त्वचेवर अंडी घालते. उझी माशीचा अंडी उबवण काळ 48 ते 62 तासांचा असतो. अंडी फुटून अळ्या (मॅगट) बाहेर पडल्यानंतर तिच्या छाती जवळील हुकच्या साहाय्याने छिद्र करून रेशीम कीटकाच्या शरीरात प्रवेश करतात. त्या ठिकाणी काळा डाग पडतो. या रेशीम कीटकांच्या शरीरावरील काळ्या डागा वरून उझी माशीचा प्रादुर्भाव झालेला ओळखता येतो.



उझी माशी नियंत्रण | Uzi fly control –

अ. संगोपन गृहाचे व्यवस्थापन –

1. संगोपन गृहाच्या सर्व खिडक्यांना माशीच्या नियंत्रणासाठी सापळे (uzi fly trap) लावावे.
2. एक लिटर पाण्यात उझीनाशकाची एक गोळी टाकून द्रावण तयार करावे. पांढ­ऱ्या रंगाच्या प्लॅस्टिक ट्रेमध्ये हे द्रावण ओतावे. हे द्रावण पिवळ्या रंगाचे असते. हा ट्रे खिडकीच्या आतील व बाहेरील बाजूस ठेवावा.
3. संगोपन गृह, कोष खरेदी केंद्र, अंडीपुंज निर्मिती केंद्र, धागानिर्मिती केंद्र अशा सर्व ठिकाणी अळ्या, कोष गोळा करून जाळून नष्ट करावेत. या सर्व ठिकाणच्या जमिनीच्या भेगा बुजवून घ्याव्यात.
4. गोळा केलेल्या अळ्या, कोष 0.5 टक्का डिटर्जंटच्या द्रावणात टाकून नष्ट करावेत.
5. रेशीम कीटकाच्या तिस­ऱ्या अवस्थेपासून पुढे उझी माशी सापळे कोष विणन काळापर्यंत रॅकवर लावावे.
6. रेशीम कीटकांना उझी नाशक गोळी किंवा सापळ्यांचा त्रास होत नाही.

( शेती निगडीत नव-नवीन विडियो पाहण्यासाठी येथे क्लिक करा – कृषि डॉक्टर यूट्यूब चॅनल)

ब. जैविक पद्धतीने नियंत्रण | Uzi fly control by organic method –

1. उझी माशीच्या कोषावर उपजीविका करणारे लिसोलायनेक्स थायमस हे परोपजीवी कीटक संगोपन गृहात रेशीम कीटकांनी चौथी कात टाकल्यानंतर तिसऱ्या किंवा चौथ्या दिवशी सोडावेत.
2. 100 अंडीपुंज साठी परोपजीवी कीटकाचे दोन पाऊच लागतात.
3. रेशीम कीटक कोषावर गेल्यानंतर लिसोलायनेक्स थायमस परोपजीवी कीटकांचे पाऊच चंद्रिकेजवळ ठेवावेत.
4. कोश काढणीनंतर परोपजीवी कीटकांचे पाऊच खताच्या खड्ड्याजवळ ठेवावे.
5. परोपजीवी कीटकांची केंद्रीय रेशीम संशोधन आणि प्रशिक्षण संस्था, मैसूर येथे आवश्यकतेनुसार मागणी नोंदवावी.
6. मागणी करताना रेशीम कीटक अंडीपुंज संख्या आणि अंडी फुटण्याची तारीख त्यावर नमूद करावी.
7. केंद्रीय रेशीम संशोधन आणि प्रशिक्षण संस्था, म्हैसूर येथून अगोदर पैसे भरून मागणी केली तर पोस्ट किंवा कुरियरच्या साह्याने परोपजीवी कीटकांचे पाऊच पाठवले जातात.
8. उशी माशीच्या नियंत्रणासाठी फवारणी केंद्रीय रेशीम संशोधन आणि प्रशिक्षण संस्थेने उशी माशीच्या नियंत्रणासाठी उझी साइड, 2 टक्के ब्लिचिंग पावडर द्रावण, उझी पावडर आणि उझी नाश याची शिफारस केलेली आहे.
9. केंद्रीय रेशीम संशोधन आणि प्रशिक्षण संस्थेच्या सल्ल्यानुसार रासायनिक उझीनाशकाची फवारणी आणि जैविक उपाय एकाच वेळी केले तर 77 टक्के उझी माशीवर नियंत्रण मिळवता येते.
10. उझी साइड, जैविक उपाय आणि उझी ट्रॅप या तिन्ही उपायांचा एकाच वेळी वापर केला तर 84 टक्यांपर्यंत उझी माशीवर नियंत्रण मिळविता येते.

क. संगोपन गृहाची स्वच्छता महत्त्वाची –

1. राज्यात 99 टक्के कच्चे शेडनेट संगोपनगृह आहेत.
2. शक्यतो पक्के सिमेंट काँक्रीटमध्ये बांधकाम करून शिफारशीप्रमाणे दरवाजे खिडक्या आणि हवा खेळती राहण्यासाठी तिरपी वायुविजन व्यवस्था करावी.
3. खालच्या व वरच्या बाजूस झरोके ठेवावेत.
4. सर्व खिडक्या व दरवाज्यांना नायलॉन वायर मेश जाळीचे संरक्षण करावे, म्हणजे उझी माशी कीटक संगोपनगृहात सरळ प्रवेश करणार नाही.
5. संगोपनगृहात सरळ प्रवेश व्यवस्थेऐवजी बाहेर लहान खोली तयार करून त्यामध्ये प्रवेश करून नंतर दुसऱ्या दरवाज्यामधून आत प्रवेश व्यवस्था असावी.
6. दरवाजे आपोआप बंद होण्याची व्यवस्था असावी. म्हणजे उझी माशीला मज्जाव होईल.
7. तुती पाने साठवण करण्यासाठी वेगळी अंधारी खोली असावी.
8. फांदी खाद्य देण्याअगोदर उझी माशी फांद्या किंवा पानांद्वारे सरळ संगोपन गृहात प्रवेश करते.
9. यासाठी नियंत्रणाच्या उपाययोजना कराव्यात.
10. संगोपन गृहात उंदीर येणार नाहीत याची काळजी घ्यावी.
11. कोष विक्री केलेल्या बाजारातून पोते घरी आणू नये. कारण या सोबत उझी माशीच्या अळ्या, कोष आपल्या संगोपन गृहात येण्याची शक्यता असते.
12. प्रादुर्भावग्रस्त गावात एक दीड महिना (एप्रिल व मे महिना) रेशीम कोषाचे पीक बंद ठेवावे.



Conclusion I सारांश –

शेतकरी मित्रांनो तुम्हाला krushi doctor या वेबसाइट वरील आमचा uzi fly control: रेशीम कीटकावरील उझी माशीचे नियंत्रण हा लेख तुम्हाला कसा वाटला वाटला हे खाली कमेंट बॉक्स मध्ये सांगायला विसरू नका. आणि हा लेख जर तुम्हाला आवडला तर तुमच्या इतर शेतकरी मित्रांसोबत शेयर नक्की करा. आणखी अशा प्रकारची कृषीविषयक माहिती पाहण्यासाठी आमच्या krushi doctor या वेबसाईटला नक्की भेट द्या.

FAQ’s | वारंवार विचारले जाणारे प्रश्न –

1. रेशीम किडे किती काळ जगतात?
उत्तर – रेशीम किड्याचे जीवन चक्र. रेशीम किड्याचे संपूर्ण आयुष्य 6 ते 8 आठवडे असते.

2. कोणता कीटक रेशीम तयार करण्यासाठी वापरल्या जाणार्‍या बारीक सूत तयार करण्यास मदत करतो?
उत्तर – रेशीम कीटक पतंग, (बॉम्बिक्स मोरी), लेपिडॉप्टेरा ज्याचा सुरवंट हजारो वर्षांपासून रेशीम उत्पादनात (सेरीकल्चर) वापरला जातो.

लेखक –
सूर्यकांत इर्लेकर
मू. पो – इर्ले, तालुका – बार्शी, जिल्हा – सोलापूर.
राज्य – महाराष्ट्र. पिन – 413412


शेयर करा